-- आदेश --
( पारित दि. 01.04.2011)
द्वारा सौ. अलका उमेश पटेल, सदस्या
तक्रारकर्ता श्री. शोभेलाल मोहनलाल कटरे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1 तक्रारकर्ता यांनी वि.प. यांच्याकडून विज कनेक्शन घेतला व त्याचा D.L.No.000054 व ग्राहक क्रमांक 431050400451 असा आहे. वि.प. यांनी तक्रारकर्त्याला ऑगस्ट 2010 या कालावधीचे 791 युनिटचे रु.4290/- चे बिल दिले. सदर बिल न भरल्यामुळे वि.प.यांनी विजपुरवठा खंडीत केला आहे. .
2 तक्रारकर्ता मागणी करतात की, वि.प.यांच्या सेवेत न्युनता आहे असे घोषित करावे तसेच त्यांनी ऑगस्ट 2010 च्या बिलामध्ये सुधारणा करावी व झालेल्या त्रासासाठी रुपये 60,000/- व शारीरिक, मानसिक त्रासासाठी 20,000/- तर न्यायालयीन खर्च म्हणून 10,000/- रुपये मिळावे.
3 वि.प. म्हणतात की, तक्रारकर्ता हे आपल्या विजेचे बिल वेळेवर भरते नव्हते व लाईन मेन यांनी दिलेली दि. 11.11.2010 ची इन्क्वायरी रिपोर्ट तक्रारकर्ता यांनी कनिष्ठ अभियंता सालेकसा यांच्याकडे दाखल केली नाही. म्हणून त्यांना सुधारित बिल देण्यात वेळ झाला आहे. म्हणून तक्रारकर्ता यांची सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
5 तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज , इतर पुरावा यांचे अवलोकन केले असता मंचाच्या असे निदर्शनास आले की, तक्रारकर्ता यांनी मंचात इंटरिम रिलीफसाठी अर्ज केल्यामुळे खंडीत विजपुरवठा वि.प.यांनी जोडलेला आहे. तसेच वि.प.यांनी तक्रारकर्ताच्या तक्रारीत बिलामध्ये सुधारणा करुन रु.340/- चे बिल दिले आहे व ते बिल तक्रारकर्ता यांनी भरलेले आहे. दि. 11.11.2010 चा इन्क्वायरी रिपोर्ट लाईन मेन यांनी त.क.ला दिली याबद्दल शपथपत्र, पुरावा रेकॉर्डवर नाही. परंतु वि.प. यांच्या गलथानपणामुळे त.क. ला जवळ-जवळ दिड महिना विद्युतपुरवठा नसल्यामुळे अंधारात राहण्याचा त्रास सहन करावा लागला यात शंका नाही. तक्रारकर्ता हे नियमित विज देयक भरत नव्हते हे दर्शविण्यासाठी वि.प.यांनी कोणतेही दस्ताएवज दाखल केले नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 त.क. यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 वि.प.क्रं. 1 व 2 यांनी त.क. ला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासासाठी रु.3000/- व
न्यायालयीन खर्च म्हणून रु.2000/- द्यावे व हे रु.5000/- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांच्या पुढील देयकांमध्ये समायोजित करुन द्यावेत.