Maharashtra

Nagpur

CC/690/2019

SMT. KIRAN WD/O. PRAKASH NAKTODE - Complainant(s)

Versus

BALABHAU PETH NAGRIK GRIHNIRMAN SAHAKARI SANSTHA LTD. NAGPUR, THROUGH PRESIDENT/SECRETARY - Opp.Party(s)

ADV. R.S. NAKTODE

17 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/690/2019
( Date of Filing : 04 Dec 2019 )
 
1. SMT. KIRAN WD/O. PRAKASH NAKTODE
R/O. PLOT NO. 12-A, BEHIND CHAMAT SCHOOL, ADARSH NAGAR, RING ROAD SQUARE, DIGHORI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BALABHAU PETH NAGRIK GRIHNIRMAN SAHAKARI SANSTHA LTD. NAGPUR, THROUGH PRESIDENT/SECRETARY
PLOT NO. 64, KAWRAPETH, SHANTINAGAR, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Mar 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्षाने  मौजा दिघोरी, तहसील जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक ५४/४, मौजा क्रमांक १३९, पटवारी हलका क्रमांक ३४, थाक क्रमांक १७२, या लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक १२ऐ, एकूण क्षेञफळ १९७४.६८८ चौरस फुट (१८३.४५३ चौरस मीटर) तक्रारकर्तीच्‍या पतीला दाखविला व उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) लेआऊट रस्‍त्‍यामध्‍ये असल्‍याचे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या पतीला दाखविले. त्‍यामुळे  प्‍लॉट क्रमांक १२ऐ नकाशाप्रमाणे १५९६ चौरस फुट (१४८.२७ चौरस मीटर) आहे. विरुध्‍द पक्ष सोसायटीने तक्रारकर्तीच्‍या  पतीला आश्‍वासीत केले की, सदर लेआऊट नकाशामध्‍ये नंतर सुधारणा करण्‍यात येईल आणि उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) तक्रारकतीच्‍या पतीच्‍या नावाने करण्‍यात येईल परंतु त्‍याला थोडा अवधी लागेल. विरुध्‍द पक्षाने एकूण प्‍लॉटचे क्षेञफळ १९७४.६८८ चौरस फुट (१८३.४५३ चौरस मीटर) पैकी १५९६ चौरस फुट (१४८.२७ चौरस मीटर) प्‍लॉटचे विक्रीपञ तक्रारकर्तीच्‍या पतीला लावून दिले. तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाला उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) ची रक्‍कम अदा केली व ती विरुध्‍द पक्षाने स्विकारली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या पतीला दिनांक ९/६/२०१४ रोजी उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) चे कब्‍जा पञ लिहून दिले व खाली जागेचा ताबा दिला आणि तेव्‍हापासून सदर जागा तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या कब्‍जात आहे.  
  3. सन १९९६ रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीने प्‍लॉटवर घर बांधले व प्‍लॉट क्रमांक १२ ऐ, एकूण क्षेञफळ १९७४.६८८ चौरस फुट (१८३.४५३ चौरस मीटर) वर कुटुंबासमवेत राहायला सुरुवात केली. तक्रारकर्तीच्‍या पतीने विक्रीपञानुसार दिनांक ९/५/२०१४ रोजी प्‍लॉट क्रमांक १२ ऐ, एकूण क्षेञफळ १४०.५६९ नियमीत केला व Maharashtra Gunthewari Development (Regulation, Upgradation and Control Ordinance, 2001 and NIT Board Resoluation, dated 27/1/2001 Vide permit No. BE (S) (572/320/2001) of 2003, dated 30/05/2003 अन्‍वये डिमांड प्रमाणे रुपये २६५१२/- अदा करुन त्‍याने १९.५८ चौरस मीटर बांधकाम स्‍वतःच्‍या नावाने केले.
  1. तक्रारकर्तीच्‍या पतीचे दिनांक १६/११/२०१७ रोजी निधन झाले. तक्रारकर्तीने दस्‍ताऐवजाचा शोध घेतला तेव्‍हा तिच्‍या निर्दशनास आले की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीच्‍या पतीला प्‍लॉट क्रमांक १२ऐ मधील १५९६ चौरस फुटाचे विक्रीपञ करुन दिले व उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चे विक्रीपञ तक्रारकर्तीच्‍या पतीला करुन दिले नाही. फक्‍त प्‍लॉट चे कब्‍जापञ करुन दिले आहे. तक्रारकर्तीने अनेक वेळा विरुध्‍द पक्षाचे सोसायटीला भेट दिली व उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) चे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला उर्वरीत प्‍लॉटचे विक्रीपञ करुन देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक २०/१०/२०१८ रोजी सोसायटीचे अध्‍यक्ष श्री एस.जी. काळे यांना पञ दिले व त्‍याव्‍दारे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत विनंती केली. विरुध्‍द पक्ष सोसायटीला पञ प्राप्‍त होवूनही त्‍यांनी दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला न्‍युनतम सेवा देवून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला खसरा क्रमांक ५४/४, मौजा क्रमांक १३९, पटवारी हलका क्रमांक ३४, थाक क्रमांक १७२, या लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक १२ऐ, मधील उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ  ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) चे विक्रीपञ करुन द्यावे. जर विरुध्‍द पक्ष सोसायटीला प्‍लॉटचे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला प्‍लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम २४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी किंवा आजच्‍या बाजार भावाने प्‍लॉटची किंमती परत करावी.
  3. मानसिक व शारीरिक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च द्यावा.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत रजिस्‍टर्ड ए.डी.व्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होवूनही विरुध्‍द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही करिता मंचाने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ९/३/२०२० रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज व लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                      उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                        अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. विरुध्‍द पक्षाचा जमीन विकसीत करुन प्‍लॉट विक्रीचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल अॅनेक्‍स्‍चर A चे अवलोकन केले असता निर्दशनास ये‍ते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचे मौजा दिघोरी, तहसील जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक ५४/४, मौजा क्रमांक १३९, पटवारी हलका क्रमांक ३४, थाक क्रमांक १७२, या लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक १२ऐ, एकूण क्षेञफळ १५९६ चे विक्रीपोटी रुपये ४८०००/- स्विकारुन प्‍लॉटचे विक्रीपञ दिनांक ९/५/१९९४ रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीला करुन दिले व निशानी क्रमांक २ वर दाखल अॅनेक्‍स्‍चर बी चे अवलोकन केले असता निर्दशनास येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या पतीकडून रुपये ५००/- स्विकारुन त्‍याच लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक १२ ऐ च्‍या लगत असलेली जागा एकूण क्षेञफळ ३७८.६८८ चौ. फुट (३५.१९ चौरस मीटर) चे कब्‍जापञ तक्रारकर्तीच्‍या  पतीला दिनांक ९/६/२०१४ रोजी करुन दिले व विक्रीपञ करुन देण्‍याचे आश्‍वासीत केले होते. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल अॅनेक्‍स्‍चर ए व बी चे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.  विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च  न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. तक्रारकर्तीच्‍या पतीचे दिनांक १६/११/२०१७ रोजी निधन झाल्‍यानंतर तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला तिच्‍या कब्‍ज्‍यामध्‍ये  असलेल्‍या उर्वरीत प्‍लॉट एकूण क्षेञफळ ३७८.६८८ ( ३५.१९ चौरस मीटर) चे विक्रीपञ नोंदणी करुन देण्‍याबाबत विनंती केली व दिनांक २०/१०/२०१८ रोजी सोसायटीचे अध्‍यक्ष यांना पञ दिले परंतु विरुध्‍द पक्षाने कब्‍जापञामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीकडून प्‍लॉट विक्रीपोटी रक्‍कम रुपये ५००/- स्विकारुनही तक्रारकर्तीला विक्रीपञ करुन दिले नाही ही विरुध्‍द  पक्षाची तक्रारकर्ती प्रति ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला मौजा दिघोरी, तहसील जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक ५४/४, मौजा क्रमांक १३९, पटवारी हलका क्रमांक ३४, थाक क्रमांक १७२, या लेआऊट मधील तक्रारकर्तीचा भूखंड क्रमांक १२ऐ च्‍या लगत असलेल्‍या आणि तिच्‍या कब्‍ज्‍यामध्‍ये असलेल्‍या एकूण क्षेञफळ ३७९.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) वादातीत भूखंडाचे विक्रीपञ करुन द्यावे. विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.

                                                                      किंवा

      विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्तीचे ताब्‍यात असलेल्‍या एकूण क्षेञफळ ३७९.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) भूखंडाचे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने मौजा दिघोरी, तहसील जिल्‍हा  नागपूर येथील खसरा क्रमांक ५४/४, मौजा क्रमांक १३९, पटवारी हलका क्रमांक ३४, थाक क्रमांक १७२, या लेआऊट मधील आदेशाच्‍या दिवशी असलेल्‍या   शासकीय दराने तक्रारकर्तीला ३७८.६८८ चौरस फुट (३५.१९ चौरस मीटर) भूखंडाची किंमत आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिण्‍याचे आत अदा करावी. सदरहु रक्‍कम  एक महिण्‍याचे आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक १७/३/२०२१ पासून द.शा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. आदेशानुसार भूखंडाची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्तीने वादातीत भूखंडाचा ताबा विरुध्‍द पक्षाला द्यावा.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा क.रावे.
  3. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  4. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.