(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवालाकडून मुदतठेवीची रक्कम रु.11,31,833/- मिळावी, या रकमेवर आजपावेतो 12% दराने व्याज मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.1 लाख व अर्जाचा खर्च रु.15,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी याकामी पान क्र.25 लगत लेखी म्हणणे व पान क्र.27 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय?-- होय.
3. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-होय.
4. अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून ठेवपावतीवरील रक्कम व्याजासह वसूल होऊन
मिळणेस पात्र आहेत काय?-- होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः
मंजूर करणेत येत आहे
तक्रार क्र.146/11
विवेचनः
याकामी अर्जदार यांचेवतीने पान क्र.30 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.31 लगत युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केलेली आहे.
अर्जदार यांनी याकामी पान क्र.8 ते पान क्र.14 लगत ठेवपावतींच्या झेरॉक्स प्रमाणीत प्रती हजर केलेल्या आहेत. पान क्र.8 ते पान क्र.14 चे कागदपत्र सामनेवाले यांनी स्पष्टपणे नाकारलेले नाहीत. पान क्र.8 ते पान क्र.14 चे ठेवपावतींचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “तक्रारीस मुदतीची बाध येते. सामनेवाला बँकेवर अवसायकाची नेमणुक झालेली आहे. अवसायकाविरुध्द कुठलाही दावा कोणत्याही कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असेल वा दाखल करावयाचा असेल तर त्यासाठी सहकार खात्याची परवानगी घेणे सहकार कायदा कलम 107 अन्वये अनिवार्य आहे. सामनेवाला बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी निर्बंध टाकलेले होते. दरम्यानच्या काळात रिझर्व बँकेचाच एक विभाग-डिपॉझीट इंश्युरन्स अँण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन्स यांनी बँकेकडे त्याबाबतची रक्कम वर्ग केलेली आहे परंतु अशी रक्कम वर्ग करतांना डि.आय.सी.जी.सी अँक्ट 1961 चे कलम 21(2) अन्वये व डी.आय.जी.सी जनरल जनरल रेग्युलेशन अँक्ट 1961 चे कलम 22(अ) अन्वये प्रत्येक ठेवीदाराला 1 लाखाचे वर रक्कम देणे शक्य नाही कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. तरतुदीनुसार देण्यात येणारी रक्कम रु.1 लाख ही यापुर्वीच अर्जदार यांना देण्यात आलेली आहे. ही बाब अर्जदार यांनी अर्ज कलम 4 मध्ये मान्य केलेली आहे.अशा परिस्थितीत प्रस्तुत ठेवीदाराला त्याने अर्जात मागितलेली रक्कम देता येणार नाही.” असे म्हटलेले आहे.
याबाबत अर्जदार यांनी तक्रार दाखल करतांनाच विलंब माफीचा अर्ज सादर केलेला आहे. सदरचा अर्ज दि.7/7/2011 रोजी मंजूर करण्यात येवून तक्रार अर्जास झालेला विलंब माफ करण्यात आलेला आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांना पान क्र.19 प्रमाणे दि.07/1/2011 रोजी पत्र दिलेले आहे. विलंब माफी अर्जावरील आदेश व पान क्र.19 चे पत्र याचा विचार होता अर्जदार यांचा अर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला बँकेवर अवसायकाची नेमणूक झालेली असली तरी कर्जदार यांचेकडून कर्जाऊ रकमेची वसुली करुन ठेवीदारांची ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाला बँक/अवसायक यांचेवर आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान
तक्रार क्र.146/11
क्र.15 ते 18 प्रमाणे नोटीस पाठवलेल्या आहेत. सदर नोटीशी मिळाल्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांची पान क्र.8 ते पान क्र.14 चे ठेवपावतीवरील संपूर्ण रक्कम व्याजासह परत केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
याबाबत मंचाचे वतीने मा.राष्ट्रीय आयोग नविदिल्ली यांचेसमोरील रिव्हीजन अर्ज क्र.2528/2006 नि.ता.24/7/2008 भारतीय रिझर्व बँक वि. ईश्वर आप्पा या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
पान क्र.8 ते पान क्र.14 चे ठेवपावतींचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून पान क्र.8 ते पान क्र.14 चे ठेवपावतींवरील संपुर्ण रक्कम रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांचेकडून रक्कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे दोन्ही बाजुंची युक्तीवादाबाबतची पुरसीस, वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला यांनी पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
(अ) ठेवपावती क्र.47585 याचा खाते क्र.3/26190 वरील रक्कम रु.3,57,135/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.1/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
तक्रार क्र.146/11
(ब) ठेवपावती क्र.42014 याचा खाते क्र.3/26218 वरील रक्कम रु.3,36,974/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.7/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
(क) ठेवपावती क्र.47591 याचा खाते क्र.3/26196 वरील रक्कम रु.2,11,881/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.1/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
(ड) ठेवपावती क्र.47616 याचा खाते क्र.3/0092 वरील रक्कम रु.1,07,236/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.1/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावी.
(इ) ठेवपावती क्र.47573 याचा खाते क्र.3/26178 वरील रक्कम रु.1,52,415/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.1/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
(ई) ठेवपावती क्र.47690 याचा खाते क्र.3/26200 वरील रक्कम रु.1,04,072/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.3/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
(उ) ठेवपावती क्र.47572 याचा खाते क्र.3/26177 वरील रक्कम रु.62,120/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.1/9/2006 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत.
(4) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/-दयावेत.
(5) वर कलम 2 (अ) ते (ऊ) प्रमाणे देय असलेल्या रकमेपैकी काही रक्कम यापूर्वी अर्जदार यांना सामनेवाले बँकेने अदा केलेली असल्यास त्याची वजावट वरील 2 (अ) ते 2(उ) रकमेतून करावी.