Maharashtra

Nagpur

CC/317/2019

VIHANG VINAYAK SAKHARE - Complainant(s)

Versus

BAJAJ FINANCE/FINSERV, THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. G.T. RAMTEKE

15 Apr 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/317/2019
( Date of Filing : 06 Jun 2019 )
 
1. VIHANG VINAYAK SAKHARE
R/O. 51, C-LAYOUT, BEZONBAGH, NR. INDORA CORPORATION HOSPITAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BAJAJ FINANCE/FINSERV, THROUGH BRANCH MANAGER
LOTUS BUILDING 1ST FLOOR, DHARAMPETH, NAGPUR/ RIAAN HOUSE, 3RD FLOOR, NEXA SEVA CENTRE, KINGSWAY, KASTURCHAND PARK, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Apr 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने लोटस (इलेक्‍ट्रॉनिक सुपर मार्केट) VLYTRI Willows 3, Sir  Benzonji Mehta Road Opp. Empress City, Nagpur यांचेकडून सोनी कंपनीचा होम थेटर DAV-DZ-35, दिनांक ३०/०६/२०१७ रोजी पावती क्रमांक ३५ आर १७००९४२ अन्‍वये रुपये २०,१९९/- इतक्‍या  किंमतीत विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने होम थेटर खरेदीपोटी रुपये ५,१२२/- पावती क्रमांक ३६एम १७००२९१ अन्‍वये अदा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष कंपनीकडून 0% व्‍याज दराने १५,८६८/- इतके कर्ज होम थेटर खरेदीपोटी केस क्रमांक ४०६० सीडी ४५२८९९६६ अन्‍वये घेतले, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे कर्ज अप्रुवल नंबर एसएफ ६७७२६३९० अन्‍वये मंजूर केले. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला कर्जापोटी एकूण रुपये १६,२५८/- प्रत्‍येकी मासिक हफ्ता रुपये १,१६७/- प्रमाणे एकूण १४ हफ्त्‍यात अदा करावयाचे होते. विरुध्‍द पक्षाने कस्‍टमर आयडी ४९०३७२४६ असलेले कर्ज खाते विवरण क्रमांक ४०६०सीडी४५२८९९६६ ई.एम.आय. आदेश तक्रारकर्त्‍याला दिला. सदरची कर्ज हफ्त्‍याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे बचत खाते क्रमांक ११९५४२६०९५ मधून प्रत्‍येक महिण्‍याला कपात होणार होती जे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, एल.आय.सी. चौक, कामठी रोड नागपूर यांचेशी संलग्‍न होते.
  3. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाचे प्रपोजल मंजूर असल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे गरजेनुसार आवश्‍यक दस्‍तऐवजावर स्‍वाक्षरी केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून कर्ज घेतले. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याने अदा करावयाचे एकूण कर्ज हफ्त्‍याचे शेड्यूल अॅनेक्‍सचर ४(बी) प्रमाणे आहे. विरुध्‍द पक्षाचे कर्मचारी श्री विशाल भरडे (२९५७४) यांनी दिनांक ६/९/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याचे घरी भेट दिली आणि तक्रारकर्त्‍याच्‍या घराचा पत्‍ता तपासला आणि काही दस्‍तऐवजावर पुढील तपासणी व चौकशी करिता तक्रारकर्त्‍याची सही घेतली. त्‍याअनुषंगाने विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पावती स्विकृती  AWB54698217866 दिली. (अॅनेक्‍सचर ५).
  4. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे बॅंक बचत खाते असलेल्‍या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, एल.आय.सी. चौक शाखेला भेट दिली आणि त्‍याचे बचत खाते क्रमांक ११९५४२६०९५ च्‍या अनुषंगाने बॅंकेत चौकशी केली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला लक्षात आले की, दिनांक ४/९/२०१७ रोजी रुपये १,१६७/- चा पहिला हफ्ता दिनांक ३/१०/२०१७ रोजी रुपये १,१६७/- चा दुसरा हफ्ता व दिनांक २/११/२०१७ रोजी रुपये १,१६७/- चा तिसरा हफ्ता तक्रारकर्त्‍याच्‍या  खात्‍यातून वळती करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याला लक्षात आले की, दिनांक १४/११/२०१७ रोजी रुपये २५०/- जीएसटी सह रुपये ४५/- असे चार वेळी एकूण रक्‍कम रुपये १,१८०/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून वळती करण्‍यात आले. (अॅनेक्‍सचर ६) तक्रारकर्त्‍याने सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया चे अधिका-यांशी संपर्क  साधला व  सदर रक्‍कम वळतीबाबत चौकशी केली. त्‍यावेळी सेंट्रल बॅंकेच्‍या अधिका-यांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, आज्ञेचे पालन न झाल्‍यामुळे सदरची रक्‍कम बॅंक सर्व्हिस चार्जेस म्‍हणून कापण्‍यात आली. त्‍याबाबतची नोंद तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खाते पुस्‍तकात आहे. बॅंक अधिका-यांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, तुमची कर्ज रक्‍कम रुपये ५०,०००/- असून त्‍या कर्जाबाबतची सविस्‍तर माहिती तक्रारकर्त्‍याला दिली. विरुध्‍द पक्षाने बॅंक अधिका-यांना कर्ज रक्‍कम रुपये ५०,०००/- बाबत प्रत दिली. (अॅनेक्‍सचर ७)
  5. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून रुपये १५,८६८/- ऐवढे कर्ज घेतले. परंतु विरुध्‍द पक्षाने कर्ज रक्‍कम रुपये ५०,०००/- दाखवून चुकीची माहिती पुरविली. बॅंक अधिका-यांनी कर्ज रक्‍कम रुपये ५०,०००/- दाखविणारे एक स्‍टेटमेंट निर्गमीत केले. (अॅनेक्‍सचर ८) विरुध्‍द पक्ष बॅंकेने चुकीने तक्रारकर्त्‍याचा तोटा व बॅंकेचा फायदा घेण्‍याच्‍या दृष्‍टीने दगाबाजी करुन लबाडीने कर्जाबाबत चुकीची माहिती पुरविली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनतम सेवा तसेच चुकीची पद्धत वापरली आहे.
  6. विरुध्‍द पक्षाने दिनांक १४/११/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याचे बचत खाते क्रमांक ११९५४२६०९५ सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, एल.आय.सी. चौक नागपूर मधून रुपये ५०,०००/- रक्‍कम काढण्‍याचा प्रयत्‍न केला. विरुध्‍द पक्षाने दिनांक १४/११/२०१७ रोजी चारवेळा रक्‍कम खात्‍यातून ईनकॅश करण्‍याचा प्रयत्‍न केला. तक्रारकर्त्‍याने बॅंक अधिका-याला विचारणा केली असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रुपये ५०,०००/- ट्रान्‍सफर करण्‍याचा प्रयत्‍न केला. बॅंकेने तक्रारकर्त्‍याला त्‍यासंबंधिचे दस्‍तऐवज दिले.(अनेक्‍सचर ९ ए व ९बी) दिनांक ३०/११/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने धरमपेठ नागपूर शाखेला भेट दिली व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला बॅंकेला दिलेले दस्‍तऐवज दाखविले. त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कळविले की,कर्ज मर्यादा रक्‍कम रुपये ५०,०००/- आहे आणि प्रत्‍यक्ष कर्ज तक्रारकर्त्‍याला रुपये १५,८६८/- देण्‍यात आले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला चुकीची माहिती दिली आणि विरुध्‍द पक्षाने न्‍युनतम सेवा देऊन धोखाखडी करीत आहे.
  7. विरुध्‍द पक्षाचे कर्मचारी तक्रारकर्त्‍यास दुरध्‍वनी करीत आहे व त्‍याव्‍दारे रुपये ४,०००/- ची मागणी करीत आहे. तक्रारकर्त्‍याने माहे २०१९ रोजी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला भेट दिली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला खात्‍याचे विवरण दिले. त्‍यामध्‍ये बोनस चार्जेस रुपये ४,०००/- दाखवित आहे. तक्रारकर्त्‍याने प्रत्‍येक महिण्‍यात खात्‍यामध्‍ये पैसाची व्‍यवस्‍था केली होती. व तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात रुपये ४०,०००/- शिल्‍लक आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मधील तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍याचे विवरण दर्शवित आहे की, तक्रारकर्त्‍याने दर महिण्‍याला कर्ज हफ्ता रक्‍कम नियमीतपणे ई.सी.एस. व्‍दारे अदा केली आहे.
  8. तक्रारकर्त्‍याने दिनांक ७/४/२०१८ विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस दिली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने दखल घेतली नाही. तक्रारकर्त्‍याने‍ दिनांक ९/२/२०१८ रोजी पोलीस स्‍टेशनला लेखी तक्रार केली परंतु त्‍याचा उपयोग झाला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- अदा करण्‍यात यावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानुसार तक्रारकर्त्‍याने दिनांक १४/७/२०१७ रोजी सोनी होम थेटर खरेदी करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडून कर्ज खाते क्रमांक ४०६०सीडी ४५२८९९६६ अन्‍वये रुपये २०,९९०/- 0% दराने कर्ज घेतले. सदर कर्ज १८ समान मासिक हफ्ता रुपये १,१६७/- प्रमाणे दिनांक २/९/२०१७ पासून अदा केले आहे. तक्रारकर्त्‍याने एकूण १८ हफ्त्‍यापैकी सुरवातीचे ४ हफ्ते (११६७ ×४) प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये ४,६६८/- आगाऊ जमा केली आहे आणि उर्वरीत रक्‍कम १४ मासिक हफ्त्‍यात अदा करायचे ठरले. मासिक कर्ज हफ्ते वेळेत जमा करण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला ऑटो डेबिट/एन.ए.सी.एच. मॅन्‍डेट व्‍यवस्‍था त्‍याचे बॅंक खात्‍यातून वळती करण्‍याकरिता पुरविण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने कर्ज मिळण्‍याकरिता अर्ज विरुध्‍द पक्षाला सादर केला आणि कर्जाच्‍या मास्‍टर शर्ती व अटी स्विकारल्‍या. सदर वस्‍तु विकत घेतेवेळी विरुध्‍द पक्षाचे अधिका-याने/प्रतिनिधीने तक्रारकर्त्‍याला कर्जाच्‍या अटी व शर्ती समजावून सांगितल्‍या. कर्जाच्‍या अटी व शर्ती विरुध्‍द पक्षाने वेबसाईटवर उपलब्‍ध आहेत. त्‍याबाबतची लिंक खालिलप्रमाणे आहे.

 

            तक्रारकर्त्‍याने कर्जाच्‍या शर्ती व अटी व्‍याजदर, लेट पेमेंट चार्जेस, अप्‍लीकेबल चार्जेस, बाऊंसिग चार्जेस समजावून घेतल्‍यावर विरुध्‍द पक्षाकडून कर्ज घेतले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे खात्‍यात आवश्‍यक रक्‍कम शिल्‍लक ठेवली नव्‍हती त्‍यामुळे ई.एम.आय. चा ऑटो डेबिट/एन.ए.सी.एच. मॅन्‍डेट बॅंकने पुरेशी रक्‍कम खात्‍यात नसल्‍याकारणास्‍तव परत पाठविला. त्‍यामुळे बाऊसिंग चार्जेस कर्ज खात्‍यात लावण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचा ई.एम.आय. नगदी विरुध्‍द पक्षाला अदा केले परंतु बाऊसिंग चार्जेस अदा केले नाही.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेल्‍या ई.एम.आय. बाबतची विस्‍तृत माहिती खालिलप्रमाणे आहे.

Sr. No.

EMI Due Date

EMI Paid On

EMI Paid in delay

1

02/09/2017

02/09/2017

NIL

2

02/10/2017

02/10/2017

NIL

3

02/11/2017

02/11/2017

NIL

4

02/12/2017

12/10/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 9 months and 10 days due to which bouncing charges have been levied.

5

02/01/2018

19/10/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 9 months and 17 days due to which bouncing charges have been levied. 

6

02/02/2018

15/02/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 13 days due to which bouncing charges have been levied. 

7

02/03/2018

13/03/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 11 days due to which bouncing charges have been levied. 

8

02/04/2018

02/04/2018

NIL

9

02/05/2018

02/05/2018

NIL

10

02/06/2018

13/06/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 11 days due to which bouncing charges have been levied. 

11

02/07/2018

13/07/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 11 days due to which bouncing charges have been levied. 

12

02/08/2018

15/09/2018

The EMI got bounced which was paid by the complainant in cash after a period of 13 days due to which bouncing charges have been levied. 

13

02/09/2018

02/09/2018

NIL

14

02/10/2018

02/10/2018

NIL

 

  1. तक्रारकर्त्‍याने मासिक कर्जहफ्ता नियमितपणे जमा केला नाही आहे. त्‍यामुळे बाऊसिंग चार्जेस तक्रारकर्त्‍याच्‍या कर्ज खात्‍यात लावण्‍यात आले आहे. कर्जखात्‍याचे स्‍टेटमेंट तपासले असता असे निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्षाकडे उपलब्‍ध असलेल्‍या कर्ज खात्‍यानुसार मासिक कर्ज हफ्ता ऑटो डेबिट च्‍या हुकमानुसार खात्‍यामध्‍ये पुरेशी रक्‍कम शिल्‍लक नसल्‍याकारणास्‍तव मासिक कर्ज हफ्ता परत आला. त्‍यामुळे बॅंकेने त्‍यापोटी बाऊसिंग चार्जेस वसुल केले. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून बॅंकेने बॅंकर्स चार्जेस वसुल केले. परंतु तक्रारकर्त्‍याने बॅंकेला सदर प्रकरणात प्रतिवादी केले नाही.
  2. विरुध्‍द पक्षाने दिनांक १४/११/२०१७ रोजी रुपये ५०,०००/- काढण्‍याचा प्रयत्‍न केला हे पूर्णतः चू‍कीचे व खोटे आहे. विरुध्‍द पक्षाचे बॅंक चमुकडून प्राप्‍त माहितीनुसार विरुध्‍द पक्षाकडून अशा प्रकारे रुपये ५०,०००/- काढण्‍यात आले नाही आणि ही बाब सन २०१७-२०१८ मधील व्‍यवहारामधून कळून येईल. (अॅनेक्‍सचर बी) तक्रारकर्त्‍याकडून विरुध्‍द पक्षाला २०१७ रोजी पाठविलेली नोटीस विरुध्‍द पक्षाचे संबंधित व्‍यक्‍तीकडे पोहचली नाही त्‍यामुळे नोटीस ला प्रतिउत्‍तर देण्‍यात आले नाही. विरुध्‍द पक्षाविरुध्‍द तक्रार दाखल करण्‍याचे कारण उद्भवले नाही. तक्रारकर्त्‍याकडून विरुध्‍द पक्षाने जास्‍तीची रक्‍कम घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार दाखल होण्‍यास पाञ नाही आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
  3. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व तक्रारकर्त्‍याचा तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        नाही
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २(१,२,३) दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर निदर्शनास ये‍ते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून होम थेटर खरेदीपोटी रुपये २०,९९०/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला रुपये १,१६७/- मासिक हफ्त्‍याप्रमाणे एकूण १८ हफ्त्‍यात अदा करावयाची होती. त्‍यापैकी ११६७/- प्रमाणे ४ हफ्त्‍याची रक्‍कम एकूण रुपये ४,६६८/- आगाऊ जमा करण्‍यात आली होती व उर्वरीत रक्‍कम रुपये १,१६७/- प्रमाणे १४ हफ्त्‍यात अदा करावयाची होती. वरील नमूद निशानी क्रमांक २ वरील दस्‍तऐवजावरुन हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २(६) वर दाखल बचत खात पुस्‍तीकानुसार तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात पुरेशी रक्‍कम शिल्‍लक असतांना तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून दिनांक १४/११/२०१७ रोजी ४ वेळा मॅन्‍डेट फेल कारणास्‍तव रुपये २५०/- व जी.एस.टी. रुपये ४५/- सह एकूण १,१८०/- वळती करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून एकूण रुपये १,१८०/- वळती करण्‍याचा वाद हा बॅंकेशी आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्‍युनतम सेवा दिलेली नाही आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.