Maharashtra

DCF, South Mumbai

CC/19/174

LALCHANDRA YADAV - Complainant(s)

Versus

BAJAJ ELECTRICALS LTD - Opp.Party(s)

30 Sep 2019

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/19/174
( Date of Filing : 06 Sep 2019 )
 
1. LALCHANDRA YADAV
SHYAM SUNDAR SOCIETY MANGAN PATEL CHAWL EXCER DONGARI BORIVALI WEST MUMBAI 400 092
MUMBAI
MAH
...........Complainant(s)
Versus
1. BAJAJ ELECTRICALS LTD
51 MAHATMA GANDHI ROAD FORT MUMBAI 400 023
MUMBAI
MAH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 HON'BLE MR. M.P. KASAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Sep 2019
Final Order / Judgement

तक्रारदार  पुकारले असता गैरहजर. तक्रार दाखलकामी असताना  तक्रार योग्‍य त्‍या मंचात दाखल करण्‍याची मुभा देऊन भौगोलिक कार्यक्षेत्राअभावी खारीज करण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाहीत.  स्‍वतंत्र टंकलिखीत आदेश पारीत. प्रकरण निकाली.

 

// तक्रार दाखलकामी आदेश //

श्रीमती. स्‍नेहा एस. म्‍हात्रे, अध्‍यक्षा

 

         सदर प्रकरणामध्‍ये दि. 25/09/2019 रोजी तक्रारदारांनी तक्रारीबाबत युक्तिवाद केला असून,  भौगोलिक कार्यक्षेत्राबाबत निवेदन करण्‍यासाठी प्रकरण आज नेमण्‍यात आले होते. परंतु तक्रारदार  आजरोजी दुस-यांदा पुकारले असता त्‍याकामी गैरहजर आहेत. सदर प्रकरणामधील कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार  यांनी तक्रारीत नमूद सिलींग फॅन माताजी इलेक्‍ट्रॉनिक्‍स यांचेकडून त्‍यांच्‍या कांदीवली

(पूर्व) येथील दुकानातून दि. 13/08/2018 रोजी रु. 1,300/- या किंमतीस खरेदी केला आहे.  तसेच त्‍याबाबत दिलेल्‍या वॉरंटी कार्डवर कांदीवली (पूर्व) असा पत्‍ता दिसून येतो. त्‍यानंतर तक्रारदारांनी दि. 13/07/2019 रोजी लक्ष्‍मी स्‍टील सेंटर यांचेकडून खरेदी केलेल्‍या फॅनबाबत जोडलेल्‍या कागदपत्रांवरुन लक्ष्‍मी स्‍टील सेंटर यांच्‍या दुकानाचा बोरीवली (पूर्व) येथील पत्‍ता दिसून येतो. तक्रारदार  हे देखील बोरीवली (पश्चिम) येथे राहत असल्‍याचे कॉज-टायटलवरुन दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये जोडलेल्‍या कागदपत्रांवरुन तसेच ईमेल इ. वरुन तक्रारदारांनी जरी तक्रारीच्‍या कॉज-टायटलमध्‍ये सामनेवाला यांचा पत्‍ता फोर्ट, मुंबई असा नमूद केला असला तरी तक्रारीचे कारण फोर्ट येथे उद्भवले असल्‍याबाबत अथवा बजाज इलेक्‍ट्रीकल्‍स हे सदर सिलींग फॅनचे उत्‍पादक असून त्‍यांचे कार्यालय फोर्ट येथे असल्‍याचे व त्‍यामुळे तक्रारीचे कारण अंशतः फोर्ट येथे घडल्‍याचे तक्रारीत तक्रारदारांनी नमूद केलेले नाही अथवा त्‍याबाबतचा सविस्‍तर खुलासा तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत केलेला नाही.  सबब प्रस्‍तूत तक्रार मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नाही. सबब न्‍यायहिताचे दृष्‍टीने तक्रारदारांना प्रस्‍तूत तक्रार योग्‍य त्‍या मंचात दाखल करण्‍याची मुभा देऊन भौगोलिक कार्यक्षेत्राअभावी खारीज करण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाहीत. प्रकरणात हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा. प्रकरण निकाली.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. M.P. KASAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.