Maharashtra

Kolhapur

CC/09/74

Prafful Mahadeo Jadhav. - Complainant(s)

Versus

Bajaj Auto Ltd. - Opp.Party(s)

Adv. Vinay Kadam/R.D.Thakur

14 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/74
1. Prafful Mahadeo Jadhav.Mahavirnagar, Hupari, Tal. Hatkanangale, Dist.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Bajaj Auto Ltd.Service Deptt., Mumbai-Pune Road, Aakurdi, Pune.Pune.Maharastra2. Auto India (Bajaj),Ichalkaranji-Sangli Road, Yadrav, Ichalkaranji. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv. Vinay Kadam/R.D.Thakur for the complainants
Adv.Vaishali S. Pawar for the opponents

Dated : 14 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.14.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले.  सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांनी सामनेवाला क्र्.1 कंपनीने उत्‍पादित केलेली न्‍यु बजाज सिटी- 100 हे दुचाकी वाहन दि.09.11.2005 रोजी खरेदी केले आहे. सदर गाडीचा रजि.नं. एम्.एच्.09 एटी 1928 असा आहे. सुरवातीस थोडे दिवस गाडी सुरळितपणे चालली. परंतु, त्‍यानंतर वेळोवेळी गाडीचे अ‍ॅव्‍हरेज प्रतिलिटर पेट्रोल (मायलेज) हे कमी मिळत असलेबाबत दि.30.01.2006 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेकडे तक्रार नोंदविली त्‍यावेळी त्‍यांनी पेट्रोल प्‍लेट रिपेअर करुन अ‍ॅव्‍हरेज सेटींग करुन दिले. परंतु, त्‍यानंतरही प्रति लिटर अ‍ॅव्‍हरेज कमी मिळणेस सुरुच राहिले. तसेच, वाहनाचे अ‍ॅव्‍हरेज कमी देत असलेबाबत, त्‍याचप्रमाणे टायरला खड्डे पडत असलेबाबत, तसेच फयुअल मिटर रिडींग योग्‍य दाखवत नसलेबाबत सामनेवाला यांचेकडे तक्रार केली आहे. परंतु, सामनेवाला यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले आहे. वॉरंटी कालावधीमध्‍ये स्‍पेअर पार्ट बदलून दिलेले नाही. दि.18.08.2007 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली. त्‍यास सामनेवाला यांनी खोटे उत्‍तर दिले. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदारांची फसवणुक केली आहे. सबब, सामनेवाला यांनी दोषास्‍पद वाहन दिलेने वाहनाची रक्‍कम रुपये 35,000/- देणेचा आदेश व्‍हावा किंवा नविन वाहन बदलून देणेचा आदेश व्‍हावा. तसेच, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/-, खर्च रुपये 10,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत गाडीबाबतची दैनिकातील जाहिरात, सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेली दि.18.08.07 व दि.20.08.07 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला क्र.2 यांनी दि.07.09.2007 रोजी तक्रारदारांना पाठविलेले पत्र, गाडी वेळोवेळी दुरुस्‍तीसाठी दिल्‍यानंतरच्‍या रिसिटस्, तक्रारदारांनी टायर विकत घेतलेची पावती इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये वाहनाच्‍या दोषाबाबतची कथने नाकारलेली आहेत. तसेच, सामनेवाला पुढे सांगतात, तक्रारदारांनी घेतलेले वाहन हे दि.09.11.2005 रोजी घेतले आहे. त्‍यानंतर 3 वर्षांपेक्षा जास्‍त कालावधी होवून गेलेनंतर सदरची तक्रार दाखल केलेली नाही; सदरची तक्रार मुदती केली नसल्‍याने प्रथमदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे. अशा परिस्थितीत तक्रार मुदतीत दाखल केली आहे का असा मुद्दा काढून त्‍यावर प्रथम सुनावणी होणे आवश्‍यक आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना नुकसान भरपाई रुपये 10,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत तक्रारदारांच्‍या नांवचे जॉबकार्ड, तक्रारदारांनी लिहून दिलेले सॅटिस्‍फॅक्‍शन व्‍हौऊचर, सर्व्हिस मॅन्‍युअल इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(6)        प्रस्‍तुत प्रकरणी दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. तक्रारदारांनी तक्रारीत उल्‍लेख केलेले वाहन हे दि.09.11.2005 रोजी खरेदी केले आहे व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रार ही दि.07.02.2009 रोजी दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (ए) यातील तरतुदीचा विचार करता तक्रारदारांनी त्‍यांची तक्रार कारण घडलेपासून 2 वर्षांचे आंत दाखल केलेली नाही. सबब, प्रस्‍तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे या निष्‍कर्षाप्र हे मंच येत आहे. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे :-
 
AIR 2002 SUPREME COURT 1210 - M/s. Kerala Agro Machinery Corporation Ltd. V/s. Bijoy Kumar Roy and others.
 
Consumer Protection Act (68 of 1986), Ss. 12, 12, 17 - Consumer complaint - Alleging repairs and replacement of machinery purchased from manufacturers through dealers - Limitation - Claim relating to defects was lodged with manufature in Feb.1989 - Claim petition in respect thereof was filed more than 4 years after lodgment of claim with manufacturer - Claim petition is barred by limitation - Plea of complainant that dealy occurred due to assurances given by manufacturers and dealers for removal of defects - Not tenable, in view of fact that there was no letter within limitation period indicating that liability was acknowledged by manufacturer - Order passed by State Commission can be interfered with at any stage on point of limitation.
 
(7)        उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
1.    तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाहीत.  


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT