जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/281 प्रकरण दाखल तारीख - 24/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 04/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या शेख रियाज पि.शेख जहूर वय 30 धंदा व्यापार, रा.मगदुमनगर, नई आबादी, नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. बजाज ऑटो फायनांन्स,आकुर्डी, गैरअर्जदार पुणे. 411035. 2. अश्विनी इंटारप्रायजेस, बजाज ऑटो फायनान्स उज्वलएंटर प्रायजेस, जानकी नगर, हनूमान गढ कमानी जवळ, हिंगोली रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सी.डी.इंगळे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.गजानन खनगुंडे. गैरअर्जदार क्र. 2 - No Say . निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदाराची थोडक्यत तक्रार अशी की, अर्जदाराने बजाज पल्सर गाडी क्र. एम.एच.26/एक्स-3087 ही उज्वल एंटरप्राईजेस यांचेकडुन दि.18/09/2009 रु.65,602/- किंमतीची विकत घेतली. अर्जदाराकडे एक रक्कमी रु.65,602/- नसल्यामुळे त्याने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन रु.30,000/- लोन घेतले ज्याचा लोन प्रपोजल क्र. L2 WNan00192853 आहे. अर्जदाराने मार्कन्डेय नागरी सहकारी बँक नांदेड या बँकेचे दि.15/10/2009 ते दि.15/08/2011 असे एकुण 23 चे क रु.1570/- व एक रु.1570 चा अडव्हांस चेक असे एकुणस 24 चेक गैरअर्जदार क्र. 1 यांना दिले दि.15/10/2009 रोजीच्या चेकची रक्कम गैरअर्जदार क्र. 1 यांनी बँकेतून उचलून घेतली तसेच दि.15/11/2009 व दि.15/12/2009 हे चेक बँकेत न वटल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना नगदी रु.4,100/- बॉन्सींग चार्ज व लेट पेमेंटबद्यल दिले, त्याची पावती दाखल केली आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.15/01/2010 व दि.15/2/2010 या चेकची रक्कम बँकेमार्फत घेतली या चेक उचलल्यानंतर अर्जदार हे बाकी राहीलेली 18 चेकची रक्कम नगदी घेऊन दि.16/02/2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे व गैरअर्जदार यांना तुमची राहीलेली 18 चेकची रक्कम व्याजासहीत घेऊन मला नो डयुज प्रमाणपत्र द्या अशी विनंती केली. अर्जदाराला माहिनेवारी रक्कम भरणे शक्य होत नसल्याने व त्यामुळे दिलेले चेक बाऊन्स होत असल्यामुळे व चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याचे वेगळे चार्जेस लागत असल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे पुर्ण व्याजासहित लोन अडवॉन्समध्येच पुर्ण भरण्याच्या तयारीत होते, परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडुन बाकीची एकमुस्त रक्कम घेण्यास इन्कार केला व बेबाकी प्रमाणपत्र अर्जदाराला दिले नाही. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे पुर्ण व्याजासहीत लोन भरण्यास तयार असतांना सुध्दा गैरअर्जदार क्र. 1 यांनी मुद्यामहून एकमुस्त लोन स्विकारण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे अर्जदाराने बाकीची चेकची रक्कम बँकेत जमा केली नाही व चेक बाऊंस होण्यास गैरअर्जदार क्र. 1 हेच जबाबदार आहेत. वास्तविक पहाता गाडी जप्त केल्यानंतर उर्वरित चेक बँकेत टाकता येत नाही परंतू बाऊंसींग चार्जेस मिळण्याच्या लालचीने गैरअर्जदार हे चेक बाऊंस करणे चालूच ठेवत आहेत. गैरअर्जदार हे अर्जदाराला विनाकारण बाऊंसिंग चार्जेस गाडी जप्ती चार्जेस लेट इन्स्टॉलमेंट चार्जेस असे एकुण रु.18,230/- उकळण्याच्या प्रयत्नात आहेत. गैरअर्जदाराने अर्जदाराची दि.16/02/2010 रोजी घेऊन गेलेली एकमुस्त रक्कम रु.28,260/- स्विकारली नाही व अर्जदाराला विनाकारण गाडी जप्ती चार्जेस, बाऊंसिंग चार्जेंस, लेटपेमेंट चार्जेस अशी अवास्तव रक्कम लावत आहेत. अशप्रकार गैरअर्जदार हे अर्जदारास त्रुटीची सेवा देत आहेत. अर्जदार आजही उर्वरित रक्कम अडव्हांन्समध्ये भरण्यास तयार आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम स्विकारुन गाडी परत करण्याचे आदेश गैरअर्जदार यांना देण्यात यावे. शेवटी अर्जदाराने दि.12/11/2011 रोजी गैरअर्जदार यांना सदर गाडीची राहीलेली एकमुस्त रक्कम स्विकारुन गाडी परत देण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे काहीही ऐकले नाही आणि त्यांची विनंती धुडकाऊन लावली म्हणून सदरील तारीख ही सदर तक्रार दाखल करण्याचे कारण घडली आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराने जबरदस्तीने अर्जदाराच्या ताब्यातुन घेऊन गेलेली बजाज पल्सर गाडी क्र.एम.एच.26/एक्स-3087 ही परत करण्याचे आदेश गैरअर्जदारास द्यावेत. तसेच विनाकारण गैरअर्जदार यांनी गाडी घेऊन गेल्यामुळे अर्जदाराला मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासाबद्यल रक्कम रु.50,000/- नुकसान भरपाई अर्जदारास देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे हजर झाले असून त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे. गैरअर्जदार हे अर्जदाराच्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 1 ते 6 नाकारल्या आहेत. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने दाखल केलेला अर्ज हा बेकायदेशीर स्वरुपाचा असून अर्जदाराने केलेल्या चुकामुळे उलट गैरअर्जदाराचे नुकसान झाले आहे. गैरअर्जदाराचा पैसा हा पब्लीकमनी आहे जर अर्जदाराने वेळेवर पैसे न भरल्यास त्याला समोरचे येणारे ग्राहकांसाठी सदर पैसा हा पुढे वाटप करता येणार नाही. त्यामुळे अर्जदारास दंड व्याज लावण्यास काही हरकत नाही. खात्याउता-यात पुर्णपणे माहिती दर्शविली आहे. त्यात अर्जदाराने बरेच वेळेस हप्ते न भरलेले आहे व अर्जदाराने दिलेले धनादेश हे बरेच वेळेस वटलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने पुर्वसुचना देवून व हप्ते न भरल्यामुळे सदर वाहन ताब्यात घेतले व अर्जदाराने हप्ते न भरु शकत असल्यामुळे वाहन गैरअर्जदाराच्या ताब्यात सोपवले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास केंव्हाही पुर्ण एक रक्कमी फायनान्सची रक्कम भरण्याची तयारी दाखवलेली नाही किंवा तशा प्रकारची माहितीही दिलेली नाही. त्यामुळे अर्जात लिहीलेला मजकूर हा अर्जदाराने सदर प्रकरण दाखल करण्याच्या उद्येशाने अशा प्रकारची खोटी माहीती पुरवलेली आहे व असा कोणताही अर्ज किंवा पत्र गैरअर्जदार क्र. 1 यास अर्जदाराने दिलेला नाही. ज्यावेळेस अर्जदाराचे 8 ते 10 हप्ते थकीत असल्यावर 1 किंवा 2 हप्ते भरण्याची तयारी दाखवल्यास उर्वरित रक्कम भरण्याचा विश्वास दिसणार नाही. त्यामुळे अर्जदारांनी अर्जात दिलेली माहिती ही पटण्यास योग्य नाही. त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेला अर्ज हा दंडा सहीत खारीज करावा व अर्जदाराचे वाहन विकुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिलेले कर्ज रक्कम वसुल करुन घेण्याचा आदेश करावा अथवा अर्जदारास खाते उता-याप्रमाणे रक्कम भरुन गैरअर्जदार क्र. 1 ची कर्ज रक्कम संपुष्टात आणावी असा आदेश करावा, असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांना या मंचाची नोटीस मिळूनही ते आपले म्हणणे सादर केलेले नाही म्हणुन त्यांच्या विरुध्द प्रकरण No Say आदेश करुन पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदापत्र तपासुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय होय. 2. अर्जदार यांनी केलेली मागणी पुर्ण करण्यास गैरअर्जदार बांधी आहेत काय? नाही 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदाराने बजाज पल्सर गाडी क्र. एमएच 26/एक्स- 3087 पल्सर ही उज्वल एन्टरप्राईजेस यांचेकडुन दि.18/09/2009 रोजी रु.65,602/- रुपये किंमतीची विकत घेतली त्यामुळे अर्जदार गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे. मुद्या क्र. 2 – अर्जदार यांनी उज्वल एंटरप्राईजेस याचेकडे रु.35,775/- दि.18/09/2009 व दि.19/09/2009 रोजी रु.2,600/- असे एकुण रु.38,375/- हाऊन पेमेंट भरले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडुन रु.30,000/- चे कर्ज घेतले. अर्जदाराने मार्कन्डेय नागरी सहकारी बँकेकडुन 23 चेक रु.1570/- व एक 1570/- चा अडव्हान्स चेक असे 24 चेक गैरअर्जदारांना दिले. दि.15/12/2009 हे चेक बॅकेत न वटल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना नगदी रु.4100/- चेक बाऊसिंगबद्यल दिले,या अर्जदाराच्या म्हणण्यावरुन असे दिसुन येते की, अर्जदार हा हप्ते भरण्यास अनियमीत होता. गैरअर्जदार यांनी अर्जदारांना वेळोवेळी हप्ते भरण्याची पुर्व सुचना देऊनही हप्ते भरले नाही. त्यामुळे अर्जदारास पुर्व सुचना देऊन वाहन ताब्यात घेतले. अर्जदार हा गैरअर्जदाराचे हप्ते भरण्यास नियमीत नव्हते, असे दिसते. गैरअर्जदार त्यांचे लेखी म्हणयात असेही म्हणतात की, अर्जदाराकडे 8 ते 10 हप्ते थकीत आहेत. अर्जदाराकडे शिल्लक राहीलेली हप्त्याची रक्कम गैरअर्जदाराकडे जमा करुन गाडी ताब्या घ्यावी, असे या मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांनी त्यांचेकडे थकीत असलेले हप्ते गैरअर्जदाराकडे जमा करुन त्यांचे वाहन ताब्यात घ्यावे. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. (श्री.बी.टी.नरवाड पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |