जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/171. प्रकरण दाखल तारीख - 27/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 23/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य अब्दूल हमीद अब्दुल रहीम वय,42 वर्षे, धंदा व्यापार रा. लालकुंटा धर्माबाद ता.धर्माबाद जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. बजाज अटो फायनांन्स मर्यादित, प्लॉट नंबर 5, आधार हॉस्पीटल्यच्या समोर, उल्कानगर, औरंगाबाद मार्फत, प्राधिकृत अधिकारी. गैरअर्जदार 2. बजाज अटो फायनांन्स मर्यादित, शाखा नांदेड, द्वारा उज्वल ऑटो, एअरपोर्ट रोड, नांदेड मार्फत, शाखाधिकारी. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.जी.कोलते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.जे.बी.महाले. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार बजाज अटो फायनान्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी बजाज कंपनीची प्लॉटीना (अलॉय) मोटार सायकल क्र.एम.एच.26-यू-5474 गैरअर्जदार यांचेकडून वित्त पूरवठा घेऊन करार करुन दि.11.12.2007 रोजी खरेदी केली. कर्ज रु.32,000/- चे घेतले, कर्जाची परतफेड 20 महिन्यात रु.1600/- च्या हप्त्याने करण्याचे ठरले होते. अर्जदाराने दि.31.1.2008 ते दि.30.7.2009 पर्यत रु.30400/- भरणा केले. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.9.7.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली त्यात त्यांनी अर्जदार यांचेकडे दि.7.7.2009 रोजी रु.6400/- थकीत हप्त्याची रक्कम भरणे बाकी आहे असे कळविले, ती रक्कम जर भरली नाही तर गाडी जप्त करण्यात येईल असे सांगितले. अर्जदाराने नोटीस मिळाल्याबरोबर दि.20.7.2009 रोजी रु.6400/- जमा केले. परत रु.17800/- ताबडतोब नाही भरल्यास गाडी जप्त करतो असे सांगितले. त्यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन गाडी जप्त करु नये म्हणून मनाई हूकूम मागितला आहे. तसेच अशी मागणी केली आहे की, अर्जदाराने रु.1600/- चा हप्ता भरल्यावर वाहनावर चार्ज काढण्यासाठी आर.टी.ओ. नांदेडकडे बेबाकी व ना हरकत प्रमाणपञ पाठविण्यास आदेशीत करावे, तसेच मानसिक ञासापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.2000/- मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराला गाडी घेण्यासाठी वित्त पूरवठा केला हे मान्य आहे. पण अर्जदाराने कराराप्रमाणे कर्ज हप्त्याची रक्कम विहीत तारखेला तसेच नीर्धारित हप्त्याने परतफेड केलेली नाही. अर्जदाराने करारातील अटीचा भंग केल्यामूळे कायदयानुसार नोटीस पाठविणे गरजेचे आहे. कर्ज न फेडण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.अर्जदारास दि.1.12.2007 रोजी दूचाकी वाहन खरेदी करण्यासाठी रु.32000/- कर्ज मंजूर केले व तसा करार केला आहे. करारानुसार कर्जाची रक्कम धनादेशाद्वारे समान सुलभ मासीक हप्त्याने भरतफेड करण्याचे अर्जदाराने मान्य केले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे धनको व ञ णको असे संबंध आहेत त्यामूळे ते ग्राहक नाहीत. अर्जदार यांनी सदर वाहन उज्वल अटो नांदेड यांचेकडून खरेदी केलेले आहे पण त्यांना या तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही. त्यामूळे नॉन जॉईडर ऑफ नेससरी पार्टी या तत्वानुसार तक्रार रदद होणेस पाञ आहे. गैरअर्जदार यांनी मा.नॅशनल कंझूमर डिस्प्यूट रीड्रेसल कमीशन न्यू दिल्ली यांचे निवाडे दाखल केलेले आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार रदद करण्यात यावी व रु.5000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वित्त पूरवठा घेतलेला आहे. त्याबाबतची बजाज फायनान्सच्या रक्कम भरल्याच्या पावत्या तसेच पासबूक अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी जवाबामध्ये कर्ज दिल्याचे मान्य केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून प्लॅटिना मोटार सायकल खरेदी करणेसाठी कर्ज घेतलेले आहे. अर्जदार हे थकबाकीदार झाल्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना थकीत हप्त्याची रक्कम भरणेसाठी दि.09.07.2009 रोजी नोटीस पाठविलेली आहे. सदर नोटीस प्रमाणे अर्जदार यांचेकडे रक्कम रु.17,800/- येणे बाकी असल्याचे सदर नोटीसमध्ये नमूद केलेले आहे. त्यानंतर अर्जदार यांनी रक्कम रु.6400/- चा भरणा गैरअर्जदार यांचेकडे केल्याचे गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.32,000/- चे कर्ज घेतलेले आहे सदर कर्जाची परतफेड मासिक हप्ता रु.1600/- प्रमाणे करण्याचे होती. परंतु अर्जदार यांनी कर्ज हप्त्याच्या रक्कमेपोटी दिलेले धनादेश न वटता परत आल्यामूळे करारानुसार दोन हप्त्याची रक्कम रु.3200/- व धनादेश न वटता परत आल्यामूळे दंडाची रक्कम रु.12400/- अशी अर्जदार यांचेकडून येणे बाकी आहे असे गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमूद केलेले आहे. अर्जदार यांना थकीत हप्त्याच्या रक्कमेच्या वसूलीसाठी गैरअर्जदार यांनी नोटीस पाठविलेली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या खाते उता-यानुसार अर्जदार यांचेकडून दि.05.09.2009 अखेर ओ.डी. चार्जेस रक्कम रु.11000/- + बाऊंन्स डयू रु.1400/- अशी एकूण रु.12400/- येणे बाकी दाखविलेली आहे. अर्जदार यांचेकडून गैरअर्जदार यांना थकीत कर्ज रक्कमेपोटी रक्कम येणे बाकी आहे हे सदरच्या खातेउता-यावरुन दिसून येत आहे. गैरअर्जदार यांनी लेखी म्हणणे व शपथपञ दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी प्रतिउत्तर दिलेले नाही अगर गैरअर्जदार यांच्या खातेउता-यानुसार दाखवलेली येणे बाकी रक्कम ही देय नाही असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत राष्ट्रीय आयोगाचे निकालपञ दाखल केलेले आहे, सदर निकालपञानुसार हांयर परचेस करारानुसार कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्कमेची वसूली बाकी असल्यास सेवेत कमतरता म्हणता येणार नाही. अर्जदार यांनी प्रस्तूतची तक्रार गैरअर्जदार यांनी दि.09.07.2009 रोजी वकिलामार्फत थकीत कर्ज रक्कमेची मागणी करणारी नोटीस पाठविल्यानंतर तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रार अर्जाच्या विनंती कलमामध्ये अर्जदारांनी रु.1600/- चा हप्ता भरल्यावर गैरअर्जदारांना त्यांचा वाहनावरचा चार्ज काढण्यासाठी आरटीओ कडे बेबाकी व नाहरकत प्रमाणपञ पाठविण्यास आदेशीत करावे अशी मागणी केलेली आहे. यांचा अर्थ अर्जदार हे एकप्रकारे थकीत कर्ज रक्कम बाकी असल्याचे मान्यच करीत आहेत. अर्जदार यांचा अर्ज,शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी मूळ अर्जासोबत तात्पूरत्या मनाई हूकूमाचा अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी हजर होऊन म्हणणे देईपर्यत वाहन जप्तीसाठी प्रतिबंध करण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी म्हणणे दाखल करेपर्यतच अर्जदार यांचे वाहनाबाबतचे जप्ती आदेश अस्तीत्वात होते. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेली कागदपञे, व त्यांचा यूक्तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व गैरअर्जदार यांचेतर्फे केलेला यूक्तीवाद तसेच वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |