जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/01. प्रकरण दाखल दिनांक – 06/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 21/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. लक्ष्मण पि. रामन्ना लिंगमपल्ले वय वर्षे 60, व्यवसाय निल, रा. सिडको नवीन नांदेड. अर्जदार विरुध्द 1. बजाज अटो फायनान्स लि. द्वारा, पगारीया अटो सेंटर, जालना रोड, आकाशवाणी केंद्रासमोर, औरंगाबाद. 2. बजाज अटो फायनान्स लि. आकुर्डी, पुणे-411 004. गैरअर्जदार 3. शाखा व्यवस्थापक, उज्वल इंटरप्रायजेस, हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.अभय व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे - अड.एस.एस.धानोरकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार बजाज फायनान्स यांच्या सेवेच्या अनुचित प्रकाराबददल अर्जदार यांनी नोंदविलेलया आपल्या तक्रारीत म्हणतात की, त्यांने जून,2006 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून एल.जी. कंपनीचे ऊषा उन्फोटेक कॉम्प्यूटर सेल्स सर्व्हीस अन्ड पेरीफिअर्स पुंडलीकवाडी नांदेड यांचेकडून एक संगणक गैरअर्जदार यांचेकडून रु.30,000/- कर्ज घेऊन खरेदी केले. त्यापोटी अर्जदाराने त्यांना दि.08.06.2007 रोजी रु.4500/- सुरक्षा अनामत म्हणून ठेवले. कर्जाची रक्कम अर्जदार यांनी रु.1629/- याप्रमाणे 12 हप्त्यात परतफेड केले आहे. तसेच रु.16,478/- दि.22.06.2007 रोजी एकमुस्त भरलेले आहेत असे असूनही अनामत रककम वापस न करता गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली. चेक न वटल्यामूळे कारवाई का करु नये ? अशी नोटीस दिली आहे. अर्जदाराने कर्जाची संपूर्ण रक्कम भरली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी त्यांना अनामत रक्कम रु.4500/- वापस दयावेत अशी मागणी केली आहे. तसेच बेबाकी प्रमाणपञही त्यांना मिळावे, तसेच झालेल्या मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1,2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदाराने कर्ज घेतले इत्यादी गोष्टी त्यांना मान्य आहेत. परंतु अर्जदाराने खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे. कारण करारनाम्याप्रमाणे कर्जाची रक्कम 8.73 टक्के द.सा.द.शे. व्याजासह रु.1469/- महिना याप्रमाणे 24 हप्ते भरावयाचे होते. परंतु अर्जदाराने फक्त 12 हप्ते भरले. यानंतर हप्ते भरणा बंद केले. म्हणून गैरअर्जदाराने 13 हप्त्यानंतर भरावयाची रक्कम रु.15,304/- + 13 व्या हप्त्याची रक्कम रु.1469/- अशी एकूण रक्कम रु.16,773/- अर्जदाराकडून स्विकारली. त्यांचेकडे येणे रक्कम रु.295/- आहे. अर्जदाराने करार करतेवेळेस भरलेली बिन व्याजी अनामत रक्कम गैरअर्जदार यांचेकडे रु.4500/- जमा आहेत परंतु ती रक्कम परत मागावयाची असल्यास अर्जदाराकडून त्यासंबंधीची लेखी पावती गैरअर्जदार यांचेकडे जमा करणे आवश्यक होते परंतु या कराराची अमंलबजावणीस अर्जदाराने टाळाटाळ केली व सूडबूध्दीने ही तक्रार दाखल केली. वीशेष प्रकरण म्हणून अर्जदाराची अनामत रक्कम व अर्जदाराकडून येणे असलेली रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम रु.295/- दि.16.02.2009 रोजी अर्जदारास वापस करण्यात आलेली आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी पूर्ण झाली सून त्यांचे तक्रारीत कोणतेही स्वारस्य नाही म्हणून त्यांची तक्रार खारीज करावे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांची मूख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी दि.28.06.2006 रोजी गैरअर्जदार यांचेकडे दिलेली अनामत रक्कम त्यांना वापस मिळावी. अर्जदाराने गैरअर्जदार बजाज फायनान्स कंपनीकडून जे कर्ज घेतले आहे ती कर्जाची रक्कम 12 हप्त्यात व यानंतर उर्वरीत रक्कम र्टरर्मीनेशन ऑफ लोन यावर पूर्णतः भरलेले आहे. प्रश्न एवढा शिल्लक आहे की, गैरअर्जदाराने अनामत रक्कम वापस करणे जरुरी होते ती रक्कम गैरअर्जदाराने दिली नाही. गैरअर्जदार यांनी दि.11.02.2008 रोजी जी नोटीस काढली होती त्यांस उत्तर म्हणून चेक नंबर 554168 रु.1469/- डयू डेट दि.08.02.2008 रोजी डिसऑनर झाला म्हणून ती रक्कम भरतो असे म्हटले आहे. यांला गैरअर्जदार यांनी दि.29.02.2008 रोजी नोटीसद्वारे त्यांचेवर कलम 138 खाली कारवाईका करु नये अशी नोटीस दिलेली आहे. यावर अर्जदाराने पूर्ण रक्कम भरल्याचे म्हटले आहे व त्यांस गैरअर्जदारांनी इन्कार केलेला नाही. गैरअर्जदार यांनी यूक्तीवाद करते वेळेस असे म्हटले आहे की, अनामत रक्कम वापस मागण्यासाठी अनामत रक्कमेची मूळ पावती गैरअर्जदार यांनी देणे आवश्यक होते परंतु अर्जदाराने ती पावती दिली नाही. म्हणून अनामत रक्कम वापस देण्याचे राहीले. अर्जदाराने ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केल्याचे नंतर गैरअर्जदाराने एक वीशेष बाबत म्हणून अर्जदाराकडून येणे बाकी असलेली रक्कम रु.295/- ची रक्कम रु.4205/- चेकनंबर 808154 दि.16.02.2009 रोजी देण्यात आले. आमच्या मते अर्जदार यांनी अनामत रक्कम पाहिजे असले तर त्यांनी गैरअर्जदार यांना मूळ पावती न देण्याचे कारण नाही व समजा अशी पावती त्यांनी दिली नसेल तर गैरअर्जदार यांचेकडे अनामत रक्कम असल्या बददलचे रेकॉर्ड आहे व अर्जदार यांनी रु.295/- कमी रक्कम भरली असेल तर फोर क्लोजर मध्ये गैरअर्जदार यांना भरमसाठ दंड व्याज वसूल करुन पूर्ण रक्कम अर्जदाराकडून वसूल केलेली आहे. त्यामूळे रु.295/- अर्जदार कमी भरतील असे वाटत नाही. अनावधानाने ही रक्कम कमी भरली असेल तर सूरक्षा रक्कमेतून गैरअर्जदार ही रक्कम कापून घेऊ शकतात व त्याप्रमाणे ती रक्कम कापून घेतली. प्रस्तूत तक्रार अर्ज दाखल केल्याचे नंतरच जवळपास 1 महिन्याचे नंतर त्यांना अनामत रक्कम वापस दिली आहे. म्हणजे तो वाद आता संपूष्टात आला आहे. परंतु अर्जदार यांना गैरअर्जदाराकडून ती रक्कम वसूल करण्यासाठी न्यायमंचात यावे लागले व यानंतरच गैरअर्जदार यांनी त्यांची दखल घेतली म्हणून अर्जदार यांना मानसिक ञास भरपूर झालेला आहे. यासाठी गैरअर्जदार यांना जबाबदार ठरवून त्यापोटी रु.1,000/- देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य राहील. गैरअर्जदारांची कृती ही त्यांनी केलेल्या अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब म्हणून गृहीत धरण्यास हरकत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र.2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना झालेल्या मानसिक ञासापोटी रु.1,000/- दयावेत व दावा खर्च म्हणून रु.1,000/- दयावेत. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |