Maharashtra

Kolhapur

CC/09/525

Sou. Indira Bharat Rajepandre. - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz Life Insurance co ltd, - Opp.Party(s)

Ramesh Pawar,

22 Dec 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/525
1. Sou. Indira Bharat Rajepandre.Tarabaipark.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Bajaj Allianz Life Insurance co ltd,Bagal Chowk,Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
A,D,Bumkar., Advocate for Opp.Party

Dated : 22 Dec 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.22/12/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. तक्रारदाराने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. 
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार हया नमुद पत्‍त्‍यावर कायमपणे राहत असून तक्रारदार हया वकील आहेत व गेले 23 वर्षे त्‍या कोल्‍हापूर जिल्‍हयात वकीली करतात. सामनेवाला ही इन्‍शुरन्‍स कंपनी आहे. त्‍यांची कोल्‍हापूर येथे शाखा असून हेड ऑफिस येरवडा पुणे येथे आहे. तक्रारदार यांनी सामनेवालांकडे ‘ युनिट गेन प्‍लॅन’ या योजनेअंतर्गत दि.19/05/006 रोजी रक्‍कम रु.75,000/- गुंतवले. सामनेवाला यांनी सदर पॉलीसीसोबत रक्‍कम रु.3,75,000/-चे जिवन विमा संरक्षण व रु.50,000/- चे क्रिटीकल ईलनेस बेनेफिट कव्‍हरेजही दिले होते. तक्रारदाराने प्रिमियमचे नियमित हप्‍ते भरलेले आहेत. मे-2008 अखेर एकूण रु.2,25,000/- इतके भरलेले आहेत. दि.26/01/09 रोजी दुपारी 12.30 चे सुमारास तक्रारदाराचा अपघात झाला. सदर अपघातामध्‍ये डोळा, हात व पायास जखमा व मार लागल्‍याने तक्रारदार हया अनकॉन्‍शन्‍स होत्‍या. तातडीने उपचारासाठी त्‍यांना सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्‍हापूर येथे दाखल केले. तदनंतर केळवकर मेडिकल सेंटर अॅन्‍ड क्रिटीकल केअर यूनिट मध्‍ये पुढील उपचार केले आहेत. तसेच डोक्‍यास मार लागलेने अॅपल हॉस्पिटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयूट लि. मध्‍ये पूढील तपासणी तसेच मेंदूचे सिटी स्‍कॅन केले आहे. डॉ.कौस्‍तुभ औरंगाबादकर न्‍युरोसर्जन यांचेकडे नेले. तक्रारदारस सातत्‍याने होणा-या giddiness and vertigo मुळे रोटरी हिअरींग एड सेंटर तसेच नाक,कान, घसा तज्ञ तज्ञ डॉ. नागपूरकर यांचेकडे नेले. E.M.G. M.C.V. केलेनंतर तक्रारदाराचे दोन्‍ही हातातील शक्‍ती नष्‍ट झालेचे व शरीरात व दोन्‍हीं हातांमध्‍ये shivering and tremours  होत होते. तसेच दोन्‍ही कानांची ऐकण्‍याची शक्‍ती नष्‍ट झाली होती. सदर Critical illness हा सदर अपघातामध्‍ये डोकयास झालेल्‍या मारामुळे झालेला आहे.
 
           तक्रारदाराने पॉलीसी नं.21305764 अंतर्गत Critical illness  क्‍लेमची योग्‍य कागदपत्रांची पूर्तता करुन मागणी केली. दि.20/04/2009 चे पत्राने सामनेवालांनी प्रपोजल फॉर्ममध्‍ये आरोग्‍याची वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट केली नसलेने नाकारला आहे. वस्‍तुत: सदर पॉलीसी उतरवणेपूर्वी सामनेवाला कंपनीचे अधिकृत लोटस हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केली होती. त्‍या तपासणीचे सर्व रिपोर्टस नॉर्मल होते. सदर मूळ रिपोर्ट सामनेवालांकडे आहेत. तक्रारदाराने सर्व मेडिकल रिपोर्ट सामनेवालांकडे देऊन सर्व वस्‍तुस्थिती उघड केलेली होती. प्रस्‍तुत प्रपोजल फॉर्म हा भगवान सुर्यंवंशी या सामनेवालांचे एजंटने भरला होता. व्‍हायरल इन्‍फेक्‍शनमुळे क्‍वाड्रीप्‍लेजीया झालेचे वैद्यकीय रिपोर्ट कंपनीस दिले होते. तसेच सदर बाब ती बरी झालेने सामनेवालांनी तक्रारदाराची प्रपोजल फॉर्मवेळी घेतलेल्‍या वैद्यकीय तपासणीमध्‍ये कोणताही दोष आढळला नाही. तदनंतर प्रपोजल फॉर्म स्विकारुन सामनेवालांनी पॉलीसी देऊन क्रिटीकल ईलनेस क्‍लेम रु.50,000/- व रु.3,75,000/-चे विमा संरक्षण सोबत दिले आहे. सामनेवालांचे अटी व शर्ती प्रमाणे वैद्यकीय चाचण्‍या इत्यादी पूर्तता झालेली आहे. तरीही सामनेवालांनी क्‍लेम नाकारल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन मोठया प्रमाणावर तक्रारदाराने सामनेवालांकडे गुंतवणूक केलेने वैद्यकीय बीले भागवणेकरिता आर्थिक अडचणी आल्‍या. सबब झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व क्रिटीकल ईलनेस क्‍लेम रु.50,000/-, तक्रारदाराने सामनेवालांकडे गुंतवलेली रक्‍कम द.सा.द.शे.24 टक्‍के व्‍याजासहीत, तक्रारच्‍या खर्चापोटी रु.25,000/-सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे पॉलीसीच्‍या प्रिमियमपोटी भरलेल्‍या रक्‍कमेच्‍या दि.27/05/08, 07/05/07, व 19/05/06 च्‍या रिसीटस, तक्रारदाराचे नांवचे इनिशिअल युनीटस स्‍टेटमेंट, तक्रारदाराने सामनेवालांना अपघातानंतर पाठविलेले पत्र व त्‍यासोबत पाठविलेले रिपोर्टस, सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत. दि.08/03/2011 रोजी तक्रारदाराने कायमचे अपंगत्‍व आलेबाबतचे डॉ. केळवकर व डॉ. संदिप पाटील यांचे सर्टीफिकेट,डॉ.औरंगाबादकर, न्‍युरॉलॉजीस्‍ट यांचे सर्टीफिकेट, स्‍टेटमेंट ऑफ अकौन्‍ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केले लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी, चुकीची असलेने फेटाळणेत यावी. तक्रारदाराची तक्रार अर्जातील मान्‍य केले कथनाखेरीज अन्‍य कथने परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. कलम 3 व 4 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. कलम 8 मधील वैद्यकीय कागदपत्रे व रिपोर्ट दिलेचे मान्‍य केले आहे. सामनेवालांनी विक्रांत अॅडव्‍हायझर्स सर्व्‍हीसेस प्रा.लि. यांची तक्रारदाराच्‍या क्रिटीकल इलनेस क्‍लेमबाबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन करणेसाठी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली. तक्रारदार हे मे. मंचाची दिशाभूल करत आहेत. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने प्रपोजल भरतेवेळी तिचे आरोग्‍यासंदर्भात योग्‍य माहिती दिली नाही. तसे आरोग्‍याबाबतचा गतइतिहास ( past health record)  वस्‍तुस्थिती उघड केली नाही. आरोग्‍याबाबतची वस्‍तुस्थिती फॉर्म भरतेवेळी दडवून ठेवली. सामनेवालांनी तक्रारदाराचे अधिकृत डॉक्‍टरकडून वैद्यकीय तपासणी केली आहे. सदर तपासणीवेळीही तक्रारदाराने आरोग्‍याबाबत तसेच आरोग्‍याच्‍या गतइतिहासाबाबत डॉक्‍टरांना माहिती दिली नाही. अशा प्रकारच्‍या आरोग्‍याबाबतच्‍या तपासण्‍या व चाचण्‍या या विमा उतरविलेल्‍या व्‍यक्तिने दिलेल्‍या आरोग्‍यविषयक माहितीवर आधारीत असतात. सदर व्‍यक्‍ती जी आरोग्‍याबाबतची माहिती डॉक्‍टरांना देते त्‍यावर त्‍याचे निष्‍कर्ष अवलंबून असतात. प्रस्‍तुत आजाराबद्दलची माहिती तक्रारदाराने डॉक्‍टरांना दिली नाही तसेच प्रपोजल फॉर्ममध्‍येही भरली नाही. प्रपोजल फॉर्मवर सही करतेवेळी वर नमुद इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी दिलेला रिपोर्टवरुन तक्रारदाराने 4 वर्षापूर्वी Quadriplegia या विकाराने/आजारने त्रस्‍त असलेने तिला आधार नर्सिंग होममध्‍ये उपचारासाठी दाखल केले होते. सदर वस्‍तुस्थिती तक्रारदाराने प्रपोजल फॉर्म भरतेवेळी दडवून ठेवली आहे. सध्‍याही तक्रारदार हया प्रस्‍तुत Quadriplegia ने त्रस्‍त आहेत. प्रस्‍तुत तक्रारदारास सदर आजअखेर त्रास सुरु आहे. प्रपोजल फॉर्म हा त्रयस्‍त व्‍यक्‍तीने भरला आहे व त्‍यावर तक्रारदाराने केवळ सही केली आहे ही बाब तक्रारदार सिध्‍द करु शकले नाहीत. तक्रारदार या पेशाने वकील आहेत. त्‍या कोणी सर्वसाधारण व्‍यक्‍ती नाहीत. अशाप्रकारे तक्रारदाराने कथन करणे हे चुकीचे आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये झालेला व्‍यवहार वाणिज्‍य स्‍वरुपाचा आहे. कमर्शिअल कॉन्‍ट्रॅक्‍ट आहे. तक्रारदार ग्राहक नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराने तिचे आरोग्‍यविषयक वस्‍तुस्थिती दडवून ठेवलेने क्रिटीकल ईलनेस क्‍लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. केवळ पैसे उकळणेचे दृष्‍टीने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार सर्व मागण्‍या व खर्चासहीत फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. तसेच तक्रारदारास रु.50,000/- इतका दंड ठोठावणेत यावा अशी विनंती केली आहे.
 
(06)       सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ लोटस हॉस्पिटल यांचे पत्र व मेडिकल मॅट्रीक्‍स, पॉलीसी डॉक्‍यूमेंटसमधील क्रिटीकल इलनेस संबंधीत कागदपत्रे, तक्रारदाराने भरुन दिलेला क्‍लेम फॉर्म इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(7)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय?      --- होय.
2. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- नाही.
3. काय आदेश ?                                       --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी वाणिज्‍य हेतूचा मुद्दा उपस्थित केला आहे. तक्रारदाराने युनिट गेन पॉलीसी घेतली आहे. सदर पॉलीसीनुसार 2006 ते 2008 अखेर प्रतिवर्षी रु.75,000/- प्रमाणे रु.2,25,000/- इतकी रक्‍कम गुंतवलेली आहे ही वस्‍तुस्थिती निदर्शनास येते. सदर पॉलीसी अंतर्गत सामनेवाला यांनी रक्‍कम रु.3,75,000/- चा जीवन विमा संरक्षण व रु.50,000/- चे क्रिटीकल इलनेस बेनी‍फीट दिलेचे मान्‍य केले आहे. तक्रारदाराने कागदपत्रे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्रिटीकल ईलनेस क्‍लेम नाकारलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब क्‍लेमबाबतचे निर्णयाबाबतची सेवात्रुटी ठरवणेचे व सदर तक्रारी चालवणेचे या मंचाचे अधिकारक्षेत्रात येत असलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2:- मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा नुसार सामनेवालांनी तक्रारदारास पॉलीसी क्र.21305764 दिली आहे. तसेच वर नमुद केलेप्रमाणे विमासंरक्षण दिले आहे. तक्रारदाराचा दि.26/01/09 रोजी दुपारी 12.30 चे सुमारास अपघात झाला. सदर अपघातामध्‍ये डोके, हात व पायास जखमा व मार लागल्‍याने तक्रारदार हया अनकॉन्‍शन्‍स होत्‍या. तातडीने उपचारासाठी त्‍यांना सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्‍हापूर येथे दाखल केले. तदनंतर केळवकर मेडिकल सेंटर अॅन्‍ड क्रिटीकल केअर यूनिट मध्‍ये पुढील उपचार केले आहेत. तसेच डोक्‍यास मार लागलेने अॅपल हॉस्पिटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयूट लि. मध्‍ये पूढील तपासणी तसेच मेंदूचे सिटी स्‍कॅन केले आहे. डॉ.कौस्‍तुभ औरंगाबादकर न्‍युरोसर्जन यांचेकडे नेले. तक्रारदारस सातत्‍याने होणा-या giddiness and vertigo मुळे रोटरी हिअरींग एड सेंटर तसेच नाक,कान, घसा तज्ञ तज्ञ डॉ. नागपूरकर यांचेकडे नेले. तक्रारदाराची हातची तसेच श्रवणशक्‍ती सदर अपघातात नष्‍ट झाली आहे ही वस्‍तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहेत. वादाचा मुद्दा आहे तो तक्रारदाराने क्रिटीकल ईलनेस क्‍लेम मागणी केला होता मात्र दि.20/04/2009 चे पत्राने Suppression of material fact या कारणास्‍तव तो नाकारला आहे. तक्रारदाराने 2004 मध्‍ये Quadriplegia  साठी आधार नर्सिंग होममध्‍ये उपचार घेतलेचे दाखल नमुद कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच सामनेवालांनी प्रस्‍तुत बाबीबाबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केलेले आहे. सदर इन्‍व्‍हेस्‍टीगेशन अहवाल व त्‍यासंदर्भातील आवश्‍यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. प्रस्‍तुत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन अहवालामध्‍ये तक्रारदार हे सन 2004 मध्‍ये Quadriplegia  साठी उपचार घेतलेचे नमुद केले आहे. तसेच त्‍याअनुषंगीक वैद्यकीय कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराचा अपघात झाला त्‍यावेळी तक्रारदारास केळवकर मेडिकल सेंटरमध्‍ये दाखल केले होते. सदर हॉस्पिटलचे दि.26/01/2009 चे केसपेपर्सवरुन Past History मध्‍ये Quadriplegia 4 years back  म्‍हणून स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. तसेच त्‍याबाबत डॉ.कौस्‍तुभ औरंगाबादकर यांनी तक्रारदारास चार वर्षापासून Quadriplegia  असलेबाबत नमुद केले आहे. तक्रारदारास तपासले असता दि.30/01/2009 रोजीचे फायनल डायग्‍नोसीसमध्‍ये नमुद केले आहे. तसेच तक्रारदारास सदर कारणास्‍तव आधार नर्सिंग होममध्‍ये दाखल केले होते. त्‍याबाबतची डिस्‍चार्ज कार्डची सत्‍यप्रत प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सदर कार्डवरुन तक्रारदारावर दि.12/09/04 ते 22/09/04 अखेर उपचार केलेले आहेत. डॉ. अजित कुलकर्णी यांनी याबाबत उपचाराच्‍या नोंदी केलेल्‍या आहेत. सदर कागदपत्रे इन्‍व्‍हेस्‍टीगेशन अहवालासोबत जोडलेली आहेत. यावरुन तक्रारदार सदर पॉलीसी उतरवणेपूर्वी Quadriplegia याआजाराने ग्रस्‍त होत्‍या व त्‍याबाबत उपचार घेतलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो प्रस्‍तुतची बाब तक्रारदाराने पॉलीसी घेतेवेळी दडवून ठेवली होती किंवा नाही ? 
 
           प्रपोजल फॉर्म भरतेवेळी प्रश्‍नावलीमध्‍ये तक्रारदाराने तिचे आरोग्‍य विषयक माहितीमध्‍ये 5 वर्षापासून क्रिटीकल इलनेस या आजारावर उपचार घेतले बाबत ‘ नाही ’ असे उत्‍तर नोंदविले. प्रपोजल फॉर्ममध्‍ये सदर बाबींची माहिती दिलेली नाही ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने सदर बाबींचे समर्थन करताना सामनेवालांचे एजंट भगवान सुर्यंवंशी यांनी प्रपोजल फॉर्म भरुन त्‍यावर तक्रारदाराची सही घेतली. तक्रारदाराने सदरची माहिती त्‍यांचेकडे उघड केली होती असे कथन केले आहे. मात्र सदर बाब तक्रारदार सिध्‍द करु शकले नाही. वादाकरिता सदर फॉर्म त्रयस्‍त व्‍यक्‍तीने फॉर्म भरलेवर सदर फॉर्मवर तक्रारदाराने सही केली आहे असे गृहीत धरले तरी तक्रारदार या सर्वसाधारण व्‍यक्‍ती(layman)  नसून 23 वर्षे वकीली व्‍यवसाय करणा-या नामांकित वकील आहेत. सही करणेपूर्वी किमान प्रपोजल फॅार्मवरील भरलेली माहिती वाचलेखेरीज त्‍या सही करणार नाही. वादाकरिता फॉर्मवरील भरलेली माहिती न वाचता सही केली असेल तर ती तक्रारदाराची चुक आहे. नमुद प्रश्‍नावलीमध्‍ये ‘ नाही’ असे उत्‍तर नोंदवलेले आहे. असे निदर्शनास आले असते व सदर प्रश्‍नावलीची उत्‍तरे चुकीची भरलेली आहेत असे तक्रारदारास वाटले असते तर त्‍यांना तो फॉर्म रद्द करुन दुसरा फॉर्म भरणेस कोणतीही अडचण नव्‍हती. सदर दोन्‍ही वस्‍तुस्थितीचा विचार करता प्रस्‍तुत बाबीत तक्रारदाराचीच पूर्णत: चुक आहे.
 
           विमाधारक व कंपनी यांचेमध्‍ये होणारे करार हे परमविश्‍वासावर (Utmost good faith)  आधारित असतात. तक्रारदार सन 2004 पासूनच Quadriplegia  ने त्रस्‍त होती. सदर Quadriplegia  इन्‍जुरीबाबत वैद्यकीय साहित्‍य परिक्षण पुढीलप्रमाणे –
 
DEFINATION OF QUADRIPLEGIA INJURIES - One of the most tragic and physically devastating injuries someone can endure is a quadriplegia injury. Quadriplegia injuries can result in a lifetime of pain and discomfort as the victim loses all sensation and the ability to move their four limbs. Every year there are 8,000/- new spinal cord injuries diagnosed, including quadriplegia. A quadriplegia injury can greatly disrupt a person’s life forever.
 
            Quadriplegia refers to complete and total paralysis of all limbs as well as of the torso or stomach area. A person who is a quadriplegic generally has no feeling or muscle control below the neck. Which means that they are unable to move their legs or their arms. When someone becomes quadriplegic. There is an incredible amount of medical care that becomes necessary. The individual will likely not be able to care for him or herself without professional assistance and will need extensive adaptive devices to do basic daily activities. 
 
           सदर साहित्‍याचा व परिक्षणाचा विचार करता तक्रारदार हया सन 2004 पासून प्रस्‍तुत आजाराग्रस्‍त होती व त्‍याबाबत तिने उपचार घेतलेची बाब सामनेवालांचे पासनू दडवून ठेवली आहे. ही वस्‍तुस्थिती वरील विवेचन व दाखल पुराव्‍याचा विचार करता निर्विवाद आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराने क्रिटीकल ईलनेस बाबतचा केलेला क्‍लेम हा क्‍लॉज न.9 नुसार Non-disclosure  या कारणास्‍तव नामंजूर केला आहे. सदर क्‍लॉज खालीलप्रमाणे आहे.
            In case of non-disclosure or fraud or misrepresentation in the Proposal/personal statement, declaration or in any other connected document leading to the acceptance of he risk, the company shall at its discretion repudiate the claim and no benefit shall be payable thereunder, subjet to Section 45 of the Insurance Act, 1938.
          
           प्रस्‍तुत पॉलीसी ही युनिटगेन ही पॉलीसी आहे. तसेच 75,000/- इतका मोठा वार्षिक हप्‍ता आहे. तक्रारदाराने तीन हप्‍त्‍याची रक्‍कम रु.2,25,000/- भरले आहेत. ते सामनेवाला यांनी मान्‍य केले आहे. तसेच प्रस्‍तुत पॉलीसीसोबत सामनेवाला कंपनीने बेनेफिटस दिलेले आहेत. यामध्‍ये गॅरंटेन बेनिफिटमध्‍ये बेसीक बेनेफिट रु.3,75,000/- तर सप्‍लीमेंटरी बेनेफिटमध्‍ये क्रिटीकल ईलनेस रायडर रु.50,000/- विमा संरक्षण दिलेचे दिसून येते. प्रस्‍तुत पॉलीसीच्‍या स्‍वरुपाचा विचार करता क्रिटीकल ईलनेस बेनेफिट हा सप्‍लीमेंटरी बेनेफिट आहे व सदर बेनेफिटच्‍या कलम 11 नुसार तक्रारदारास संरक्षण मिळालेले आहे. मात्र नमुद पॉलीसीच्‍या वर नमुद क्‍लॉज नं.9 प्रमाणे क्‍लेम नाकारलेला आहे. मात्र नमुद क्‍लॉजनुसार प्रस्‍तुत मिळणारा बेनेफिट सामनेवाला नाकारु शकते व सदर कारणास्‍तव क्‍लेम नाकारुन सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           हे मंच यापुढे असेही स्‍पष्‍ट करीत आहे की, मूळ पॉलीसी ही युनिटप्‍लस गेन पॉलीसी आहे. तक्रारदाराने रु.2,25,000/- इतकी गुंतवणूक केलेली आहे. तक्रारदाराची मूळ तक्रार ही क्रिटीकल ईलनेस क्‍लेम नाकारलेमूळेच दाखल केलेली आहे. त्‍याबाबत या मंचाने वर नमुद केलेप्रमाणे सेवात्रुटी नसलेचा निष्‍कर्ष काढलेला आहे. मात्र प्रस्‍तुत तक्रारीनुसार क्रिटीकल ईलनेस क्‍लेमसोबतच तक्रारदाराने गुंतवलेल्‍या रक्‍कमेची व्‍याजासहीत मागणी केलेली आहे. तसेच त्‍या संदर्भात तक्रारदाराने दि.05/10/2011 रोजी सदर गूंतवणूक केलेली रक्‍कम तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार काढून घेतलेशिवाय दिली जाणार नाही असे सामनेवाला यांनी सांगितलेने प्रस्‍तुत प्रकरण सदर रक्‍कम मिळेपर्यंत निर्णित करु नये अशी विंनती मे. मंचास केली होती. दि.10/10/2011 रोजीचे आदेशाने ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचे प्रकरणी प्रलंबीत ठेवता येणार नाही. या कारणास्‍तव सदरचा अर्ज नामंजूर केलेला आहे. प्रस्‍तुत गुंतवणूकीचा वाद मे. मंचासमोर नाही. सबब पॉलीसीचे स्‍वरुप नियम व तरतुदींचा विचार करता याबाबत हे मंच कोणतेही भाष्‍य करीत नाही. मात्र सदर क्रिटीकल ईलनेस क्‍लेम व्‍यतिरिक्‍तच्‍या वादाबाबत सक्षम ऑथॉरिटीकडे दाद मागण्‍याची मुभा तक्रारदारास देणेत येते या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्रिटीकल ईलनेस क्‍लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
 
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
 
          
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT