Complaint Case No. CC/134/2021 | ( Date of Filing : 18 Feb 2021 ) |
| | 1. SMT. SINDHU MADHUKAR GHAGRE | PLOT NO 88,89 FLAT NO 301, SHRI SAI SEVA SHIV APARTMENT, DABHA NAGPUR 440023 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY LIMITED THROUGH ITS AUTHORIZED OFFICER | BAJAJ ALLIANZ HOUSE, AIRPORT ROAD YERWADA PUNE 411006 | PUNE | MAHARASHTRA | 2. BAJAJ HOUSING FINANCE LIMITED THROUGH ITS AUTHORIZED OFFICER | 3RD FLOOR, 304 & 305,KHULLAR CHAMBERS, MUNJE CHOWK, SITABULDI, NAGPUR 4400012 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35(1) अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 1 ही विमा कंपनी असून विरुध्द पक्ष 2 ही वित्त पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्ष 2 कडून गृह कर्जाकरिता रुपये 9,77,000/- आणि रुपये 10,80,763/- 10 वर्षाच्या कालावधीकरिता घेतले होते. त.क.च्या पतीने वि.प. 2 कडून कर्ज घेतांना वि.प. 1 कडून गृह कर्ज सुरक्षित करण्याकरिता विमा मुल्य रक्कम रुपये 15,80,913/- एवढया रक्कमेकरिता वि.प. 1 च्या एजंट मार्फत पॉलिसी क्रं. 0342306206 अन्वये Group Credit Protection Plus अंतर्गत ( UIN 116N021V04 ) विमा पॉलिसी विमाकृत केली होती. वि.प. 2 यांनी गृहकर्ज मंजूर करतांना कर्ज मंजूर रक्कमेतून एक रकमी विमा प्रिमियम रक्कम रुपये 1,47,763.14 पै. वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारकर्तीच्या पतीला अदा केली व पॉलिसी निर्गमित केली. तक्रारकर्तीच्या पतीने विमा पॉलिसी घेतांना त्याच्या प्रकृतीबाबत वि.प. 1 च्या एजंटला संपूर्ण माहिती दिली होती आणि त्यानंतर प्रपोझल फॉर्मवर सही केली होती व त्यात तक्रारकर्तीचे नांव नॉमिनी म्हणून नमूद केले होते.
- तक्रारकर्तीच्या पतीला कोविड झाल्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे भरती केले असता दि. 24.08.2020 ला निधन झाले. त्यानंतर तक्रारकर्तीने विमा रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे विमा दावा सादर केला. परंतु विरुध्द पक्षाने दि. 24.11.2020 च्या पत्रान्वये तक्रारकर्तीचा पती सन 2010 पासून PTCA (Percutaneous Transluminal Coronary Angioplasty ) ने बाधित होता व सदरची बाब तक्रारकर्तीच्या पतीने विमा पॉलिसी घेतांना लपविल्याच्या कारणावरुन विमा दावा नाकारला व तक्रारकर्ती विमा कंपनीच्या निर्णयाशी सहमत नसल्यास तक्रारकर्ती क्लेम रिव्हयू कमिटीला सामोरे जाऊ शकते असे पत्रात नमूद केले आहे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्तीने क्लेम रिव्हयू कमिटीकडे विमा दावा सादर केला होता, परंतु सदर कमिटीने दि. 03.12.2020 च्या पत्रान्वये तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला व विरुध्द पक्षाने घेतलेला निर्णय कायम ठेवला.
- तक्रारकर्तीच्या पतीचा पतीचा मृत्यु Respiraty failure with Phemunia & Covid positive) with ISCHEMUS Heart Disease with systemic Hypertation ने झाल्याचे मृत्यु प्रमाणपत्रात नमूद आहे. तक्रारकर्तीने विमा दावा मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे वारंवारं संपर्क साधून ही विरुध्द पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केली की, ......
अ. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटी पूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे. आ. विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा रक्कम रुपये 15,80,913/- 18 टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल दिनांकापासून प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत देण्याचा आदेश द्यावा. इ. तसेच विरुध्द पक्षाने मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्याचा आदेश द्यावा. - विरुध्द पक्ष 1 व 2 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ते आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द अनु.क्रं. दि. 13.08.2021 व 23.08.2021 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवजाचे अवलोकन केल्यावर आयोगाने प्रकरण निकाली कामी काढण्याकरिता खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय 3. काय आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्ष 2 कडून गृह कर्जाकरिता रुपये 9,77,000/- आणि रुपये 10,80,763/- 10 वर्षाच्या कालावधीकरिता घेतले होते व त्याकरिता वि.प. 2 कडून कर्ज घेतांना वि.प. 1 कडून गृहकर्ज सुरक्षित करण्याकरिता विमा मुल्य रक्कम रुपये 15,80,913/- एवढया रक्कमेकरिता वि.प. 1 च्या एजंट मार्फत पॉलिसी क्रं. 0342306206 अन्वये Group Credit Protection Plus अंतर्गत ( UIN 116N021V04 ) विमाकृत केली होती. वि.प. 2 यांनी गृहकर्ज मंजूर करतांना कर्ज मंजूर रक्कमेतून एक रकमी विमा प्रिमियम रक्कम रुपये 1,47,763.14 पै. वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारकर्तीच्या पतीला अदा केली व पॉलिसी निर्गमित केली होती हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्ती ही विमाधारकाची पत्नी या नात्याने लाभार्थी असून पॉलिसीत तक्रारकर्तीचे नांव नॉमिनी म्हणून नमूद असल्यामुळे ती विरुध्द पक्ष 1 व 2 ची ग्राहक आहे. तक्रारकर्तीने नि.क्रं. 2(5) वर दाखल केलेल्या दि. 24.08.2020 रोजीच्या मृत्यु प्रमाणपत्रात विमाधारकाचा मृत्यु शासकीय मेडिकल रुग्णालय नागपूर येथे कोविड पॉझेटिव्हमुळे झाल्याचे नमूद आहे. यावरुन विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा चुकिचे कारण दाखवून नाकारल्याचे स्पष्टपणे दिसून येते. म्हणून तक्रारकर्ती विरुध्द पक्ष 1 कडून Group Credit Protection Plus अंतर्गत ( UIN 116N021V04 ) विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
- विरुध्द पक्ष 2 ही वित्त पुरवठा करणारे असून त्यांनी तक्रारकर्तीला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीला विमा दावा मुल्य रक्कम रुपये 15,80,913/- आणि त्यावर दि. 24.11.2020 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष 1 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत करावी.
- विरुध्द पक्ष 2 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |