Maharashtra

Kolhapur

CC/13/316

Piraji Krishna Patil - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz Life Insurance Co.Ltd., through Local Manager - Opp.Party(s)

S.M.Potdar/R.M.Potdar

29 Oct 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/316
 
1. Piraji Krishna Patil
790/37, Plot No.11, Yogeshwari Colony, Pachgaon Road, Kolhapur.
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Allianz Life Insurance Co.Ltd., through Local Manager
2nd Floor, Omkar Plaza, Rajaram Road, Bagal Chowk, Kolhapur.
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv.S.M.Potdar/Adv.R.M.Potdar, Present
 
For the Opp. Party:
Adv.A.D.Bhumkar, Present
 
ORDER

निकालपत्र (दि.29.10.2015)  व्‍दाराः- मा. सदस्‍या - सौ. रुपाली डी. घाटगे  

1           सामनेवाले विमा कंपनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा, 1986  चे कलम-12 अन्‍वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली. 

2          प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत होऊन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला.  सामनेवाले यांना नोटीस बजावणी होऊन सदर कामी हजर झाले. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांचे वकीलांचे तोंडी युक्‍तीवाद व सामनेवाले यांचे लेखी युक्‍तीवादाचा विचार करता, सदर काम हे गुणदोषावरती खालीलप्रमाणे निकाल पारीत करीत आहे.

तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

3           तक्रारदार हे औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, कोल्‍हापूर येथे कार्यरत असून सामनेवाले हे विमा कंपनी आहे.  तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनी यांच्‍या Bajaj Allianz Unit Grain Guarantee SP या पॉलीसी प्रॉडक्‍टची माहिती देऊन सदर पॉलीसीअंतर्गत रक्‍कम रु.25,000/- गुंतविले व त्‍यावर 106% जादा फायदा अशी सर्व रक्‍कम पॉलीसीचा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेनंतर देणेत येईल अशी लेखी हमी तक्रारदारास दिलेली होती. सामनेवाले यांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदारांनी दि.18.01.2007 रोजी रक्कम रु.25,000/- रोखीने सिंगल प्रिमीयम पेमेंट या मोडखाली सामनेवाले यांना अदा केले. सदरहू पॉलीसीचा क्र.0036300657, दि.18.01.2007 ते दि.19.01.2012 या पाच वर्षाच्‍या कालावधीकरीता दिलेली आहे. सामनेवाले विमा कंपनीकडून दि.19.01.2012 रोजी म्‍हणजेच सदर पॉलीसीचा कालावधी पूर्ण झाल्‍यानंतर सामनेवाले यांच्‍याकडील मुळ गुंतवणूक रक्‍कम रु.25,000/- + मिनीमम गॅरंटीड मफच्‍युरिटी बेनेफिट रु.26,500/- अशी एकूण होणारी रक्‍कम रु.51,500/- इतकी रक्‍कम येणे होती व सदर पॉलीसीच्‍या अटी व नियमांप्रमाणे हमी व खात्री सामनेवाले यांनी दिलेली होती. पाच वर्षाच्‍या मुदतीनंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍या संबंधीत ऑफीसमध्‍ये गेले असता, त्‍यांना फक्‍त्‍ रक्‍कम रु.24,582/- एवढीच रक्‍कम मिळणार असल्‍याचे सामनेवाले यांचेकडून सांगण्‍यात आल्‍यामुळे तक्रारदरांना प्रचंड मानसिक व आर्थिक धक्‍का बसला. तथापि वर्षभर तक्रारदाराने आपल्‍या न्‍याययोग्‍य रक्‍कम रु.51,500/- या संपूर्ण येणे रक्‍कमेकरीता सामनेवाले यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला. तब्‍बल एक वर्षानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडील मॅच्‍युरीटी रक्‍कम अंडर प्रोटेस्‍ट स्विकारणेचे ठरवून त्‍याप्रमाणे दि.10.05.2013 रोजी त्‍यांनी मॅच्‍युरिटी अॅप्लिकेशन सामनेवाले यांचेकडे समाविष्‍ट केले. सामनेवाले यांनी दि.16.05.2013 रोजी तक्रारदारास रक्‍कम रु.24,582/- इतक्‍या रक्‍कमेचा चेक दिला. दि.11.06.2013 रोजी वकील नोटीसीने सामनेवाले यांच्‍याकडे पॉलीसीच्‍या अटी व नियमानुसार सामनेवाले विमा कंपनीकडून येणे असलेली उर्वरीत रक्‍कम रु.26,918/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदारास सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, तक्रारदारांनी सदरहू तक्रार या मंचात दाखल करुन मॅच्‍युरिटी बेनेफिटची येणे असलेली रक्‍कम रु.26,918/- दि.19.01.2012 पासून ते संपूर्ण रक्‍कम वसूल होऊन मिळेपावेतो द.सा.द.शे.18टक्‍के व्‍याजासहित सामनेवाले यांचेकडून मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- अशी रक्‍कम सामनेवाले यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.  

4           तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केलेली असून ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत.  दि.19.01.2007 चे First Premium Receipt, पॉलीसी समरी, प्रपोझल डिपॉझिट भरलेची सामनेवाले यांनी दिलेली पावती, प्रिमीयम पेड सर्टीफिकेट, पॉलीसीचे वर्णन व फायदे, सामनेवाले यांना दिलेली वकील नोटीस, सदर नोटीस सामनेवाले यांना मिळालेची आर.पी.ए.डी.ची पोहोचपावती तसेच तक्रारदारांचे दि.03.11.2014 रोजीचे पुराव्‍याचे शपथपत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

5           सामनेवाले यांनी दि.19.07.2014 रोजी म्‍हणणे दाखल केलेली असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाले विमा कंपनी Higher Fund Value or Minimum Guaranteed Maturity Benefit देणेस जबाबदार आहे.  जर पॉलीसीतील शेडयुलप्रमाणे पॉलीसी कालावधी 5 वर्षांचा असेल तर Minimum Guaranteed Maturity Benefit 106% एकूण विमा रक्‍कमेवर असून त्‍यातुन Mortality Charges वजा केले जातात. प्रस्‍तुत कामी Minimum Guaranteed Maturity Benefit रक्‍कम रु.17,138/- हा सदर पॉलीसीमध्‍ये नमुद आहे. त्‍याकारणने पॉलीसीतील अटीप्रमाणे तक्रारदार हे      Higher Fund Value or Minimum Guaranteed Maturity Benefit ची रक्‍कम सामनेवाले विमा कंपनीकडून मिळणेस पात्र होते.  पॉलीसीनुसार Minimum Guaranteed Maturity Benefit हा पॉलीसी शेडयुलनुसार रक्‍कम रु.17,138/- होता व सदरची पॉलीसीचे मॅच्‍युरिटीवेळी फंड व्‍हॅल्‍यु रक्‍कम रु.24,582/- इतका येतो.  त्‍याकारणाने सामनेवाले विमा कंपनीने रक्‍कम रु.24,582/- तक्रारदारांना देऊ केलेली असून सदरची रक्‍कम तक्रारदारांनी स्विकारलेली असून यांची माहिती (knowledge) तक्रारदारास आहे.  सामनेवाले यांचेकडे स्‍टेटमेंट ऑफ अकौंटनुसार रक्‍कम रु.25,000/- इतकी रक्‍कम तक्रारदारांनी जमा केली होती. त्‍यानुसार सामनेवाले यांचे 98% allotted rate आणि 10.0350 युनिटप्रमाणे रक्‍कम रु.24,500/- इतकी गुंतवणूक केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना Minimum Maturity Benefit विषयी कल्‍पना दिलेली नव्‍हती आणि सर्व Maturity Benefit हे मार्केटमधील परिस्थितीवर अवलंबून असून सदरची पॉलीसी ही Non-participating Unit Linked plan ची होती. हे तक्रारदारांनी प्रपोझल फॉर्म आणि पॉलीसी शेडयुलप्रमाणे माहिती होते.

6           तक्रारदारांना जर सदरचे पॉलीसी मान्‍य नव्‍हती तर पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार सामनेवाले यांनी दिलेल्‍या फॅसीलीटीनुसार सदरची पॉलीसी तक्रारदारांना रद्द करता आली असती.  सामनेवाले क्र.1 यांनी Cancellation Facility ही प्रत्‍येक विमाधारकाला दिलेली असून त्‍यानुसार, सामनेवाले क्र.1 यांना विमा हप्‍ता (Premium Amount) सदरचे Facility नुसार तक्रारदारांना परत करता येते. तथापि तक्रारदारांनी तसे न करता पॉलीसीचा लाभ घेऊन सदरची पॉलीसी चालू ठेवलेली आहे. पॉलीसीचे कागदपत्रावरुनच विमा हप्‍त्‍याची रक्‍कम ही equity, stock, bonds इत्‍यादी स्‍वरुपात गुंतविलेली होती आणि पॉलीसीचा returns (नफा) हा सदरचे stock market or equity market वर अवलंबून असतो.  जर शेअर मार्केट चांगले असेल तरच विमाधारकाला त्‍याचा फायदा होतो. पॉलीसीतील हप्‍त्‍यावर कोणताही इंटरेस्‍ट आणि बोनस नव्‍हता हे तक्रारदारांना माहित होते.  तक्रारदारांनी सदरचे पॉलीसीनुसार कोणतीही फिक्‍सड् रिर्टनस ठराविक वेळेत मिळतील किंवा नाही याची जोखीम (Risk) तक्रारदारांना स्विकारलेली होती.  सदरची पॉलीसी ही गुंत‍वणिकेच्‍या दृष्‍टीकोनातुन तक्रारदारांनी घेतलेला होती. पॉलीसीनुसार गुंतविलेली रक्‍कमेवर शेअर मार्केटप्रमाणे नफा हा तक्रारदारांना प्राप्‍त होणार होता.  त्‍याकारणाने, सदरची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाचे अधिकारक्षेत्रात (Jurisdiction) येत नसलेने या मंचात चालणेस अपात्र नामंजूर करणेत यावी.

7           सदरची पॉलीसी शेडयुलप्रमाणे माहित होते. सदरची पॉलीसी ही गुंतवणूक स्‍वरुपाचे असून तक्रारदारांनी सदरचे पॉलीसीमध्‍ये पैसे मिळवण्‍याच्‍या हेतुने गुंतवणूक केलेली असलेने सदरचे transaction commercial स्‍वरुपाचे आहे. सदरचा प्रपोझल फॉर्म तक्रारदारांनी स्‍वत: भरलेला असून तक्रारदारांना कोणताही दबाव अथवा फसवणूक करुन घेतलेला नव्‍हते.

8           सदरचे पॉलीसी प्राप्‍त झालेनंतर 7 वर्षापूर्वी तक्रारदारांनी कोणताही हरकत (grievances) सदरचे पॉलीसीतील अटीबाबत घेतलेला नाही.  सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेचे तक्रारदारांना सदरचे पॉलीसीचे सर्व कागदपत्रे, त्‍या अनुषंगाने, मिळण्‍याचे फायदे / Benefit तक्रारदारांना दिलेले होते.  तक्रारदारांनी सदरची विमा रक्‍कम under protest स्विकारलेचे हे म्‍हणणे बेकायदेशीर, बिनबुडाचे आहे.  सदरची बाब, (burden of Proof) ही तक्रारदारांनी सिध्‍द करणेची जबाबदारी असताना देखील तक्रारदारांनी सिध्‍द केलेली नाही.  तक्रारदारांनी सदरची संपूर्ण विमा रक्कम (amount of maturity) full and final satisfaction झालेमुळे स्विकारलेली आहे.  तक्रारदारांची सदरची पॉलीसी ही 2007 सालची असलेने 7 वर्षोचे पॉलीसीमधील अटी व शर्तीबाबत तक्रारदार हरकत (objection) घेतलेने तक्रारदारांची तक्रार ही time barred असलेने नामंजूर करणेत यावी.  सबब, तक्रादारांनी रक्‍कम रु.25,000/- इतकी कॉस्‍ट सामनेवाले यांना देऊन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी.

9           सामनेवाले यांनी दि.19.07.2014 रोजी 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे- तक्रारदारांची पॉलीसी डॉक्‍युमेंट कागद क्र.1/1 ते 1/15 व इतर संबंधीत कागद, तक्रारदाराने दिले डिक्‍लेरेशन, तक्रारदाराने दिला प्रपोजल फॉर्म, तक्रारदाराचे ओळखपत्र व तक्रारदाराचे अकाऊंट स्‍टेटमेंट, इत्‍यादी कागदपत्रे जोडलेली आहेत.

10          तक्रारदारांचा तक्रार अर्ज व सामनेवाले क्र.1 व 2 यांचे म्‍हणणे तसेच  सोबत दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र व तक्रारदारांचे वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला व सामनेवाले यांच्‍या लेखी युक्‍तीवादाचा विचार करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

मुद्दे

उत्‍तर

1

 तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात काय ?

नाही

2

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा:-

मुद्दा क्र.1:-  तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे Bajaj Allianz Unit Grain Guarantee SP पॉलीसी अंतर्गत रक्‍कम रु.25,000/- अधिक त्‍यावर 106% ज्‍यादा फायदा अशी 5 वर्षाचे कालावधीसाठी पॉलीसी गुंतविलेली होती.  पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही.  सदरचे पॉलीसीचे कालावधी पूर्ण झालेनंतर गुंतवणूक रक्‍कम रु.25,000/- अधि‍क Minimum Guaranteed Maturity Benefit Rs.26,500/-  एकूण रक्‍कम रु.51,500/- रक्‍कम सामनेवाले यांनी देणेचे हमी तक्रारदारांना दिली होती.  तथापि सामनेवाले यांनी तक्रारदारांनी रक्‍कम रु.24,582/- इतकी रक्‍कम देऊन उर्वरीत रक्‍कम तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍याकारणाने, सामनेवाले यांनी सदरची पॉलीसी तक्रारदारांचेकडून उतरवून तक्रारदारांना पॉलीसीप्रमाणे प्राप्‍त होणारी उर्वरीत रक्‍कम रु.26,918/- इतकी अदयाप न देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. या कारणास्‍तव सदरची तक्रार दाखल तक्रारदारांनी केलेली आहे. तथापि सामनेवाले यांनी सदरची पॉलीसी ही गुंतवणूक नफा मिळविणेच्‍या उद्देशाने घेतलेली असल्‍याने सदरची पॉलीसी कर्मिशिअल स्‍वरुपाची असल्‍याने तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक होत नाही असा बचाव घेतलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने विमा पॉलीसी प्रपोजलचे अवलोकन केले असता, त्‍यावर तक्रारदाराचे नांव आहे.

            Product Name             :           Bajaj Allianz Unit Grain Guarantee SP

            Single Premium          :           RS.25,000/-

            Sum Assured               :           Rs.31,250/-

            Death Benefit              :           Rs.31,250/- + Fund Maturity

            Maturity Benefit         :           Minimum Guarantee Maturity Benefit or

Fund Value whichever is higher.

            सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदार हे सदरची पॉलीसीनुसार सदरच्‍या पॉलीसीचे बेनीफीट हे सदरची पॉलीसी मॅच्‍युअर झालेवर Minimum Guarantee Maturity Benefit or Fund Value जे काही जास्‍त असेल ते तक्रारदार हे मिळणेस पात्र होते हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. 

            सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये, पॉलीसीतील शेडयुलप्रमाणे पॉलीसी कालावधी 5 वर्षांचा असेल तर Minimum Guaranteed Maturity Benefit 106% एकूण विमा रक्‍कमेवर असून त्‍यातुन Mortality Charges वजा केले जातात. प्रस्‍तुत कामी Minimum Guaranteed Maturity Benefit रक्‍कम रु.17,138/- हा सदर पॉलीसीमध्‍ये नमुद आहे. त्‍याकारणने पॉलीसीतील अटीप्रमाणे तक्रारदार हे Higher Fund Value or Minimum Guaranteed Maturity Benefit ची रक्‍कम सामनेवाले विमा कंपनीकडून मिळणेस पात्र होते.  पॉलीसीनुसार Minimum Guaranteed Maturity Benefit हा पॉलीसी शेडयुलनुसार रक्‍कम रु.17,138/- होता व सदरची पॉलीसीचे मॅच्‍युरिटीवेळी फंड व्‍हॅल्‍यु रक्‍कम रु.24,582/- इतका येतो.  त्‍याकारणाने सामनेवाले विमा कंपनीने रक्‍कम रु.24,582/- तक्रारदारांना देऊ केलेली असून सदरची रक्‍कम तक्रारदारांनी स्विकारलेली असून हे यांची माहिती (knowledge) तक्रारदारास आहे.  सामनेवाले यांचेकडे स्‍टेटमेंट ऑफ अकौंटनुसार रक्‍कम रु.25,000/- इतकी रक्‍कम तक्रारदारांनी जमा केली होती. त्‍यानुसार सामनेवाले यांचे 98% allotted rate आणि 10.0350 युनिटप्रमाणे रक्‍कम रु.24,500/- इतकी गुंतवणूक केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना Minimum Maturity Benefit विषयी कल्‍पना दिलेली नव्‍हती आणि सर्व Maturity Benefit हे मार्केटमधील परिस्थितीवर अवलंबून असून सदरची पॉलीसी ही Non-participating Unit Linked plan ची होती. हे तक्रारदारांनी प्रपोझल फॉर्म आणि पॉलीसी शेडयुलप्रमाणे माहिती होते.

            सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणणेनुसार, तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये सदरची Higher Fund Value रक्‍कम रु.24,582/- इतकी रक्‍कम सामनेवाले यांचेकडून दि.10.08.2013 रोजी स्विकारलेचे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये मान्‍य केले असलेचे या मंचास स्‍पष्‍टपणे दिसून येते.  परंतु सदरची रक्‍कम चेक स्‍वरुपात स्विकारताना under protest स्विकारलेचे तक्रारदारांचे तक्रारीत कथन केले आहे.  तथापि सदरचा चेक under protest स्विकारलेची बाब सिध्‍द करणेची जबाबदारी (Burden of Proof) तक्रारदारांवर असताना देखील तक्रारदारांनी मा.मंचात सदरची बाब सिध्‍द केलेली नाही. तसेच सदरचा प्रपोझल फॉर्म भरतेवेळी तक्रारदारांचे वर सामनेवाले यांनी कोणताही दबाव (Coercion) अथवा फसवणूक करुन भरून घेतलेला नाही. सदरचे पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारदारांना सदरचे पॉलीसी मॅच्‍युअर झालेनंतर मॅच्‍युअर बेनिफिटप्रमाणे Minimum Guarantee Maturity Benefit or Fund Value  यापैकी जे जास्‍त असेल ते प्राप्‍त होणार हे तक्रारदारांना सामनेवाले यांनी सदरचे पॉलीसी शेडयुलनुसार ज्ञात/माहीत करुन दिेलेले होते व त्‍यानुसार, तक्रारदारांनी सदर पॉलीसीची Higher Fund Value  ही स्विकारलेली देखील आहे, हे वरील सर्व कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट होते.

            सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या प्रपोझल फॉर्ममध्‍ये डिक्‍लेरेशनचे या मंचाने अवलोकन केले असता,

      Declaration in case of UL Policies – I understand and agree that the same will be subject to market risks, condition and fluctuations and that Bajaj Allianz Life Insurance Company may not be able to guaranty any minimum return on the said policy.      

        सदर Declaration वर तक्रारदारांची सही आहे.

                  तसेच Declaration वरुन तक्रारदारांनी सेंच्‍युरी प्‍लस युनिट लिंक स्‍वरुपाची पॉलीसी घेतलेली असून पॉलीसीनुसार गुंतविलेल्‍या रक्‍कमेवर शेअरमार्केट प्रमाणे नफा (Returns) हा अवलंबून असतो हे तक्रारदारांना माहित होते. तक्रारदारांनी घेतलेली विमा पॉलीसी ही पॉलीसीमध्‍ये नमुद केलेले बेनीफीट मिळणेकरीता घेतलेली आहे हे वरील कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. 

            सदरची पॉलीसी ही सन-2007 साली तक्रारदारांनी घेतलेली होती.  जर तक्रारदाराला सदरची पॉलीसी मान्‍य नव्‍हती तर तक्रारदारांनी सामनेवाले यांनी दिलेल्‍या पॉलीसीतील अटी व शर्तीमधील CLAUSE NO.15-Free Look Period कॅन्‍सलेशन फॅसीलीटीनुसार सदरची पॉलीसी तक्रारदार रद्द (Cancel) करु शकत होते.  तथापि तक्रारदारांनी सदरची गुंतवणूक स्‍वरुपाची पॉलीसी चालू (Continue) ठेवली.

                  वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदाराने घेतलेली पॉलीसी ही विमा पॉलीसीमधून नमुद केलेल्‍या बेनीफीट मिळणेकरीता घेतलेली होती व त्‍यानुसार फंड व्‍हॅल्‍यू (Fund Value) तक्रारदारांनी स्विकारलेली देखील आहे व सदरची बाब तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये मान्‍य देखील केलेली आहे. सबब, सदरची पॉलीसी ही वाणिज्यिक प्रयोजनाकरिता (Commercial  Purpose)  विमा पॉलिसी घेतलेली आहे हे दिसून येते. त्‍याकारणाने, तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 2(1)(d) मधील “ग्राहक” या संज्ञेमध्‍ये बसत नाहीत.  कलम 2(1)(d) मधील “ग्राहक” ‍व्‍याख्‍या अशी-  

d) “consumer” means any person who-

(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or

(ii) 1[hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 1[hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first-mentioned person;

2[Explanation: For the purposes of sub-clause (i), “commercial purpose” does not include use by a consumer of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;]

सबब, हे मंच सामनेवाले यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या न्‍या‍यनिवाडाचा आधार घेत आहे.

Revision PetitionNo.658/2012 N.C., New Delhi

Ram Lal Aggrawal

Versus

Bajaj Allianz Life Insurance Co.Ltd.

The petitioner /Complainant is put to strict proof of the same.  Even for the sake of argument if its assumed that at the time of taking the policy the petitioner / Complainant was ignorant about the details of the policy, but after receipt of the policy certificate and the terms and condition of the policy, he could have returned the policy in the free look period of 15 days as contained in clause no.14 of the policy document.  The policy being an Unit Linked policy and is dependent on the market volatility and the value may go up or may come down depending upon the market condition.  The fund switching has been done strictly on the basis of the written requests of the Complainant in the prescribed forms.  

The investment made by the petitioner/Complainant was to gain profit.  Hence, it was invested for commercial purpose and therefore, the petitioner/ Complainant is not a consumer under the Opposite Parties.  The State Commission, Odisha in First Appeal no.162 of 2010 in the case of Smt.Abanti Kumari Sahoo Vs. Bajaj Allianz Life Insurance Company Ltd., have held that the money of the petitioner/ Complainant invested in the share market is no doubt a speculative gain and the speculative investment matter does not come under the Consumer Protection Act and accordingly, the State Commission dismissed the appeal. 

In view of the aforesaid discussions and findings of the State Commission, we are of the opinion that the present complaint is not maintainable under the Consumer Protection Act, 1986 and as such it is dismissed being devoid of merit.

      सबब, वरील सर्व कागदपत्रांचा मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयाचा विचार करता, ग्राहक कायदा कलम-2(1)(डी) व्‍याखेचा विचार करता, तक्रारदारांच्‍या सदरच्‍या तक्रारीतील पॉलीसी ही Bajaj Allianz Unit Gain Guarantee SP असून सदर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम ही equity, stock, bonds इत्‍यादी स्‍वरुपात मार्केटमध्‍ये गुंतविलेली आहे व सदरचे रक्‍कमेवर शेअर मार्केटप्रमाणे होणारा नफा म्‍हणजेच Higher Fund Value हा तक्रारदारांना सदरची पॉलीसी मॅच्‍युअर झालेवर मिळालेला होता व त्‍यांनी स्विकारलेला होता. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे ग्राहक कायदा,1986 चे कलम-2(1)(डी) नुसार ग्राहक या व्‍याख्‍येत बसत नाहीत. तक्रारदारांची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाचे अधिकारक्षेत्रात (Jurisdiction) येत नसलेने या मंचात चालणेस अपात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र.2:- मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करीता, तक्रारदार हे ग्राहक कायदा कलम-2(1)(d) नुसार ग्राहक या व्‍याख्‍येत बसत नसलेने तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर येतो. तक्रारदारांनी त्‍यांचे इच्‍छेनुसार योग्‍य त्‍या न्‍यायालयात आपली दाद मागावी तसेच हे मंच पुढे असे विहीत करीत आहे की, सदर प्रकरणासाठी व्‍यथित झालेला कालावधी यापुढे मुदत माफीसाठी ग्राहय धरणेत यावा.  सबब आदेश,

                       आदेश

1.   तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.

2.   खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

3.   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.