Maharashtra

Thane

CC/10/67

Mr. Kailash Jaiswar - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz Insurance - Opp.Party(s)

Adv.Subhash D.Tigde

23 Jun 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/67
 
1. Mr. Kailash Jaiswar
Bldg. No. 03, Sector 06, R. no. 102, 3rd Floor, Tal. Pen, Dist Raigad, Maharashtra.
Raigad.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Allianz Insurance
Divisional Manager, Bajaj Allianz Sun Magnchca Bidg.,Near RTO Off.,Insurance Co. Ltd., Sun Magnetica Bldg., Near R.T.O. Office, Louis Wadi, Thane.
Thane.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Jun 2017
Final Order / Judgement

 (द्वारा मा. सदस्‍या – श्रीमती. माधुरी एस. विश्‍वरुपे)

1.    तक्रारदार यांनी उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी टाटा टेम्‍पो क्रमांक – एमएच-06-एसी-605 विकत घेतले होते.  तक्रारदारांनी सदर वाहनाकरीता वाहन क्लिनर (Cleaner) म्‍हणुन श्री. कपील दुबार चैसवाल यांना नेमण्‍यात आला होता.  तक्रारदार त्‍यांना रु. 4,200/- प्रतिमहिना पगार देत होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन त्‍यांचे Workmen करीता मोटार वाहन कायद्यान्‍वये सक्‍तीची (compulsory) असलेली विमा पॉलीसी घेतली.  प्रस्‍तुतस पॉलीसी अन्‍वये तक्रारदारांचे कामगाराना अपघातात काही इजा (injury) झाल्‍यास अथवा मृत्‍यु पावल्‍यास सामनवेाले यांनी तक्रारदारातर्फे कामगारास (workman) / वारसास नुकसान भरपाई देण्‍याचे दायित्‍व स्विकारले होते.  सामनेवाले यांनी दिलेली विमा पॉलीसी ता. 16/09/2008 ते ता. 15/09/2009 या कालावधी करीता वैध होती.  दुर्दैवाने श्री. कपील दुबार जैसवार हे तक्रारदारांचे वाहनाकरीता काम करीत असतांना ता. 29/08/2009 रोजी पुणे – मुंबई express Highway वरील ऑक्‍ट्रॅय नाका, खालापूर सावरोली येथे सकाळी 3 वाजता झालेल्‍या अपघातामध्‍ये गंभीररित्‍या जखमी झाले सदर अपघाताची नोंद खालापूर पोलीस स्‍टेशन, जि. रायगड येथे करण्‍यात आली.

 

2.          श्री. कपील दुबर जैसवार यांचे वय 20 असुन त्‍यांना रु. 4,200/- पति महा मंजुरी तक्रारदार देत असल्‍यामुळे (9200 x 601 x 224) रु. 4200/- प्रती महिना एवढी नुकसान भरपाई त्‍यांना आलेल्या 100% टक्‍के शारिरीक अपंगत्‍वाबद्दल सदर पॉलीसीनुसार देय आहे.  या कारणास्‍तव कामगार श्री. कपील डुबार जैसवार  यांनी त्‍यांचे अपघाती नुकसान भरपाई मागणी करीता तक्रारदारांना कायदेशिर नोटिस पाठविली. तक्रारदारांनी या संदर्भात विमा दावा आवश्‍यक आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसहीत सामनेवाले यांचेकडे दाखल केला.  तथापी सदर विमादाव्यानुसार विमा पॉलीसी अंतर्गत नुकसान भरपाईची रक्‍कम सामनेवाले यांनी अदा केली नाही असे तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमुद केले आहे.

 

3.          सामनेवाले यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार कामगार नुकसान भरपाई (W.C. Act) कायद्यान्‍वये अथवा मोटर अपघात कायदा कलम 165 अन्‍वये दाखल करणे आवश्‍यक होते.  सदर तक्रार मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात (jurisdiction) मध्‍ये येत नाही.  तसेच तक्रारदार सदर व्‍यवसाय उदरनिर्वाह करीता असल्‍याची बाब सामनेवाले यांना मान्‍य नाही.  सबब प्रस्‍तुत तक्रार वाणिज्‍य हेतुने दाखल केल्याचे दिसुन येते.  तसेच सामनेवाले यांनी तक्रारीमध्‍ये नमुद केलेला मजकुर पुर्णपणे नाकारला आहे.

 

4.          मंचाने तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाले यांची लेखी कैफीयत तसेच उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे व या सर्वांचे अवलोकन केले उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच निष्‍कर्ष काढत आहे.   

5.                              कारण मिमांसा

अ. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या वाहनाकरीता सामनेवाले यांच्‍याकडुन विमा पॉलीसी घेतल्‍याची बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे.  तक्रारदारांच्‍या मालकीच्‍या टाटा टेम्‍पो नं. एमएच-6-एसी / 605 मध्‍ये टोयॅटो माजी जिल्‍हा सातारा येथुन मुंबई येथे घेवुन येत असतांना ता. 29/08/2009 रोजी मुंबई पुणे एक्‍सप्रेस हायवे वर खालापूर सावरोली टोल नाक्याच्‍या पुढे सकाळीसुमारे 3 वाजता झालेल्‍या अपघातात ड्रायव्हर व क्लि‍नरला दुखापत झाल्‍याची बाब खालापूर पोलीस स्‍टेशन यांचेकडे तक्रारदार वकीलांनी दिलेल्‍या अपघाताची खबर मध्‍ये नमुद केल्‍याचे दिसुन येते तसेच कपील जैसवार यांना सदर अपघातात झालेल्‍या दुखापतीबाबत वैद्यकीय उपचार  घेतल्‍याबाबतचे ब्रहनमुंबई महानगर पालिका हॉस्‍पीटल व लोकमान्‍य टिळक म्युनिसीपल जनरल हॉस्‍पीटल सायन या हॉस्‍पीटलची कागदपत्रे तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केली आहेत.

ब. Workmen’s compensation Act, मधील कलम-3 प्रमाणे वर्कमॅन यांना नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी तक्रारदारांची असुन सदर कायद्याच्‍या कलम-4 A नुसार तक्रारदारांनी श्री. कपील जैसवार यांना अपघातामध्‍ये झालेल्‍या दुखापती संदर्भात विहीत मुदतीत नुकसान भरपाईची रक्‍कम देणे आवश्‍यक होते, व त्‍यानंतर सदर रक्‍कम सामनेवाले यांचे कडुन प्रतिपुर्ती (re-imbrues) करणे आवश्‍यक होते.  सामनेवाले यांनी विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांना द्याव्या लागणा-या नुकसान भरपाईच्‍या रकमेला इंडेम्न्फिाय (indemnify) केले आहे असे मंचाचे मत आहे.

क. तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार Workmen’s Compensation Act 1923 sec 19(2) प्रमाणे कामगार न्‍यायालयात तसेच Motor Vehicle Act Sec 165 अन्‍वये मोटार अपघात न्‍यायाधिकरण यांचेकडे तक्रार दाखल करण्‍याची कायदेशिर तरतुद असुन ग्राहक संरक्षण कायदा कलम 3 मधील तरतुदीनुसार तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करण्‍याचा अधिकार आहे.  सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार कामगार कायदा व मोटार वाहन कायदा हे विशेष प्रकारचे कायदे (special Law) असुन special law मधील तरतुदीनुसार प्रस्‍तुत प्रकरण दाखल करणे आवश्‍यक आहे.

ड. सामनेवाले यांनी या संदर्भात मा. सर्वोच्च न्‍यायालयाचा खालील न्‍यायनिर्णय दाखल केला आहे.  Civil Appeal No. 7142/93 Decided on 09/02/1995

The Chairman Thriuvaallurar Transport corporation

V/s

The Consumer Protection Council

A) Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(C) – complaint – motor vehicles Act 1988 – section 165 – deceased travelled in the bus – bus met with an accident – deceased succumbed to the injury – complaint by the legal representatives of deceased before National Commission – relief granted by National Commission – held the complaint in instant case not in relation to any service hired or availed by the consumer but injury sustained due to accident  - fail  within section 165 of 1988 Act.

B) Consumer Protection  Act, 1986 – Section 21 – Jurisdiction of National Commission – Motor vehicle accident – whether National Commission has jurisdiction to entertain claim application and award compensation in respect of motor vehicle accident? – Case falls within 1988 Act, specia; Act 1986 Act, general law – general law must yield to special law – held the National Commission exercised unwarranted jurisdiction.

वरील न्‍यायनिर्णय प्रस्‍तुत प्रकरणात लागु होतो असे मंचाचे मत आहे.    

इ. तसेच प्रस्‍तुत तक्रारीतील दाखल पुराव्यानुसार तक्रारदारांनी सदर तक्रारीतील कामगार / कपील दुबर जैसवार यांना समाविष्‍ठ केले नाही.  श्री. कपील दुबार जैसवार यांनी तक्रारदारांना अपघातातील नुकसान भरपाईच्‍या रकमेची मागणी केल्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही.  तसेच श्री. कपील दुबार जैसवार यांच्‍या तक्रारीतील नमुद अपघाता संदर्भातील नुकसान भरपाईची रक्‍कम नियमानुसार त्‍यांना अदा केली आहे का? किंवा कमिशनर ऑफ कॉम्पेनशेसन यांचे कडे भरणा केली आहे का? या बाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही.

ई. Workmen’s Compensation Act 1923 clause 8 Distribution of Compensation नुसार एम्‍प्‍लॉयरने नुकसान भरपाईची रक्‍कम कमिशनर यांचेकडे भरणा करणे बंधनकारक आहे व त्‍यानंतर कमिशनर अँवार्डनुसार ती कामगार किंवा वारसांना अदा करण्‍यात येते.

उ. तक्रारदार यांनी नुकसान भरपाईची रक्कम कामगाराला अथवा वारसांना अदा केल्‍यानंतर सदर रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना अदा करण्‍याची जबाबदारी विमा पॉलीसीतील अटी व शर्ती नुसार बंधनकारक आहे. तक्रारदारांनी श्री. कपील दुबार जैसवार यांना नुकसान भरपाईची रक्‍कम नियमानुसार अदा केल्‍याची बाब अथवा सदर नुकसान भरपाईची कमिशनर यांच कडे भरणा केल्‍याची बाब सबळ पुराव्यानिशी सिध्‍द केली नाही.  सबब प्रस्‍तुत तक्रार मुदतपुर्व (pre-mature) असल्‍याचे कारणास्‍तव खारीज करण्‍यात येते.  तसेच तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण (cause of action ) घडले नाही असे मंचाचे मत आहे.

 

6.            उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो. या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .

                                           आदेश

1. तक्रार क्र. 67/2017 खारीज करण्‍यात येते.

2. खर्चाबाबत आदेश नाहीत.

3. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

4. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.