द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. ही तक्रार तक्रारदारातर्फे दाखल करण्यात आली असून तक्रारीवर मीरा एस.रोटांगण यांची सही आहे. त्याचबरोबर त्यांनी सुरेश नेमाराम कुमावत या त्यांच्या भावाला अधिकार दिल्याचे तक्रारीखाली जे व्हेरीफिकेशन केले आहे त्यात म्हटले आहे. वास्तविक पहाता सुरेश कुमावत जे तक्रारदाराचे भाऊ आहेत त्यांची स्वतंत्र पॉवर ऑफ अँटॉर्नी असणे आवश्यक हाते. तक्रारीत नमूद केले म्हणजे अधिकार पूर्ण होत नाही. असे असले तरी मूळ तक्रारीवर तक्रारदाराची सही असल्यामुळे ही तक्रार दाखल झाली आहे. ती दाखल झाल्यावर ती अधिकारक्षेत्राचे कारणावर नेमण्यात आली होती, त्यासाठी तक्रारदाराना दि.3-5-11 तारीख नेमण्यात आली होती. 2. तक्रारदाराची तक्रार बजाज अलियांज इन्शु.कं.विरुध्द दाखल असून ती त्यांच्या येरवडा पुणे शाखेविरुध्द तसेच ब्रँच ऑफिस अंधेरी कुर्ला रोड येथे आहे. त्यांचेविरुध्द तसेच एच.डी.एफ.सी. बँक लि. सेनापती बापट मार्ग, मुंबई व एच.डी.एफ.सी. ची ब्रँच वाशी नवी मुंबई यांचेविरुध्द दाखल केली आहे. 3. तक्रारकर्तीचे असे कथन आहे की, तक्रारकर्तीचे पती मयत झाले आहेत, त्याने एच.डी.एफ.सी.कडून लोनद्वारे मारुती व्हॅन आठ सीटर खरेदी केली असून तिचा नं.एम.एच-04 ईडब्ल्यू 7615 आहे. त्यासाठी सामनेवाले 2 ने फायनान्स दिला होता. फायनान्स करतेवेळी सामनेवाले 2 ने सामनेवाले 1 तर्फे विमा उतरवणेस सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स उतरवला होता व हा इन्शुरन्स उतरवताना त्यांनी सुरक्षा कवच म्हणून वेगळी पॉलिसी त्यांना दिली होती तिचा नं.0जी/09/1901/6014/00173391 असा असून 28-2-09 ही तारीख आहे. ही पॉलिसी अस्तित्वात असताना तक्रारकर्तीचे पती मयत झाले असल्यामुळे तिचे पैसे परत मिळणे आवश्यक असल्याचे तिचे म्हणणे आहे. 4. तक्रार दाखल झाल्यानंतर अँडमि शनसाठी नेमली असताना ही तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येते किंवा नाही हा प्रश्न मंचापुढे उपस्थित झाला. त्यासंबंधी मंचाने तक्रारदाराचे वकीलांना युक्तीवाद करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराच्या वकीलांनी ज्युरिसडिक्शनच्या मुद्दयावर युक्तीवाद केला. त्यांचे असे म्हणणे होते की, एच.डी.एफ.सी.ची शाखा वाशी येथे आहे म्हणून ही तक्रार या मंचाला चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 11(2)(ए)(6) चा आधार घेऊन सामनेवाले या मंचाचे कार्यक्षेत्रात कार्य करत असल्यामुळे या मंचाला दाखल करुन घेण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. मंचाने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. त्यावरुन असे दिसते की, संबंधित सामनेवाले कंपनीची पॉलिसी ही बजाज अलियांज जन.इन्शु. लि.यांचेतर्फे इश्यू करण्यात आली असून ती पॉलिसी बजाज अलियांजचे अंधेरी शाखेतर्फे इश्यू करण्यात आल्याचे दिसते. बजाज अलियांज कंपनीचे मुख्य कार्यालय येरवडा पुणे येथे असून ब्रँच कार्यालय अंधेरीला असल्याचे पॉलिसीवरुन दिसून येते. तक्रारकर्तीने असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचे पती मयत झाल्यावरसुध्दा सामनेवालेनी त्यांची रक्कम त्यांचे खात्यातून वर्ग केली आहे, त्याबाबत त्यांनी पासबुकाचा पुरावा दाखल केला आहे, ते पाहिले असता ते कोणत्या बँकेचे आहे याचा बोध होत नाही. फक्त पासबुक हे भाईंदर पूर्व येथील कोणत्यातरी बँकेचे असल्याचे दिसून येते. त्यानुसार त्यांनी रक्कम काढल्याचे दिसत आहे. दि.13-9-10 चे पत्रावरुन असे दिसते की, एच.डी.एफ.सी.चे भाईंदर शाखेकडून कर्जाचे पैसे घेतले आहेत. बजाज अलियांज कंपनीच्या दाखल केलेल्या तक्रारदाराचे क्लेम नाकारल्याचे दि.1-11-10 चे पत्र ते अंधेरी कुर्ला या शाखेने इश्यू केले आहे. 5. या सर्वावरुन मंचापुढे असा प्रश्न येतो की, या तक्रारीचे कारण या क्षेत्रात घडले नसल्यामुळे ही तक्रार मंचाला चालवण्याचा अधिकार निर्माण होईल काय? याचे उत्तर नाही असे आहे. केवळ या कार्यक्षेत्रात सामनेवाले कामास आहेत किवा व्यवसाय करतात म्हणून मंचाला अधिकार प्राप्त होणार नाही. प्रत्यक्ष ज्या शाखेबरोबर त्यांचा व्यवहार झाला आहे त्या कार्यक्षेत्रात त्यांनी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तशी त्यांनी न करता केवळ या मंचाच्या कार्यक्षेत्रात त्यांचे ब्रँच ऑफिस आहे म्हणून ही तक्रार दाखल करणे चुकीचे आहे. 6. कलम 11 प्रमाणे सामनेवाले जर वेगवेगळया ठिकाणी रहात असतील तर त्यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदारानी तशी पूर्वपरवानगी संबंधित मंचाकडून घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे तसा परवानगीचा अर्ज तक्रारदारानी दिलेला नाही या ही कारणास्तव ही तक्रार अँडमिशन स्टेजला नाकारता येईल असे मंचाचे मत आहे. कार्यक्षेत्राचे बाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय दिला आहे त्यानुसार ज्या कार्यक्षेत्रात व्यवहार घडला आहे त्याच कार्यक्षेत्रात दाखल करणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत असल्यामुळे ही तक्रार कार्यक्षेत्राचे कारणास्तव चालवण्यात येत नसल्यामुळे ती अँडमिशन स्टेजला नामंजूर करुन निकाली करण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 2010 CTJ 2 Supreme court CP Sonic surgical V/s. National Insurance Co.Ltd. Civil Appeal no.1560 of 2004. 20-10-2009. 7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. वर चर्चा केलेल्या कारणास्तव तक्रारदारांची तक्रार या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे अँडमिशन स्टेजलाच ती खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे. 2. सदर आदेशाची प्रत तक्रारदाराना पाठवण्यात यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुबई. दि.5-5-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |