निकालपत्र :- (दि.24/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार यांनी श्री प्रदिाप लीलाचंद राठोड रा.सी-12,एम.आय.डी.सी. शिरोली पुलाची, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर यांचेकडून सामनेवालांकडे इन्शुअर्ड असलेली लक्झरी बस क्र.MH-09-L-6642 ही दि.30/03/2010 रोजी खरेदी केली. सदर गाडीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला असून त्याचा कालावधी हा दि.07/10/2009 ते 06/10/2010 असा आहे. वर नमुद गाडीचा सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.11/05/2010 रोजी अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्ये तक्रारदाराचे गाडीचे दुरुस्तीस रु.2,88,000/- इतक्या रक्कमेचे नुकसान झाले आहे. त्याबाबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे तक्रारदारांनी क्लेमची मागणी केली असता दि.12/07/2010 रोजी सामनेवाला यांनी “ अपघातावेळी पॉलीसीवर श्री प्रदिप लीलाचंद राठोड असे नांव होते व गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेटवर श्री अमरजीत शहाजीराव देशमुख असे नांवे होते ” या कारणाने क्लेम देता येत नसलेचे कळवले आहे. वास्तविक गाडीचे अपघातात नुकसान झाले त्यावेळी गाडी कायदेशीरपणे तक्रारदांराचे नांवे होती व सदर गाडीची विमा पॉलीसीही चालू स्थितीत होती. तसेच पॉलीसीचे कालावधीतच गाडीचा अपघात झालेने व तक्रारदार हे क्लेम घेणेस कायदयाने पा9 असूनही सदर गाडीचा क्लेम न देऊन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर व्हावी व तक्रारदाराची क्लेमची रक्कम रु.2,88,000/- दि.11/05/2010 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पाठविलेले पत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मान्य केले कथनाखेरीज तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुतची तक्रार खोटी चुकीची खोडसाळपणाची असलेने प्रथमदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदार हा सामनेवालांचा पॉलीसीधारक नाही. अपघातावेळी सामनेवाला व तक्रारदारामध्ये कोणत्याही प्रकारचा करार नव्हता. प्रस्तुत तक्रारीचे स्वरुप गुंतागुंतीचे असलेने तसेच अनेक कागदपत्रे व साक्षीदारांची तपासणेची गरज असलेने प्रस्तुत कायदयाच्या तरतुदीचा विचार करता प्रस्तुत तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र मे. मंचास येत नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारीतील नमुद लक्झरी बस क्र.MH-09-L-6642 या गाडीचा विमा अपघातावेळी श्री प्रदिप लिलाचंद राठोड यांचे नांवे सामनेवालांकडे उतरविलेला होता.त्याचा पॉलीसी नं.कोजी-10-1001-1812-00000534 असून त्याचा कालावधी हा दि.07/10/2009 ते 06/10/2010 असा होता. इन्शुरन्स अक्ट 1938 कलम 64व्हिबी तरतुदीस अधिन राहून पॉलीसीच्या अटी व शर्ती व मर्याद, अपवाद याचा विचार करुन पॉलीसी दिलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्रस्तुतचा विमा पॉलीसीचा क्लेम फॉर्म हा प्रदिप राठोड यांचे नांवे दिलेला आहे तसेच पॉलीसीही त्यांचेच नांवे दिलेली आहे. नमुद पॉलीसी ट्रान्सफर करणेबाबत तक्रारदार यांनी कधीही सामनेवालांशी संपर्क साधलेला नाही. याचे ज्ञान तक्रारदारास होते. तसेच वाहनाची मालकी तक्रारदारांचे नांवे केलेबाबतची सुचना सामनेवालांना दिलेली नाही. सबब जीआर 17 चा भंग झालेमुळे तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र नाही. सदर जीआर नुसार वाहन ट्रान्सफर झालेपासून 14 दिवसांचे आत लेखी सुचना ट्रान्सफर येणे सामनेवाला कंपनीस दयावयास हवी होती ती दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेली कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. यासाठी सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये विविध पूर्वाधांरांचे विश्लेषण दिलेले आहे. सदर पूर्वाधारांचा विचार करता तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये कोणताही करार झाला नसलेने सामनेवालांचे अपघाताच्या क्लेम बाबत कोणतेही उत्तरदायित्व येत नाही. तसेच नमुदचे वाहन हे वाणिज्य वापराचे हेतूने घेतलेले आहे. तसेच नमुदचे वाहन हे मूळ मालक प्रदिप राठोड यांचेकडून तक्रारदारचे नांवे आरटीओ रत्नागिरी जिल्हा यांनी ट्रान्सफर केले आहे. सबब प्रस्तुतचे तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येत नाही. सामनेवाला यांनी कायदेशीर बाबी तसेच मोटार टेरिफ नियमांचा विचार करुनच दि.12/7/2010 रोजी तक्रारदाराचा नाकारलेला क्लेम हा योग्य कारणासाठीच नाकारलेला आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की,अपघाताची सुचना मिळालेवर लगेच आयआरडीए मान्यताप्राप्त सर्व्हेअरची नेमणूक केलेली आहे. त्यानुसार 92927/- इतकी रक्कम नमुद पॉलीसीची अटी वशर्तीची पूर्तता केल्यास देय आहे. नमुद सर्व्हेअर यांचे अहवालानुसार नमुदचे वाहन तक्रारदाराचे नांवे असून नमुद वाहनाची पॉलीसी ही प्रदिप लिलाचंद राठोड यांचे नांवे आहे. सबब तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी तसेच तक्रारदारावर रु.25,000/- इतका दंड ठोठावण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. 6) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी पॉलीसी ज्यांचे नांवे आहे त्यांचेकडून मागितलेल्या कागदपत्रांसंबंधीचे पत्र, पॉलीसी शेडयूल, पंचनामा प्रत, जबाब प्रत, वाहनाचे आर.सी.बुक कॉपी, दाव्यातील वाहन ट्रान्सफर झाले संदर्भातील आर.टी.ओ. रत्नागिरी यांचा दाखला, तक्रारदाराचे नांवे असलेले परमिट, आर.टी.ओ. कोल्हापूर यांचा वाहनाच्या संदर्भातील दाखला, श्री राठोड यांनी त्यांचे सहीने भरुन दिलेला क्लेम फॉर्म, इन्शुरन्स सर्व्हे रिपोर्ट व 6 पूर्वाधार इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) प्रुस्तुतची तक्रार चालविणेचे अधिकार सदर मंचास येते का ? --- होय. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- विमा सेवा व त्यासंबंधीत असणा-या तक्रारी हया ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कक्षेतील बाब आहे. सबब अशा स्वरुपाच्या तक्रारी चालविणेचे अधिकारक्षेत्र मे.मंचास आहे.सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये प्रस्तुतची तक्रार ही गुंतागुंतीची व किचकट स्वरुपाची असलेने तसेच साक्षीदार व कागदपत्रे यांची गरज असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचास चालविणेचे अधिकार क्षेत्र नसलेचे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुत तक्रारी संदर्भात आवश्यक असणारी योग्य कागदपत्रे उभय पक्षांनी दाखल केलेली आहेत. प्रस्तुत तक्रारीचे स्वरुप गुंतागुंतीचे अथवा किचकट नसलेने तसेच साक्षीदार तपासणीची आवश्यकता नसलेने प्रस्तुतची तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र मेत्र मंचास आहे. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारीतील वाहन हे तक्रारदाराने वाणिज्य हेतूने (कमर्शिअल पर्पज) घेतले असलेने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही असे प्रतिपादन केले आहे. मात्र NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI I (2005) CPJ 27(NC) HORSOLIA MOTORS Vs. NATIONAL INSURANCE CO. LTD.-First Appeal Nos.159] 160 & 161 of 2004 Decided on 03.12.2004-Consumer Protection Act, 1986-Sections 2(1)(d), 2(1)(o) – Consumer –Service –Commercial purpose- Insurance policy taken by commercial units-Whether excluded from purview of C.P. Act-Complainants availed service of insurance company for commercial purpose- Complaint dismissed by State Commission as not maintainable – Hence appeal – Hiring of services of insurance company by complainants who are carrying on commercial purpose-Policy it taken for reimbursement or indemnity for loss which may be suffered due to various perils-No question of trading or carrying on commerce in insurance policy-Contract of insurance generally belongs to general category of contract of indemnity- Services may be for any connected commercial activity, yet it would be within purview of Act. या पूर्वाधाराचा विचार करता प्रस्तुत वाहनांच्या पॉलीसी या वाहनाच्या नुकसानीबाबतच्या असून त्यामागे कोणताही नफा घेणेचा हेतू नसतो. सबब सदर पुर्वाधाराचा विचार करता सामनेवाला यांचा सदर आक्षेप हे मंच फेटाळत आहे. आरटीओ रत्नागिरी यांचेकडे ट्रान्सफर नोंद झालेली असलेने प्रस्तुत मंचास क्षेत्रअधिकार येत नाही असे प्रतिपादन केले आहे. मात्र सामनेवाला यांचे शाखा कार्यालय मे. मंचाचे कार्यक्षेत्रात आहे. तसेच नमुद वाहनाचा मूळ मालक प्रदिप राठोड यांनी सदर वाहनाचा विमा कोल्हापूर जिल्हयात शाखा कार्यालयाकडे उतरविलेला आहे. सबब सदर तक्रार चालविणचे क्षेत्रिय अधिकारीता या मंचास येत असलेने सदर तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र या मंचास येत असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- नमुदचे वाहन हे प्रस्तुत तक्रारदार यांनी लक्झरी बस क्र.MH-09-L-6642 ही दि.30/03/2010 रोजी मूळ मालकाकडून खरेदी केली आहे. नमुद वाहनाचा विमा मूळ मालकाने सामनेवालांकडे उतरविलेला आहे.त्याचा पॉलीसी नं.कोजी-10-1001-1812-00000534 असून त्याचा कालावधी हा दि.07/10/2009 ते 06/10/2010 असा होता. प्रस्तुतची पॉलीसी सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. नमुद वाहन हे तक्रारदाराचे नांवे ट्रान्सफर झालेले आहे. त्याबाबत सामनेवाला यांनी आरटीओ कोल्हापूर यांना दि.03/06/2010 रोजी नमुद वाहनाच्या माहितीबाबत आरटीओ कोल्हापूर यांनी माहितीबाबत अर्ज दिलेला होता. सदर अर्जास सदर पत्राव्दारे उत्तर दिलेले आहे. त्यानुसार प्रस्तुतचे वाहनाचा मालक प्रस्तुतचा तक्रारदार असलेचे नमुद केले आहे. तसेच वर नमुद पॉलीसी व कालावधी याचीही नोंद केलेली आहे. नमुद वाहनाची मालकी तक्रारदाराचे नांवे झालेचे निर्विवाद आहे. मात्र नमुद वाहनाची पॉलीसी ही तक्रारदाराचे नांवे असून मूळ मालक प्रदिप राठोड यांचे नांवे दिसून येते. नमुद वाहनाचा अपघात दि.11/5/2010 रोजी झालेला आहे. सदर अपघातासंबंधीचे कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. तक्रारदाराने सदर अपघातानंतर सामनेवालांकडे विमा दावा केला असता दि.12/07/2010 रोजी सामनेवाला यांनी अपघातावेळी पॉलीसीवर प्रदिप राठोड असे नांव होते तर गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेटवर अमरजीत शहाजीराव देशमुख असे नांव होते. त्यामुळे प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार विमा रक्कम मिळणेस कसे पात्र आहेत याबाबत पुढील पूर्वाधार दिलेले आहेत. 1. IV (2007) CPJ 289 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Shri Narayan Singh Vs New India Assurance Co. Ltd. Revision Petition No. 556 of 2002-Decided on 22.05.2007, 2. II (2008) CPJ 324 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – National Insurance Co. Ltd. Vs Subhash Chand Kataria and Anr. Revision Petition No. 518 of 2008-Decided on 29.02.2008, 3. II (2009) CPJ 213PUNJAB STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CHANDIGARH – Li;wamt Singh Vs United India Insurance Co. Ltd. Appeal No.1627 of 2002-Decided on 15.05.2008, 4. 1999 CCJ 590 MADHYA PRAEDSH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, BHOPAL – Narendra Singh Vs New India Assurance Co. Ltd. and anothers Appeal No. 181 of 1996-Decided on 10.10.1997, प्रस्तुत पूर्वाधाराचे अवलोकन केले असता प्रस्तुत पूर्वाधार अनुक्रमे 2007, 2008 मधील आहेत. प्रस्तुत पूर्वाधारामध्ये वाहनाचे हस्तांतरणा बरोबरच आपोआपच विमा पॉलीसीचे हस्तांतरण होते त्यामुळे जरी वाहनाची पॉलीसी मूळ मालकाचे नांवे असली तरी नवीन मालकाला सदर पॉलीसीनुसार विमा रक्कम मिळणेचा हक्क राहतो. त्यामुळे जरी नवीन मालकाचे नांवे पॉलीसी ट्रान्सफर झाली नसली तरी नमुद वाहनाच्या हस्तांतरणाबरोबर आपोआपच वाहनाची पॉलीसी नवीन मालकाकडे जाते असे ग्राहय धरुन विमा दावा रक्कमा अदा करणेबाबत सामनेवाला विमा कंपन्यांना जबाबदार धरणेबाबत निर्वाळा दिलेला आहे. सदर निर्वाळयांचा विचार करता तक्रारदार विमा दावा रक्कम मिळणेस पात्र असलेचे तक्रारदाराचे वकीलांनी प्रतिपादन केलेले आहे. याउलट सामनेवाला यांनी प्रस्तुत प्रकरणी पाच पूर्वाधार तसेच मोटर वाहन कायदा कलम 157 इत्यादीच्या दाखल केलेले आहेत. 1. II (2010) CPJ 170 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – New India Assurance Co. Ltd. Vs Chandrakant Bhujangrao Jogdand Revision Petition No. 4387 of 2009-Decided on March 2010, 2. I(2009) CPJ 568 MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MUMBAI – New India Assurance Co. Ltd. Vs. Dattatraya Shankar Buva(Since deceased) thru. His lrs. and ors. First Appeal No.303 of 2006-Decided on 08.10.2008, 3. I(2009) CPJ 158 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Madan Singh Vs United India Insurance Co. Ltd. Revision Petition No. 3267 of 2003-Decided on 02.12.2008, 4. IV (2008) CPJ 65 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Om Prakash Sharma Vs National Insurance Co. Ltd. Revision Petition No. 2889 of 2006-Decided on 30.06.2008, 5. I(2007) CPJ 245 PUNJAB STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CHANDIGARH – Mandeep Singh Vs National Insurance Co. Ltd. Misc Application No. 669 of 2006-Decided on 22.05.2006, प्रस्तुत पूर्वाधार हे 2010, 2009,2008, 2007 मधील आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेले प्रस्तुत पूर्वाधारामधील II (2010) CPJ 170 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – New India Assurance Co. Ltd. Vs Chandrakant Bhujangrao Jogdand Revision Petition No. 4387 of 2009-Decided on March 2010,- Consumer Protection Act, 1986 –Section 21(b) –Motor Vehicles Act, 1988-Section 157-Indian Motor tariff Act- GR 17-Insurance-Insurable interest –Vehicle on date of accident stood in name of previous owner- Transferee has to apply in writing within 14 days from date of transfer to the insurer for making necessary changes-As per Apex Court ruling, deemed transfer of policy under Section 157, Motor Vehicles Act, 1988 restricted not entitled to insured sum since on date pf accident vehicle not transferred in favour of complainant-Complainant had no insurable interest in policy. प्रस्तुत पूर्वाधार प्रस्तुत प्रकरणी तंतोतंत लागू होतो. प्रस्तुत पूर्वाधारात नमुद केलेले तक्रारीचे स्वरुप व दाखल तक्रारीचे स्वरुप यामध्ये साम्य आहे. तक्रारदाराने लक्झरी बस क्र.MH-09-L-6642 हे वाहन श्री प्रदिप राठोड यांचेकडून खरेदी केले होते. सदर वाहनाचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. त्याचा निर्धारित विमा रक्कम रु.8,50,000/- इतकी होती. त्याचा पॉलीसी नं.कोजी-10-1001-1812-00000534 असून त्याचा कालावधी हा दि.07/10/2009 ते 06/10/2010 असा होता. नमुद वाहन तक्रारदाराचे नांवे हस्तांतर झालेबाबत आरटीओ रत्नागिरी यांचेकडील कागदपत्र दाखल आहेत. तसेच नमुद वाहनाची पॉलीसी ही अदयापही मूळ मालकाचे नांवे आहे. प्रस्तुतचा वाहनाचा अपघात दि.11/05/2010 रोजी झालेला आहे. तसेच प्रस्तुत वाहनाची पॉलीसी मूळ मालकाकडून नवीन मालकाचे नांवे वाहन हस्तातरण झालेची सूचना मूळ मालक प्रदिप राठोड अथवा नवीन मालक प्रस्तुत तक्रारदार अमरजीत देशमुख यांनी सामनेवाला कंपनीस दिलेली नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. इंडियन मोटर टेरिफ अक्ट जीआर 17 ट्रान्सफरच्या तरतूदीचा विचार करता वाहन ट्रान्सफर झाले तारखेपासून 14 दिवसंचे आत विमा कंपनीस लेखी सुचना दयावयास हवी ज्यायोगे मूळ मालकाचे नांवे असणारी पॉलीसी बदलून नवीन विमा प्रमाणपत्र देता येते. तसेच मूळ विमा प्रमाणपत्र जमा करुन रक्कम रु.50,000/- इतकी फी भरुन नवीन प्रमाणपत्र घेता येते. सदर तरतुदीचा विचार करता तक्रारदाराने अशाप्रकारे सामनेवाला विमा कंपनीस कोणतीही सुचना दिलेली नाही व मूळ मालकाचे नांवे असलेली पॉलीसी स्वत:चे नांवे बदलून घेतलेली नाही. सबब अपघातावेळी वाहनाची मालकी जर तक्रारदाराकडे असली तरी नमुद वाहनाची पॉलीसी ही मूळ मालक प्रदिप लिलाचंद राठोड यांचे नांवे होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब तक्रारदार व सामनेवाला विमा कंपनी यांचेमध्ये कोणत्याही प्रकारची विमा सेवा देणेबाबत करार झालेला नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी दाखल केलेला पूर्वाधार हा 2010 चा असून तक्रारदाराने दाखल केलेले पूर्वाधार 2009 चे आहेत. सबब 2010 चा पूर्वाधार प्रस्तुत प्रकरणी तंतोतंत लागू होतो. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता वरील विमा क्लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत कोणतीही त्रुटी ठेवली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:-सामनेवालांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |