Maharashtra

Kolhapur

CC/11/227

Ashok Raygonda Patil - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

P.K.Patil

29 Mar 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/11/227
 
1. Ashok Raygonda Patil
Bhendawade, Tal. Hatkanangale,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Allianz General Insurance Co.Ltd
Branch-D3/D4, second floor, Royal Prestige, Sky Extention, Shahupuri,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:P.K.Patil, Advocate
For the Opp. Party: A.A.Bhumkar, Advocate
Dated : 29 Mar 2017
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य :  (व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा) 

1)    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे

      तक्रारदार हे मु.पो. भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्‍हापूर येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत.  वि.प. ही नामांकित विमा कंपनी आहे.  तक्रारदाराने त्‍यांचे मालकीचा ट्रॅक्‍टर व ट्रेलर चा विमा वि.प.कडे उतरविला होता त्‍याचे वर्णन पुढीलप्रमाणे-

ट्रॅक्‍टर व ट्रेलर नं. एम.एच.झेड 8870 – मेक - हिंदुस्‍थान

विमा पॉलिसी नं. ओ.जी. 10-2005- 1811 – 00000316

विमा कालावधी  - दि. 22-11-2009 ते 21-11-2010 रात्री 12 वाजेपर्यंत

सम अॅश्‍युअर्ड रक्‍कम रु. 2,74,000/-

     दि. 20-02-2010 रोजी सकाळी 11 वाजणेच्‍या सुमारास वारणानगर येथून सावर्डे मार्गे भेंडवडेकडे जात असताना सदर ट्रॅक्‍टरचा अपघात झाला आहे.  सदर अपघातात ट्रॅक्‍टर व ट्रेलरचे प्रचंड नुकसान झालेले आहे.  सदरचा अपघात हा डंपर नं. जी.ए.01-यु-1490 चा चालक तिप्‍पान्‍ना आण्‍णाप्‍पा वडर याचे हयगयीने, अविचाराने, निष्‍काळजीपणे चालवून अपघात झाला आहे.  त्‍यामुळे डंपर चालकाविरुध्‍द वडगांव पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा नोंद करणेत आलेला आहे.  प्रस्‍तुत अपघात हा विमा पॉलिसीचे कालावधीतच घडलेला आहे.  सदर अपघातानंतर तक्रारदाराने अपघाताची माहिती वि.प. यांना दिली परंतु अपघात पाहणेसाठी वि.प. यांचेकडून कोणीही आले नाही.  तदनंतर अपघाताचे ठिकाण हे रहदारीचे असलेने तक्रारदार यांना पोलिसांनी सांगितलेनंतर ट्रॅक्‍टर-ट्रेलर अपघाताचे ठिकाणातून काढून घेतले.  त्‍यानंतर वि. प. यांचेशी संपर्क साधला असता वि.प. यांनी तक्रारदाराला वाहन दुरुस्‍त करुन घ्‍या व क्‍लेमसाठी अर्ज करा असे सांगितले.  त्‍यामुळे वि.प. चे सांगणेवरुन तक्रारदाराने ट्रॅक्‍टर व ट्रॉली दुरुस्‍त करुन घेतले त्‍यास रक्‍कम रु. 2,40,000/- चे वर खर्च आला आहे व ब-याच काळ ट्रॅक्‍टर बंद अवस्‍थेत असलेने तक्रारदाराचे व्‍यवसायाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.  त्‍यानंतर तक्रारदाराने योग्‍य त्‍या कागदपत्रांसह विमा क्‍लेम वि.प. कडे दाखल केला असता वि.प. यांनी वेळोवेळी वेगळी कारणे सांगून क्‍लेम देणेस टाळाटाळ केली व शेवटी 11 महिन्‍यानंतर दि. 14-02-2011 रोजी तक्रारदाराचे हाती पत्र देवून अपघात वाहने अपघात स्‍थळावरुन हालविली असे कारण सांगून तसेच संबंधित ड्रायव्‍हर याचे ट्रॅक्‍टर व ट्रेलर  चालविणेचे  ड्रायव्हिंग  लायसन्‍स नव्‍हते या कारणावरुन कराराचा विमा क्‍लेम  वि.प. ने नाकारला आहे.  म्‍हणजेच तक्रारदाराचा न्‍याय विमा क्‍लेम नाकारलेने वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे.  सबब, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.                                         

2)   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी वि.प. यांचेकडून विमा क्‍लेमची रक्‍कम रु. 2,74,000/- वसूल होऊन मिळावी, प्रस्‍तुत रक्‍कमेवर द.सा.द.शे. 16  %  व्‍याज मिळावे.  तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 2000/-  वि.प. कडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.   

     

3)   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी अॅफिडेव्‍हीट,  कागद यादीसोबत ट्रॅक्‍टर व ट्रॉलीची विमा पॉलिसी उतरविलेली पावती, वि.प. ने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, पुराव्‍याचे शपथपत्र, ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीस आले खर्चाच्‍या पावत्‍या, पोलीस पेपर्स, पंचनामा, जबाब,  ड्रायव्‍हींग लायसन्‍स, ट्रॅक्‍टरचा अपघात झालेनंतरचा फोटो, जादा पुराव्‍याचे शपथपत्र, ट्रॅक्‍टरची आर.सी.बुक, टॅक्‍स पावती, ट्रेलरची आर.सी.बुक, टॅक्‍सची पावती, क्रेनसाठी दिलले बील, फिर्याद ग्रामपंचायत, भेंडवडे यांचा दाखला, लेखी युक्‍तीवाद, मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे, वगैरे कागदपत्रे तक्रारदारानेया कामी दाखल केली आहेत.      

      

4)   वि. प. पे प्रस्‍तुत कामी म्‍हणणे/कैफियत, म्‍हणण्‍याचे अॅफिडेव्‍हीट, कागद यादी यादीसोबत, विमा पॉलिसी अटी व शर्तीससह, ई मेल, तक्रारदाराला वि.प. ने दिलले पत्र, आर.टी. ओ. सोलापूर यांचे प्रमाणपत्र, ट्रॅक्‍टर ड्रायव्‍हरचा जबाब पंचनामा, खबरी जबाब, तक्रारदाराने क्‍लेमसोबत दाखल केलेली बीले, ड्रायव्‍हींग लायसन्‍स, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्‍तीवाद व मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे वगैरे कागदपत्रे वि.प. यांनी दाखल केलेले आहेत. 

     वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतीत तकारदाराचे तक्रार अर्जावर सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.

     (i)   तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.

     (ii)  तक्रारदारांना ट्रॅक्‍टर व ट्रॉली यांची विमा पॉलिसी दिलेली आहे.  तसेच ट्रॅकटर एम.एच. झेड 8270 ची IDV रक्‍कम रु. 84,000/- आणि एका ट्रॉलीची IDV रक्‍क मरु. 1,90,000/- अशी आहे त्‍यामुळे तक्रारदाराला ट्रॅक्‍टरसाठी रक्‍कम रु. 84,000/- व ट्रॉलीसाठी रक्‍कम रु. 1,90,000/- या रक्‍कमेपर्यंतचाच विमा क्‍लेम मागता येईल/क्‍लेम करता येईल. असे असतानाही तक्रारदाराने मुद्दामपणे 1 ट्रॅक्‍टर व 2 ट्रॉली यांचा रक्‍कम रु. 2,40,000/- इतका केला आहे.  वास्‍तविक एका ट्रॉलीसाठी आलेला खर्च वेगळा दाखविणे आवश्‍यक होते पण तक्रारदाराने वि.प. कडून रक्‍कम उकळणेसाठी सदरचा अवाजवी रकमेचा विमा क्‍लेम दाखल केला आहे.  तो खर्चासह रद्द होणेस पात्र आहे.                  

      (iii)   अपघात झालेनंतर तक्रारदाराने ताबडतोब वि.प. विमा कंपनीस अपघाताची माहिती देणे बंधनकारक होते परंतु तक्रारदाराने अपघातानंतर तब्‍बल 30 दिवसांनी उशिरा अपघाताची माहिती वि.प. विमा कंपनीस कळविली आहे.  उशिराबाबत स्‍पष्‍टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही.

          (iv) तक्रारदाराने वि.प. यांना अपघाताची माहिती न देताच वाहनाची दुरुस्‍ती परस्‍पर करुन घेतली आहे त्‍यामुळे वि.प. यांना  अपघातग्रस्‍त वाहनाची पाहणी करुन योग्‍य तो सर्व्‍हे करणेची संधी मिळाली नाही.  तक्रारदाराने जाणून बूजुन प्रस्‍तुत संधी वि.प.स दिलेली नाही असा विलंबाने केलेला विमा क्‍लेम नाकारणेचे पॉलिसी अटीशर्तीप्रमाणे  सर्व अधिकार वि.प. यांना आहेत.  तक्रारदाराने ताबडतोब अपघताची माहिती वि.प. ला दिलेली नाही.  तसेच तक्रारदाराचा ट्रॅक्‍टर चालकाकडे अधिकृत ड्रायव्‍हींग लायसन्‍स नसतानाही ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडून माल वाहतुक करणेचे बेकायदेशीर कृत केले आहे.  तक्रारदाराने ड्रायव्‍हरला बेकायदेशीरपणे वाहतुक करणेची परवानगी दिली होती  यावरुन तक्रारदाराचा बेजबाबदारपणा व निष्‍काळजीपणा लक्षात येतो कारण तक्रारदाराने 10 वर्षे त्‍याचे लायसन्‍स तपासलेले नव्‍हते.             

     (v)    ट्रॅक्‍टर व 2 ट्रॉलीजचे मालकी हक्‍क शाबीत करणे आवश्‍यक आहे.

     (vi) तक्रारदाराने तक्रार अर्ज पॅरा नं. 4 मध्‍ये रक्‍कम रु. 2,40,000/- व मागणी तपशिलामध्‍ये रक्‍कम रु. 2,74,000/- अशा निरनिराळया रक्‍कमा नमूद केल्‍या आहेत. तसेच यापैकी कोणत्‍याही रक्‍कमेची स्‍पष्‍टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही.  सबब, तथाकथीत रक्‍कम ग्राहय धरता येणार नाही.

     (vii)  प्रस्‍तुत ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा वापर तक्रारदार हे व्‍यापारी कारणासाठी करत होते.  त्‍यामुळे तक्रारदार वि.प. चे ग्राहक होत नाहीत.  सबब, तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा.  

      (viii) विमा पॉलिसी अटी व शर्थीची पूर्तता होणे आवश्‍यक असते एका अटीचा जरी भंग झाला तरीही विमा क्‍लेम वि.प. यांना नाकारता येतो.  प्रस्‍तुत केसमध्‍ये तर तक्रारदाराने अक्षम्‍य चुका, त्रुटी, स्‍वत: जाणूनबूजून केल्‍या आहेत.  त्‍यामुळे  शर्तींचा भंग झालेला आहे.   करिता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून कोणतेही लाभ मिळणेस पात्र नाहीत.

     सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. ने तक्रारदाराने तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.     

      

5)   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

    

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1)

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व

सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय

2)

तक्रारदार प्रस्‍तुत ट्रॅक्‍टर व्‍यापारी हेतुसाठी

वापरत होते काय ?    

 

नाही

3)

वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

 

होय

4)

तक्रारदार वि.प.कडून विमा क्‍लेमची रक्‍कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

 

होय

5)

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे

 

वि वे च न

 

मुद्दा क्र. 1

 

6)    वर नमूद  मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.  कारण तक्रारदारने वादातीत ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता व आहे.  प्रस्‍तुत विमा पॉलिसी या कामी दाखल आहे.  तसेच वि.प. ने सदर बाब मान्‍य केली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झाली आहे.  सबब,  मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

   

मुद्दा क्र. 2

 

7)    मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे कारण प्रस्‍तुत तक्रारदाराने सदरचा ट्रॅक्‍टर हा व्‍यापारी कारणाकरिता खरेदी केला होता किंवा प्रस्‍तुत ट्रॅक्‍टर पासून तक्रारदाराने मोठया प्रमाणात फायदा मिळवला, उत्‍पन्‍न मिळवले हे सिध्‍द करणेसाठी वि.प.  कोणताही लेखी तोंडी पुरावा या कामी दाखल केलेला नाही.  सबब, तक्रारदाराने प्रस्‍तुत ट्रॅक्‍टर हा व्‍यापारी हेतूसाठी खरेदी केला अथवा वापरला आहे हे सिध्‍द झालेले नाही.  त्‍यामुळे येथे Commercial Purpose  नसलेमुळे तक्रारदार ‘ग्राहक’ या संज्ञेत येतो. व प्रस्‍तुत तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र आहे त्‍यामुळे सबब,  मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिलेले आहे.

8)     मुद्दा क्र. 3  

     प्रस्‍तुत कामी मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  कारण तक्रारदार यांचे मालकीचा ट्रॅक्‍टर व ट्रेलर दि. 20-02-2010  रोजी सकाळी 11.00 वाजणेच्‍या सुमारास वारणानगर येथून सावर्डे मार्गे भेंडवडेकडे जात असताना डंपर नं. GA-01-U-1490 या डंपरने अविचाराने निष्‍काळजीपणाने चालवून तक्रारदाराचे ट्रॅक्‍टर ट्रॉलीस उजव्‍या बाजूस येऊन धडकलेला होता.  सदर डंपर चालकाविरुध्‍द वडगांव पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा नोंद आहे. तसेच सदरचा अपघात हा विमा पॉलिसी कालावधीत झालेला आहे.  सदर तक्रारदार यांचे ट्रॅक्‍टर व  ट्रॉलीचे दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु. 2,40,000/-  इतका खर्च झालेला असून प्रस्‍तुत बाबतीत तक्रारदाराने विमा क्‍लेम मिळावा म्‍हणून वि.प. विमा कंपनीकडे विमा क्‍लेम सादर केला होता.  सदरचा विमा क्‍लेम वि.प. यांनी पुढील कारणाने फेटाळलेला आहे. अपघाताची माहिती/वर्दी तक्रारदाराने वेळेत दिली नाही, ट्रॅक्‍टर  चालकाकडे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते तसेच तक्रारदाराच्‍या ट्रॉलीचा विमा उतरविलेला नाही अशी कारणे देऊन विमा क्‍लेम फेटाळलेला आहे.  वास्‍तविक तक्रारदाराचे ट्रॅक्‍टरच व   ट्रॉलीचा विमा उतरविला होता हे विमा पॉलिसीवरुन स्‍पष्‍ट झाले आहे.  तसेच तक्रारदाराचे ट्रॅक्‍टर चालविणारा ड्रायव्‍हर सिध्‍देश्‍वर दत्‍तू गेंड याचे ड्रायव्‍हींग लायसन्‍सवर नॉन ट्रान्‍सपोर्टचा परवाना आहे असे सकले तरीही सदरचा अपघात हा ट्रॅक्‍टर ड्रायव्‍हरचे  चुकीमुळे झालेला नाही तर समोरुन येणारे डंपर चालकाच्‍या चुकीमुळे व बेजबाबदारपणाने व निष्‍काळजीपणामुळे झालेला असून प्रस्‍तुत डंपर चालकाविरुध्‍द पोलिसांनी गुन्‍हा नोंद केलेला आहे ही बाब पोलिस पेपर्सवरुन म्‍हणजेच पंचनामा व ड्रायवहरचा जबाब यावरुन स्‍पष्‍ट होते.  तसेच प्रस्‍तुत अपघात हा ट्रॅक्‍टर चालकाचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स वैध नव्‍हते या कारणामुळे झालेला नाही.  त्‍यामुळे वाहन चालकाचे वैध ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते हे कारण देऊन वि.प. यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारणे म्‍हणजे सेवा त्रुटीच आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

     सदर कामी आम्‍ही तक्रारदाराने दाखल केलेल्‍या मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या  पुढील न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे. 

(1)   I (2007) CPJ 90

Chattisgarh State Consumer Disputes Redressal Commission, Raipur

OM Prakash Baghel VS. Oriental Insurance Co. Ltd.,

 

Head Note:-  Consumer Protection Act. 1986 – Section 15- Insurance vehicle damaged in accident – Failure of complainant to produce document viz., fitness certificate, permit etc, - Repudiation of claim in toto – Legality – Settling claim on non- standard basis – contention of insurer, complainant committed breach of policy, condition, as vehicle was without necessary fitness and permit – Nothing to show that said breach  in any manner  contributed to occurrence of accident.     

(2) III (2005) CPJ 310

                             

Chattisgarh State Consumer Disputes Redressal Commission, Raipur

New India Assurance Co Ltd, Vs. Purushottam Kumar Jain

 

Head Note: Consumer Protection Act, 1986 – Section 15- Insurance – Repudiation of claim – Driver not holding valid licence- Negligence of driver not the cause of Accident – Repudiation not proper even if driver not holding valid licence – Complaint allowed – Order upheld in appeal. 

 

9)    मुद्दा क्र. 4  

    प्रस्‍तुत मुद्दा क्र. 4 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.  कारण तकारदाराने त्‍यांचे ट्रॅक्‍टरचे दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु. 2,40,000/- खर्च आला होता.  सदरची बीले वि.प. कडे क्‍लेम सोबत दाखल केली होती.  परंतु वि.प. ने सदर बिले या कामी दाखल केली नाहीत.  सबब,  तक्रारदाराने या कामी ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीची खर्चाची एकूण रक्‍कम रु. 2,31,720/- ची बिले दाखल केली आहेत.  तसेच वि.प. ने ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीची बीले स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाहीत तसेच  वि.प. ने बील चेक रिपोर्ट दाखल केलेला नाही. सबब, प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने त्‍यांचा तक्रार अर्ज भारतीय पुराव्‍याच्‍या कायदयातील तरतुदीप्रमाणे सबळ पुराव्‍यासह सिध्‍द केला आहे.  वि.प. ने या कामी दाखल केलेले मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे लागू होत नाहीत.  तसेच तक्रारदाराने या कामी मे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खालील नमूद न्‍याय निवाडयातील दंडकांप्रमाणे तक्रारदार नॉन-स्‍टॅन्‍डर्ड-बेसीसवर (Non-Standard Basis)  विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

II (2010) CPJ 9 (SC)

 

SUPREME COURT OF INDIA

AMALENDU SAHOO     V/S.    ORIENAL INSURANCE CO. LTD.,

 

Head NoteInsurance – Non-standard Settlement – Terms of policy violated – Vehicle insured for personal use, used on hire – Claim repudiated by insurer - Complaint dismissed by Consumer Forum – Order  upheld in appeal - Revision against order  dismissed – Civil appeal filed Repudiation of claim  in toto unjustified – Settlement of claim on non-standard basis directed.        

          वरील मे. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयानुसार तक्रारदार हे वि.प. यांचेकडून प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने एकूण रक्‍कम रु. 2,40,000/- इतका खर्च वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी केलेला आहे.  त्‍यापैकी रक्‍कम रु. 2,31,720/- या रक्‍कमेची बीले तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.  सदर बिले विचारात घेऊन रक्‍कम रु. 2,31,720/- चे 75 % प्रमाणे होणारी रक्‍कम रु. 1,73,790/- (रक्‍कम रु. एक लाख त्र्याहत्‍तर हजार सातशे नव्‍वद मात्र) व प्रस्‍तुत रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 %  दराने होणारे व्‍याज त्‍याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- अशी सर्व रक्‍कम वि.प. यांचेकडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.                          

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.  सबब, आदेश.

 

                                             - आ दे श -                     

              

1)     तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्‍यांचे ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचा विमा क्‍लेमपोटी  रक्‍कम रु. 1,73,790/- (रक्‍कम रुपये एक लाख त्र्याहत्‍तर हजार सातशे नव्‍वद मात्र)  तसेच प्रस्‍तुत रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे होणारी व्‍याजाची रक्‍कम अदा करावी.   

   3)   मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- (रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- (रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराला  अदा करावेत.    

4)   वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.   

5)  विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

6)  आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

  

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.