निकालपत्र :- (दि.09/08/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे त्याचे वाहन बजाज पल्सर 150 DTSI Model 2007 काळया रंगाची मोटरसायकल क्र.MH-09-AX-6760 Chease No.MDZDHDHZZHCH24639 and Engine No.DHGBNH62789 चा विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.ओजी-10-2005-1802-00006354 असा असून विमा कालावधी दि.12/02/2010 ते 11/02/2011 असा आहे. विमा उतरवितेवेळी सदर वाहनाची किंमत रु.32,292/- इतकी होती. तक्रारदाराने त्याचे नमुद वाहन घराचे दारात भिंतीस लागून दि.20/10/2010 रोजी लावलेले होते. सदर वाहन रात्री अज्ञात चोरटयाने चोरुन नेले त्यासंबंधीची तक्रार दि.22/10/2010 रोजी संबंधीत पोलीस स्टेशनला दिली आहे. दि.18/11/2010 रोजी सामनेवाला विमा कंपनीने कोणत्याही सबळ कारणाशिवाय तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. सदरचा क्लेम वाहनाची योग्य ती काळजी न घेतलेने नामंजूर केलेबाबत तक्रारदारास कळवलेले आहे. वस्तुत: तक्रारदाराने वाहनाचे इग्नेशन लॉक केलेले होते. तसेच सदर वाहन व्यवस्थीत प्लास्टीक कव्हरने झाकलेले होते. तसेच वाहन किल्लीशिवाय चालवणेचे स्थितीमध्ये नव्हते. सदर वाहनाचे हॅन्डल लॉक नाही या एका कारणावरुन तक्रारदाराने खुप मोठा निष्काळजीपणा केला आहे व योग्य ती खबरदारी घेतली नाही व पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केला असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराने वाहनाबाबत योग्य ती खबरदारी घेतलेली होती व आहे. सदर वाहनाची वापरातील किल्ली यापूर्वीच सामनेवालांकडे दिली होती. तरीही सामनेवालांनी त्यांचे पत्रामध्ये सदर किल्ली दिली नसलेबाबत चुकीचे नमुद केले आहे. दि.03/12/2010 रोजी आर;पी.ए.डी.ने वकील नोटीस पाठवून क्लेमचा पूर्नविचार करुन नुकसान भरपाईची रक्कम 7 दिवसांचे आत देणेबाबत कळवले. त्यास सामनेवाला यांनी दि.29/12/2010 चे पत्राने नकार दिला आहे. सदर वाहनाचा किल्ली तशीच असती तर त्याचा उल्लेख तक्रारदाराने फिर्यादीमध्ये केला असता. केवळ पॉलीसीच्या नियमातील सेक्शन ए ते डी मध्ये नमुद कारणास्तव नुकसान भरपाईची रक्कम देणेचे नाकारु शकतात व तसे नमुद केलेले खबरदारीचे कारण हे डायरेक्टरी असून मँन्डेटरी नाही. सबब तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्चासह मंजूर करुन नमुद वाहनाची रक्कम रु.32,692/-त्यावर द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ पॉलीसी, सदर पॉलीसीच्या अटी व शर्ती, गाडी चोरीस गेल्याची एफआयआर, तक्रारदार यांचा पोलीसांनी नोंदविलेला जबाब, गाडी चोरीचा पंचनामा, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले पत्र, वकीलांमार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोचलेली पोहोच पावती, सदर नोटीसला पाठवलेले उत्तर इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदार हे मंचाची दिशाभूल करीत आहेत. प्रस्तुतची तक्रार खोटी, लबाडीची व आधारहीन आहे. सबब सामनेवाला यांना ती मान्य व कबूल नाही. तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे वाहन बजाज पल्सर 150 DTSI Model 2007 क्र.MH-09-AX-6760 या मोटरसायकलचा विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.ओजी-10-2005-1802-00006354 असा असून विमा कालावधी दि.12/02/2010 ते 11/02/2011 असा आहे. तक्रारदाराने दि.21/10/2010 रोजी क्लेमची मागणी केलेली आहे. वस्तुस्थिती कागदपत्रे व पुरावा याचा विचार करता सामनेवाला यांनी योग्य कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने त्याचे वाहन घराचे बाहेर रस्त्यालगत भिंतीला लागून दि.20/10/2010 रात्री चालवणेच्या स्थितीमध्ये व कोणत्याही प्रकारचे आच्छादन न करता लावलेले होते. दि.21/10/2010 रोजी तक्रारदाराची आईस पहाटे 6.00 वाजता सदर वाहन लावले ठिकाणी लावले नसलेचे आढळले. दि.22/10/2010 रोजी 19.20 वाजता तक्रारदाराने पोलीस स्टेशनला जबाब दिलेला आहे. दि.23/10/2010 रोजी सकाळी 10.50 ला पंचनामा केलेला आहे. तक्रारदाराने पोलीसांपुढे दिलेला जबाब एफआयआर, पंचनामा इत्यादीवरुन तक्रारदाराने वाहन लावताना निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे चोरी झालेली आहे. तसेच वाहन चोरी झाल्याझाल्या लगेच पोलीसांत तक्रार दिलेली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे वापरात असलेल्या किल्लीची मागणी केलेली होती. त्यावेळी त्यांनी नवीन व वापरात नसलेली किल्ली सामनेवाला यांना दिलेली आहे. नमुद वाहनास किल्ली घालणेसाठी एकच छिद्र असते. वाहन लावले त्यावेळी ते लॉक केलेले नव्हते हे पोलीस पेपरमध्ये दिसून येते. यामध्ये तक्रारदाराचा निष्काळजीपणा आहे व त्यामुळे वाहन चोरीस गेलेले आहे. सबब सामनेवाला यांनी नमुद पॉलीसीच्या पान नं.6 वरील अट क्र.4 नुसार तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही; सबब यासाठी सामनेवाला यांनी रवणीत सिंह बग्गा वि. केएलएम रॉयल डच एअरलाईन्स (2000) ISCC 66 चा आधार घेतलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रारखर्चासह नामंजूर करणेत यावी तसेच तक्रारदारास रु.25,000/-दंड ठोठावण्यात यावा व तो सामनेवाला यांना देणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती केलेली आहे. (06) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच क्लेम फॉर्म, डिक्लरेशन फॉर्म, एफआयआर, जबाब, क्लेम नाकारलेचे पत्र, उत्तरी नोटीस, मॅन्यूअल व अनयुज्ड की चे फोटो इत्याद कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे त्याचे वाहन बजाज पल्सर 150 DTSI Model 2007 काळया रंगाची मोटरसायकल क्र.MH-09-AX-6760 Chease No.MDZDHDHZZHCH24639 and Engine No.DHGBNH62789 चा विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.ओजी-10-2005-1802-00006354 असा असून विमा कालावधी दि.12/02/2010 ते 11/02/2011 असा आहे. विमा पॉलीसी कालावधीत तक्रारदाराचे वाहन दि.20/10/2010 रेाजी चोरीस गेलेले आहे. तक्रारदाराने क्लेमची मागणी केलेली होती व सदरचा क्लेम सामनेवाला यांनी नाकारलेला आहे ही वस्तुस्थिती सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी प्रसतुतचा क्लेम पॉलीसीची कंडिशन क्र.4 नुसार प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे. CONDITION-4 :- The insured shall take all reasonable steps to safeguard the Vehicle from loss or damage and to maintain it in efficient condition and the Company shall have at all times free and full access to examine the Vehicle or any part thereof or any driver or employee of the Insured. In the event of any accident or breakdown the Vehicle shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if vehicle be driven before the necessary repairs are effected any extension of the damage or any further damage to the Vehicle shall be entirely at the insured’s own risk. प्रस्तुत अटीचा विचार करता व उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने दि.22/10/2010 रोजी पोलीसांपुढे दिलेल्या जबाबामध्ये तक्रारदाराने त्याचे नमुद वाहन त्याचे राहते घरी दारासमोर उघडयावर लॉक न लावता दारात लावून झोपी गेलो. त्यामुदतीत तक्रारदाराची आई दि.21/10/2010 रेाजी सकाळी पहाटे 6.00 वाजता दारात गाडी नसलेबाबतचे सांगितले. आसपास चौकशी करुन गाडी चोरीस गेलेची खात्री झालेनंतर फिर्याद दिलेचे नमुद केले आहे. पंचनाम्यामध्येही नमुद वाहन लॉक न करता रात्री झोपी गेलेचे नमुद केले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे युज की मागितलेली होती. मात्र त्याने सामनेवाला यांना अनयुज की दिलेली आहे. त्याबाबत सामनेवाला यांनी अनयुज की चे फोटोग्राफ दाखल केलेला आहे. तक्रारदाराने गाडीच्या दोन्ही किल्ल्या प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या आहेत. तसेच सामनेवाला यांनी दि.19/11/2010 रोजी सामनेवालांचे व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रामध्ये वाहनाची दुसरी किल्ली एक वर्षापुर्वी हरवले असलेमुळे ती आपल्याकडे दाखल करता येत नसलेबाबत कळवले. मात्र तदनंतर तक्रारदाराने अॅफिडेव्हीट दाखल करुन घर बदलत असताना सदर वाहनाची दुसरी किल्ली सापडलेचे नमुद केले आहे. तसेच तक्रारदाराने त्याचेवतीने साक्षीदार म्हणून श्री संदिप आप्पासाहेब चौगले यांचे शपथपत्र दाखल केले आहे.सदर शपथपत्रात वाहनास किल्ली तशीच ठेवलेली नव्हती. वाहनाची किल्ली तक्रारदाराने काढून घेऊन वाहन प्लास्टीकचे कागदाने व्यवस्थीत झाकून ठेवलेचे स्वत: पाहिलेचे नमुद केले आहे. तसेच सदर वाहनाचे इग्नेशन लॉक होते व ते चालवणेचे स्थितीत नव्हते असेही नमुद केले आहे. सामनेवाला यांनी जादा म्हणणे देऊन प्रस्तुतची बाब खोडून काढलेली आहे. सदर बजाज पल्सर वाहनास इग्नेशन व हॅन्डल लॉकसाठी एकच छिद्र (key hole) असते. तक्रारदाराने सदर वाहन हे लॉक केलेले नव्हते हे त्याने पोलीसांसमोर सांगितले आहे व तसे पोलीस पेपरमध्ये आलेले आहे. यावरुन तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे नमुद वाहन चोरीस गेलेले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी इग्नेशन लॉक केले होते मात्र हॅन्डल लॉक केलेले नव्हते असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता वाहन चोरीस गेले त्यावेळी तक्रारदाराकडे अनयुज कि नव्हती. अशी अनयुज कि व्दारे वाहन लॉक केले असते तर ते चालवता आले नसते.मात्र तक्रारदाराने वापरात असलेले किल्लीव्दारे जरी वाहन लॉक केले असे गृहीत धरले तरी अशी वापरात असलेली किल्ली सहजासहजी कि होलमधून निघू शकते. अशावेळी वाहन लॉकच असेल हे सांगता येत नाही. तक्रारदाराने त्याचे वाहन लावताना योग्य ती काळजी घेतली नसलेचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. सबब सदर निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे वाहन चोरीस गेलेले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच साक्षीदाराचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्याचा जबाब पोलीस पेपरमध्ये नाही व तसे तक्रारदाराने त्याचा पोलीसांनी जबाब घेतला नसलेचे मान्य केलेले आहे. उपरोक्त विस्तृत विवेचन व पुराव्याचा विचार करता तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे वाहन चोरीस गेले असलेने सामनेवाला यांनी अट क्र.4 नुसार क्लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |