Maharashtra

Nagpur

CC/316/2015

Motiram Gangandas Moriyani - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz General Insurance co. Ltd.,Through Regional Manager Claims - Opp.Party(s)

Harshal Ghumde

22 Oct 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/316/2015
( Date of Filing : 15 Jul 2015 )
 
1. Motiram Gangandas Moriyani
R/o. Plot no. 28/A, Kashmiri Gali Gorund, near 10 No. Pulliya, kamptee Road Nagpur 440017
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Allianz General Insurance co. Ltd.,Through Regional Manager Claims
219-221, 3rd floor, Shriram Towers, Kingsway, Sadar Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Harshal Ghumde, Advocate
For the Opp. Party: C.B.Pande, Advocate
Dated : 22 Oct 2019
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.        तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल  केली असून तक्रारीचे स्‍वरुप असे की, तक्राकर्त्‍याने दि. 10.10.2006 रोजी रुपये 7,67,626/- ला Honda City Car ZX (EXi) खरेदी केली असून त्‍याचा नोंदणी क्रं. MH 31 CN 8551 असा आहे. तक्रारकर्त्‍याने सदरहू वाहनाचा दिनांक 09.02.2013 ते 08.02.2014 च्‍या मध्‍यरात्री पर्यंतच्‍या कालावधीकरिता विमा काढलेला असून त्‍याचा विमा पॉलिसी क्रं. OG-13-21-1-1801-00007679 हा असा आहे. व सदरहू पॉलिसीप्रमाणे वाहनाचा विमा घोषित मुल्‍यांकन रुपये 3,16,482/- इतका होता. तसेच तक्रारकर्त्‍याने विमा प्रिमियम पोटी रुपये 7,614/- दिले होते.  
  2.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, दि. 31.07.2013 रोजी  नागपूर मध्‍ये मुसळधार खूप जास्‍त प्रमाणात सतत पाऊस पडला आणि एका दिवसामध्‍ये 101.4 एम.एम. पाऊस पडला. त्‍यामुळे सर्व ठिकाणी पाणी साचून दैंनदिन जीवनमान विस्‍कळित झाले आणि तक्रारकर्त्‍याच्‍या बेसमेंट (तळमजला) मधील पार्किंगमध्‍ये पाणी गेल्‍यामुळे त्‍याच्‍या वरील वाहनाचे नुकसान झाले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 02.08.2013 रोजी विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला टोल फ्रि क्रमांकावरुन सूचना देऊन कळविले आणि दि. 05.08.2013 पर्यंत विरुध्‍द पक्ष कंपनी तर्फे कुणीही स्‍थळ परीक्षण (स्‍पॉटवर)  करण्‍याकरिता आले नाही.  तक्रारकर्त्‍याने सदरहू वाहनाचे नुकसान होऊ नये म्‍हणून सदरहू कार दि. 05.08.2013 रोजी वृषभ होंडाच्‍या वर्कशॉप मध्‍ये दिली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि.21.08.2013 रोजी पत्र पाठविले आणि कागदपत्रांची मागणी केली आणि तक्रारकर्त्‍याने सदरहू कागदपत्रे दिल्‍यानंतर सदरहू वाहनाबाबतचे दुरुस्‍ती खर्चाचे अंदाजपत्रक मुंदडा मोटर्स यांच्‍याकडून दि. 28.08.2013 रोजी मिळविले. त्‍याप्रमाणे सदरहू वाहनाला रुपये 4,22,837/- एवढा खर्च येण्‍याबाबतचा रिपोर्ट मिळाला. या उलट कंपनीच्‍या सर्व्‍हेअरने  मुंदडा मोटर्सच्‍या गॅरेज मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची पाहणी केली आणि केवळ रुपये14,250/- च्‍या खर्चाचे अंदाजपत्रक दिले.
  3.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की,  दि. 21.11.2013 रोजी विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याला पत्र पाठविले आणि त्‍यामध्‍ये काल्‍पनिक गोष्‍टया नमूद केल्‍या. सदरच्‍या पत्राला तक्रारकर्त्‍याने दि. 26.11.2013 रोजी उत्‍तर दिले  आणि त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष यांनी योग्‍य कार्यवाही न केल्‍यामुळे दि. 11.12.2013 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली.
  4.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याचा रुपये 4,22,837/- चा विमा दावा योग्‍य असतांना ही विरुध्‍द पक्ष कंपनीने पत्रामध्‍ये चुकिची कारणे दाखवून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन सदरहू वाहनाची दुरुस्‍ती वेळेवर न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नविन होंडा सिटी वाहन रक्‍कम रुपये 11,60,500/- ची खरेदी करावी लागली आणि म्‍हणून विरुध्‍द पक्षाने नविन वाहनाची किंमत देण्‍याचा आदेश करण्‍यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चाकरिता रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.  
  5.        विरुध्‍द पक्ष यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केला असून त्‍यांनी तक्रारीमधील मजकूर नाकारलेला आहे. परंतु सदरहू वाहनाची विमा पॉलिसी काढल्‍याबाबत आणि विमा घोषित मुल्‍यांकन रक्‍कम रुपये 3,16,482/- असल्‍याचे मान्‍य केलेले आहे. विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, सदरहू वाहनाचे नुकसान झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीमधील अटीप्रमाणे विरुध्‍द पक्षाला त्‍वरित सूचना ( immediate notice)  दिली नाही आणि विरुध्‍द पक्ष हे विमाकराराच्‍या बाहेर असलेल्‍या अतिरिक्‍त नुकसानीसाठी जबाबदार नाही. तसेच दि. 31.07.2013 रोजी पाऊसामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीचे नुकसान झाल्‍याचे विरुध्‍द पक्षाने नाकारले आहे.
  6.        विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला दि.21.08.2013 , 22.11.2013, 17.01.2014 , 05.02.2014, 21.02.2014 आणि  07.03.2014 रोजी पत्र पाठविली. परंतु तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक ती कागदपत्रे दुरुस्‍तीचे बिल, पैश्‍यांच्‍या पावत्‍या हजर केलेल्‍या नाही. तसेच तक्रारकर्ता हा स्‍वतःच निष्‍काळजीपणे वागलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला त्‍वरित सूचना न दिल्‍यामुळे त्‍यांना सदरहू वाहनाची वेळेवर तपासणी करता आली नाही आणि पाऊसामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत लवकरात लवकर पाहणी करणे व दुरुस्‍ती करणे आवश्‍यक असते अन्‍यथा वाहनाला गंज चढल्‍यामुळे जास्‍त नुकसान होऊ शकते. विरुध्‍द पक्षाने पुढे असे ही नमूद केले की, स्‍वतंत्र सर्व्‍हेअरने केलेल्‍या पाहणी मध्‍ये वाहनाचे रुपये 14,250/- चे नुकसान झाल्‍याचे  आढळून आले आणि ही बाब दि. 21.11.2013 च्‍या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्‍याला कळविली होती.  तक्रारकर्त्‍याला विमा कराराच्‍या बाहेरची रक्‍कम अथवा नुकसान देता येणार नाही. तक्रारकर्ता हा स्‍वच्‍छ हाताने मंचासमक्ष आलेला नाही, म्‍हणून वर्तमान तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली.  
  7.        उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्र, लेखी युक्तिवाद व त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद.

       मुद्दे                                                 उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ             होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ        होय
  3. काय आदेश ॽ                                  अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •                                                                                        कारणमिमांसा
  1.        आम्‍ही उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच  उभय पक्षांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की,  मुसळधार पावसामुळे बेसमेंटमध्‍ये (तळमजला) पाऊसाचे पाणी गेल्‍याने तक्रारकर्त्‍याचे वाहन संपूर्ण बुडाल्‍यामुळे वाहनाचे भरपूर नुकसान झालेले होते. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाच्‍या सर्व्‍हेअरने गाडीचे नुकसान केवळ रुपये 14,250/- चे झाल्‍याचा रिपोर्ट दिला. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी चुकिच्‍या कारणाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन आपल्‍या सेवेत त्रुटी केलेली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करण्‍यात यावा अशी मागणी केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला.

OM PRAKASHVS.RELIANCE GENERAL INSURANCE

AND ANR.CIVIL APPEAL NO 15611 OF 2017 SUPREME

  1. .

 

  • .M/s. Galada Power and Telecommunication Ltd. VS. United India Insurance Co. Ltd. And Another Etc.  Civil Appeal No. 8884-8900 of 2010  Supreme Court.

 

  1.        विरुध्‍द पक्षाच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्‍याने वेळेमध्‍ये सूचना न दिल्‍यामुळे वाहनाचे जास्‍त नुकसान झालेले आहे आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष हे रुपये 4,22,837/- देण्‍यास जबाबदार नाही. सर्व्‍हेअरच्‍या शपथपत्राप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे रुपये 14,250/- चे नुकसान झाले आहे आणि त्‍यानंतर ही तक्रारकर्त्‍याने वाहन दुरुस्‍तीची बिले, दुरुस्‍तीचा खर्च दिल्‍याबाबतच्‍या पावत्‍या इ. कागदपत्रे विरुध्‍द पक्षाला न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला आहे आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष नविन वाहनाची किंमत देण्‍यास जबाबदार नाही. विरुध्‍द पक्षाने विमा दावा नाकारुन सेवेत कोणत्‍याही प्रकारे त्रुटी केलेली नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2. मुद्दा क्रमांक  1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाचा विमा पॉलिसी वर नमूद केलेल्‍या प्रमाणे काढलेली होती आणि विमा संरक्षाच्‍या कालावधीमध्‍ये मुसळधार पावसामुळे त्‍याच्‍या वाहनाचे नुकसान झालेले आहे आणि म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट आहे.  
  3.        तक्रारकर्ता यांनी दि. 31.07.2013 ला वाहनाचे नुकसान झाल्‍यानंतर लवकरात लवकर म्‍हणजे दि. 02.08.2013 रोजी टोल फ्रि क्रमांकावरुन विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला सूचना दिलेली आहे. तसेच विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने दिनांक 21.08.2013 रोजी पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये क्‍लेम नं. OC-14-2101-1801-00000962 हा लिहिलेला आहे. याचाच अर्थ असा की, तक्रारकर्त्‍याने घटनेची सूचना लवकरात लवकरच विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला दिलेली आहे आणि त्‍यामध्‍ये अवाजवी विलंब झालेला नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने विलंबाबाबतचा घेतलेला बचाव चुकिचा आहे. तसेच सदरहू क्‍लेम नाकारणा-या पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याला सदरहू विमा दावा हा (settle) सेटल करायचा नाही असे चुकिचे कारण देऊन विमा दावा नाकारण्‍यात आला आहे. मुंदडा मोटर्स यांनी दिलेले खर्चाचे रुपये 4,22,837/- चे अंदाजपत्रक चुकिचे असल्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही आणि केवळ प्रथम सर्व्‍हेअरनी दिलेल्‍या रुपये 14,250/- च्‍या रिपोर्टवर आपली भिस्‍त ठेवलेली आहे. परंतु सदरहू रिपोर्ट तक्रारकर्त्‍याला मंजूर नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी दुस-या सर्व्‍हेअरची नेमणूक केल्‍याचे दिसून येत नाही आणि योग्‍य प्रकारे विमा दावा निकाली काढण्‍याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्‍न केला असल्‍याचे दिसून येत नाही. सबब विरुध्‍द पक्ष यांचा विमा दावा नाकारण्‍याचे कारण चुकिचे आहे असे आमचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रमांक 1 व 2 वर होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.
  4. मुद्दा क्रमांक 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने नविन कारची किंमत रुपये 11,60,500/- मिळण्‍याची केलेली मागणी ही विमा कराराशी संबंधित नाही आणि म्‍हणून ती मान्‍य करणे योग्‍य नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा खर्च जरी विमा घोषित किंमती पेक्षा जास्‍त असला तरी तक्रारकर्त्‍याला नुकसानी पोटी विमा घोषित किंमती पेक्षा जास्‍त रक्‍कम मंजूर करता येणार नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याला वाहनाच्‍या नुकसानीबाबत रुपये 3,16,482/- (आय.डी.व्‍हल्‍यू ) मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे असे आमचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 10,000/- वर्तमान प्रकरणात मंजूर करणे योग्‍य असल्‍याचे आमचे मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित

 

अंतिम आदेश

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2.  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला वाहनाची विमा घोषित मुल्‍यांकन  (IDV) प्रमाणे रुपये 3,16,482/- त्‍वरित द्यावी आणि सदरहू रक्‍कमेवर तक्रार दाखल दिनांक 30.06.2015 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.  
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’  व ‘क’ फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.