Maharashtra

Nagpur

CC/83/2019

SHRI DNYANESHWAR NARAYAN UMREDKAR - Complainant(s)

Versus

BAJAJ ALLIANZ GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV A. T. SAWAL

22 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/83/2019
( Date of Filing : 28 Jan 2019 )
 
1. SHRI DNYANESHWAR NARAYAN UMREDKAR
PLOT NO A 9, NEAR GAYATRI DECORATION, KAMTHI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BAJAJ ALLIANZ GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER
BLOCK NO 603, 6TH FLOOR, SHRIRAM SATYAM TOWER, NEAR NIT BUILDING, KINGSWAY SADAR NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
2. BAJAJ ALLIANZ GENERAL INSURANCE CO. LTD THROUGH CHIEF MANAGER / BRANCH MANAGER
GAY PLAZA, AIRPORT ROAD, YERVADA, PUNE 411006
PUNE
MAHARASHTRA
3. MAHESH ENTERPRISES THROUGH SHRI MAHESH SATYANARAYAN BANG
PLOT NO 49, AAZAMSHAHA CHOWK, NEAR HOTEL AL ZHAM ZHAM, C.A. ROAD, NAGPUR 440027
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Mar 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून बिल क्रमांक ५०९२४८, दिनांक ७/११/२०१८ अन्‍वये एक मोबाईल हॅन्‍डसेट सॅमसंग ऐ-७ हा एकूण रुपये २२,९९०/- इतक्‍या किंमतीत विकत घेतला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे दुकानात विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या  मोबाईलची पॉलिसी क्रमांक 0G-19-21019931-00007437 अन्‍वये दिनांक ७/११/२०१८ ते दिनांक ६/११/२०१९ या कालावधीकरीता रुपये २२,९९०/- इतक्‍या विमा मुल्‍याकरीता रुपये २,३६०/- स्विकारुन मोबाईल सुरक्षा पॉलिसी काढली होती व ती तक्रारकर्त्‍याला निर्गमीत केली.
  3. तक्रारकर्ता दिनांक २/१२/२०१८ रोजी सकाळी भाजीपाला खरेदी करण्‍याकरीता ईतवारी मध्‍ये गेला असता सकाळी ९.०० वाजता अज्ञात व्‍यक्‍तीने तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट चोरला. तक्रारकर्त्‍याने सुरवातीला मोबाईलचा शोध घेतला परंतु मोबाईल सापडला नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दोन दिवसानंतर सं‍बंधित लकडगंज्‍ पोलीस स्‍टेशनला चोरीची घटना सांगून दिनांक ८/२/२०१८ रोजी पोलीस स्‍टेशनला अपराध क्रमांक ६४० अन्‍वये एफ.आय.आर. दाखल केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ चे कार्यालयाला एफ.आय.आर. व इतर सर्व दस्‍तऐवजासह भेट दिली. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विमा दावा दाखल करण्‍याकरीता वारंवार टाळाटाळ करीत होता व तक्रारकर्त्‍याचा विमा दावा दाखल केला नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा पॉलिसीचे शर्ती व अटी नुसार बसत नसल्‍याचे कारण पुढे करुन विमा दावा दाखल करुन घेतला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक १२/१२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षकार यांना नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही व तक्रारकर्त्‍याला विमा दावा रक्‍कम रुपये २२,९९०/- अदा केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागण्‍या केल्‍या आहेत.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करावे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याला मोबाईलची किंमत रुपये २२,९९०/- विमा पॉलिसीप्रमाणे २४ टक्‍के व्‍याजासहीत परत करावी.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये २५,०००/- द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये १२,५००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ चे कथनानुसार विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला दिनांक ७/११/२०१८ ते दिनांक ६/११/२०१९ या कालावधीकरीता पॉलिसी क्रमांक 0G-19-21019931-00007437 अन्‍वये पॉलिसी सोबत दिलेल्‍या शर्ती व अटी (Limitation आणि Exception) ला धरुन पॉलिसी निर्गमीत केली. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मोबाईल हॅन्‍डसेट चोरीची तक्रार पोलीस स्‍टेशनला ६ दिवस उशीराने दिली. विमा पॉलिसीमधील क्‍लॉज नंबर ५ (Exception Clause) खालिलप्रमाणे आहे.

‘ The policy does not cover theft, loss or damage during the hire or loan of the instrument to a third party’

       तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हरविल्‍याचे कारण चोरीचे असल्‍यामुळे पॉलिसीचे Exception Clause 5 नुसार तक्रारकर्त्‍याला विमा दावा रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला कोणतीही न्‍युनतम सेवा दिली नसून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार कायदेशीर नसून दाखल होण्‍यास पाञ नाही आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचा मोबाईल हरविल्‍याची बाब विरुध्‍द  पक्षाला कळविली नाही. तक्रारकर्त्‍याने वस्‍तुस्थिती लपवून ठेवली त्‍यामुळे तक्रारकर्ता तक्रारीमध्‍ये नमुद केलेली कोणतीही रिलीफ मिळण्‍यास पाञ नाही आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.

  1. मंचामार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना रजिस्‍टर्ड पोस्‍टाव्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली परंतु ती प्राप्‍त होवूनही विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २८/५/२०१९ रोजी  पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, प्रतिउत्‍तर व लेखी युक्तिवाद व विरुध्‍द पक्षाचे लेखी जबाब व लेखी युक्तिवाद व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद एकूण निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                         होय
  3. काय आदेश ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट आय.एम.ई.आय. क्रमांक ३५१५७८१०४४७५५८७, दिनांक २/१२/२०१८ रोजी तक्रारकर्ता सकाळी ९.०० वाजता ईतवारा मध्‍ये भाजीपाला खरेदी करण्‍याकरीता गेला असता जुना मोटर स्‍टॅन्‍ड चौक, मच्‍छी मार्केट येथे अज्ञात चोराने तक्रारकर्त्‍याच्‍या वरच्‍या शर्टाचे खिशातून चोरुन नेला. तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबची तक्रार प्रथम खबर ६४० अन्‍वये दिनांक ८/१२/२०१८ रोजी सकाळी १२.३० वाजता लकडगंज पोलीस स्‍टेशनला दाखल केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तऐवजावरुन निर्दशनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडून पॉलिसी क्रमांक पॉलिसी क्रमांक 0G-19-21019931-00007437 अन्‍वये दिनांक ७/११/२०१८ ते दिनांक ६/११/२०१९ पर्यंत एक वर्षाची विमामुल्‍य रुपये २२,९९०/- इतक्‍या विमा मुल्‍याकरीता मोबाईल सुरक्षा पॉलिसी रुपये २,३६०/- स्विकारुन काढली होती व ती तक्रारकर्त्‍याला निर्गमीत केली त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला निर्गमित केलेली All Risk Policy मधील शर्त क्रमांक ५ खालिलप्रमाणे आहे.

 

‘ The policy does not cover theft, loss or damage during the hire or loan of the instrument to a third party’

 

तक्रारकर्त्‍याचा मोबाईल हॅन्‍डसेट हा चोरीला गेला. तक्रारकर्त्‍याने सदरहु फोन इतर कोणालाही भाड्याने किंवा लोनवर दिला नाही. यामुळे सदर प्रकरणी विमा पॉलिसीतील शर्त क्रमांक ५ लागू होत नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याचा मोबाईल चोरीला गेल्‍यानंतर प्रथम त्‍याने मोबाईलचा शोध घेतला व शोध घेवूनही तो न मिळाल्‍यामुळे त्‍याने पोलीस स्‍टेशनला त्‍याबाबतमाहिती दिली व एफ.आय.आर. नोंदविला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मोबाईल चोरीला गेल्‍याची तक्रार पोलीस स्‍टेशनला दाखल करण्‍यात कुठेही दिरंगाई केली नाही. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी प्रमाणे विमा दावा नाकारुन तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिली आहे व अनुचित व्‍यापार प्रथेचा वापर केला आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून तक्रारकर्त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट विकत घेतला होता त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतेही न्‍युनतम सेवा दिली नाही आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश नाही आहे. विमा पॉलिसी मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्ता विमा पॉलिसीच्‍या मुल्‍याएवढी रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक व सयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला विमा मुल्‍य रुपये २२,९९०/-, दिनांक २८/१/२०१९ (तक्रार दाखल दिनांका) पासून ७ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावी.
  3. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावा.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे विरुध्‍द दाखल करण्‍यात आलेली तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.