तक्रार क्र. 106/2014.
तक्रार दाखल दि.14-07-2014.
तक्रार निकाली दि.29-02-2016.
श्री. विनोद रामदेव चव्हाण,
रा.कोरेगांव,ता. कराड, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. सिनियर डिव्हीजनल मॅनेजर/प्रबंधक,
बजाज अलायंज जनरल इन्श्यूरन्स कं. लि.,
जाधव आर्केर्ड, पंकज हॉटेलशेजारी, कराड नाका,
सर्व्हीस रोड, हायवेलगत, कराड, जि.सातारा.
2. सिनीयर डिव्हीजनल मॅनेजर/प्रबंधक,
बजाज अलायंज जनरल इन्श्यूरन्स कं. लि.,
“वर्धमान” चौथा मजला, सेव्हन लव्हज चौक,
शंकरशेठ रोड, पुणे – 411 042. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे- अँड.व्ही.पी.जगदाळे.
.....जाबदार तर्फे- अँड.के.आर.माने.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कोरेगांव, ता.कराड, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी दि.13/12/2010 रोजी टाटा कंपनीची एल.एम.व्ही. पिक अप. गाडी विकत घेतली. प्रस्तुत गाडीचा विमा जाबदार कंपनीकडे पॉलीसी क्र. ओजी-13-2015-1803-00001429 ने उतरविला. प्रस्तुत विमा पॉलीसी दि. 20/2/2012 ते दि.19/12/2013 चे मध्यरात्रीपर्यंत सुरु होती. तथापी या गाडीला दि.10/7/2013 रोजी अपघात झाला आणि गाडीचे दुरुस्तीसाठी श्री गणेश बॉडी बिल्डर अँन्ड स्प्रे पेंटींग वर्क्स व जाधव गॅरेज यांचेकडे गाडी दुरुस्तीस एकूण रक्कम रु.58,458/- एवढा खर्च आला. सबब तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा क्लेम नं. ओ.सी.10-2001-1803-00000283 हा दाखल केला असता जाबदाराने तक्रारदार यांना दि.18/8/2013 चे पत्राने कळविले की, आमच्याकडे जमा असलेली कागदपत्रे पाहता तुम्ही तुमचे वाहन श्री. अरुण वसंतराव यादव यांना विकलेले आहे. त्यामुळे तुम्हाला विमा हेतू राहीलेला नाही. तुम्हाला क्लेम देता येत नाही. वास्तवीक सदर गाडी ही अद्याप श्री. अरुण वसंतराव यादव यांना विकलेली नाही ती त्यांना कांही रक्कम स्विकारुन वापरण्यास दिली होती. मात्र सदरची गाडी ही परिवहन RTO विभागाकडे RTO Transfer केलेली नाही असे असताना विमा क्लेम नाकारणेचे कारण हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने सेवेत कमतरता/त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने सेवेत कमतरता/त्रुटी दिलेली आहे. सबब प्रस्तुत जाबदार यांचेकडून विमा क्लेम मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदाराने सेवेतील त्रुटी केली आहे असे घोषीत करुन मिळावे, जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.58,458/- (रुपये अठ्ठावन्न हजार चारशे अट्टावन्न मात्र) इतका विमा क्लेम द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने क्लेम दाखल केलेपासून प्रदान करण्याचे जाबदाराला आदेश व्हावेत, तक्रारदाराला मानसीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- जाबदार यांनी अदा करावेत असे जाबदाराला आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केलेली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.नि.5/9 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे गाडीची आर.सी.बुकची प्रत, विमा पॉलीसीची प्रत, जाबदाराने क्लेम नाकारलेचे पत्र, बँकेचे स्टेटमेंट तक्रारदाराने पाठवलेले पत्र, तक्रारदाराचे गाडीचे करारपत्र, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे गाडीची आर.सी.बुकची प्रत, विमा पॉलीसीची प्रत, जाबदाराने क्लेम नाकारलेचे पत्र, बँकेचे स्टेटमेंट, तक्रारदाराने पाठवलेले पत्र, तक्रारदाराचे गाडीचे करारपत्र, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे गाडीचे बिल, खबरी जबाबाची प्रत, नि. 12 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.13 कडे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे याकामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांना ब-याच संधी देवूनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. सबब प्रस्तुत जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ (No-Say) आदेश पारीत केलेला आहे. सबब जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. नि. 14 कडे जाबदाराने ‘म्हणणे नाही’ आदेश रद्द होऊन मिळणेसाठीचा अर्ज दाखल केला. परंतू प्रस्तुत ‘म्हणणे नाही’ आदेश रद्द करणेचे अधिकार या मे. मंचास नसल्यामुळे प्रस्तुत अर्ज मे. मंचाने नामंजूर केला आहे. त्यामुळे जाबदाराने प्रस्तुत अर्जासोबत दिलेले म्हणणे/ कैफियत Read & Record केलेले नाही . तसेच पुराव्याची दिलेली पुरसिसही विचारात घेतली जाणार नाही नामंजूर असे आदेश झाले. तसेच नि.15 कडे कागदयादीसोबत जाबदाराने कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतू प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ आदेश झालेले असलेने सदर कागदपत्रे पुराव्यात वाचता येणार नाहीत असे आदेश कागदयादीवर झालेने ते Read & Record केले नाहीत. त्यानंतर नि. 16 कडे कागदपत्रे दाखल करणेसाठी परवानगीचा अर्ज जाबदारांनी दिला परंतू प्रस्तुत अर्जही मे. मंचाने नामंजूर केला आहे. नि. 17 कडे जाबदाराने प्रस्तुत कामी ‘म्हणणे नाही’ आदेश रद्द केला नाही. त्या आदेशाविरुध्द मे. राज्य आयोग यांचेकडे रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे सबब प्रस्तुत कामी कोणतेही आदेश जाबदारांविरुध्द होऊ नयेत असा अर्ज जाबदाराने दाखल केला. परंतू जाबदाराने प्रस्तुत रिव्हीजन अर्जाचे कोणतेही कागदपत्रे मे मंचात दाखल केली नसलेने जाबदाराचा अर्ज नामंजूर करणेत आला. त्यानंतर नि. 18 कडे जाबदाराने प्रस्तुत कागदपत्रे दाखल करणेसाठी आठ दिवसांची मुदत मिळावी असा अर्ज दिला. प्रस्तुत अर्जावर मे. मंचाने जाबदार यांनी पुढील तारखेस सदर रिव्हीजनचे कागदपत्रे मे मंचात दाखल न केलेस तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकूण प्रकरण निकालावर ठेवणेत येईल असे आदेश मे. मंचाने दि.1/10/2015 च्या सदर अर्जावर केले. दि.15/10/2015 रोजी जाबदाराने रिव्हीजन अर्जाची प्रत मे मंचात दाखल केली. परंतू मे. राज्य आयोगाने प्रस्तुत कामी स्थगीती आदेश दिलेला नव्हता व नाही त्यानंतर दि.15/2/2016 रोजी पुन्हा जाबदाराने सदर कामी युक्तीवादावर काम तहकूब करावे म्हणून अर्ज दिला. प्रस्तुत कामी मे मंचाने अर्ज नामंजूर केला. तक्रारदार व जाबदार यांचे विधिज्ञांना युक्तीवाद करणेस सांगीतले व उभय विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकला व प्रकरण निकालावर ठेवणेत आले. प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदाराला याकामी तक्रारदाराने त्याचे वाहन श्री. अरुण प्रतापराव यादव यांना विक्री केलेने तक्रारदाराला याकामी Insurable Interest नाही त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे सांगीतले. जाबदार यांचेविरुध्द No Say ‘म्हणणे नाही’ आदेश झालेला आहे तो मे. राज्य आयोग यांनी रद्द केलेचे कागदपत्रे याकामी दाखल नाहीत. सबब जाबदाराने दाखल केले कागदपत्रे पुराव्यात वाचता येत नाहीत. सदरचे प्रकरण सन 2014 मधील आहे. प्रस्तुतची प्रकरणे 90 दिवसात निकाली करणेत यावीत व लवकरात लवकर ग्राहकांना न्याय मिळावा म्हणून प्रस्तुत कामी जाबदार यांची विनंती अर्ज नामंजूर करुन प्रकरण निकालावर ठेवणेत आले.
5. याकामी तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने प्रस्तुत कामी पुढील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ?- होय.
2. जाबदाराने तक्रारदार यांचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला
सेवात्रुटी दिली आहे काय ? होय.
3. तक्रारदार विमा क्लेम जाबदारकडून मिळणेस पात्र आहेत काय?- होय.
4. अंतिम आदेश काय?- खाली नमूद केले
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे एल.एम.व्ही. टाटा पिक अप गाडीचा विमा जाबदार कंपनीकडे पॉलीसी क्र. ओ.जी. 13-2015-1803-00001429 ने उतरविला होता व आहे. त्याचा कालावधी दि.20/12/2012 ते दि.19/12/2013 असा होता. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदार यांचे सेवापुरवठादार आहेत ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/2 कडे दाखल केले. विमा पॉलीसीवरुन स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
तसेच प्रस्तुत तक्रारदाराची एल.एम.व्ही. टाटा पिक अप गाडी नं.एम.एच.11-ए.जी.5787 ही गाडी वर नमूद केलेप्रमाणे जाबदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती. प्रस्तुत गाडीचा दि. 10/7/2013 रोजी अपघात झाला. सदर गाडी दुरुस्तीसाठी गणेश बॉडी बिल्डर अँन्ड स्प्रे पेंटींग तसेच जाधव गॅरेज यांचेकडे एकूण रक्कम रु.58,458/- एवढा खर्च आला. सबब तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा क्लेम नं. ओ.सी.10-2001-1803-00000283 हा दाखल केला असता जाबदाराने तक्रारदार यांना पत्राने कळविले की, विमा क्लेम सोबत दाखल कागदपत्रांवरुन असे दिसते की, तुम्ही तुमचे वाहन अरुण वसंतराव यादव यांना विकलेले आहे. त्यामुळे तुम्हाला विमा हेतू राहीलेला नाही. सबब विमा क्लेम देता येत नाही असे कळविले व विमा क्लेम देणेचे नाकारले आहे. वस्तूतः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे पाहता तक्रारदाराने प्रस्तुत गाडी ही अरुण वसंतराव यादव यांना रक्कम रु.2,90,000/- ला विकली आहे. त्यांचेकडून तक्रारदाराने रक्कम रु.90,000/- स्विकारुन ऊर्वरीत रक्कम अरुण यादव यांनी स्वतः दि कराड अर्बन को’ऑप.बँक, शाखा कराड यांचेकडील कर्ज फेडलेनंतरच गाडी प्रस्तुत अरुण यादव यांचे नावावर करणेची असे स्पष्टपणे सदर गाडी प्रस्तुत अरुण यादव यांचे नावावर करणेची असे स्पष्टपणे सदर नि.5/6 कडील करारपत्रात नमूद आहे. त्यामुळे प्रस्तुत गाडी ही अद्याप अरुण यादव यांचे नावावर आर.टी.ओ. रजिस्टर झालेली नाही असे दिसते.
प्रस्तुत कामी सदर अरुण वसंतराव यादव यांनी जाबदार विमा कंपनीकडे सदर वाहनाचा विमा क्लेम सादर केला होता. त्यावेळी प्रस्तुत अरुण वसंतराव चव्हाण यांचे नावावर अद्याप वादातीत वाहनाचे आ.टी.ओ. रजिस्ट्रेशन किंवा आर.सी.टी.सी. वर नोंदणी न झालेमुळे प्रस्तुत अरुण यादव यांना सदर विमा क्लेम मागणेस इन्श्यूरेबल इंटरेस्ट नाही. असे म्हणून जाबदाराने दि.25 जुलै,2013 रोजी क्लम नाकारलेचे पत्र दिले. तसेच त्यानंतर तक्रारदार यांनी विमा क्लेम दाखल केला असता जाबदाराने तक्रारदार यांना दि.19 ऑगस्ट 2013 चे पत्राने कळविले की प्रस्तुत वादातीत वाहन हे तक्रारदाराने श्री. अरुण वसंतराव यादव यांना विकले असलेने तक्रारदार यांना प्रस्तुत वाहनाचे इन्श्यूरन्स कॉन्ट्रॅक्ट विमा कंपनीसोबत तुम्ही केलेले नाही. सबब विमा क्लेम नाकारलेचे कळविले आहे.
अशाप्रकारे तक्रारदाराने व जाबदाराने दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन करता जाबदाराने तक्रारदाराचा वाहनाचा विमा क्लेम तक्रारदाराने दाखल केले नंतरही फेटाळला व श्री. अरुण वसंतराव चव्हाण यांना गाडी विक्रीचा करार करुन दिलेने अरुण यादव यांनीही दाखल केलेला विमाक्लेम ही अनुचित व्यापारी प्रथा जाबदाराने अवलंबीलेली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. जाबदाराने विमाक्लेम नाकारलेचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे हे निर्विवादपणे स्पष्ट झालेले आहे. जाबदार यांना वारंवार संधी देवूनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नसलेमुळे जाबदार यांचेविरुध्द ‘No Say’ म्हणणे नाही आदेश पारीत झालेला आहे. तसेच जाबदार यांनी मे मंचात ‘No Say’ आदेश रद्द होणेसाठी दिलेला अर्ज (नि.14) मे. मंचाने नामंजूर केला आहे. त्यामुळे जाबदाराचे म्हणणे दाखल करुन घेतले नाही. तक्रारदाराने नि. 5/8 कडे गाडी दुरुस्तीची सर्व बीले दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचा विचार करता प्रस्तुत तक्रारदाराचे वादातीत वाहनाचे आर.टी.ओ. रेर्कॉर्ड सदरी अद्याप श्री. अरुण वसंतराव यादव यांचे नावाची नोंद झालेली नाही. तसेच करारातील अटीप्रमाणे श्री. अरुण यादव यांनी तक्रारदाराचे गाडीचे दि कराड अर्बन को-ऑप. बँकेचे कर्ज पूर्ण फेड केलेशिवाय प्रस्तुत वाहनाच्या आर.टी.ओ. रेकॉर्ड सदरी अरुण यादव यांचे नावाची नोंद होणार नाही हे स्पष्ट होत आहे. सबब तक्रारदाराने विमा क्लेम मागणी करणेस तक्रारदार यांना इन्श्यूरेबल इंटरेस्ट आहे असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
वरील सर्व कागदपत्रे विवेचन लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता तक्रारदार हे जाबदार यांचेकडून वादातीत वाहनाचा विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.58,458/- (रुपये अठ्ठावन्न हजार चारशे अठ्ठावन्न मात्र) अदा करावी.
3. प्रस्तुत विमा क्लेम रकमेवर क्लेम जाबदार विमा कंपनीने नाकारले तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे प्रत्यक्ष हात पडेपर्यंत जाबदाराने द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रारदाराला अदा करावे.
4. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराने तक्रारदाराला अदा करावेत.
5. वर नमूद आदेशांचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन करणेत जाबदारांनी कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 29-02-2016.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.