निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 04/12/2009 तक्रार नोदणी दिनांकः- 07/12/2009 तक्रार निकाल दिनांकः- 16/04/2010 कालावधी 04 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. भाऊराव सटवाजी पतंगे अर्जदार वय 40 वर्षे. धंदा शेती रा.खांडेगांव, अड.डि.यू.दराडे ता.बसमत जि.हिंगोली. विरुध्द बजाज अलायझ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड गैरअर्जदार मार्फब ब्रॅच मॅनेजर राजेंद्र भवन दुसरा माळा, अड.बी.ए.मोदानी एल.आय.सी.बिल्डींगजवळ, अदालत रोड, औरंगाबाद. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) अपघातात डॅमेज झालेल्या मोटार सायकलची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने बेकायदेशीररित्या नाकारले म्हणून प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत अशी की, अर्जदाराच्या मालकीची बजाज प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक एम.एच.38/एच 7948 चा गैरअर्जदाराकडून दिनांक 17.03.2008 ते 16.03.2009 या कालावधीसाठी रुपये 33490/- नुकसान भरपाई हमीचा विमा उतरविलेला होता. दिनांक 26.11.2008 रोजी अर्जदाराने त्याची मोटार सायकल नामदेव राघोजी गायकवाड याला मानवत येथे जाण्यासाठी दिली होती . मानवत रोडवरील ताडबोरगांव गावाजवळ अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्यामुळे अपघातात नामदेव जागीच ठार झाला. मानवत पोलीस स्टेशनला घटनेची खबर दिल्यानंतर पोलीसानी गु.नं. 136/08 नोंदवून .पंचनामे केले व प्रेत सरकारी हॉस्पिटल परभणी येथे पाठविले. त्यानंतर अर्जदाराने अपघात घटनेची व मोटार सायकलच्या नुकसानीची गैरअर्जदारालाही कल्पना दिली होती गैरअर्जदारातर्फे नेमलेले सर्व्हेअर यानी घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा सर्व्हे केला व दुरुस्तीसाठी वाहान गॅरेजमध्ये नेण्यास परवानगी दिली. अर्जदाराने त्यानंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे विमा क्लेम सादर केला त्यानंतर गैरअर्जदाराने चालकाच्या ड्रायव्हींग लायसन्सची मागणी केली त्याबाबत अर्जदाराने हिंगोली आर.टी.ओ.कडून लायसन घेतले असल्याचे गैरअर्जदारास फोनवरुन सांगितले. असे असतानाही गैरअर्जदाराने 27.02.2009 रोजीचे पत्र पाठवून अर्जदाराने चालकाचे डायव्हींग लायसेन्स दिले नाही याकारणास्तव क्लेम नामंजूर केले असल्याचे कळविले. अशारितीने गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्या क्लेम नाकारुन सेवा त्रूटी केली म्हणून मोटार सायकल दुरुस्तीचा खर्च रुपये 28,000/- द.सा.द.शे 12 % व्याजासह मिळावा मानसिक त्रासापोटी रुपये 10000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 3000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत सहा कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटिस पाठविल्यावर तारीख 25/01/2010 रोजी त्याने आपले लेखी म्हणणे नि. 10 सादर केले. अर्जदाराच्या मोटार सायकलच्या मालकी संबंधी व विमा पॉलीसी संबंधीचा मजकूर त्याना मान्य आहे. परंतू 26.11.2008 रोजी अर्जदाराने नामदेव गायकवाड याला मानवतला जाण्यासाठी मोटार सायकल दिली होती व अपघात झाला हा तक्रार अर्जातील मजकूर वैयक्तिक माहिती अभावी नाकारुन तो खोटा असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने अपघातातील मोटार सायकलच्या नुकसानी संदर्भात क्लेम दाखल केल्यावर ड्रायव्हींग लायसेन्सची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला पत्राव्दारे माहिती केली होती परंतू त्याने प्रतिसाद दिला नाही . गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, चालकाकडे ड्रायव्हींग लायसन्स नसल्यामुळे अर्जदाराने ते पाठविले नसावे मोटार सायकलची अपघातात झालेली नुकसानीच्या बाबतीत अर्जदाराकडून विमा पॉलीसी कराराचा भंग झाल्यामुळे गैरअर्जदारानी नियमानुसार क्लेम नाकारलेला आहे त्यामध्ये बेकायदेशीरपणा अथवा सेवात्रूटी मुळीच केलेली नाही सबब तक्रार अर्ज रुपये 10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.11) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 16 लगत एकूण सात कागदपत्रे दाखल केली आहेत. प्रकरणाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. दराडे यानी युक्तिवाद केला गैरअर्जदारातर्फे अड. मोदानी यानी लेखी युक्तिवाद सादर केला शिवाय तोंडी युक्तिवादही केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराच्या मालकीच्या बजाज प्लॅटीना रजि.नं. एम.एच.38/एच 7948 मोटार सायकलची अपघातात झालेली नुकसान भरपाई अर्जदाराने चालकाचे ड्रायव्हींग लायसेन्स दिले नाही या कारणास्तव नामंजूर करुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराच्या मालकीची बजाज प्लॅटीना रजि. क्रमांक एम.एच.38/एच.7948 च्या मोटार सायकलचा गैरअर्जदाराकडून दिनांक 17.03.2008 ते 16.03.2009 या मुदतीचा विमा उतरविलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने सदर वाहनाचे आर.सी.बुक (नि.5/5) व विमा पॉलीसी कव्हर नोट ( नि.5/4) पुराव्यात दाखल केलेली आहे. दिनांक 26.11.2008 रोजी अर्जदाराने त्याची मोटार सायकल नामदेव राघोजी गायकवाड याला मानवत येथे जाण्यासाठी दिली होती मानवतला जाताना ताडबोरगांव गावाजवळ अज्ञात वाहानाने मोटार सायकलला धडक दिल्याने अपघातात नामदेव गायकवाड हा जागेवरच मयत झाला होता व वाहानाची बरीच नुकसान झाली होती हे पुराव्यातू शाबीत करण्यासाठी मानवत पोलीस स्टेशनला प्रकाश महादू गजभारे याने दिलेली अपघाताची खबर ( एफ.आय.आर 136/08) (नि.5/1) घटनास्थळ पंचनामा ( नि.5/3) मयताचा मरणोत्तर पंचनामा ( नि.5/2) हे पोलीस पेपर्स दाखल केलेले आहेत त्याचे अवलोकन करता अपघाताची घटना रात्री 9.30 वाजता घडलेली होती हे पुराव्यातून शाबीत झालेले आहे. अपघातात मोटार सायकलची विमा पॉलीसी मुदतीत नुकसानी झाल्यामुळे ती नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने गैरअर्जदारास देखील घटनेची माहिती कळविलेली होती हे गैरअर्जदाराने नाकारलेले नाही तसेच विमा कंपनीतर्फे नेमलल्या सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा सर्व्हे केलेला होता हे देखील सर्वमान्य आहे. सर्व्हेअरने वाहनाच्या दुरुस्तीसाठी लागणा-या स्पेअर पार्टसचा सविस्तर तपशीलासह नुकसान भरपाईचा सर्व्हे केला होता त्याचा अहवाल ही गैरअर्जदारातर्फे पुराव्यात (नि.16/7) वर दाखल केला आहे याखेरीज नुकसान भरपाई मंजूर करणेचे कामी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सादर केलेला विमा क्लेम फॉर्म (नि.16/3) क्लेम इंटीमेशन लेटर (नि.16/2) पॉलीसी सर्टीफीकेट (नि.16/1 ) ही कागदपत्रे गैरअर्जदारानेच पुराव्यात दाखल केलेली असल्यामुळे कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराकडून झालेली होती ही बाब देखील शाबीत झालेली आहे. (नि.16/7) वरील सर्व्हेअर रिजवान फकीर मो. शेख यानी आपल्या सर्व्हेरिपोर्टमध्ये क्षतीग्रस्त मोटार सायकल दुरुसतीसाठी लागणा-या स्पेअर पार्टसच्या किंमतीतून नियमाप्रमाणे तपशीलावर घसारा वजा करुन रुपये 15803/- इतकी नुकसान भरपाई विमा कंपनी देय लागते असे अहवालात नमूद केलेले आहे मात्र सदरची नुकसान भरपाई अर्जदारास मंजूर करण्यासाठी अर्जदारास मोटार सायकल चालक मयत नामदेव राघोजी गायकवाड यांचे ड्रायव्हींग लायसेन्स सादर करण्याची अर्जदारास अट घातली होती हे गैरअर्जदाराने पुराव्यात नि. 16/5 वर दाखल केलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे आणि अर्जदाराने त्याची पूर्तता केली नाही म्हणून गैरअर्जदाराने दिनांक 27.02.2009 तारखेचे अर्जदाराला पत्र पाठवून विमा क्लेम नामंजूर केलेला आहे त्यामुळे अर्जदाराने त्याची कायदेशीर दाद प्रस्तूत तक्रार अर्जाव्दारे ग्राहक मंचाकडून मागितलेली आहे अर्जदाराने ड्रायव्हींग लायसेन्स दिले नाही या कारणास विमा क्लेम गैरअर्जदारास नामंजूर करता येईल का ? एवढा एकच महत्वाचा मुद्या निर्णयासाठी उपस्थित झालेला आहे. युक्तिवादाचे वेळी अर्जदारातर्फे अड दराडे यानी याबाबतीत मुचापुढे असे निवेदन केले की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा केलेला क्लेम हा own damages तथा त्याचे वाहनास ति-हाईत वाहनाने धडक दिल्यामुळे वाहानाचे नुकसान झाल्यामुळे त्याच्या भरपाईसाठी पॉलीसी हमीप्रमाणे मागितलेला आहे. मोटार सायकलची अपघातात झालेली नुकसान ही चालकाच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणामुळे झालेली नव्हती ही वस्तूस्थिती आहे व पोलीस तपास पेपर्स वरुनही सिध्द झाले आहे त्यामुळे क्लेम मंजूरीसाठी ड्रायव्हरच्या लायसेन्स ची केलेली मागणी गैर असून अनावश्यक आहे. अपघातात चालक मयत झालेला होता त्यामुळे त्याचे लायसेन्स च्या तपशीलाची माहिती अर्जदाराला असणे शक्य नाही किंवा आर.टी.ओ कार्यालयाकडूनही मिळविणे अशक्य आहे मयत नामदेव गायकवाड कडे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते असे क्षणभर ग्रृहीत धरले तरी गैरअर्जदाराने त्या बाबत हरकत घेतलेली असल्यामुळे ते शाबीत करण्याची जबाबादारी विमा कंपनीची आहे त्यामुळे अर्जदाराने मयत चालकाच्या ड्रायव्हींग लायसेन्सची पूर्तता करण्याची मुळीच जबाबदारी नाही. यासंदर्भात अड. दराडे यानी मा. राष्ट्रीय आयोगाने खालील दोन रिपोर्टेड केसेसचा आधार घेतलेला आहे. 1 रिपोर्टेड केस 2009(3) सी.पी.आर पान 306 ( राष्ट्रीय आयोग ) यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, Whether the driver possessed a driving licence or not is immaterial when the accident took place due to no fault on his part – Repudiation of claim by insurance Company is illegal. 2 रिपोर्टेड केस 2005(1) सी.पी.आर पान 40 ( राष्ट्रीय आयोग ) यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, Where insurance Company seeks to defend claim of insured regarding damage to vehicle on a plea that driver did not possess valid affective driving licence, onus would be on insurer to prove negligence on part of insured. 3 रिपोर्टेड केस 2004(1) सी.एल.टी पान 1 ( सुप्रीम कोर्ट ) यामध्येही मा. सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, If on fact it is found that accident was caused solely because of some other unforeseen or intervening cause like mechanical failure and similar other causes having no nexus with driver, the insurer will not be allowed to avoid its liability . 4 रिपोर्टेड केस 2005 एन.सी.जे.पान 481 ( राष्ट्रीय आयोग ) यामध्येही मा. राष्ट्रीय आयोगाने वरील अनुक्रमांक 3 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताप्रमाणेच निर्णय दिलेला आहे. वरील चारही रिपोर्टेड केसेस मध्ये वरीष्ठ कोर्टाने व्यक्त केलेली मते विचारात घेता गैरअर्जदाराने अर्जदाराचार क्लेम बेकायदेशीरपणे नाकारलेला आहे असा निष्कर्ष निघतो. व याबाबतीत गैरअर्जदाराने निश्चीतपणे सेवा त्रूटी केलेली आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतो. बचावाचे समर्थनासाठी गैरअर्जदारातर्फे अड. मोदानी यानी युक्तिवादाचे वेळी मंचापुढे खालील रिपोर्टेड केसेस सादर केलेल्या आहेत. 1 2009(3) ACC 38 ( गुजराज हायकोर्ट ) 2 2003 (1) ACC 629 ( अलहाबाद हायकोर्ट ) 3 2008(4) ACC 358( दिल्ली हायकोर्ट ) 4 सिव्हील अपील 396/09 ( सु.को. ) 5 2009 SAR ( Civil ) 679 ( सु.को. ) 6 2008 (1)ACC 54 ( सु.को.) 7 रिव्हीजन पिटीशन 916/06 ( राष्ट्रीय आयोग ) 8 2002 (2) BCR 27 (सु.को.) 9 AIR 2007 ( सु.को.) 1563 वरील रिपोर्टेड केसेसचे अवलोकन केले असता व्हेइकल इन्शुरन्स पॉलीसी अंतर्गत थर्ड पार्टी रिस्कच्या बाबतीतील नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन कायदयान्वये मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे दाखल केलेंल्या केसेसच्या वरील रिपोर्टेड केसेसमधील घटना असून इन्शुअर्ड वाहनाची अपघातात झालेली नुकसान भरपाई बाबतच्या ( Own Damage Claim ) नाहीत तसेच रिपोर्टेड केसेसमधील घटना ही भिन्न स्वरुपाचे आहेत. वरील रिपोर्टेड केसेस पैकी अनुक्रम.नं. 5,7 व 9 केसेस रिन्यूव्हल ऑफ लायसन्स संदर्भातील असल्याने अर्जदाराच्या प्रकरणाला लागू पडत नाही तसेच अ.न. 8 ची केस ही गैरलागू आहे. अर्जदाराने तक्रार अर्जातून मोटार सायकच्या दुरुस्तीसाठी लागणा-या स्पेअर पार्टसची एकूण किंमत रुपये 28000/- ची मागणी केलेली आहे परंतू वाहनाच्या उत्पादीत सालापासून अपघात होइपर्यंतच्या कालावधीतील वाहान वापराच्या घस-याचा अर्जदाराने विचारच केलेला नाही. नवीन स्पेअर पार्टसच्या किंमतीतून नियमाप्रमाणे ठराविक टक्के घसारा विचारात घ्यावा लागतो. गैरअर्जदारातर्फे पुराव्यात नि. 16/7 वर दाखल केलेल्या सर्व्हेअरच्या असेसमेंट रिपोर्टमध्ये स्पेअर पार्टसच्या किंमतीतून नियमाप्रमाणे ठराविक टक्के घसारा वजा करुन अंतिम नुकसान भरपाई रुपये 15803/- विमा कंपनी देय लागते असे शेवटी नमूद केलेले आहे. तेवढीच नुकसान भरपाई अर्जदार मिळण्यास पात्र आहे. याखेरीज तदअनुषांगीक सेवा त्रूटी/मानसिक त्रास, दावा खर्च याचीही योग्य ती नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचीत वाटते सबब मुद्या क्रमांक 1 व चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 तक्रार अर्ज अशंता करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदारास रुपये 15803/ नुकसान भरपाई द.सा.द.शे 9 % दराने क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दिनांक 27.09.2009 पासून व्याजासह दयावेत. 3 मानसिक त्रास व सेवा त्रूटीबददल रुपये 2000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावा. 4 संबंधीतानाआदेशकळविण्यातयावा. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |