Maharashtra

Kolhapur

CC/25/2015

Amar Sadashiv Wadam - Complainant(s)

Versus

Bajaj Allianz Gen. Insu. Co. Ltd. Through Br. Manager - Opp.Party(s)

M. P. Jadhav

18 Oct 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/25/2015
 
1. Amar Sadashiv Wadam
Nr. Kalkai Mandir, A ward, Shivaji Peth
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Allianz Gen. Insu. Co. Ltd. Through Br. Manager
D-3, D-4, 2nd Floor, Royal Prestige
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.M.P.Jadhav, Present
 
For the Opp. Party:
Adv.A.A.Bhumkar, Present
 
Dated : 18 Oct 2016
Final Order / Judgement

तक्रार दाखल ता.03/02/2015   

तक्रार निकाल ता.18/10/2016   

न्‍यायनिर्णय

द्वारा:- मा. सदस्‍या - सौ. रुपाली डी. घाटगे.  

 

1.           प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल केली आहे.

2.          प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. तर्फे वकीलांचा तोंडी/लेखी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

3.         तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

   तक्रारदार हे वर नमुद पत्‍त्‍यावर रहात असून त्‍यांनी आपले व्यवसायाकरिता Swift/VD/Maruti SWIFT  VDI BSIV   MH-09-BX-281, इंजिन नं.1600379, चेसीस नं.686916 कार घेतली असून तक्रारदारांनी वि.प.यांचेकडे दि.26.04.2014 रोजी सदर कारचा इन्‍शुरन्‍स रक्‍कम रु.8,930/- इतकी रक्कम भरुन उतरविला. तक्रारदारांनी वि.प.यांचेकडे उतर‍वलेल्‍या कारचा इन्‍शुरन्‍स कालावधी दि.27.04.2014  ते दि.25.04.2015 रोजी आहे.  दि.13.10.2014 रोजी तक्रारदारांचे सदर गाडीचा यरगट्टी, जि.बेळगांव येथे डिव्‍हायडर लागून सदर गाडी नादुरुस्‍त झाली. त्‍यानंतर तक्रारदारांनी सदर गाडी दुरुस्‍तीकरीता साई सर्व्‍हीस प्रा.लि. यांचेकडे त्‍यांचे कोल्‍हापूर येथील कार्यशाळेत पाठविली असता, त्‍याचा खर्च रक्‍कम रु.1,25,229/- इतका झाला आहे.  दि.29.11.2014 रोजी मेल पाठवून तक्रारदारांना सदर गाडीचे दुरुस्‍तीपोटी केवळ रक्‍कम रु.19,100/- चा क्‍लेम मंजूर केलेबाबत तक्रारदारांना कळविले. त्‍यानंतर तक्रारदारांनी तो क्‍लेम नाकारला असता, वि.प.यांनी दि.04.12.2014 रोजी तक्रारदारांना मेल पाठवून तक्रारदारांचे सदर गाडीचे दुरुस्‍तीपोटी रक्‍कम रु.26,583/- इतक्‍या रक्‍कमेचा क्‍लेम मंजूर केलेचे कळविले.  तक्रारदारांनी तो क्‍लेम नाकारला आहे असे वि.प.यांना कळविले. तक्रारदारांचे सदरहू गाडीचा फुल इन्‍शुरन्‍स वि.प.यांचेकडे उतरविला असून सदरहू गाडीचे दुरुस्‍तीची पुर्ण रक्‍कम रु.1,25,299/- इतकी रक्‍कम देणेची सर्वस्‍वी जबाबदारी वि.प.यांची आहे असे असताना वि.प.यांनी दुरुस्‍तीची रक्‍कम देणेस नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे. दुरुस्‍तीचा संपूर्ण खर्च तक्रारदारांनी पूर्ण साई सर्व्‍हीस प्रा.लि.यांचेकडे भागविला आहे. दि.19.12.2014 रोजी आर.पी.ए.डी.ने नोटीस अॅड.महेश प्रभाकर जाधव यांचेमार्फत पाठविली. सदरहू नोटीस मिळूनही वि.प.यांनी तक्रारदारांचे नोटीसीस उत्‍तरही दिले नाही. तथापि वि.प.यांचे या कृत्‍यामुळे तक्रारदारांना त्रास झाला असून वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. म्‍हणून त्‍यांनी सदरहू अर्ज या मंचात दाखल केला. तक्रारदारांचे मालकीचे गाडीचे दुरुस्तीची रक्‍कम रु.1,25,299/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व नोटीसीचा खर्च रक्‍कम रु.2,500/- तसेच रक्‍कम रु.147,799/- प्रस्‍तुत तक्रार दाखल केले तारखेपासून द.सा.द.शे.18टक्‍के व्‍याजदराने वसुल होऊन मिळावी अशी वि.प. यांचेकडून तक्रारदारांना अदा व्‍हावी अशी मागणी सदरहू मंचास केलेली आहे.   

 

4.        तक्रारीसोबतचे कागदपत्रे एकूण 12 कागदपत्रे दाखल केलेली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. पावती, एकूण चार टॅक्‍स इनव्‍हाईसेस, साई सर्व्‍हीस यांचेकडील पत्र, बजाज अलायन्‍स या कंपनीची पॉलीसी, वि.प.यांनी तक्रारदारांना पाठविलेले मेल, तक्रारदारांनी वकीलांमार्फत पाठविलेल्‍या नोटीस व नोटीसची आर.पी.डी.ची पावती व नोटीस पोहोच झालेची पोहचपावती तसेच तक्रारदारांचे दि.27.11.2015 रोजीचे पुराव्‍याचे शपथपत्र, इत्‍यादी दाखल केलेली आहेत.

 

5.         वि.प.यांनी दि.21.04.2015 रोजी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  तक्रारदारांनी वि.प.यांना सदरचे घटनेची माहिती लगेचच न कळविता, उशिरा कळविलेली आहे.  वि.प.यांनी तक्रारदारांना कागदपत्रांची मागणी वेळोवेळी करुनदेखील तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे दिलेली नसलेने वि.प.यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे. सदरचे वाहनाचा ऑईल पंप खराब (Damage) झालेला होता. खराब झालेला ऑईल पंप असताना देखील तक्रारदारांनी सदरचे वाहन दुरुस्‍त न करता वापरलेने सदरचे वाहनाचे इंजिनचे नुकसान झालेले आहे. पॉलीसीतील अट क्र.4 चा भंग झालेला आहे. सदर पॉलीसीतील अट क्र.4 नुसार जर विमाधारकाने सदरचे वाहन योग्‍यरित्‍या दुरुस्‍त करणेपुर्वीच वापरले, तर त्‍यामुळे होणारे वाहनाचे नुकसानीची पुर्णपणे जबाबदारी विमाधारकांवर असते.  सर्व्‍हेअर यांचे अहवालानुसार, सदर वाहनाचे इंजिनचे नुकसान हे इंजिनमधील पार्ट (Parts) खराब (worn out) झालेले असलेने झाले आहे. परिणामाप्रमाणेची नुकसानभरपाई (Consequential Loss) करीता वि.प. देय लागत नाहीत. Clause -2 Sec.1 प्रमाणे सदर परिणामाप्रमाणे होणारी (Consequential Loss) नुकसानभरपाई किंवा इलेक्‍ट्रीकल ब्रेकडाऊन किंवा ब्रेकेजमुळे होणा-या नुकसानीकरीता वि.प.हे जबाबदार नाहीत.  दि.13.10.2014 रोजी तक्रारदारांनी सदर वाहन निष्‍काळजीपणाने पावसात चालविलेमुळे सदरची घटना घडलेने वि.प.यांनी योग्‍य कारणाने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे.  सदरची घटना दि.13.10.2014 रोजी घडली व तक्रारदारांकडे त्‍याची माहिती दि.17.10.2014 रोजी म्‍हणजे 6 दिवसांनी वि.प.यांना कळविलेली आहे. पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नुकसानीची बाब झालेचे तक्रारदारांनी वि.प.यांना लगेचच (immediate) कळविले.  त्‍यानंतर, वि.प.यांना सदरचे वाहनाची अपघात समयची परिस्थिती (Factual Position) समजणेकरीता सर्व्‍हेअरची नेमणे अडचणीचे झाले.  दि.17.10.2014 रोजी सदरची घटना माहित होताच सर्व्‍हेअर यांची नेमणूक केली.  तथापि तक्रारदारांनी आवश्‍यक ती कागदपत्रे सर्व्‍हेअर यांनी मागणी करुन देखील दिलेली नाही. तक्रारदार हे सर्व्‍हेअर यांचे अहवालानुसार, रक्‍कम रु.26,583/- पेक्षा जास्‍त मिळणेस पात्र नाहीत.  सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी. तक्रारदारांचेकडून रक्‍कम रु.25,000/- इतकी कॉस्‍ट वि.प.यांना मिळावी अशी वि.प.यांनी मंचात विनंती केलेली आहे.

 

6.    वि.प.यांनी दि.12.08.2016 रोजी सात कागदपत्रे दाखल केलेली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. वाहनाचे पॉलीसी शेडयुल, सदर पॉलीसीचे डॉक्‍युमेंट अटी व शर्ती, वाहनाचे केलेल्‍या सर्व्‍हेसंबंधीत प्रिलीमीनरी सर्व्‍हे. रिपोर्ट, अनुक्रमे दि.16.12.2014, दि.19.01.2015 व दि.29.01.2015 रोजी तक्रारदारास पाठविलेली पत्रे, दि.17.10.2014 रोजी तक्रारदाराने वि.प.कडे सादर केलेला क्‍लेमफॉर्म तसेच दि.27.06.2016 रोजी सर्व्‍हेअर प्रसाद वांझले यांचे पुराव्‍याचे शपथपत्र मंचात दाखल केलेले आहे.

 

7.    तक्रारदारांचा तक्रार अर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे व सोबत दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवादाचा विचार करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय      ?

होय

2

तक्रारदार हे वि.प.यांचेकडून नुकसानभरपाई रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

3

तक्रारदार हे वि.प.यांचेकडून मानसिक व शारिरीक नुकसानभरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

अंतिम आदेश काय ?

अंशत: मंजूर

कारणमिमांसा:-

8.  मुद्दा क्र.1:- तक्रारदारांनी वि.प.यांचेकडून व्‍यवसायाकरीता Swift/VD/Maruti SWIFT  VDI BSIV   MH-09-BX-281, इंजिन नं.1600379, चेसीस नं.686916 कार दि.26.04.2014 रोजी कारचा संपुर्ण इन्‍शुरन्‍स वि.प.यांचेकडे रक्‍कम रु.8,930/- इतकी रक्‍कम भरुन उतरविला होता.  पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदरची कार दि.13.10.2014 रोजी यरगट्टी, जि.बेळगांव येथे डिव्‍हायडर लागून नादुरुस्‍त झाली.  सदरची गाडी दुरूस्‍तीकरीता साई सर्व्‍हीस यांचेकडे रक्‍कम रु.1,25,229/- इतक्‍या रक्‍कमेस दुरुस्‍त केली.  तक्रारदारांनी सदरचे क्‍लेमची मागणी वि.प.यांचेकडे केली असता, वि.प.यांनी दि.04.12.2014 रोजी सदर गाडी दुरुस्‍तीसाठीची रक्‍कम रु.26,583/- इतकी रकमेचा क्‍लेम मंजूर केला.  वि.प.यांनी अपघात वाहनावर झालेला परिणाम हा तत्‍कालीन नसून अपघात होऊन देखील वाहन तसेच पुढे नेल्‍याने तक्रारदारांचे निष्‍काळजीपणामुळे चुकीमुळे झालेला असल्‍याने सदर नुकसानीस वि.प.कंपनी जबाबदार नाही. या कारणास्‍तव सदरची क्‍लेमची संपुर्ण रक्‍कम तक्रारदारास देणेस नकार दिला.  सबब, सदर कारणास्‍तव तक्रारदारांचे कलेमची उर्वरीत रक्‍कम नाकारुन वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्‍या अनुषगांने या मंचाने दाखल पॉलीसीप्रतचे अवलोकन केले असता, Vehicle IDV=3,19,629/-  इतकी आहे. तक्रारदारांनी सदर रक्‍कम रु.8,931/- इतका प्रिमीयम सदर वाहनापोटी भरलेचा दिसून येतो. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन दि.29.11.2014 रोजी वि.प.यांनी ई-मेल पाठवून गाडी दुरुस्‍तीपोटी रक्‍कम रु.19,100/- इतके मंजूर केलेचे दिसून येते.  तक्रारदारांनी सदरची रक्‍कम नाकारले असता, दि.04.12.2014 रोजी सदर वाहनाचे दुरुस्‍तीपोटी रक्‍कम रु.26,583/- मंजूर केलेचे दिसून येते.  यावरुन वि.प.यांना सदरचे वाहनाचा अपघात होऊन नुकसान झालेचे मान्‍य आहे हे स्‍पष्‍टपणे शाबीत होते. तथापि वि.प.यांनी त्‍याचे लेखी म्‍हणणेमध्‍ये कथन केलेप्रमाणे सर्व्‍हेअर यांचे अहवालानुसार व पॉलीसीतील अट क्र.4, क्‍लॉज नं.2, कलम-1 प्रमाणे सदर परिणामाप्रमाणे नुकसान भरपाई (Consequential Loss) करीता वि.प.जबाबदार नाहीत म्‍हणजेच वि.प.यांचे म्‍हणण्‍यानुसार, सदरचे तत्‍कालीन परिणाम नसून अपघात होऊनदेखील सदरचे वाहन तक्रारदारांनी निष्‍काळजीपणे पुढे चालवित नेल्‍यामुळे झालेला परिणाम आहे.  त्‍याअनुषंगाने, वि.प.यांनी सर्व्‍हेअर प्रसाद वांजले यांचे अॅफीडेव्‍हीट दाखल केले आहे.  सदर अॅफीडेव्‍हीटचे अवलोकन केले असता, During ko visits internal damage to engine due to dry run after fuel drain noticed. Assessment for the same is not given as it is a consequential loss. The Company shall not be liable to make any payment irrespective of consequential loss असे नमुद आहे. म्‍हणजेच केवळ सर्व्‍हेअर यांचे सांगणेवरुन वि.प.कंपनीने सदरचे परिणामाबाबतचे निष्‍कर्षास आलेचे दिसून येते. तथापि वि.प.यांनी कथन केलेप्रमाणे सदरचे सर्व्‍हेअर यांनी सदर वाहनाची घटना माहित होताच दि.17.10.2014 रोजी सर्व्‍हेअर यांची नेमणूक केलेली आहे.  सदरचा वाहनाचा अपघात दि.13.10.2014 रोजी झालेला असून सदरचा सर्व्‍हे. हा सदरचे घटनेनंतर तब्‍बल सहा दिवसांनी केलेला आहे.  यावरुन वि.प.विमा कंपनी यांचे म्हणणे हे वस्‍‍तुस्थिती सोडून व तर्कावर आधारीत असलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  तक्रारदारांचे अपघात समयी सदरचे वाहन रनिंगमध्‍ये असताना, ऑईलपाईप लिकेज झालेस इंजिन ऑर्इल निघून गेल्‍यावर कमी कालावधीत सदरचे वाहनाचे इंजिन जाम झालेचे लक्षात येते व पुढील परिणाम होऊ नयेत म्‍हणून गाडी थांबवणे हे तक्रारदार शक्‍य नव्‍हते.  सदरचे वाहन बंद पडल्‍यावर तक्रारदारांचे लक्षात आले.  तक्रारदारांचे शपथपत्रावरुन व दाखल कागदपत्रावरुन तक्रारदारांनी सदरचे वाहन बिघाड झाल्‍यावर हेतुपुरस्‍परपणे चालविलेचे दिसून येत नाही. त्‍याकारणाने, वि.प.यांचे म्‍हणणेनुसार, सदरचा परिणाम तत्‍कालीन असलेने होणा-या Consequential Loss हा तक्रारदारांचे निष्‍काळजीपणमुळे झालेला आहे हा निष्‍कर्ष केवळ सर्व्‍हेअर यांचेशी सदरचे अपघात झालेनंतर सहा दिवसांनी काढलेला आहे. सदरची निष्‍कर्ष वस्‍तुस्थिती (Factual Position) सोडून, तर्कावर काढलेचा शाबीत होतो. सबब, प्रस्‍तुत कामी हे मंच पुढील न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहे.

 

National Commission, New Delhi

 

Original Petition No.44/1992;  Pate no.333

 

M/s.Raj Kamal and Co.                                       …Appellants

 

Versus

 

United Insurance                                                 …Respondents 

 

Insurance claim-Repudiation-Complaint against-evidence of record revealing that repudiation of claims by Insurance Company was not at all justified-on receipt of report of the survey, it was for the Insurance Co. to examine the report and the document produced by the insured before the surveyor and then come to an independent finding of claims of insured were inflated or not-the insurance co. doesn’t  appear to have applied its mind- on facts produced there is no reason to doubt the figures given by the claimants in his claim-claims were unjustified rejected.

 

सबब, वरील सर्व कागदपत्रांचा मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयाचे या मंचाने सखोलतेने अवलोकन केले असता, वि.प.यांनी केवळ अपु-या कागदपत्रांवरुन सदर अपघाची वस्‍तुस्थिती (Factual Position) विचारात न घेता केवळ एकतर्फा निष्‍कर्षास येऊन तक्रारदारांचे क्‍लेमची उर्वरीत क्‍लेम नाकारून तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

9. मुद्दा क्र.2:-  उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत साई सर्व्‍हीस यांचेकडे सदरचे वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी झालेल्‍या खर्चाचे पावत्‍या/टॅक्‍स इनव्‍हॉईस (Tax Invoice)  दाखल केलेल्‍या आहेत. सदरच पावत्‍या वि.प.यांनी नाकारलेल्‍या नाहीत.  तथापि वि.प.सर्व्‍हेअर यांचे अहवालानुसार रक्‍कम रु.26,583/- इतकी रक्‍कम देणेस तयार आहेत.  त्‍या अनुषंगाने हे मंच प्रस्‍तुत न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहे.

 

 2009    ACJ  1729 (SC)

New India Insurance Co. Ltd.    …Appellants

Versus

Pradeep Kumar                             …Respondents

              Claim for damage to truck – Surveyor’s report – Truck fell into khud and was damaged –Owner of the truck filed claim duly supported by original vouchers, bills and receipts for the parts purchased and the labour charges paid for repairs-Insurance company appointed surveyor who estimated damages at Rs.63,771/- which was not accepted by the owner-Owner filed complaint and District Forum directed insurance company to pay Rs.1,58,409/- which was confirmed by State Commission and National Commission- Contention that loss assessed by approved surveyor is binding upon the insurance company and the insured-Held: no; it may be the basis or foundation for settlement of a claim; loss assessed by consumer fora affirmed.

सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.यांचेकडून सदरचे वाहन दुरूस्‍तीपोटीचा खर्च रक्‍कम रु.1,25,299/- व सदर रक्‍कमेवर तक्रार स्विकृत दि.03.02.2015 रोजीपासून सदरची रक्‍कम संपूर्ण मिळेपर्यंत द.सा.द.शे.9टक्‍के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

10. मुद्दा क्र.3:- उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील सविस्‍तर विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेमुळे तक्रारदार हे वि.प.यांचेकडून झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त)  व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रुपये तीन हजार फक्‍त) मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

11.  मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

 

आदेश

 

1     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2     वि.प.यांनी तक्रारदार यांना Swift/VD/MARUTI  SWIFT VDI BSIV, रजि.नं. MH-09-BX-281 वाहनाचे दुरुस्‍तीपोटी खर्च झालेली रक्‍कम रु.1,25,299/- (अक्षरी रक्‍कम रुपये चार हजार फक्‍त) अदा करावी. तसेच सदर रक्‍कमेवरती तक्रार स्विकृत दि.03.02.2015 रोजीपासून ते सदरची रक्‍कम संपूर्ण मिळेपर्यंत द.सा.द.शे.9टक्‍के प्रमाणे व्याज तक्रारदाराला वि.प.यांनी अदा करावे.

3     वि.प.यांनी तक्रारदारांना झाले मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.

4     वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प.कंपनीने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

5     विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.

6     आदेशाच्‍या सत्‍यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.