जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/286. प्रकरण दाखल तारीख - 29/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 04/08/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. बालाजी धोंडीबाराव केशटवार प्रो.प्रा.जनता प्रोव्हीजन वय 48 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा.शाहू नगर, नांदेड विरुध्द. 1. बजाज अलायंन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि., तर्फे वीभागीय व्यवस्थापक, रजिस्टर्ड हेड ऑफीस एअरपोर्ट रोड, एरवडा, पुणे. गैरअर्जदार 2. बजाज अलायंन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि., तर्फे वीभागीय व्यवस्थापक, दूसरा माळा, कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.दागडीया एस.के. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.जी.एस.औढेंकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार बजाज अलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल त्यांनी नूकसान भरपाईची रक्कम रु.2,81,881/- व त्याचे वर 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- दिले नाहीत म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे जनला प्रोव्हीजन या दूकानाचे मालक आहेत. सदरील दूकानामध्ये सर्व प्रकारचे किराणा, जनरल व काही कटलरी साहित्य व सर्व प्रकारचे तेल खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. दूकानात चांगल्या प्रतीचे फर्निचर व दूकानामध्ये एक फ्रिज, वजन माप सूध्दा होते. अशा 10 x 10 च्या दूकानात अर्जदाराने भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेकडून रु.2,00,000/-चे कॅश क्रेडीट घेऊन माल भरला होता. त्यासाठी ते दर महिन्याचे पहिल्या आठवडयात दूकानाचा स्टॉक स्टेटमेंट बँकेत देत असत. मार्च व एप्रिल महिना हा लग्नसराईचा असल्याकारणाने दूकानात जवळपास साडेतीन ते चार लाखाचा माल स्टॉक होता. मार्च महिन्यात जे बँकेत स्टेटमेंट दिले त्याप्रमाणे रु.4,50,000/- चा स्टॉक दूकानात होता. वर्ष 2006-07 मध्हये रु.80,000/- चे फर्निचर घेतले. दूकान व्यवस्थीत चालू असताना त्यांचे सूरक्षेसाठी गैरअर्जदार यांचेकडून पॉलिसी घेतली होती. दि.13.04.2009 रोजी राञी अंदाजे 12 ते 12.30 वाजताचे सूमारास अर्जदाराचे दूकानास आग लागली हे कळाल्या बरोबर अर्जदार तिकडे धावले व पाहिले असता दूकानात धूर जमा झाला होता. शेजा-याचे मदतीने पाण्याने आग विझवण्यात आली. शटर काढल्यानंतर दूकानाची पाहणी केली असता दूकानातील सर्व माल जळून खाक झाला होता व फ्रिज व फर्निचरही जळाले होते. दूकानातील आग विझविण्यासाठी पाणी टाकल्याने दुकानातील अर्धवट जळालेला शिल्लक माल पाण्यामध्ये भिजून खराब झाला होता. सदरच्या घटनेची सूचना विमा कंपनीस दिल्यावर सर्व्हेअर श्री. तोतला यांनी दि.14.04.2009 रोजी दूकानाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना दूकानाचे स्टॉक स्टेटमेंट,ट्रेडींग खाते, नफा व तोटा पञक देण्यात आले. अर्जदारास रु.1,40,950/- चे नूकसान झाले. सर्व्हे रिपोर्ट मागणी करुन अर्जदारास देण्यात आले नाही. सर्व्हेअरच्या खोटया रिपोर्ट वरुन गैरअर्जदाराने अर्जदाराने घेतलेल्या कर्जासाठी नुकसान भरपाई रु.7500/- बँकेच्या कर्ज खात्यात जमा केले ही रक्कम अर्जदाराने अंडर प्रोटेस्ट म्हणून स्विकारले आहे या बाबत गैरअर्जदार यांनी दि.14.09.2009 रोजी पञ दिले आहे. अ) आगीत झालेल्या मालाचे रु.1,00,731/- ब) फर्निचरचे नुकसान रु.1,40,950/- क) इलेक्ट्रीक वायरींगचे नूकसान रु. 10,000/- ------------------ एकूण रक्कम रु.2,51,681/- ------------------- दि.14.04.2009 पासून दि.14.12.2009 पर्यत 18 टक्के दराने व्याजाची रक्कम रु.30,200/- --------------------- एकूण रक्कम रु.2,81,881/- -------------------- असे वरील प्रमाणे नूकसान झाल्याचे दर्शविले आहे. तेव्हा ती रक्कम मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा तक्रार अर्ज हा खोटा आहे. दि.29.06.2009 रोजी अर्जदाराने क्लेम डिसचार्ज व्हायचर सही करुन दिले व त्यांने रु.7500/- ही रक्कम फूल अन्ड फायनल सेंटलमेंट म्हणून स्विकारली आहे. त्यामूळे आता परत त्यांना आणखी रक्कम किंवा जास्तीचे नूकसान झाले असे म्हणता येणार नाही. स्टॉक स्टेटमेंट बददल गैरअर्जदार यांना कल्पना नाही. अर्जदाराची शॉप किपर पॅकेज पॉलिसी गैरअर्जदारास मान्य आहे. त्याबददल वाद नाही. सर्व्हेअरने त्यांचे रिपोर्टमध्ये फर्निचर डॅमेजेस झाले नाही. स्टॉक रु.1,00,731/- एवढे नूकसान झालेले नाही. इलेक्ट्रीकल मेटरियल डॅमेज झाले नाही. अर्जदाराने जे स्टॉक स्टेटमेंट आगीचे आधी दिलेले आहे ते रु.2,01,524/- चे असून त्यानंतर निव्वळ नूकसान जे झालेले आहे ते वजा जाता रु.1,00,731/- असे दाखवलेले आहे. एव्हरेज स्टॉक काढले असता तो रु.4,65,955/- चा येतो. पंरतु नक्की स्टॉक रु.1,90,000/- चाच होता. जो की, अंदाजे जे स्टॉक स्टेटमेंट दिलेले आहे त्यांचेशी जूळते त्यामूळे अर्जदार हा स्वच्छ हाताने समोर आलेला नाही. सर्व पाहून रु.18,836/- चा लॉस असेस केलेला आहे. त्यामूळे सेवेत त्यांनी कोणतीही ञूटी केलेली नाही. यामध्ये सेवेतील ञूटी नाही. यास आधार म्हणून Ravneet Singh Bagga Vs KLM Royal Dutch Airlines (2000) 1 SCC 66 चा आधार घेतलेला आहे. अर्जदाराचा दावा खोटा असून तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांचे दूकानास दि.13.04.2009 रोजी आग लागली त्यांची सूचना गैरअर्जदार यांना दिल्यानंतर दि.14.04.2009 रोजी अर्जदाराच्या किराणा दूकानाला शॉर्ट सर्कीट मूळे आग लागली त्यामूळे दूकानातील सर्व मालाचे व इतर असे एकूण रु.1,00,000/- चे नूकसान झाले असा पोलिस पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराचे पॉलिसी नंबर 0G-09-2007-4092-00001507 ही शॉप किपर पॅकेज पॉलिसी तक्रार अर्जासोबत दाखल केलेली आहे. अर्जदाराचे एकंदर कथन व तक्रार पाहिल्यानंतर दूकानामध्ये निश्चितच जास्त माल होता व त्यांचे नूकसान ही जवळपास रु.1,00,000/- चे झालेले आहे. गैरअर्जदाराने देखील आपले म्हणण्यात रु.2,01,524/- चा स्टॉक गृहीत धरुन त्यावर जो लॉस असेस केला तो रु.1,00,731/- चे असणार आहे. नक्की जो स्टॉक होता तो गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे रु.1,90,000/- चा होता. थोडयावेळा साठी हाच आकडा गृहीत धरुन यावर यातील काही माल शिल्लक असेल व पाण्याने भिजून गेला असला तरी अर्जदारांचे तक्रारीप्रमाणे रु.1,00,000/- चे आजपास नूकसान सहज होऊ शकते. याबददल अर्जदाराने आपल्या क्लेम फॉर्म मध्ये रु.1,25,000/- चे नूकसान मागितले आहे. अर्जदाराने सन 2009 च्या दरम्यान त्यांचे दूकानासाठी काय काय खरेदी केले त्यांचे बरेचशे बिल या तक्रारीसोबत जोडलेले आहे.बँकेचे स्टॉक स्टेटमेंट आहे यावरुन व भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे व्यवस्थापक श्री.श्रीपाद श्रीकृष्ण सबनीस यांनी शपथपञावर आग लागल्याचे म्हटले, त्यादिवशी दूकानास भेट दिली त्यावेळी दूकानातील माल हा रु.4,00,000/- चा आहे अशी साक्ष शपथपञाद्वारे दिलेली आहे. यांचे सपोर्ट मध्ये मनोहर रामराव लोहकरे तसेच अर्जून शिवंलिग लाला यांनी देखील शपथपञाद्वारे सदरील दूकानास आग लागून त्यांचे जवळपास रु.2,50,000/- ते रु.3,00,000/- चे नूकसान झाल्याचे आपल्या साक्षीत म्हटले आहे. यात त्यांनी असेंसमेट ऑफ लॉस दाखवलेले आहे. याप्रमाणे रु.18,386/- लॉस गृहीत धरलेला आहे यातून साल्व्हेज रु.886/- कमी केले असता रु.17500/- नूकसान झाल्याचे म्हटले आहे व यातून पॉलिसी एक्सेस रु.10,000/- कमी करुन गैरअर्जदार यांची जबाबदारी रु.7500/- फिक्स केली आहे. ही रक्कम अर्जदाराने दि.29.06.2009 रोजी रशिद पावती वर सही करुन फूल अन्ड फायनल सेंटलमेंट म्हणून स्विकारली आहे. यावर भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचा सही व शिक्का आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, मजबूरीने ही रक्कम स्विकारली परंतु असा कोणताही पूरावा त्यांनी समोर आणलेला नाही. एक तर गैरअर्जदार यांचे नांवाने लिहीलेले आहे. ते पञ दि.14.09.2008 रोजी लिहीलेले आहे ते यू.पी.सी. ने पाठविल्याचे म्हटले आहे. पण नूसते पञ पाठवून यांचा त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे काय पाठपूरावा केला यांचा कोणताही पूरावा उपलब्ध नाही. मंचामध्ये तक्रार देखील त्यांनी जवळपास घटना घडल्यानंतर दि.29.12.2009 रोजी दाखल केलेली आहे. म्हणजे घटने पासून जवळपास सहा महिन्यानंतर तक्रार दाखल केली आहे. अंडर प्रोटेस्ट जर रक्कम जर स्विकारली असेल तर ते एवढे दिवस ते का थांबले ? शिवाय रु.7500/- ची रक्कम ही अशी मोठी रक्कम होती की ती मजबूरीने अर्जदार यांना स्विकारावी लागली. एवढी छोटी रक्कम मजबूरीने स्विकारली असे वाटत नाही. ही रक्कम देखील स्विकारण्यासाठी व त्यांचा क्लेम सेंटल करण्यासाठी अर्जदाराने पाठपूरावा केलेला नसून गैरअर्जदाराने त्यांना वारंवार स्मरणपञ पाठविले ते दि.06.05.2009, 16.05.2009 हे गैरअर्जदाराने दाखल केले आहे. अर्जदाराकडून काही तर मोठी चूक झाली हे योग्य जरी असले तरी गैरअर्जदाराकडून एकदा फूल अन्ड फायनल सेंटलमेंट म्हणून स्वीकारले असताना आता त्यांनी परत रक्कम मागण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे. परंतु अर्जदार यांनी विमा कंपनीस विनंती करुन पुर्नविचार करणेसाठी अर्ज द्यावा. यावर I (2008)CPJ 487 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi,, National Insurance Co. Ltd.Vs. Vasavi Traders याप्रमाणे फुल अन्ड फायनल सेंटलमेंट कारण फायर अक्सींडेंट, यात अर्जदाराला सेंटलमेंट व्हायचर वर सही करण्यास मजबूर केले होते व आर्थिक परिस्थितीमूळे ते स्विकारले यामूळे जी रक्कम विमा कंपनीने दिली त्यानंतर फरकाची रक्कम देण्याची सूचना करण्यात आलेली आहे. परंतु या प्रकरणात रु.7500/- ही रक्कम मजबूरीने स्विकारल्या सारखी नव्हती म्हणून ती अंतीम समजण्यात येते. याद्वारे गैरअर्जदाराने सेवेत ञूटी केली असे सिध्द होत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांना आपआपला खर्च सोसावा. 3. उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |