Maharashtra

Akola

CC/15/65

Rukmabai Sunil Pachpor - Complainant(s)

Versus

Bajaj Alliance Life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

R L Rathi

13 Aug 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/65
 
1. Rukmabai Sunil Pachpor
R/o.Mandaka Tq. Post.Gondhanpur Khamgaon
Buldhana
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Alliance Life Insurance Co.Ltd.
through Divisional Manager,ist floor,In front of National seeds Corp.Birla Rd.Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श प त्र  :::

मा. अध्‍यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-

       तक्रारकर्तीने दाखल केलेला, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये तक्रार दाखल करण्‍यास झालेला उशीर माफ होवून मिळणेबाबतच्‍या अर्जावर आदेश.

     तक्रारकर्तीने सदर अर्ज दाखल केल्‍यावर विरुध्‍दपक्षाला नोटीस पाठवून त्‍यांचे या अर्जावर निवेदन प्राप्‍त करुन घेतले.  विरुध्‍दपक्षाने या अर्जावर युक्‍तीवाद केला.  परंतु, तक्रारकर्तीने संधी देऊनही या अर्जावर कोणताही युक्‍तीवाद मंचासमोर केला नाही, त्‍यामुळे दाखल दस्‍तांवरुन मंचाने हा निर्णय पारीत केला आहे. 

      या प्रकरणात दाखल दस्‍तांवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्तीच्‍या मयत पतीची पॉलीसी विरुध्‍दपक्षाकडे काढलेली होती.  तक्रारकर्तीचे पती श्री. सुनिल श्रीकृष्‍ण पाचपोर यांचा रस्‍ता अपघातात दिनांक 17-02-2012 रोजी मृत्‍यू झाला होता.  तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाकडे सदर पॉलीसीपोटी अपघाती मृत्‍य लाभ ( Accidental Death Benefit ) मिळण्‍याकरिता विमा दावा दाखल केला असता, विरुध्‍दपक्षाने दिनांक 29-03-2012 रोजी तक्रारकर्तीस पत्र देवून असे कळविले होते की, त्‍यांनी सदर पॉलीसीची रक्‍कम रुपये 1,78,542.45 पैसे ईतकी तक्रारकर्तीच्‍या पंजाब नॅशनल बँकेतील खात्‍यात जमा केली आहे व अपघाती मृत्‍यू लाभाची रक्‍कम, तक्रारकर्तीने मयत पतीचे वाहन चालविण्‍याचा परवाना ( Driving License ) दाखल न केल्‍यामुळे नामंजूर करण्‍यात आली, त्‍यामुळे हे प्रकरण दाखल करण्‍यास कारण हे दिनांक 29-03-2012 रोजी उदभवले होते.  परंतु, तक्रारकर्तीने सदर प्रकरण मंचात दिनांक 13-02-2015 रोजी दाखल करुन, झालेला उशीर माफ होणेबद्दलचा अर्ज केला.  परंतु, सदर विलंब का झाला? याबद्दलचे स्‍पष्‍टीकरण कागदोपत्री पुराव्‍याद्वारे मंचात दाखल केले नाही.  प्रत्‍येक दिवसाच्‍या विलंबाबद्दल योग्‍य ते स्‍पष्‍टीकरण अर्जात नमूद नाही.  त्‍यामुळे ईतका विलंब/उशीर योग्‍य त्‍या पुराव्‍याशिवाय माफ करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.  सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.

अं ति म   आ दे श

  1. तकारकर्तीचा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये तक्रार दाखल करण्‍यास झालेला उशीर माफ होऊन मिळणेबाबतचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो. सबब, तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

  2. न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित नाही.

  3. उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.