Maharashtra

Dhule

CC/12/193

Smt.Pramilabai Ashok Patil - Complainant(s)

Versus

Bajaj Aliyanz genral Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Shri Dipak Joshi

22 May 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/12/193
 
1. Smt.Pramilabai Ashok Patil
R/o Shindkheda,
Dhule
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Aliyanz genral Insurance Co.Ltd.
2nd floor,Shri Ganesh Plaza Kute marg,Near Sandip Hotel,Mumbai naka,Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे     

 

 मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी

 मा.सदस्‍य –  श्री.एस.एस.जोशी

                                        ग्राहक तक्रार क्रमांक  –  १९३/२०१२

                              तक्रार दाखल दिनांक   – ३१/१०/२०१२

                              तक्रार निकाली दिनांक –  २२/०५/२०१४

 

श्रीमती प्रमिलाबाई अशोक पाटील              - तक्रारदार

उ.व.४५ धंदा-घरकाम,राहणार-गव्‍हाणे.

तालुका-शिंदखेडा,जि.धुळे.

       विरुध्‍द

बजाज अलीयांझ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.   - सामनेवाले

दुसरा मजला,श्री.गणेश प्‍लाझा,कुटे मार्ग,

मुंबर्इ नाका,संदीप हॉटेल जवळ,नासिक,

तालुका व जिल्‍हा-नासिक.

 

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षा - सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

 (मा.सदस्‍य - श्री.एस.एस.जोशी)

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी)

(सामनेवाले तर्फे – वकील श्री.डी.एन.पिंगळे)

निकालपत्र

(द्वारा- मा.सदस्‍य - श्री.एस.एस.जोशी)

 

(१)       सामनेवाले यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली, अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला म्‍हणून तक्रारदार यांनी सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.

 

(२)       तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांच्‍या मालकीचा आयशर कंपनीची ट्रक आहे.  त्‍याचा क्रमांक एम.एच.१८-एए-१७०८ असा आहे.  या ट्रकची तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून कॉम्‍प्रेहेन्‍सीव्‍ह विमा पॉलिसी घेतली होती.  त्‍याची मुदत दि.१९-११-२०११ ते दि.१८-११-२०१२ अशी होती.  दि.०६-०२-२०१२ रोजी रात्री ०९-३० चे सुमारास या ट्रकचा प्रकाशा येथून शहाद्याकडे येत असतांना अपघात झाला.  ट्रकची समोरुन येणा-या ट्रॅक्‍टरशी धडक झाली.  त्‍यात ट्रकचे मोठे नुकसान झाले.  या ट्रकच्‍या दुरुस्‍तीसाठी रु.३,६९,६७२/- एवढा खर्च आला.  सामनेवाले यांच्‍याकडून वरील रकमेचा दावा मंजूर व्‍हावा यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे दावा दाखल केला.  तथापि दि.२७-०३-२०१२ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कागदपत्रांची पुर्तता केली नाही या कारणावरुन नो क्‍लेम म्‍हणून फाईल बंद करीत असल्‍याचे कळविले.  तक्रारदार यांनी दि.१२-०५-२०१२ रोजी सामनेवाले यांना पुन्‍हा पत्र पाठवून दावा मंजूर करण्‍याची विनंती केली. त्‍यावर सामनेवाले यांनी      दि.१६-०५-२०१२ रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून अपघाताच्‍या वेळी चालकाचा वाहन परवाना वैध नव्‍हता हे कारण दाखवून दावा नामंजूर करीत असल्‍याचे कळविले.  सामनेवाले यांची ही कृती अनुचित व्‍यापारी प्रथेची असून त्‍यांनी सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे, असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे.   सामनेवाले यांच्‍या विरुध्‍दची तक्रार मंजूर करावी आणि दाव्‍याची रक्‍कम रु.३,६९,६७२/- त्‍यावर दि.०६-०२-२०११ पासून द.सा.द.शे.१२ टक्‍के व्‍याज, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी रु.५०,०००/- आणि तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेश करावेत अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

 

(३)       तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ विमा पॉलिसीची प्रत, आरोपपत्राची प्रत, सिध्‍दी मोटर्स इंडिया लिमिटेड यांचे बिल, सामनेवाले यांचे पत्र या कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत.

   

(४)       सामनेवाले यांनी मंचात हजर होऊन आपला खुलासा दाखल केला.  त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे की, विमा पॉलिसी हा एक करार असतो.  हा करार दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक असतो.  त्‍यातील अटी व शर्ती दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक आहेत.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कसूर केलेली नाही.  त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी या तक्रारीस लागू होत नाहीत.  दि.०६-०२-२०१२ रोजी तक्रारदार यांच्‍या वाहनाला अपघात झाला.  त्‍यावेळी पोलीस ठाण्‍यात योगेश अशोक बोरसे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  फिर्यादीनुसार अपघाताच्‍या दिवशी योगेश अशोक बोरसे हेच वाहन चालवित होते.  घटनास्‍थळाच्‍या पंचनाम्‍यातही तेच वाहन चालवित असल्‍याचा उल्‍लेख आहे.  अपघात झाला त्‍यादिवशी योगेश अशोक बोरसे यांच्‍याकडील वाहन चालविण्‍याचा परवाना वैध नव्‍हता.  तो मुदतबाहय होता.  तक्रारदार यांनी विमा दावा मिळविण्‍यासाठी, योगेश यांच्‍याकडे वैध्‍ परवाना होता व तेच सदर वाहनाचे  चालक असल्‍याचे दाखविले आहे.  तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्‍या दोषारोप अहवालातही तसेच दिसते. वाहनाची नुकसान भरपाई मिळविण्‍यासाठी तक्रारदार हे खोटी माहिती देऊन  सरकारची व न्‍यायालयाची दिशाभूल करीत आहेत.  श्री.विक्रम पाटील यांनी अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे केला आहे.  त्‍यात त्‍यांनी वाहन चालकाकडे वैध परवाना नव्‍हता हे नमूद केले आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

 

(५)        सामनेवाले यांनी आपल्‍या खुलाशासोबत निरज दिलीप शिवणगीकर यांचे प्रतिज्ञापत्र, सर्व्‍हे रिपोर्ट, पॉलिसीची प्रत, योगेश अशोक बोरसे यांचा वाहन परवाना, योगेश अशोक बोरसे यांचे दुखापती प्रमाणपत्र, योगेश अशोक बोरसे यांचा जबाब, घटनास्‍थळ पंचनामा, फिर्यादीची प्रत आदी कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत. 

 

(६)       तक्रारदार यांची तक्रार त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि उभयपक्षांच्‍या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकला असता आमच्‍यासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांची उत्‍तरेही आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

 

मुद्देः

 निष्‍कर्षः

(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत

    काय ?                                                

 

: होय.

(ब) सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्‍यात

    कसूर केली आहे काय ?

 

: नाही.

(क) आदेश काय ?

: अंतिम आदेशा प्रमाणे

 

विवेचन

 

(७)       मुद्दा क्र. ‘‘अ’’   तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या वाहनाची सामनेवाले यांच्‍याकडून विमा पॉलिसी घेतली आहे.  ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही.  सामनेवाले यांना ही बाब कबूल आहे.  त्‍यांच्‍या खुलाशातही त्‍यांनी त्‍या बाबत उल्‍लेख केला आहे.  यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.  म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

(८)       मुद्दा क्र. ‘‘ब’’ अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा दावा नाकारुन सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे अशी तक्रारदार यांची मुख्‍य तक्रार आहे.  तक्रारदार यांच्‍या कथनानुसार दि.०६-०२-२०१२ रोजी त्‍यांच्‍या आयशर वाहनाला प्रकाशा ते शहादा या रस्‍त्‍यावर अपघात झाला.  त्‍यानंतर त्‍यांनी सामनेवाले यांच्‍याकडे रु.३,६९,६७२/-एवढया रकमेचा विमा दावा सादर केला.  सामनेवाले यांनी    दि.१६-०५-२०१२ रोजी तक्रारदार यांना विमा दावा नाकारत असल्‍याचे कळविले.

          तक्रारदार यांनी तक्रारीसोबत न्‍यायालयाचे दोषारोपपत्र व अंतिम अहवाल सादर केला आहे.  त्‍यात आरोपी म्‍हणून धिरेंद्र भास्‍कर देवरे रा.भोणगाव ता.साक्री,जि.धुळे यांचे नांव देण्‍यात आले आहे.  धिरेंद्र भास्‍कर देवरे हाच अपघात झाला त्‍या दिवशी तक्रारदार यांचे वाहन चालवित होता असे अंतिम अहवालात व दोषारोपपत्रात नमूद करण्‍यात आले आहे.  याचा आधार घेवून अपघात झाला त्‍या दिवशी धिरेंद्र भास्‍कर देवरे हाच वाहन चालवित होता आणि त्‍याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा अधिकृत वैध परवाना होता असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे.

          सामनेवाले यांनी आपल्‍या खुलाशात म्‍हटले आहे की, अपघात झाला त्‍या दिवशी धिरेंद्र भास्‍कर देवरे हा नव्‍हे तर योगेश अशोक बोरसे हा सदर वाहन चालवित होता.  योगेश बोरसे याच्‍याकडे त्‍या दिवशी म्‍हणजे   दि.०६-०२-२०१२ रोजी वाहनपरवाना अवैध होता.  योगेश बोरसे याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना होता पण त्‍याची मुदत संपलेली होती.   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत धिरेंद्र भास्‍कर देवरे हा सदर वाहन चालवित होता असा उल्‍लेख केला आहे.  तक्रारदार यांनी विमा दावा मिळविण्‍यासाठी पॉलिसीतील नियम व अटींचा भंग केला असून मंचासमोर खोटी माहिती दिली आहे.

          वाहन चालकाच्‍या परवान्‍यासंदर्भात पॉलिसीच्‍या अटी व शर्ती सामनेवाले यांनी दाखल केल्‍या आहेत.  त्‍यात म्‍हटले आहे की,

 

          ‘Any person including the insured provided that a person driving holds an  effective driving license at the time of accident and is not disqualified from holding or obtaining such a license.  Provided also that the person holding an effective learner’s license may also drive the vehicle and that such a person satisfies the requirement of Rule 3 of the Central Motor Vehicle Rules 1989.  (which prohibits him from driving any motor vehicle unless he has besides him a person duly licensed to drive the vehicle and in every case, the vehicle carries ‘L’ plates both in the front and in the rear of the vehicle’)

 

          सामनेवाले यांनी खुलाशासोबत योगेश अशोक बोरसे याच्‍या वाहन परवान्‍याची छायांकीत प्रत दाखल केली आहे.   त्‍यात त्‍याच्‍या वाहन परवान्‍याची मुदत (ट्रान्‍सपोर्टसाठी ) दि.१०-०७-२०१० अशी देण्‍यात आली आहे.  हा परवाना त्‍याला दि.११-०७-२००७ रोजी देण्‍यात आल्‍याची नोंदही परवान्‍यावर आहे.

          सामनेवाले यांनी योगेश अशोक बोरसे याने पंचनाम्‍यावेळी पोलिसांसमोर दिलेल्‍या जबाबाची छायांकीत प्रतही दाखल केली आहे.  या जबाबात अशोक याने म्‍हटले आहे की, “आज दि.०६-०२-२०१२ रोजी मी माझ्या वरील आयशर गाडीत शिरपूर येथून कापूस भरुन तो शहादा-प्रकाशा मार्गे गुजरात राज्‍यातील कढी येथे विकण्‍यासाठी स्‍वत: वाहन चालवून एकटाच घेवून जात असता व मी माझी गाडी चालवित लांबोळा गावाचे पश्चिमेस सुमारे अर्धा किमी अंतरावर रात्री ०९.३० वाजता आलो असता समोर शहादाकडे एक उसाने भरलेले ट्रॅक्‍टर येतांना दिसले.... ”

          सामनेवाले यांनी खुलाशासोबत घटनास्‍थळाचे दोन पंचनामे दाखल केले आहेत. दोन्‍ही पंचनाम्‍यावर दि.०६-०२-२०१२ अशी तारीख आहे.  एका पंचनाम्‍यात “सदर अपघातात आयशर गाडीमधील योगेश अशोक बोरसे यांच्‍या उजव्‍या हाताचे व उजव्‍या पायाचे हाड मोडले असून .....”  असा उल्‍लेख आहे तर, दुस-या पंचनाम्‍यात “प्रकाशाकडे येणारी आयशर गाडी क्रमांक एच.एम.१८-एए-१७०८ ही समोरुन ठोस मारुन अपघात केला.  सदर अपघातात वरील आयशर गाडी रोडचे दक्षीणेस पलटी झाली.  तसेच तिचेवरील ड्रायव्‍हर योगेश अशोक बोरसे याचे उजवे हातास व उजव्‍या पायास मार लागून हाड मोडले गेले.....”  असा उल्‍लेख आहे.

          सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या वरील कागदपत्रांवरुन अपघात घडला त्‍या दिवशी म्‍हणजे दि.०६-०२-२०१२ रोजी योगेश अशोक बोरसे हाच सदर ट्रक चालवित होता हे दिसून येते.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍्याकडे विमा दावा मिळविण्‍यासाठी इतर कागदपत्रांसोबत वाहन चालकाचा वाहन परवान्‍याची प्रत दाखल केली.  ती प्रतही योगेश अशोक बोरसे याच्‍याच नावाची असल्‍याचे दिसून येते.  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत सामनेवाले यांचे       दि.१६-०५-२०१२ रोजीचे पत्र दाखल केले आहे.  या पत्रानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍याकडे दावा अर्ज, पोलीस ठाण्‍यात दाखल केलेला एफआयआर आणि आरोपपत्राची प्रत, जखमींबाबतची माहिती, धिरेंद्र भास्‍कर देवरे याच्‍या दुखापती बाबतची माहिती, तिस-या पक्षातील जखमी आणि नुकसानीची माहिती मागितली होती.   ही माहिती दिली नाही म्‍हणून सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा दावा नाकारला होता.  ही माहिती सामनेवाले यांना पुरविली किंवा नाही या बाबत तक्रारदार यांनी तक्रारीसोबत किंवा नंतर कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.

          सदर अपघाताच्‍या घटनेबाबत न्‍यायालयात अंतिम अहवाल आणि दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आले आहे.  त्‍यातीलच माहिती अंतिम आणि सत्‍य असल्‍याचे कथन तक्रारदार यांच्‍या वकिलांनी आपल्‍या युक्तिवादात केले.  तथापि या अहवालातील आरोपी आणि तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर वाहनाचा चालक धिरेंद्र भास्‍कर देवरे हाच अपघात झाला त्‍या दिवशी सदर वाहन चालवित होता या बाबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी सादर केलेला नाही.  धिरेंद्र भास्‍कर देवरे  याच्‍या वाहन परवान्‍याची प्रत विमा दाव्‍यासोबत सादर करण्‍यात आली होती, हेही तक्रारदार यांनी सिध्‍द केलेले नाही.

          वरील विवेचनाचा विचार करता आणि तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे निरीक्षण करता दि.०६-०२-२०१२ रोजी तक्रारदार यांच्‍या वाहनाला अपघात झाल्‍यानंतर आणि त्‍यानंतर लगेच त्‍यांनी सामनेवाले यांना माहिती दिल्‍यानंतर सामनेवाले यांनी दि.२७-०३-२०१२ रोजी तक्रारदार यांना नो क्‍लेम म्‍हणून फाईल बंद करीत असल्‍याचे कळविले.    दि.१२-०५-२०१२ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे पुन्‍हा विनंती केल्‍यानंतर दि.१६-०५-२०१२ रोजी सामनेवाले यांनी अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या चालकाकडील वाहन परवाना वैध नव्‍हता असे कारण देऊन विमा दावा नाकारत असल्‍याचे कळविले.  यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्‍यांच्‍या दाव्‍याचा निर्णय कळविण्‍यास कोण्‍ताही विलंब केल्‍याचे दिसत नाही.  दि.०६-०२-२०१२ रोजी अपघात झाल्‍यानंतर दि.२७-०३-२०१२ रोजी म्‍हणजे सुमारे ४० दिवसातच तक्रारदार यांना त्‍यांच्‍या दाव्‍याबाबतचा निर्णय कळविण्‍यात आला होता.     दि.१२-०५-२०१२ रोजी तक्रारदार यांनी पुन्‍हा विनंती केल्‍यावरुन दि.१६-०५-२०१२ रोजी म्‍हणजे अवघ्‍या चार दिवसात त्‍यांना दावा नाकारत असल्‍याचा निर्णय कळविण्‍यात आला होता.  वरील सर्व मुद्यांचा सारासार विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी केली हे सिध्‍द होत नाही.  म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.

 

(९)       उपरोक्‍त सर्व विवेचनाचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली हे सिध्‍द होत नाही.  म्‍हणून न्‍यायाचे दृष्‍टीने आम्‍ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

   

आदेश

 (१)  तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.

 (२)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.

 

 

धुळे.

दिनांक : २२-०५-२०१४           

 

 

             (श्री.एस.एस.जोशी)            (सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

                  सदस्‍य              अध्‍यक्षा

                 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.