Maharashtra

Solapur

CC/11/373

Mangala Narayan vaghamode - Complainant(s)

Versus

Bajaj Aliyans Janaral Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

23 Sep 2013

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
 
Complaint Case No. CC/11/373
 
1. Mangala Narayan vaghamode
R/o Kadalas Tal. Sangola
Solapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Aliyans Janaral Insurance Co. Ltd
E.plaza Airport road yaravada pune
pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 


 

ग्राहक तक्रार क्रमांक : 373/2011.

तक्रार दाखल दिनांक : 23/06/2011.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 23/09/2013.                                निकाल कालावधी: 02 वर्षे 03 महिने 01 दिवस   

 

 


 

सौ. मंगल नारायण वाघमोडे, वय 45 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार

व शेती, रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर.                तक्रारदार  

                   विरुध्‍द                          

 

(1) बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

    रजिस्‍टर्ड ऑफीस : जी.इ. प्‍लाझा, एअरपोर्ट रोड,

    येरवडा, पुणे 411 006.

(2) बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि.,

    पुणे रिजनल ऑफीस, वर्धमान, चवथा माळा,

    सेव्‍हन लव्‍ह्ज् चौक, शंकरशेठ रोड, पुणे 411 042.

(3) बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

    सिटी प्राईड, दुसरा माळा, ऑफीस नं. 488, सिटी

    हॉस्पिटलजवळ, जुना एम्‍प्‍लॉयमेंट चौक, 162,

    रेल्‍वे लाईन, सोलापूर.                                       विरुध्‍द पक्ष

 

                        गणपुर्ती  :-   श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष

                        सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  ए.बी. गव्‍हाणे

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्‍ही.आर. राव

 

आदेश

 

श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांच्‍या ऑईल मीलच्‍या व्‍यवसायासाठी सन 2005 मध्ये महिंद्रा स्‍कॉर्पिओ एस.एल.एक्‍स. टर्बो (संक्षीप्‍त रुपामध्‍ये जीप) खरेदी केलेली होती आणि त्‍या जीपचा रजि. नं. एम.एच.45/ए.7774 आहे. त्‍या जीपचा विरुध्‍द पक्ष (संक्षीप्‍त रुपामध्‍ये विमा कंपनी) यांच्‍याकडे दि.30/10/2010 ते 29/10/2011 कालावधीकरिता विमा उतरविला होता. दि.18/3/2011 रोजी तक्रारदार यांचा मुलगा प्रशांत हा कडलास गावाकडे जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्‍यामुळे जीप रस्‍त्‍याच्‍या खाली गेली आणि त्‍यावेळी जीपचे चेसी क्रॅक होऊन अॅक्‍सल तुटला. तक्रारदार यांच्‍या जीपचे नुकसान झाले आणि त्‍यांनी सांगोला पोलीस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद दिल्‍यानंतर डायरी नं. 78/2011 व नोंद क्र.20/11 करण्‍यात आली. तक्रारदार यांच्‍या जीपचे रु.84,732/- चे नुकसान झाल्‍यामुळे विमा दावा दाखल केला असता दि.2/5/2011 रोजी खोटया कारणाद्वारे तो नामंजूर करण्‍यात आला. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विमा कंपनीकडून रु.84,732/- विमा रक्‍कम मिळावी, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    विमा कंपनीने अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यांनी तक्रारीतील मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारदार यांना जीप क्र.एम.एच.45/ ए.7774 करिता दि.30/10/2010 ते 29/10/2011 कालावधीकरिता पॉलिसी क्र.ओ.जी.-11-2004-1801-00001278 विशिष्‍ट अटी व शर्तीस अधीन राहून निर्गमित केली होती. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झाल्‍यास विमा कंपनी विमा नुकसान भरपाई देण्‍याकरिता जबाबदार नाही. तक्रारदार यांच्‍या अपघाताबाबत सूचनेनंतर श्री. प्रशांत एम. नझरे यांनी प्राथमिक सर्व्‍हे करुन पॉलिसी अटी व शर्तीप्रमाणे नुकसानीकरिता रु.2,570/- चे मुल्‍यनिर्धारण केले आहे. त्‍यांच्‍या अहवालाप्रमाणे चेसी क्रॅक होण्‍याशी नुकसानीचा संबंध येत नाही. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार यांचा विमा दावा योग्‍य कारणास्‍तव नाकारला असून शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची त्‍यांनी विनंती केली आहे.

                                                                                                               

3.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, तसेच लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर

   करुन त्रुटीयुक्‍त सेवा दिली आहे काय ?                                 होय.  

2. तक्रारदार विमा नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?     होय.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा

 

4.    मुद्दा क्र. 1 :- तक्रारदार यांच्‍या जीप क्र.एम.एच.45/ ए.7774 करिता दि.30/10/2010 ते 29/10/2011 कालावधीकरिता पॉलिसी क्र.ओ.जी.-11-2004-1801-00001278 विमा उतरविल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही. विमा कालावधीमध्‍ये म्‍हणजेच दि.18/3/2011 रोजी जीपचा अपघात होऊन जीपचे नुकसान झाल्‍याबाबत प्रमुख विवाद नाही. त्‍यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केल्‍याचे व त्‍यांनी दि.2/5/2011 रोजीच्‍या पत्राद्वारे तो नाकारल्‍याबाबत उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही.

 

5.    प्रामुख्‍याने, जीपवर बाह्य आघात झाला नसल्‍याचे आल्‍यामुळे व चासीला गंज चढला होता आणि अपघाताच्‍या आघातामुळे त्‍याचे नुकसान झालेले नसल्‍याने पॉलिसी अटी व शर्तीचा आधार घेऊन विमा कपंनीने तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्‍याचे निदर्शनास येते.

 

6.    तक्रारदार यांनी अभिलेखावर जीपच्‍या अपघाताबाबत पोलीस जबाब व पोलीस पंचनामा दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या जीपसमोर अचानक कुत्रे आडवे आल्‍यामुळे त्‍यास चुकवत असताना जीप डाव्‍या बाजूस रस्‍त्‍याच्‍या खाली गेली आणि जेसी क्रॅक होऊन नुकसान झाल्‍याचे नमूद करण्‍यात आलेले आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदार  यांच्‍या जीपच्‍या अपघातानंतर श्री. प्रसन्‍न एम. नझरे यांच्‍यामार्फत सर्व्‍हे करण्‍यात येऊन त्‍याबाबतचा अहवाल व त्‍यापृष्‍ठयर्थ शपथपत्र विरुध्‍द पक्ष यांच्‍यातर्फे अभिलेखावर दाखल करण्‍यात आलेले आहे. शपथपत्रानुसार चासीचे नुकसान हे संबंधीत नुकसानीच्‍या कारणाशी निगडीत नसल्‍यामुळे विमा लाभ देय होत नसल्‍याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये चासी ही बॉक्‍स टाईपमध्‍ये व कठीण स्‍वरुपाची असल्‍याचे व त्‍यावर दगडाचा आघात होऊन घर्षणाने नुकसान व खुणा आढळून आल्‍याचे नमूद केले आहे. सर्व्‍हेअरने आघाताप्रमाणे चासीच्‍या मागे-पुढे होणा-या परिणामाचा निष्‍कर्ष काढून चासीच्‍या नुकसानीशी अपघाताचा संबंध येत नसल्‍याचे नमूद केलेले आहे.

 

7.    आमच्‍या मते, तक्रारदार यांच्‍या जीपचा अपघात झाल्‍यासंबंधी कोणताही विवाद नाही आणि त्‍याप्रमाणे पोलीस पेपर्स अभिलेखावर दाखल आहेत. तसेच सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे दगडाच्‍या घर्षनाच्‍या खुणा चासीवर आढळून आलेल्‍या आहेत. असे असताना, चासीवर दगडाच्‍या झालेल्‍या आघाताचा परिणाम कसा होऊ शकतो, याचा ऊहापोह करुन चासी तुटण्‍याची क्रिया अपघाती नव्‍हती, हा ठोस निष्‍कर्ष काढता येऊ शकणार नाही. अपघात ही अचानक व अनपेक्षीत घटना आहे. ज्‍यावेळी वाहन अपघाताच्‍या घटना घडतात, त्‍यावेळी अचानक व अनपेक्षीत होणा-या क्रियेमुळे वाहनाचे कशाप्रकारे नुकसान झाले, याचे अनुमान ढोबळ मानाने काढता येणार नाही. ज्‍यावेळी चासी अपघाताचे वेळी तुटल्‍याचे मान्‍य करण्‍यात आले आहे, त्‍यावेळी चासी अपघाताशिवाय व गंज चढल्‍यामुळे, दैनंदीन वापरामुळे व घसा-यामुळे तुटल्‍याचे सिध्‍द करणारी कोणतेही कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. विमा दावा निर्णयीत करताना सर्व्‍हेअरचा अहवाल हा महत्‍वपूर्ण असतो; परंतु त्रुटीयुक्‍त असणारा सर्व्‍हे रिपोर्ट मान्‍य करण्‍याचे बंधन मंचावर येऊ शकणार नाही.

 

8.    मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 'श्री.व्‍यंकटेश्‍वरा सिंडीकेट /विरुध्‍द/ ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. व इतर', 2009 सी.टी.जे.1189 (सुप्रीमकोर्ट)(सीपी) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

      Para. 23 : In our considered view, the Insurance Act only mandates that while settling a claim, assistance of surveyor should be taken but it does not go further and say that the insurer would be bound whatever the surveyor has assessed or quantified, if for any reason, the insurer is of the view that certain material facts ought to have been taken into consideration while framing a report by the surveyor and if it is not done, it can certainly depute another surveyor for the purpose of conducting a fresh survey to estimate the loss suffered by the insured.

 

      तसेच मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 'न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि. /विरुध्‍द/ प्रदीपकुमार', 2009 सी.टी.जे.559 (सुप्रीमकोर्ट)(सीपी) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

      Para. 15 : In other words although the assessment of loss by the approved surveyor is a pre-requisite for payment or settlement of claim of twenty thousand rupees or more by insurer, but surveyor's report is not the last and final word. It is not that sacrosanct that it cannot be departed from; it is not conclusive. The approved surveyor's report may be basis or foundation for settlement  of a claim by the insurer in respect of the loss suffered by the insured but surely such report is neither binding upon the insurer nor insured.

 

9.    सर्व्‍हेअरचा अहवाल हा विमा दावा निर्णयीत करताना महत्‍वपूर्ण असला तरी उपरोक्‍त मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने विषद केलेल्‍या न्‍यायिक तत्‍वानुसार तो अंतीम व बंधनकारक ठरु शकत नाही. तसेच तक्रारदार यांनी सर्व्‍हेअरचा अहवाल अमान्‍य केलेला आहे. सर्व्‍हेअरने चासी तुटण्‍याकरिता काढलेले अनुमान तर्कहीन व तथ्‍यहीन असल्‍यामुळे तो अहवाल मान्‍य करता येणार नाही. तसेच सर्व्‍हेअरने चासीसह इतर नुकसानीबाबत खर्चाकरिता कोणतेही मुल्‍यनिर्धारण केलेले नाही. विमा कंपनीने सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

10.   विरुध्‍द पक्ष यांनी आपल्‍या युक्तिवादापृष्‍ठयर्थ मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या रिव्‍हीजन पिटीशन क्र.1282/2000, बलेंद्र गौतम /विरुध्‍द/ ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि. या निवाडयाचा संदर्भ सादर केला आहे. परंतु त्‍या निवाडयातील वस्‍तुस्थिती व निर्माण झालेले मुद्दे या तक्रारीशी कोणत्‍याही प्रकारे सुसंगत व मिळते-जुळते नाहीत. त्‍यामुळे तो निवाडा या प्रकरणामध्‍ये लागू पडणार नाही. वरील सर्व विवेचनावरुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

 

11.   मुद्दा क्र. 2 :- तक्रारदार यांच्‍या जीपचा रु.3,00,000/- रकमेचा विमा उतरविण्‍यात आलेला आहे. प्रत्‍यक्षात तक्रारदार यांना जीप दुरुस्‍तीकरिता रु.84,732/- इतका खर्च आलेला असल्‍यामुळे त्‍या रकमेची मागणी प्रस्‍तुत तक्रारीद्वारे केलेली आहे. सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे तक्रारदार यांच्‍या खर्चाकरिता रु.2,570/- चे मुल्‍यनिर्धारण करण्यात आलेले आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदार यांच्‍या जीप दुरुस्‍तीकरिता खरेदी केलेल्‍या संपूर्ण पार्ट व लेबर चार्जेसचा उल्‍लेख अहवालामध्‍ये घेण्‍यात न येता रु.2,570/- नुकसान भरपाई निश्चित करण्‍यात आलेली असून ती एकतर्फी व अनुचित आहे.

 

12.   तक्रारदार यांना जीप दुरुस्‍तीकरिता खरेदी केलेल्‍या पार्टकरिता रु.65,589/- व मजुरी रु.19,143/- असा एकूण रु.84,732/- इतका खर्च आलेला आहे. त्‍याबाबत विमा कंपनीचा विशेष आक्षेप नाही. तक्रारदार यांच्‍या जीपचे उत्‍पादन सन 2005 मध्‍ये झालेले असून अपघात दि.18/3/2011 रोजी झालेला आहे. अपघाताची घटना जीपच्‍या उत्‍पादन झाल्‍यापासून पाच वर्षाच्‍या कालावधीनंतर घडलेली आहे. त्‍यामुळे पॉलिसी अटी व शर्तीप्रमाणे 40 टक्‍के घसारा धरण्‍यात येऊन उर्वरीत खर्चासह रक्‍कम विमा नुकसान भरपाई म्‍हणून तक्रारदार यांना मिळणे क्रमप्राप्‍त व आवश्‍यक ठरते. अशा परिस्थितीत 40 टक्‍के घसारा वजावट करुन उर्वरीत रक्‍कम रु.50,839/- विमा दावा नामंजूर केल्‍याच्‍या तारखेपासून मिळविण्‍यास पात्र ठरतात, या अंतिम निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत. वरील विवेचनावरुन आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

13.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.50,839/- दि.2/5/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

3. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्‍क्‍याची प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

 

(सौ. विद्युलता जे. दलभंजन)                              (श्री. दिनेश रा. महाजन÷)

       सदस्‍य                                              अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                           ----00----

 (संविक/स्‍व/16913)

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.