जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर
तक्रार अर्ज क्रमांक:-2/2013
दाखल तारीख:-29/11/2012
निकाल तारीख:-16/04/2013
कालावधी0वर्षे04महिने18दिवस
श्री.महिबुब मोहीद्दीन शेख,वय 65 वर्षे, धंदा-व्यापार,
रा.मु.पो.शिवणी ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर तक्रारदार
विरुध्द
बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिटी प्राईड, ऑफिस नं.4,दुसरा मजला,162 रेल्वे लाईन्स,
एम्प्लॉयमेंट चौक,सोलापूर.(सदरची नोटीस मा.व्यवस्थापक यांचेवर
बजावण्यात यावी) विरुध्दपक्ष
गणपुर्ती:-सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ.विदयुलता जे.दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.एल.एन.मारडकर
-: अॅडमिशन स्टेज नि.1 वर आदेश:-
(आदेशपारीतदिनांक:-16/04/2013)
सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचेव्दारा न्यायालयीन कक्षात
तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्ज दि.29/11/2012 रोजी विरुध्दपक्षकार बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,यांचे विरुध्ददाखल केला असून, सदर तक्रारअर्ज अॅडमिशन स्टेजला ठेवले असता तक्रारदार गैरहजर त्यांचे विधिज्ञ गैरहजर असून प्रस्तुत प्रकरणात अॅडमिशन स्टेजला आजपावेतो युक्तीवाद केलेले नाहीत. मे.राज्य आयोगाचे सूचनेप्रमाणे अॅडमिशन स्टेजला युक्तीवाद केला नाही. म्हणून सदरचे प्रकरण मंचासमोर चालविण्यास तक्रारदारास स्वारस्य राहिलेले नाही म्हणून सदरचा तक्रार अर्ज प्रलंबीत ठेवण्यास काहीही कारण नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत अॅडमिशन स्टेजला सदरचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(सौ.विद्युलताजे.दलभंजन) (सौ.शशिकलाश.पाटील÷)
सदस्य अध्यक्ष(अतिरिक्तकार्यभार)
जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.दापांशिं003041300