Maharashtra

Solapur

CC/11/392

Sunita suresh Pimpale - Complainant(s)

Versus

Bajaj Alince life insurance co.ltd. - Opp.Party(s)

24 Oct 2013

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
 
Complaint Case No. CC/11/392
 
1. Sunita suresh Pimpale
Mahalexmi nagar vijapur road solapur
solapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Alince life insurance co.ltd.
emplyment chowk solapur
solapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 


ग्राहक तक्रार क्रमांक : 392/2011.

तक्रार दाखल दिनांक :  21/10/2011.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 24/10/2013.                                निकाल कालावधी: 02 वर्षे 00 महिने 03 दिवस   

 

 


श्रीमती सुनिता सुरेश पिंपळे, वय 46 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी,

रा. प्रथमेश, सी/99, महालक्ष्‍मी नगर, शासकीय तंत्रनिकेतनच्‍या

पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर.                           तक्रारदार  

                   विरुध्‍द                          

 

(1) शाखा व्‍यवस्‍थापक, बजाज अलियांझ लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि.,

    एम्‍प्‍लॉयमेंट चौक, शाखा : सोलापूर.

(2) संबंधीत अधिकारी, बजाज अलियांझ लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि.,

    एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे.

(3) संबंधीत अधिकारी, बजाज अलियांझ लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि.,

    एस.व्‍ही. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई 400 054.                  विरुध्‍द पक्ष

 

                        गणपुर्ती  :-   श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष

                        सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  ए.आर. देशपांडे

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एस. नेसरीकर

 

आदेश

 

श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, सुरेश मनोहर पिंपळे यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे दि.24/4/2008 रोजी रु.50,000/- चा भरणा करुन विमा पॉलिसी उतरविलेली असून पॉलिसीचा क्रमांक 97559563 आहे. दि.19/4/2009 रोजी सुरेश मनोहर पिंपळे यांचे निधन झाले आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमा रकमेची मागणी केली असता दि.13/11/2009 रोजीच्‍या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर केला. तक्रारदार यांनी विमा दाव्‍याबाबत पुन:निरीक्षण अर्ज सादर केला असता तोही दि.27/5/2007 रोजीच्‍या पत्राद्वारे नामंजूर केला. तक्रारदार यांनी विमा रकमेऐवजी रु.50,000/- ची मागणी केली असता विरुध्‍द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विमा दावा मंजूर करण्‍यासह व्‍याजासह रक्‍कम मिळावी किंवा सुरेश मनोहर पिंपळे यांनी भरणा केलेली रक्‍कम रु.50,000/- व्‍याजासह परत मिळावी, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारदार यांचा दावा प्राप्‍त झाल्‍यानंतर चौकशी केली असता तक्रारदार यांचे पती यांना विमा पॉलिसी खरेदी करण्‍यापूर्वी गंभीर स्‍वरुपाचा आजार होता. तक्रारदार यांचे पतीस Liver Cirrhosis & Portal Hypertension असा आजार पॉलिसी घेण्‍यापूर्वीपासून होता. त्‍या आजाराकरिता तक्रारदार यांचे पतीने दि.19/5/2008 रोजी डॉ. सुहास करमरकर, सोलापूर यांच्‍याकडे चाचणी केली होती आणि त्‍यांच्‍या प्रमाणपत्रानुसार तक्रारदार यांचे पती Hepatitis  मुळे त्रस्‍त होते. तसेच तक्रारदार यांचे पतीने डॉ. प्रेम बी. झंवर, सोलापूर व डॉ. संतोष के. शहा, सोलापूर यांच्‍याकडे केलेल्‍या तपासणीमध्‍ये Accute Hepatitis, Chr. Liver Disease, Inferior Hepatitis आजार असल्‍याचे निदर्शनास आले. प्रस्‍तुत आजार हा तक्रारदार यांचे पतीस पॉलिसी घेण्‍यापूर्वी होता आणि त्‍या आजाराने गंभीर स्‍वरुप घेतल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला. तक्रारदार यांनी पतीने विमा उतरवताना गंभीर स्‍वरुपाच्‍या आजाराबाबत कल्‍पना दिलेली नव्‍हती आणि त्‍या अनुषंगाने तक्रारदार हे विमा क्‍कम मिळविण्‍यास पात्र नाहीत. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केलेली आहे.

                                                                                                               

3.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर

   करुन त्रुटीयुक्‍त सेवा दिली आहे काय ?                                             होय.

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?                  होय.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

4.    मुद्दा क्र. 1 व 2 :-  सुरेश मनोहर पिंपळे यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे पॉलिसी क्र. 97559563 अन्‍वये विमा संरक्षण घेतल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही. दि.19/4/2009 रोजी सुरेश मनोहर पिंपळे यांचे निधन झाल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही. विमा पॉलिसीची रक्‍कम मिळविण्‍यासाठी तक्रारदार यांनी विमा दावा दाखल केला असता विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा दि.13/11/2009 व 27/5/2010 रोजीच्‍या पत्राद्वारे नामंजूर केल्‍याविषयी विवाद नाही.

 

5.    प्रामुख्‍याने, तक्रारदार यांचे पती सुरेश मनोहर पिंपळे यांना विमा पॉलिसी खरेदी करण्‍यापूर्वी Liver Cirrhosis, ascites, moderate spleenomegaly early signs of portal hypertension असा आजार होता आणि त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांना कल्‍पना दिलेली नसल्‍यामुळे विमा संरक्षण लागू होत नसल्‍याने विमा दावा नामंजूर केल्‍याचे निदर्शनास येते.  विमा दावा रक्‍कम फेटाळण्‍याकरिता दिलेल्‍या कारणांचा विचार करता, विरुध्‍द पक्ष यांचे विमा दावा नामंजूर करण्‍याचे कृत्‍य उचित व संयुक्तिक आहे काय ? हे सर्वप्रथम पाहणे आवश्‍यक ठरते. त्‍या अनुषंगाने दखल घेतली असता, विमा प्रस्‍ताव प्रपत्र व पूर्वी असलेल्‍या आजाराबाबत सुरेश मनोहर पिंपळे यांनी काय तपशील नमूद केला आहे ? हे सिध्‍द होणे आवश्‍यक होते. तसेच पॉलिसीच्‍या कोणत्‍या अटी व शर्तीप्रमाणे असे विमा दावे नामंजूर होण्‍यास पात्र ठरतात ? हे सिध्‍द होणे आवश्‍यक ठरते.

 

6.    प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी सुरेश मनोहर पिंपळे यांना असणारा आजार व त्‍याकरिता घ्‍यावयाची विश्रांती यासबंधी वैद्यकीय अधिका-यांची प्रमाणपत्रे दाखल केलेली आहेत. त्‍या प्रमाणपत्रांचे सुक्ष्‍मरित्‍या अवलोकन केले असता, विमा पॉलिसी प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर म्‍हणजेच दि.24/4/2008 नंतर संबंधीत प्रमाणपत्रे दिल्‍याचे व दि.24/4/2008 नंतर आजाराचा कालावधी असल्‍याचे निदर्शनास येते. संबंधीत वैद्यकीय अधिका-यांच्‍या प्रमाणपत्रानुसार सुरेश मनोहर पिंपळे हे Hepatitis, Accute Hepatitis, Chr. Liver Disease, Inferior Hepatitis, abdomen pain, Liver Cirrhosis and portal hypertension  मुळे आजारी असल्‍याचे निदर्शनास येत असले तरी संबंधीत प्रमाणपत्रे हे विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर निर्गमित केल्‍याचे निदर्शनास येते. त्‍यामुळे सुरेश मनोहर पिंपळे यांना उपरोक्‍त आजार हे विमा प्रस्‍ताव दाखल करण्‍यापूर्वी होते, हे मान्‍य करणे असंयुक्तिक व अनुचित ठरेल. यदाकदाचित, ते आजार सुरेश मनोहर पिंपळे यांना विमा प्रस्‍ताव दाखल करण्‍यापूर्वी असल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांचे कथन असल्‍यास त्‍यांनी संबंधीत वैद्यकीय अधिका-यांची शपथपत्रे व तसे वैद्यकीय पुरावे दाखल करणे अत्‍यावश्‍यक होते. त्‍याशिवाय, विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले प्रमाणपत्रे कशाप्रकारे व कोणाकडून प्राप्‍त केलेले आहेत ? त्‍याची वैधता कशाप्रकारे मान्‍य करावी ? याचे कोणतेही विश्‍लेषण दिलेले नाही. तसेच सुरेश मनोहर पिंपळे यांचे प्रस्‍तुत आजार हे त्‍यांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत असल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांचे कथन असताना त्‍यांनी त्‍याप्रमाणे वैद्यकीय कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. त्‍याशिवाय विरुध्‍द पक्ष यांनी विमा दावा नामंजूर करण्‍याच्‍या समर्थनार्थ विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती स्‍पष्‍ट केलेल्‍या नाहीत.

 

 

6.    वरील विवेचनावरुन विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वी किंवा विमा प्रस्‍ताव सादर करताना सुरेश मनोहर पिंपळे हे Hepatitis, Accute Hepatitis, Chr. Liver Disease, Inferior Hepatitis, abdomen pain, Liver Cirrhosis and portal hypertension  मुळे आजारी असल्‍याचे किंवा त्‍याकरिता वैद्यकीय उपचार घेतल्‍याचे सिध्‍द करणारी कोणतेही कागदपत्रे रेकॉर्डवर उपलब्‍ध नाहीत. विरुध्‍द पक्ष यांनी जरी सुरेश मनोहर पिंपळे यांनी त्‍यांची फसवणूक करुन विमा घेतल्‍याचे नमूद केले असले तरी त्‍याबाबत सबळ कागदोपत्री पुरावे सादर करण्‍यास विरुध्‍द पक्ष हे असमर्थ ठरले आहेत.

 

7.    मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या 'गुर्राम वरलक्ष्‍मी /विरुध्‍द/ एल.आय.सी. ऑफ इंडिया', 3 (2006) सी.पी.जे. 304 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये मा.आयोगाने असे नमूद केले आहे की,

 

      Para. 15 : In our view, as the burden of proof is on the insurer to establish that there was suppression of material facts on the part of the insured and unless the insurer is able to do so, there is no question of the policy being avoided on the ground of mis-statement of facts. There is not evidence on record establishing that the deceased has suppressed the material disease at the time of taking the inusrance policy. The Insurance Company has failed to produce on record the certificate given by the Doctor who examined the insured at the time of proposal, (b) the Insurance company has failed to bring on record any documentary evidence to indicate that the insured had taken the treatment for diabetes and that dibetes finally led to his cardiac arrest.

 

तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या 'नॅशनल इन्‍शुरन्‍स कं. लि. /विरुध्‍द/ बिपूल कुंडू', 2 (2005) सी.पी.जे. 12 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये मा.आयोगाने असे नमूद केले आहे की,

 

      It is settled law that Insurance Company cannot avoid consequences of insurance contract by simply showing inaccuracy or falsity of the statement made by a policy holder. Burden is cast on the insurer to show that statement on a fact had been suppressed which was material for the policy holder to disclose. It is further to be proved by the insurer that that statement was fraudulently made by the policy holder with the knowledge of falsity of that statement or that the suppression was of material fact which had not been disclosed

 

8.    वरील सर्व विवेचनावरुन सुरेश मनोहर पिंपळे यांनी विमा पॉलिसी प्रस्‍ताव दाखल करण्‍यापूर्वी त्‍यांना आजार असल्‍याची माहिती लपवून ठेवल्‍याचे सिध्‍द होत नाही. अत्‍यंत तांत्रिक व अनुचित कारणास्‍तव विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे पॉलिसी क्र.97559563 अन्‍वये देय विमा लाभ हे विमा दावा नामंजूर केल्‍याच्‍या म्‍हणजेच दि.13/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास तक्रारदार पात्र ठरतात. सबब, आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना पॉलिसी क्र. क्र.97559563 अन्‍वये संपूर्ण विमा लाभाची रक्‍कम दि.13/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 

2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

3. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्‍क्‍याची प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

 

                                                                               

(सौ. विद्युलता जे. दलभंजन)                              (श्री. दिनेश रा. महाजन÷)

       सदस्‍य                                              अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                           ----00----

 (संविक/स्‍व/231013)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.