Maharashtra

Nashik

CC/162/2011

Dipak Kashinath Pawar - Complainant(s)

Versus

Bajaj Aliance Life - Opp.Party(s)

Kishor Patil

30 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/162/2011
 
1. Dipak Kashinath Pawar
Niphad,nashik
...........Complainant(s)
Versus
1. Bajaj Aliance Life
Gala No. 7,Shriman Sankul,Opp Shah Petrol pump,Mumbai Agra Rd. Pimpalgaon(B) Tal Niphad nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Kishor Patil, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी निकालपत्र पारीत केले)

                      नि  का      त्र                             

अर्जदार यांना सामनेवालाकडून मेडीक्‍लेमची रक्‍कम रु.1,60,145/- मिळावेत, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, वकिल फी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.         

सामनेवाला नं.1 यांनी मंचाची नोटीस घेण्‍यास नकार दिला व सामनेवाला क्र.3 यांना नोटीशीची बजावणी झालेली असूनही त्‍यांनी मंचात म्‍हणणे दाखल केले नाही म्‍हणून सामनेवाला क्र.1 व 3 यांचेविरुध्‍द दि.29/09/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आले.

अर्जदार यांचे पान क्र.109 ची पुरसीस प्रमाणे व त्‍यावरील आदेशाप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांचे नाव तक्रार अर्जातून वगळण्‍यात आलेले आहे.

अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.

मुद्देः

1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय

2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे

                                                  तक्रार क्र.162/2011  

   काय?-होय.

3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडिक्‍लेम विमापॉलिसीपोटी

   रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी

   रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः

   मंजूर करण्‍यात येत आहे.

 विवेचन

या कामी अर्जदार यांचेवतीने अँड.पी.आय.पाटील यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.

अर्जदार यांनी पान क्र.5 लगत पॉलिसी शेडयुलची झेरॉक्‍स प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल करुन अर्जदार यांनी विमापॉलिसी घेतल्‍याची बाब नाकारलेली नाही.  पान क्र.5 लगतचे विमापॉलिसी शेडयुल यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र व त्‍यासोबतची सर्व कागदपत्रे सामनेवाला यांनी नाकारलेली नाहीत. पान क्र.6 चे पॉलिसीचा विचार होता, अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रु.1,00,000/- करीता विमापॉलिसी घेतलेली आहे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी पान क्र.19 ते पान क्र.80 लगत उपचाराची कागदपत्रे व उपचाराच्‍या खर्चाची बिले सादर केलेली आहेत. या कागदपत्रांचा विचार होता, सामनेवाला यांनी अर्जदार यांना मेडीक्‍लेम विमापॉलिसीपोटी रक्‍कम मंजूर करणे गरजेचे होते. परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांचा मेडीक्‍लेम मंजूर केलेला नाही.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

पान क्र.19 ते पान क्र.80 लगतची उपचाराची कागदपत्रे व हॉस्‍पीटल खर्चाची बिले याचा विचार होता, अर्जदार यांना वैद्यकिय उपचारासाठी सुमारे रु.1,00,000/- पेक्षा जास्‍त खर्च आलेला आहे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे.  परंतु पान क्र.6 ची विमापॉलिसी ही रु.1,00,000/- पर्यंतच सिमीत आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्‍लेम विमापॉलिसीपोटी रक्‍कम रु.1,00,000/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

                                                  तक्रार क्र.162/2011  

सामनेवाला यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवाला विरुध्‍द या मंचामध्‍ये दाद मागावी लागलेली आहे.  यामुळे निश्‍चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्‍तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.

                             आ दे श

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा

   द्याव्‍यात.

2अ) मेडीक्‍लेम विमा पॉलिसीपोटी रक्‍कम रु.1,00,000/- द्यावते

2ब) मानसिक त्रासापोटी रु.10,000/- द्यावेत.

2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.