जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन.
--------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १३६/२०११
तक्रार दाखल दिनांक – १८/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३१/१२/२०१२
शेख अजीज शेख हनीफ
उ.व.४४ वर्षे, धंदा - मजुरी
रा. ६८, एन एटीआय ग.न. ७,
जुने धुळे, ता.जि.धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि.
(रजि.ऑ.जी.ई. प्लाझा एअरपोर्ट रोड,
पुणे येरवाडा, पुणे – ४११ ००६)
(नोटिसीची बजावणी यांचेवर करावी.)
मॅनेजर,
बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि. नाशिक
पहिला मजला श्रीगणेश प्लाझा,
श्रीहरी नारायण कुठे मार्ग,
नाशिक – ४२२ ००९.
२. मॅनेजर,
बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि.
शाखा धुळे – स्वामी टेउराम हायस्कुलजवळ,
साक्री रोड, धुळे. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. डी.व्ही. घरटे)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड. डी.एन. पिंगळे)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारण देऊन नाकारून विमा कंपनीने सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी नवकार व्हील्स यांचेकडून रक्कम रू.४५,४७८/- ला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही मोटार सायकल खरेदी केली. त्याचा नोंदणी क्रं. एम.एच.-१८ वाय/२४५३ आहे. सदर गाडीची दि.२५.०३.०९ ते २४.०३.१० या कालावधीसाठी विरूध्द पक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि. (यापुढे संक्षिप्तेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडून विमा पॉलीसी घेतली होती.
३. तक्रारदार दि.२२/०५/०९ रोजी कामानिमित्त शहादा येथे गेला होता. त्यावेळी शहादा बसस्टॅंडवर शौचालय साफ सफाईचे कामासाठी गेला असता वाहन बाहेर लावले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने सदर गाडी तक्रारदाराच्या भावाच्या ताब्यातुन ती गाडी चोरून नेली. बराच शोध घेऊनही गाडी मिळाली नाही त्यामुळे पोलीस स्टेशन शहादा येथे फिर्याद दिली. पोलीसांनी तपास केला परंतु आरोपी व वाहन मिळून आले नाही त्यामुळे पोलीसांनी अ. समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. तक्रारदाराने विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला असता विमा कंपनीने दि.०७/०८/०९ रोजी पत्र देऊन विमा दावा नाकारला व सेवेत त्रृटी केली.
४. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीस गाडीची किंमत रू.४५,०००/- व त्यावर १८% दराने व्याज, मानसीक त्रासापोटी रू.४०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०,००० देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.६ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ३ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.६/१ वर एफ.आय.आर., नि.६/२ वर चार्जशिट, नि.६/३ वर खरेदी बील, नि.६/७ वर विमा पॉलीसी आणि नि.६/८ वर विमा दावा नाकारल्याचे पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहे.
६. विमा कंपनीने आपला खुलासा नि.१५ वर दाखल करून तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. त्यांत करण्यात आलेली मागणी करता येत नाही, त्यामुळे ती रदद करावी अशी विनंती केली आहे.
७. विमा कंपनीने तक्रारदार यांचे अर्जातील सर्व म्हणणे नाकारले आहे व वस्तुस्थिती या सदरात तक्रारदार यांचा विमा रू.३९,९९५/- चा उतरवला होता पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे वाहन लावताना वाहन मालकाने योग्य ती काळजी घेतजी पाहीजे. म्हणजेच वाहन लॉक करून ठेवले पाहिजे परंतु तक्रारदाराने सदर गाडी चावीसह पार्क केली व नंतर १५ ते २० मिनीटांनी वाहन सुरू झाल्याचा आवाज आल्यानंतर कोणीतरी इसम गाडी घेऊन जातांना दिसला व गाडीचा शोध घेतला आहे. विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराने वाहन पार्क करताना योग्य ती काळजी न घेतल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास जबाबदार राहत नाही. सदर बाब फिर्यादीतच नमुद आहे. तसेच सदर घटनेची विमा कंपनीस तात्काळ माहीती दिली नाही किंवा विलंबाचे कारणही दिले नाही. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
८. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.१६ वर श्री. निरज शिवणगीकर यांचे शपथपत्र, तसेच नि.१८/१ वर विमा पॉलीसी, नियम व अटींची प्रत व काही न्यायीक दृष्टांत दाखल केले आहेत.
९. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
केली काय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१०. मुद्दा क्र.१ तक्रारदार यांच्या मोटार सायकल क्र. MH-18/Y-2453 चा विमा होता सदर गाडी चोरीस गेली याबददल वाद नाही. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा रककम मिळणेसाठी दावा दाखल केला असता विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन दावा नाकारला आहे व सेवेत त्रृटी केली आहे.
११. विमा कंपनीने आपल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, तक्रारदार यांचा विमा रू.३९,९९५/- चा उतरवला होता पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे वाहन लावताना वाहन मालकाने योग्य ती काळजी घेतजी पाहीजे. म्हणजेच वाहन लॉक करून ठेवले पाहिजे परंतु तक्रारदाराने सदर गाडी चावीसह पार्क केले व नंतर १५ ते २० मिनीटांनी वाहन सुरू झाल्याचा आवाज आल्यानंतर कोणीतरी इसम गाडी घेऊन जातांना दिसला व गाडीचा शोध घेतला आहे. विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराने वाहन पार्क करताना योग्य ती काळजी न घेतल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास जबाबदार राहत नाही. सदर बाब फिर्यादीत नमुद आहे. तसेच सदर घटनेची विमा कंपनीस तात्काळ माहीती दिली नाही किंवा विलंबाचे कारणही दिले नाही. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
१२. अॅड. पिंगळे यांनी पॉलीसीमधील अटींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे असा युक्तीवाद करून खलील न्यायीक निवाडे दाखल केले आहेत.
१) मा.सर्वोच्च न्यायालय सिव्हील अपील नं. ६२७७/०४
युनाटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी ली. विरूध्द हरचंद राय चंदन लाल
२) मा.सर्वोच्च न्यायालय सी.ए. नं.४९१३/९७
ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. विरूध्द सोनी चेरीयन
१३. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात सदर गाडी जवळ तक्रारदाराचा भाऊ बाहेर उभा होता व तो आत शौचालय सफाईचे कामासाठी गेला होता. त्यावेळी गाडीला चावी तशीच ठेवली होती असा उल्लेख आहे. तसेच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु पोलीसांना गाडी मिळुन आली नाही.
१४. वरील परिस्थितीत तक्रारदार यांनी गाडीला चावी ठेवली हे सत्य आहे परंतु गाडीजवळ त्याचा भाऊ उभा होता व तक्रारदाराचे आतमध्ये थोडा वेळच काम होते. त्यावेळी सदर गाडीजवळ तक्रारदाराचा भाऊ उभा असल्यामुळे गाडीला चावी तशीच ठेवलेली होती म्हणजे तक्रारदाराने गाडीची काळजी घेतली नाही असे म्हणता येणार नाही, असे आम्हास वाटते.
१५. या संदर्भात तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय आयोग IV (2010) CPJ 297 नॅशनल इन्शुरन्स कं. लि. विरूध्द कमल सिंघल या न्यायीक दृष्टांतातील तत्व या प्रकरणाशी मिळते जुळते असल्याचे दिसुन येते. त्यात पुढील प्रमाणे तत्व विषद करण्यात आले आहे.
Repudiation of claim made by Insurance Company was also found to be invalid for the reason that since driver was not expected to carry key of the vehicle with him while getting down from the vehicle answer nature’s call. Particularly, when the vehicle was within his sight. We too, concur with the finding of Fora below about there being no clinching evidence suggesting violation of condition 3(A) & 4 of the policy authorizing the insurance company to defeat genuine claim of the insured.
१६. शिवाय मा.सर्वोच्च न्यायालय, मा.राष्ट्रीय आयोग व मा.महाराष्ट्र राज्य आयोग यांनी अनेक न्यायिक दृष्टांतामध्ये तांत्रिक कारणे देवून विमा दावे नाकारु नयेत असे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात आम्ही खालिल न्यायिक दृष्टांत विचारात घेत आहोत.
(1) मा.सर्वोच्च न्यायालय 2010 CTJ 485 Amalendu Sahoo V/s Oriental Insurance Co.Ltd.
(2)मा.सर्वोच्च न्यायालय B.V.Nagaraju V/s M/S.Oriental Insurance Co.Ltd.Divisional Office Hassan 1996 (2) T.A.C.429 (S.C.)
(3) मा.सर्वोच्च न्यायालय National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal 2008 CTJ 680.
१७. या न्यायीक दृष्टांतामधील तत्वे पाहता तक्रारदाराचा विमा दावा नाकारून विमा कंपनीने सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणुन मुदृा क्र. १ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१८. मुदृा क्र.२ तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीस गाडीची किंमत रू.४५,०००/- व त्यावर १८% दराने व्याज, मानसीक त्रासापोटी रू.४०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०,००० देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
१९. तक्रारदार यांच्या गाडीचा विमा पॉलीसीचा कालावधी २५.०३.०९ ते २४.०३.१० हा असल्याने व गाडीची चोरी दि.२२.०५.०९ रोजी झाली असल्याने तक्रारदार यांना विमा कंपनी कडुन रक्कम रूपये ३९,९९५/- च्या ७५% रक्कम रूपये २९,९९६/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.०७.०८.०९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०००/- मिळणेस पात्र आहेत.
२०. मुदृा क्र.३. वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुध्द पक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि. यांनी तक्रारदारास रक्कम रूपये २९,९९६/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.०७.०८.०९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शु. कंपनी लि. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.