नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा कायदेशीर असलेला विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी टाटा 407 मॅटॅडोर क्र.एमएच 13 जी – 6399 या वाहनाचा दि.28/11/08 ते दि.27/11/09 या कालावधीसाठी विमा विरुध्द पक्ष बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्तेसाठी विमा कंपनी असे संबोधन्यात येईल) यांचेकडून घेतलेला आहे. दि.16/11/09 रोजी सदर गाडीचा भरधाव येणा-या एसटी बस क्र.एम.एच.20 डी 6731 च्या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला. त्यात तक्रारदारच्या वाहनाचे संपुर्ण नुकसान झाले. त्याबाबत धुळे पोलीस स्टेशनला गु.र.नं.401/09 दाखल करण्यात आला.
3. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, गाडीचा विमा असल्याने त्यांनी विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म व आवश्यक पोलिस पेपर्स व दुरुस्तीची बील दाखल केली आहेत व रु.1,43,610/- ची मागणी केली. परंतू विमा कंपनीने दि.27/04/10 रोजी
तक्रार क्र.262/10
पत्र देऊन गाडीमध्ये जास्त प्रवासी बसले होते व वाहन ओव्हरलोड झाले त्यामुळे पॉलिसीच्या अटीचा भंग झाला असे कारण देऊन विमा दावा नामंजूर केल्याचे कळवले.
4. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आह की, त्यांच्या वाहनाला भरधाव येणा-या एसटी बस क्र.एम.एच.20 डी 6731 च्या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असतांना व गाडीमध्ये जादा प्रवासी नसतांना दावा नाकारला आहे व सेवेत त्रुटी केली आहे.
5. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी झालेला खर्च रु.1,43,610/- व त्यावर दि.16/11/10 पासून 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
6. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.3 वर शपथपत्र, तसेच नि.5 वरील यादीनुसार 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.5/1 वर फिर्यादीची प्रत, नि.5/3 वर पंचनामा, नि.5/4 वर पॉलिसी, नि.5/5 वर नोंदणी प्रमाणपत्रा आणि नि.5/7 वर क्लेम नाकारल्याचे पत्र व बिले इत्यादी कागदपत्रे आहेत.
7. विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.16 वर दाखल करुन तक्रारदाराची तक्रार खोटी असल्यामुळे व त्यांनी सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नसल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. तक्रारदाराच्या गाडीचा विमा होता व त्यांनी दावा दाखल केला होता हे त्यांनी मान्य केले आहे.
8. विमा कंपनीने सत्य परिस्थिती या सदरात असे म्हटले आहे की, सदर वाहन हे मालवाहू वाहन आहे व त्यामध्ये फक्त 2 लोक बसण्याची व्यवस्था आहे. अपघात समयी वाहनात 6 इसम बसले होते. त्यामुळे ड्रायव्हर वाहन व्यवस्थित चालू शकला नाही. त्यामुळे बसला धडक दिली गेली. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. विमा कंपनीने सदर वाहनाचा सर्व्हे केला आहे असे नमुद करुन तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
9. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.17 वर शपथपत्र, नि.18/1 वर सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे.
10. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनी यांचा खुलासा व संबंधीत वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षसाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात व
तक्रार क्र.262/10
त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
3. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
11. मुद्दा क्र.1- तक्रारदार यांच्या टाटा 407 मॅटॅडोर क्र.एमएच 13 जी – 6399 चा विमा वैध होता व तक्रारदाराचा विमा दावा विमा कंपनीने दि.27/04/10 च्या पत्रान्वये नाकारला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने त्यांचा कायदेशीर विमा दावा चुकीचे व आयोग्य कारण देवून नाकारला आहे तर विमा कंपनीने योग्य विचार करुनच दावा नाकारला आहे असे म्हटले आहे.
विमा कंपनीने नि.21 वरील यादीनुसार मा.राष्ट्रीय आयोग व राज्य आयोगाची निकालपत्रे दाखल करुन त्यामध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसविल्यामुळे विमा दावा नाकारणे विमा कंपनीचे सेवेत त्रुटी होत नाही असे तत्व विषद केल्याचे म्हटले आहे.
1. राष्ट्रीय आयोग आर.पी. नं.3176/2011 एस.जी.शिवमुर्त्ताप्पा विरुध्द रिलायन्स.
2. राष्ट्रीय आयोग एफ.ए.नं.288/2005 न्यु इंडिया विरुध्द पवन ठक्कर.
3. राष्ट्रीय आयोग एफ.ए.नं.166/2003 नॅशनल इन्शरन्स विरुध्द सुरेश.
4. तामिलनाडू आयोग II (2009) सीपीजे 350 युनायटेड इंडिया विरुध्द एस.नागाराजन.
5. हिमाचल राज्य आयोग एफ.ए.नं.280/2008 न्यु इंडिया विरुध्द राजपौल.
तक्रारदार यांनी मा.सर्वोच्च न्यायालय यांचे पुढील निकालपत्रांचा आधार घेतला आहे.
1. B.V.Nagaraju V/s M/S.Oriental Insurance Co.Ltd.Divisional Office Hassan 1996 (2) T.A.C.429 (S.C.).
2. National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal 2008 CTJ 680.
3. Amaindo Sahoo V/s Oriental Insurans Co.Ltd. 2010 CTJ 485.
तक्रार क्र.262/10
12. तक्रारदार व विमा कंपनी यांचे म्हणणे पाहता विमा कंपनीने दि.27/04/10 चे पत्रातील कारण पाहणे आवश्यक ठरते. विमा कंपनीने खालील प्रमाणे कळवले आहे.
3. The vehicle is desinged for carrying maximum 02 persons legally as well as by the manufacturer. Therefore the vehicle was deliberately subjected to over load beyond its capacity. Therefore you have failed to take reasonable care and directly contributed to the loss.
13. सदर पत्रातील मजकुर पाहता सदर विमाकृत वाहनामध्ये ड्रायव्हरच्या जवळ 6 व्यक्ती बसल्या होत्या याबद्दल ठोस पुरावा दिसून येत नाही. तसेच मालवाहू वाहनामध्ये प्रवासी बसल्यामुळे चालकाला गाडी चालवीणे शक्य नाही असेही म्हणता येणार नाही. सदर गाडीत 2 पेक्षा जास्त लोक बसण्याचा आणि अपघात होण्याचा कुठेही थेट संबंध येत नाही असे आम्हांस वाटते. तसेच सदर अपघात भरधाव येणा-या एसटी बसच्या चुकीमुळे झाल्याचे पोलिस पेपर्सवरुन स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात एसटी चालकाविरुध्द धुळे पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविल्याचे नि.5/1 वरुन दिसून येते. यावरुन विमा कंपनीने तांत्रिक कारण देऊन विमा दावा नाकारल्याचे दिसून येते. मा.राष्ट्रीय आयोग व सन्मानीय सर्वोच्च न्यायालय यांनी अनेक न्यायिक दृष्टांतामध्ये विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणावरुन विमा दावे नाकारु नयेत असे म्हटले आहे.
14. या संदर्भात आम्ही B.V.Nagaraju V/s M/S.Oriental Insurance Co.Ltd.Divisional Office Hassan 1996 (2) T.A.C.429 (S.C.) या वरीष्ठ कोर्टाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहोत. सदर न्यायनिवाडयात पुढील प्रमाणे तत्व वीषद आहे.
Liability of Insurer for damages-Damage caused to Goods Vehicle as a result of accident-Goods Vehicle carrying humans more than the number permitted in terms of Insurancepolicy-Breach of contract-Whether alleged breach of carrying humans in a Goods Vehicle more than the number permitted in terms of the policy is so fundamental a breach to afford ground to the insurer to cschew liability altogether-Held-No-Contract term provided in policy interpreted-Misuse of vehicle some what irregular though, but not so fundamental in nature so as to put an end to the contract-Insurer liable for the damages caused.
15. तसेच मा.सर्वोच्च न्यायालय यांनी 2010 CTJ 485 Amaindo Sahoo V/s Oriental Insurans Co.Ltd. व National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal 2008 CTJ 680 या न्यायिक दृष्टांतामध्ये विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणे देवून विमा दावे नाकारु नये असे मत व्यक्त करण्यात आलेले आहे. विमा कंपनीने दाखल केलेल्या न्यायिक दृष्टांमधील वस्तुस्थिती व सदर तक्रारीतील वस्तुस्थितीत फरक असल्याने सदर न्यायिक दृष्टांत या तक्रारीस लागू होत नाहीत.
16. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या वरील निवाडयातील तत्वे पाहता तक्रारदार यांचा विमा दावा विमा कंपनीने आयोग्य व चुकीचे कारण देऊन नाकारला आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
17. मुद्दा क्र.2- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी झालेला खर्च रु.1,43,610/- व त्यावर दि.16/11/10 पासून 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. विमा कंपनीने सर्व्हेअर श्री.विक्रम पाटील यांचा सर्व्हे रिपोर्ट नि.18/1 वर दाखल केला आहे. सदर अहवाल तज्ञाचा असल्यामुळे रिपोर्टमध्ये दर्शवलेली रक्कम रु.63,365/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.27/04/10 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यासही तक्रारदार पात्र आहे. तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चाची मागणी अवास्तव वाटते. तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2000/- मिळण्यास पात्र आहे.
18. मुद्दा क्र.4-वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2. विरुध्द पक्ष बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास रक्कम रु.63,365/- व त्यावर दि.27/04/10 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
तक्रार क्र.262/10
3. विरुध्द पक्ष बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2000/- या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
|
[HONABLE MR. D. D. Madake] |
PRESIDENT |
|
[HON'ABLE MR. C. M. Yeshirao] |
MEMBER |