::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/03/2015 )
माननिय सदस्या श्रीमती जे.जी. खांडेभराड, यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर फिर्याद प्रकरणात, विरुध्द पक्ष/गैरअर्जदार यांनी, निशाणी-19 प्रमाणे दिनांक 25/04/2014 रोजी फिर्याद प्रकरण नस्ती करणेबाबत अर्ज केला व त्यानुसार मुळ आदेशाप्रमाणे ( तक्रार क्र. 85/2010 ) विरुध्द पक्ष यांना 59,300/- रुपये देणे होते. असे असतांनाही विरुध्द पक्ष यांनी दिनांक 08/03/2011 रोजी 25,000/- व दिनांक 14/03/2012 रोजी 39,661/- असे एकूण 64,661/- रुपये आ. राज्य ग्राहक आयोग यांचेकडे जमा केले. सदर रक्कम ही अपील खारीज झाल्यामुळे तक्रारदाराला वि. राज्य ग्राहक आयोग यांचेकडे रितसर अर्ज करुन व्याजासह काढून घेता येते, असे नमुद केले.
विरुध्द पक्ष यांच्या वरील अर्जावर फिर्यादीचे वकिलांनी दिनांक 27/06/2014 रोजी त्यांचे म्हणणे मांडले.
परंतु त्यानंतर आजतागायत 13 वेळा संधी देऊनही तक्रारकर्ते यांनी त्यांची बाजू मांडली नाही, त्यांच्यातर्फेची कार्यवाही पूर्ण केली नाही. यावरुन फिर्यादी यांना प्रकरणात स्वारस्य उरलेले नाही, असे मंचाचे मत आहे. सबब पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अशास्थितीत, सदर फिर्याद प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर फिर्याद, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर फिर्याद प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svgiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.