जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४४३/२००८
----------------------------------------------
श्री रफीक दस्तगीर मगदूम
रा.कवठेपिरान, ता.मिरज, जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
जयसिंगपूर, शाखा दुधगांव, ता.मिरज जि. सांगली
२. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
जयसिंगपूर तर्फे चेअरमन
श्री अजित आण्णासाहेब देमापुरे
३. श्री शिवाजी कल्लाप्पा घाटे
श्री बाहुबली पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन
(वर नमूद नं.२, ३ यांना श्री बाहुबली जिल्हा
नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जयसिंगपूर
ता.शिरोळ जि.कोल्हापूर, गल्ली नं.९, भिंडी चौक,
जयसिंगपूर या पत्त्यावर नोटीसीची बजावणी व्हावी) .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी संचालक यांना याकामी सामील करणेसाठी तजवीज करणेबाबत दि.२६/११/०९ रोजी अर्ज सादर केला आहे. त्यानंतर कोणत्याही तारखेस तक्रारदार उपस्थित राहिले नाहीत. आज रोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य असल्याचे दिसून येत नाही. सबब प्रस्तुत प्रकरणी काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ३/२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.