जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 566/2010. आदेश पारीत तारीखः- 31/10/2013.
खंडोबा मर्चंट को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
फैजपुर, ता.यावल,जि.जळगांव तर्फे
योगेश पितांबर बोरोले,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.फैजपुर,ता.यावल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. बहीणाबाई महिला नागरी सह.पतसंस्था मर्या,सावदा,
शाखा फैजपुर,ता.यावल,जि.जळगांव व इतर 12 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे डिसेंबर,2010 पासुन सतत गैरहजर. तक्रारदाराने डिसेंबर,2010 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. याकामी आज रोजी नेमलेल्या तारखेसही पुकारा केला असता तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा हक्कास बाधा न येता प्रस्तुत तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 31/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.