जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 204/2011
तक्रार दाखल तारीखः- 30/03/2011
तक्रार निकाल तारीखः-16/01/2013
श्री.प्रल्हाद शेनफडू आटाळे,
वय- 62, धंदा-सेवानिवृत्त,
रा.प्लॉट नं.26,गट नं.111,.
द्वारा – श्री.राजेश प्रल्हाद आटाळे,
रा.प्लॉट नं.26,गट नं.111,जळगांव, ..........तक्रारदार
विरुध्द
1. प्रशासक/अध्यक्ष, ......... विरुध्दपक्ष
श्री.बहीणाबाई चौधरी नागरी सहकारी पतपेढी,असोदा,
ग्रामपंचायत कार्यालयासमोर,वाणीगल्ली,असोदा,
ता व जि. जळगांव.
कोरम –
श्री.डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.अ.श्री.पाटील.
विरुध्दपक्ष तर्फे अड.एन.डी.चौधरी.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावतीमधे गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री.बहीणाबाई चौधरी नागरी सहकारी पतपेढी,असोदा (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
पावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय रक्कम | देय दिनांक |
3463 | 14,766 | 10/06/10 | 14,962 | 26/07/10 |
3. तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन मुदत ठेव पावतीतील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्दपक्ष क्र 1,2 व 9 यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. परतु त्यांनी खुलासा दाखल केला नाही त्यामुळे प्रकरण विनाखुलासा चालवण्याचा आदेश करण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 3 ते 8 व 10 यांची नांवे वगळण्यात यावी असा अर्ज दिल्यामुळे त्यांची नांवे वगळण्यात आले.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावतीची रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीमधील व्याजासह होणारी रक्कम प्रशासक/अध्यक्ष श्री.बहीणाबाई चौधरी नागरी सहकारी पतपेढी,असोदा यांचेकडुन वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्ष प्रशासक/अध्यक्ष श्री.बहीणाबाई चौधरी नागरी सहकारी पतपेढी,असोदा यांचेकडुन पतसंस्थेत जमा असलेली व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द पक्ष श्री.बहीणाबाई चौधरी नागरी सहकारी पतपेढी,असोदा यांनी तक्रारदार यांना वरील निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमेवर देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत तसेच दावा खर्चापोटी रु.500/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- अदा करावेत.
(3) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.