(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून कर्ज घेतले असून, कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतांना देखील त्यांनी गॅरेंटरने हमी म्हणून दिलेला चेक वटविला म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून 25,000/- रुपयाचे कर्ज घेतले आहे. सदरील कर्जाची परतफेड त्यांनी पिग्मी एजंटद्वारे (2) त.क्र.667/10 नियमितपणे करीत असल्याचे म्हटले आहे. दि.02.08.2010 रोजी गैरअर्जदार यांनी कर्जासाठी गॅरेंटर असलेले सय्यद मुनीर यांचा 24,752/- रुपयाचा चेक वटविला. याबाबत त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी मंचात तक्रार दाखल केली असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना संधी देऊनही लेखी जवाब दाखल केला नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द ‘नो से’ चा आदेश पारित करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून 25,000/- रुपयाचे कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी सय्यद मुनीर हे जामिनदार असून, गैरअर्जदार यांनी त्यांच्याकडून कर्जफेडीची हमी म्हणून चेक घेतले आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या खाते उता-यावरुन त्यांनी ऑक्टोबर 2009 ते ऑक्टोबर 2010 या काळात अनेक वेळेस 50/- रुपये रोज याप्रमाणे कर्जफेडीची रक्कम भरली आहे. थकबाकीची रक्कम गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्वसूना न देता किंवा अर्जदाराकडून कर्ज रकमेची मागणी न करता जामिनदाराने हमी म्हणून ठेवलेला चेक वटवून घेतला असल्याची अर्जदाराची तक्रार आहे. गैरअर्जदार यांनी मंचात लेखी जवाब दाखल केलेला नाही. जामिनदाराने हमी म्हणून ठेवलेला चेक पूर्वसूचना न देता गैरअर्जदार यांनी वटविला. ही तक्रार जामिनदाराने करावयास हवी होती. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. आदेश 1) तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |