Maharashtra

Nanded

CC/09/250

Sachin shivprosad darak - Complainant(s)

Versus

bafna motors private ltd.manager - Opp.Party(s)

Adv.anubhav l.donage

20 Mar 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/250
1. Sachin shivprosad darak arvind nagar nanded tq.dist.nandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. bafna motors private ltd.manager degloor road nanded tq.dist.nandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 20 Mar 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/250.
                          प्रकरण दाखल तारीख - 05/11/2009
                          प्रकरण निकाल तारीख 19/03/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
सचिन शिवप्रसाद दरक
वय 36 वर्षे, धंदा व्‍यापार                              अर्जदार
रा. अरविंद नगर, नांदेड
     विरुध्‍द.
1.   बाफना मोटर्स प्रा.लि.
तर्फे मॅनेजर, ऑ.देगलूर रोड, नांदेड.
2.   श्री.बालासरवनन, कन्‍झुमर सपोर्ट,
टाटा मोटर्स,पूणे                                गैरअर्जदार
3.   मॅनेजींग डायरेक्‍टर,
टाटा मोटर्स, अजिंक्‍य मैन्‍सन,
     पहिला मजला, ब्‍लॉक नं.3, पंडिता रमाबाई
रोड, मुंबई -400 007.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.ए.एल.डोणगे पाटील.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील       - अड. पी.एस.भक्‍कड.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकिल       - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - अड.गणेश पी. शिंदे.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
               गैरअर्जदारांच्‍या  सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
                  अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून नवीन टाटा सूमो ग्रॅन्‍डी मॉडेलचे जिप नंबर एम.एच.26-व्‍ही-441 विकत घेतली. गाडी घेतल्‍यापासून वाहनामध्‍ये एअर कंडीशन, डोअर लॉकींग, पिकअप, इंजिनमधून मोठे आवाज येणे, इंजिन लवकर गरम होणे इत्‍यादी तक्रारी उदभवल्‍या होत्‍या. त्‍याबददल अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1
 
 
च्‍या सर्व्‍हीस स्‍टेशन मध्‍ये वाहन दि.11.4.2008,20,6,2008, 12,7,2008, 13,9,2008, 20,10,2008 दूरुस्‍तीसाठी आणले. गैरअर्जदार यांनी ते वाहन दूरुस्‍त करुन दिले पण परत दि.24.3.2009 रोजी परत वाहन खराब झाले म्‍हणून सर्व्‍हीस स्‍टेशनमध्‍ये आणले तेव्‍हा पासून दि.4.4.2009 पर्यत वाहनामधील तक्रार दूरुस्‍त न केल्‍यामूळे दि.4.4.2009 रोजी गैरअर्जदारांना नोटीस देण्‍यात आली. परंतु गैरअर्जदाराने खोटी दूरुस्‍ती करुन वाहन अर्जदारास परत केले. दि.21.9.2009 रोजी चंद्रपूर येथून नांदेड कडे येत असताना अदिलाबाद येथील जंगलामध्‍ये घाटात इंजनमध्‍ये आवाज येऊन गाडी बंद पडली. त्‍यामूळे कूटूंबातील सर्व सदस्‍य सकंटात पडली. त्‍यानतंर दि.21.9.2009 रोजी गैरअर्जदाराने त्‍यांच्‍या मोबाईल व्‍हॅन च्‍या मदतीने वाहन त्‍यांच्‍या नांदेड येथील सर्व्‍हीस स्‍टेशनमध्‍ये आणले. त्‍यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारांनी अर्जदारास नादूरुस्‍त वाहन विक्री करुन ञूटीची सेवा दिली आहे. म्‍हणून त्‍यांची मागणी आहे की, वाहनाची किंमत र.7,32,425/- व त्‍यावर दि.9.4.2008 पासून 15 टक्‍के व्‍याज मिळावे, तसेच वाहन दोषयूक्‍त करण्‍यासाठी 51 दिवसांचे प्रति दिवस रु.750/- प्रमाणे रु.38,290/- व मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.1,00,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मिळावेत.
              गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. हे बरोबर नाही की, वाहनामध्‍ये सूरुवातीपासून दोष होता. अर्जदाराने गाडी विकत घेतल्‍यानंतर पहिल्‍यांदा दि.25.4.2008 रोजी फ्री सर्व्‍हीसिंगसाठी वाहन आणले होते व अर्जदाराला त्‍याच दिवशी फ्री सव्‍हीसिंग करुन देण्‍यात आली. त्‍यावेळेस अर्जदाराने गाडीमधील दोषा बाबत तक्रार केली नाही. अर्जदाराने दि.20.6.2008 व दि.12.7.2008 रोजी जनरल चेकअप साठी वाहन आणले होते. त्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने दि.21.8.2008 व 12.7.2008 रोजी वाहनाचे जनरल चेकअप करुन वाहन अर्जदारास परत दिले.अर्जदारास दि.13.9.2009 रोजी वाहन वर्कशॉपमध्‍ये आणले होते व त्‍यावेळेस त्‍यांनी वाहनाचे डोअर लॉक होत नसल्‍याची तक्रार केली तेव्‍हा लगेच गैरअर्जदाराने डोअर लॉक स्‍टॉयकर बिना मोबदला बदलून दिले व वाहनाची वाशींग करुन दिली. अर्जदाराने दि.20.10.2008 रोजी वाहन आणले होते त्‍यावेळेस त्‍यांनी वाहनाबददल गेअर बदलताना जड जात आहे, समोरच्‍या चाकामध्‍हये आवाज येत आहे, स्‍टेअरिंगमध्‍ये आवाज येत आहे व गाडीत ए.सी. लावल्‍यावर गाडी थंड होण्‍यास वेळ लागत आहे, सदरची तक्रार आल्‍यानंतर गैरअर्जदाराने समोरच्‍या चाकाचे अलनमेंन्‍ट करुन दिले, दरवाजाचे हॅन्‍डल लिंक बदलून दिले, तसेच
 
 
 
इंजिन ऑईल बदलून दिले, समोरच्‍या चाकामध्‍ये कचरा गेलेला असल्‍यामूळे आवाज येत होता तो धूतल्‍यामूळे कमी होऊन गेला. गाडीची ए.सी. तपासून पाहिले व ए.सी. बरोबर चालत असल्‍याचे दिसून आले व अर्जदारास दि.21.10.2008 रोजी वाहन परत केले. अर्जदाराने दि.21.10.2008 रोजी नंतर गाडी दि.24.3.2009 रोजी आणली, दि.21.10.2008 ते 24.03.2009 या काळात वाहनामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा दोष नव्‍हता. दि.24.3.2009 रोजी अर्जदाराने गाडीचे दार उघडते वेळेस आवाज येत आहे व ए.सी. लावल्‍यावर गाडी थंड होत नाही अशी तक्रार केली. गाडी बरोबर न चालवल्‍यास किंवा रस्‍त्‍यातील खडयामध्‍ये आदळल्‍यास गाडीच्‍या दरवाज्‍यामध्‍ये आवाज येऊ शकतो. गैरअर्जदाराने त्‍याच दिवशी दरवाजाचे काम करुन दिले व दरवाज्‍याचा आवाज येणे बंद झाले. गैरअर्जदाराने वाहनाचे ए.सी. यूनिट तपासून पाहिले असता त्‍यामध्‍ये दोष असल्‍याचे दिसून आले. त्‍यामूळे अर्जदारास ए.सी.यूनिट नवीन बसवून देतो पण नवीन यूनिट येण्‍यास विलंब लागतो व ए.सी. यूनिट आल्‍याबरोबर आम्‍ही गाडी बोलावून ए.सी. यूनिट बदलून देऊ तोपर्यत तूम्‍ही गाडी घेऊन जाऊ शकता, पण अर्जदाराने गाडी नेली नाही व ए.सी. यूनिट बदलल्‍यावरच गाडी घेऊन जातो असे सांगितले. त्‍यामूळे गाडी दि.6.4.2009 पर्यत वर्कशॉप उभी होती. गैरअर्जदाराने नवीन ए.सी.यूनिट येताच वॉरंटीमध्‍ये ए.सी. यूनिट बदलून दिले व अर्जदार दि.6.4.2009 रोजी वाहन घेऊन गेले. वाहनाचे काम समाधानकारक झाल्‍याबददल त्‍यांचे प्रतिनीधी श्री. बजाज यांनी लिहून दिले. दि.13.4.2009 रोजी गाडी चालू होण्‍यास ञास देत आहे यासाठी वाहन वर्कशॉपमध्‍ये आणले होते. वाहन तपासून पाहिले असता वाहनाच्‍या पावर रिले मध्‍ये दोष असल्‍याचे दिसून आले. गैरअर्जदाराने पावर रिले नसल्‍यामूळे त्‍यांनी उत्‍पादकाकडे पावर रिलेची मागणी करुन नवीन पावर रिले मागवून वॉरंटीमध्‍ये बदलून दिले.तसेच दि.12.5.2009 रोजी गाडीचे कूलिंग इफेक्‍ट कमी येत आहे या साठी वाहन वर्कशॉप मध्‍ये आणले. त्‍यावेळेस वाहनाचे ए.सी. चे मायक्रो रिले मध्‍ये दोष होता, मायक्रो रिले हा लाईटच्‍या फयूजप्रमाणे असतो. गैरअर्जदाराने त्‍याचदिवशी वॉरंटीमध्‍ये तो बदलून दिला. दि.19.5.2009 रोजी वाहनाच्‍या इंजिनमध्‍ये आवाज येत असल्‍याची तक्रार केली. वाहन हे उमरी येथे उभे होते, गैरअर्जदाराने नांदेड येथून सर्व्‍हीस व्‍हॅन पाठवून गाडी टोचन करुन आणली. वाहनाच्‍या इंजिनच्‍या सिलेंडर बोर मध्‍ये लायनिंग आले होते व त्‍यामूळे इंजिनचा आवाज वाढला होता. वाहनामध्‍ये वापरलेले इंधन मिश्रीत असल्‍यास वाहनाच्‍या सिलेंडर बोरमध्‍ये लायनिंग येऊ शकतात. सदरची बाब गैरअर्जदाराने उत्‍पादकाच्‍या निदर्शनास आणून दिली
 
 
असता त्‍यांनी वाहनाच्‍या इंजिनचे हाफ ब्‍लॉक वॉरंटीमध्‍ये बदलून दिले. त्‍याकरिता विलंब झाल्‍यामूळे सूरुवातीचे चार दिवस सोडून बाकी दिवसाकरिता प्रति दिवस रु.750/-प्रमाणे देण्‍याचे मान्‍य केले. वाहन दि.13.6.2009रोजी तयार झाले त्‍याबददलची लेखी सूचना गैरअर्जदाराने अर्जदारास पञाद्वारे दिली होती. अर्जदाराच्‍या प्रतिनीधीने दि.16.6.2009 रोजी वाहन तपासून वाहनाचे काम समाधानकारक झाल्‍याबददलचे  satisfaction note  लिहून दिले.गैरअर्जदाराने अर्जदारास दि.29.5.2009 रोजी रु.19,500/- देण्‍याकरितार व्‍हाऊचर व चेक क्र.0023587 सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तयार केले पण अर्जदाराने ते घेण्‍यास इन्‍कार केला व अर्जदार म्‍हणाले की आजपर्यत जितके दिवस गाडी आली तितक्‍या दिवसाचे रु.750/- प्रमाणे रक्‍कम दयावी परंतु अर्जदाराची ही मागणी गैरवाजवी असल्‍यामूळे गैरअर्जदाराने रु.19,500/- देण्‍यात येतील असे सांगितले परंतु अर्जदाराने ते घेण्‍यास इन्‍कार केला. सगळे दोष वॉरंटीमध्‍ये अर्जदाराकडून एकही रुपया न घेता काढून देण्‍यात आले आहेत व जे काही पार्टस बदलले ते वॉरंटीमध्‍ये विनामूल्‍य बदलण्‍यात आलेले आहेत. गैरअर्जदाराने अनूचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. गैरअर्जदाराने सर्व्‍हीस व्‍हॅन पाठवून टोचन करुन आणली ही बाब अर्जदारास मान्‍य आहे. वाहनाचे सिलेंडर हेड उत्‍पादकाकडून मागवून नवीन सिलेंडर वॉरंटीमध्‍ये बदलण्‍यात आले व वाहन दि.12.10.2009 रोजी तयार झाली. सदरील वाहनामध्‍हये आता कोणत्‍याही प्रकारचा दोष नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास वारंवार मोबाईलवर वाहन तयार झाले आहे ते घेऊन जा असे सांगितले परंतु अर्जदार वाहन नेण्‍यास आले नाही. म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदारास दि.15.10.2009 व दि.28.10.2009 रोजी नोंदणीकृत पोस्‍टाने पञ पाठवून वाहन नेण्‍याची विनंती केली पण अर्जदार आजपर्यत वाहन घेण्‍यास आले नाही व सदरची खोटी तकार दाखल केली आहे. गैरअर्जदाराने वॉरंटीच्‍या अटी व शर्ती प्रमणे वेळोवेळी वाहनाचे पार्ट बदलून दिले व त्‍याकरिता गैरअर्जदाराने कोणतेही शूल्‍क घेतलेले नाही. अर्जदारास वाहन बदलून देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. वाहन विक्री करीत असताना कोणत्‍याही प्रकारचा दोष नव्‍हता यापूढे सूध्‍दा काही दोष उदभवल्‍यास गैरअर्जदार वॉरंटीच्‍या नियमाप्रमाणे ते दूर करण्‍यास तयार आहेत. म्‍हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस मिळून ते हजर झाले नाही व म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
              गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे विरुध्‍द मागितलेला रिलीफ
 
 
हे ग्राहक संरक्षण कायदयास अनूसरुन नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावे असे म्‍हटले आहे. अर्जदार यांनी हे वाहन व्‍यापारी उदिष्‍टाकरिता खरेदी केले असल्‍याने अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या तक्रारीमधील मजूकर स्‍पष्‍ट नाकारलेला आहे. अर्जदार यांनी वाहन दूरुस्‍तीसाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविले त्‍याबाबत त्‍यांना एकदाही माहीती देण्‍यात आली नाही अथवा कोणती नोटीस पाठविली नाही. वाहनाच्‍या दूरुस्‍तीबददल गैरअर्जदार क्र.1 यांची जबाबदारी असल्‍यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांचा काहीही संबंध नाही. वाहनामध्‍ये ज्‍या समस्‍या होत्‍या त्‍या पूराव्‍याद्वारे अर्जदाराने सिध्‍द केल्‍या पाहिजेत. अर्जदारास मानसिक व शारीरिक ञास झाला हे त्‍यांना मान्‍य नाही. एखादया वाहनामध्‍ये तांञिक बिघाड झाल्‍याचा खाञीलायक पूरावा सादर केल्‍यानंतर जर वाहन वॉरंटीमध्‍ये असेल तर त्‍या वाहनाचा कायमचा दूरुस्‍त न होणारा भाग रितसर बदलून देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांची आहे परंतु त्‍या मोबदल्‍यात नवीन वाहन देणे हे अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍या करार पञात नसल्‍यामूळे अर्जदाराला नवीन वाहन मागण्‍याचा अधिकार नाही. अर्जदाराच्‍या तक्रारीमध्‍ये गैरअर्जदार क्र.3 यांनी निष्‍काळजीपणा केला किंवा जबाबदारी बददल एकही वाक्‍य अर्जामध्‍ये नाही. सदर तक्रारीस गैरअर्जदार क्र.3 यांचा कोणताही संबंध नसल्‍यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
                      अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?       होय,अंशतः
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र.1     ः-
              अर्जदार यांची मूख्‍य तक्रार त्‍यांचे वाहन नंबर एम.एच.-26-व्‍ही-441 हे घेतल्‍यादिवसापासून दोषयूक्‍त आहे व गैरअर्जदार क्र.1 यांनी ते व्‍यवस्थित दूरुस्‍त करुन दिले नाही किंवा गैरअर्जदार क्र.3 यांनी उत्‍पादीत केलेले हे वाहन यात उत्‍पादन दोषच आहे अशी तक्रार केली आहे. आम्‍ही अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व जॉब कार्डस बारकाईने पाहिले असता यात गैरअर्जदार यांनी देखील हे मूळ जॉब कार्डस दाखल केलेले आहेत. वाहन हे
 
 
दि.9.4.2008 रोजी विकत घेतले व यानंतर पहिल्‍यांदा दि.25.4.2008 रोजी फ्री सर्व्‍हीसिंगसाठी आणले. तेव्‍हा गैरअर्जदार क्र.1 यांनी सर्व्‍हीसिंग करुन दिली यावर रेग्‍यूलर सर्व्‍हीसिंग करुन दिली त्‍यावेळेस वाहनात कोणताही दोष नव्‍हता. म्‍हणजे दोषमूक्‍त वाहन होते असे दिसते. यानंतर दि.20.6.2008 रोजी व दि.12.7.2008 रोजी सव्‍हीर्सिग साठी वाहन आणले. हे जॉब कार्ड पाहिले असता यावर जनरल चेकअप असे म्‍हटले आहे. यात कोणत्‍याही प्रकारचा दोष नमूद नाही. वाहन लगेच सर्व्‍हीसिंग करुन दूसरे दिवशी देण्‍यात आले आहे. त्‍यामूळे वाहन घेतल्‍यातारखेपासून दि.20.06.2008 रोजी पर्यत वाहनात कोणताही दोष नव्‍हता व हे फ्रि सर्व्‍हीसिंगमध्‍ये गैरअर्जदार क्र.1 यांनी करुन दिलेले आहे. दि.12.7.2008 रोजीला पेट्रोकिट लिकेज व गीअर शिफट लिव्‍हर अशा दोन तक्रारी होत्‍या. त्‍या गैरअर्जदार क्र.1 यांनी वॉरंटीमध्‍ये विनामूल्‍य दूरुस्‍त करुन दिल्‍या आहेत. यानंतर दि.13.9.2008 रोजीला अर्जदाराच्‍या वाहनाचे डोअरचे लॉक होत नसल्‍याची तक्रार होती. जॉब कार्ड प्रमाणे डोअर लॉक स्‍टॉयकर विना मोबदला बदलून दिलेले आहे. याशिवाय दूसरा कोणताही दोष नव्‍हता. दि.20.10.2008रोजीला गेअर बदलताना जड जात होते. स्‍टेअरिंगमध्‍ये आवाज येत होता, वाहनामध्‍ये ए.सी. लावल्‍यावर वाहन थंड होण्‍यास वेळ लागत आहे अशी तक्रार जॉब कार्ड वर नमूद आहे. यात चाकाचे अलनमेंट करुन दिले व ब्रेक पॅड व स्‍टेअरींग बदलून दिले. अर्जदाराने बदलले पार्टस चेक केल्‍यानंतर त्‍यात दोष नव्‍हता असे दिसते. कारण यात फक्‍त रिचार्ज एवढेच म्‍हटले आहे. वाहनाचे वॉशिंग केल्‍यानंतर वाहनाचे चाकातील कचरा नीघून गेला त्‍यामूळे आवाज बंद झाला. वाहनाची डिलेव्‍हरी ही दि.21.10.2008 ला देण्‍यात आली. दि.21.10.2008 ते दि.24.3.2009 पर्यत कोणतेही जॉब कार्ड दाखल नाही. गैरअर्जदार यांनी लेखी म्‍हणण्‍यात म्‍हटल्‍याप्रमाणे  या आधारावर जवळपास पाच महिने कोणत्‍याही प्रकारचा दोष नव्‍हता. दि.24.3.2009 रोजीला वाहनाचे दार उघडते वेळेस आवाज येत आहे व ए.सी. लागल्‍यावर लवकर थंड होत नाही. ही तक्रार केल्‍यावर त्‍यांचे ए.सी. यूनिट तपासून पाहिले असता त्‍यात दोष असल्‍यामूळे वॉरंटीत ए.सी. यूनिट बदलून दिलेले आहे. ए.सी.यूनिट कंपनीकडून मागवून घेतल्‍याकारणाने त्‍यांस विलंब झालला अशीही कबूली देण्‍यात आलेली आहे. त्‍यामूळे वाहन हे दि.6.4.2009 पर्यत वर्कशॉप मध्‍ये उभे होते. ज्‍या दिवशी अर्जदार हे गाडी घेऊन गेले आमच्‍या मते ए.सी. कंपनीकडून मागवून घेऊन बदलून देण्‍यास थोडा विलंब लागू शकतो. अर्जदारास तोपर्यत विना ए.सी. यूनिटचे वाहन वापरता आले असते परंतु अर्जदाराने असे केल्‍याचे दिसत नाही. यानंतर दि.13.4.2009 रोजीला वाहन
 
 
चालू होण्‍यास ञास देते. ही तक्रार आल्‍यावर वाहन तपासून पाहीली असता वाहनाचे पावर रिले मध्‍ये दोष असल्‍याचे म्‍हटले आहे. हा पार्ट उत्‍पादकाकडून मागवून तो वॉरंटीमध्‍ये विना मोबदला बदलून दिला. याबददल रक्‍कम घेतली नाही. याबददल जॉब कार्ड वर शून्‍य शून्‍य असे दाखवलेले आहे. दि.12.5.2009 रोजीला वाहनाचे कूलिंग इफेक्‍ट कमी असल्‍यामूळे तपासले असता ए.सी.चे मायक्रो रिले मध्‍ये दोष आढळून आला. गैरअर्जदाराने वाहनाचे मायक्रो रिले त्‍याच दिवशी वॉरंटीमध्‍ये बदलून दिले. गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे  इलेक्‍ट्रीक पार्टसची गॅरंटी नसते हे त्‍यांचे म्‍हणणे मान्‍य करण्‍यात येते. दि.16.5.2009 रोजीला वाहन नियमित सर्व्‍हीसिंग करुन दिले त्‍यादिवशी वाहनात दोष नव्‍हता हे जॉब कार्ड दाखवते. यावर फक्‍त व्‍हील अलांयमेट केल्‍याचे दर्शविले आहे व 10,000किलोमिटर वर ऑईल बदलल्‍याचे म्‍हटले आहे. दि.19.5.2009 रोजीला इंजिनमध्‍ये आवाज येत असल्‍याचे सांगितले व गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात वाहन उमरी येथून टोचन करुन आणले व वाहनाच्‍या सिलेंडर हेड मध्‍ये दोष आढळून आला ते उत्‍पादकाकडून मागवून नवीन सिलेंडर हेड वॉरंटीमध्‍ये बदलण्‍यात आले. हा प्रकार इंधन मिश्रीत असल्‍यास असे होऊ शकते असे म्‍हटले आहे. उत्‍पादकास सांगून त्‍यांचे निदर्शना प्रमाणे इंजीनचे हाफ ब्‍लॉक वॉरंटीमध्‍ये बदलून दिले. त्‍यामूळे विलंब झाला यासाठी सूरुवातीचे चार दिवस सोडून प्रति दिवस रु.750/- प्रमाणे  रु.19,500/- देण्‍याची तयारी दर्शविली होती. त्‍यासाठी चेक नबर 0023587 सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा चेक तयार करण्‍यात आला होता. अर्जदाराची मागणी जास्‍त असल्‍यामूळे त्‍यांनी तो स्विकारला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या नांवे गाडी तयार असल्‍याबददल दोन नोटीस पाठविल्‍या आहेत. वाहन हे आजही पूर्ण तयार होऊन वर्कशॉपला उभे आहे. या सर्व जॉब कार्ड वरुन एक गोष्‍ट निदर्शनास आली की, अर्जदार यांनी जेव्‍हा जेव्‍हा त्‍यांचे वाहन वर्कशॉपला आणले तेव्‍हा तेव्‍हा गैरअर्जदार क्र.1 यांनी पूर्ण विनामोबदला दूरुस्‍त करुन अर्जदाराचे वाहन दोषयूक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. परंतु एकंदर वाहनात छोटया मोठया सारख्‍या तक्रारी येत होत्‍या हे दिसून येते. यात ब-याच गोष्‍टी येतात. याप्रमाणे अर्जदाराने वाहन कशा रस्‍त्‍यावर वापरले, रस्‍त्‍या कशा प्रकारचा होता. म्‍हणजे खराब रस्‍ता होता काय, त्‍यामूळे वाहनाचे दरवाजे खराब होऊ शकतात, वाहनामध्‍ये इंधन कशा प्रकारचे घातले, ते जरी मिश्रीत असले तर मशीन खराब होऊ शकते, अशा अनेक बाबी येऊ शकतात. गैरअर्जदार क्र.3 यांनी वाहनात दोष असल्‍याबददलचे स्‍पष्‍टपणे नाकारलले आहे. परंतु उत्‍पादक कंपनीने देखील इंजिनचे हॉफ हे दूरुस्‍त करु देण्‍यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांना मंजूरी दिलेली
 
 
आहे. सूरुवातीस सहा महिने वाहनात दोष नव्‍हता, दोष हा दि.24.3.2009 रोजी पासून सूरु झाला. यात अर्जदार यांनी वाहन कशा प्रकारे हाताळले ही बाब मूख्‍यतः विचारात घेतली पाहिजे. म्‍हणजे साधारणतः एक वर्ष वाहन व्‍यवस्थित चालले, कमीअधिक छोटयामोठया तक्रारी या वाहन चालवित असताना येत असतात. वाहन हे 18000 किलोमिटर पेक्षा जास्‍त चालल्‍यानंतर आता नवीन वाहन बदलून दया असे म्‍हणणे संयूक्‍तीक वाटत नाही. आजही गैरअर्जदार क्र.1 हे वॉरंटीमध्‍ये अजून काही दोष जर येत असेल तर विनामोबदला ते दूरुस्‍त करुन देण्‍यास तयार आहेत. दि.06.04.2009,16.6.2009 व दि.12.10.2009 रोजी वाहन तपासून अर्जदाराच्‍या प्रतिनीधीने सही करुन वाहन समाधानकारक दूरुस्‍त झाल्‍याबददल म्‍हटले आहे, तसा पूरावा पण दाखल केलेला आहे. यांस अर्जदार यांनी नकार दिलेला नाही.
 
              गैरअर्जदार यांनी IV (2008) CPJ 47 Ramesh Chandra Vs. Maruti Udyog Ltd. & another यात इंजीन जाम झाले होते व उत्‍पादन दोष होता. हे इंजीन विनामोबदला दूरुस्‍त करु देण्‍यात आले. नवीन गाडी बदलून देण्‍यात आलेली नाही.
              II CPJ (2005) 553 Maruti Udyog Ltd anr. Vs. Rathinaduri  यात देखील उत्‍पादन दोष आढळला नाही. तज्ञाचा पूरावा नाही. म्‍हणून गैंरअर्जदार यांचे हक्‍कात निकाल दिला आहे.
              III (2008) CP[J 216 Mahindra & Mahindra limited Vs. Ranvijay Singh & ors. उत्‍पादन दोष आहे असे म्‍हटले आहे. वाहन 42124 किलोमिटर चालले, इंजीनमध्‍ये बीघाड होता असे सांगण्‍यात आले. यात देखील यांचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यात आलेले नाही.   गैरअर्जदाराच्‍या हक्‍कात आदेश करण्‍यात आला.
              IV (2006) CPJ 257 (NC) R. Baskar Vs. D.N. Udani & ors.  यात वाहनामध्‍ये उत्‍पादन दोष आहे हे सिध्‍द झाले नाही. वाहन हे दिड वर्ष वापरले गेले व 10,000किलोमिटरच्‍या वर चालले आहे.  त्‍यामूळे उत्‍पादन दोष आहे असे म्‍हणता येणार नाही.  अर्जदार वाहन घेण्‍यास नकार जरी देत असले तरी देखील वाहनाची किंमत किंवा नवीन वाहन बदलून दिल्‍या जाऊ शकत नाही असे म्‍हटले आहे.
              I (2006) CPJ 3 (NC)   Maruti Udyog Ltd. Vs. Susheel Kumar Gabgotra & another. यात क्‍लचमध्‍ये उत्‍पादन दोष होता व तो वॉरंटीत होता त्‍यामूळे ते बदलून देण्‍यात आले. त्‍यामूळे अर्जदार यांचे वाहन बदलून देण्‍याची विनंती अमान्‍य करण्‍यात आली. वॉरंटीमध्‍ये निकामी भाग बदलून देण्‍यात आले.
 
              सूप्रिम कोर्ट Variava S.N. & Sema H.K., JJ. Vs. Jose Philip Mampilli    यात वाहनाचे डिलेव्‍हरीचे वेळी वाहनात दोष नव्‍हता हा दोष नंतर निघाला. त्‍यात वाहनाचा निष्‍काळजीपणे वापर केला गेला. त्‍यामूळे पिस्‍टन रिंग गेले. यात तेवढाच भाग वॉरंटीमध्‍ये बदलून देण्‍याचे आदेश करण्‍यात आलेले आहेत.
              हे सर्व सायटेशन पाहिले असता अर्जदाराने वाहन कशा प्रकारे हाताळले, रस्‍त्‍याची कंडीशन या सर्व बाबी यासाठी जबाबदार आहेत. या सायटेशन प्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी वेळावेळी वॉरंटीमध्‍ये विनामोबदला सर्व दोष काढलेले आहेत. त्‍यामूळे अर्जदार यांची नवीन वाहन बदलून देण्‍याची मागणी मान्‍य करता येणार नाही.
                    वरील सर्व बाबी बारकाईने पाहिल्‍यानंतर असे लक्षात येते की, वाहनात कमीअधिक दोष आले व गैरअर्जदार क्र.1 यांनी आता वाहनात कोणताही दोष नाही असे म्‍हटले आहे. त्‍यामूळे अर्जदाराने त्‍यांचे वाहन तपासून घेतले पाहिजे. यापूर्वी वाहन पूर्ण चेक करुन त्‍यात कोणताही दोष नाही यांची खाञी करुन घेण्‍यास हरकत नाही. अर्जदार यांनी थोडाबहूत ञास झालेला आहे परंतु त्‍या मागे अनेक कारणे आहेत. यात खोलात गेल्‍यास यात कोणाची चूक आहे हे सिध्‍द होणे अवघड आहे.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                         आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचे वाहन क्र.एम.एच.-26-व्‍ही-441 हे परत एकदा इंजीन व बॉडीसह बारकाईने तपासून त्‍यात आवश्‍यक असेल तर विनामोबदला पार्ट बदलून ते पूर्णतः दोषमूक्‍त करुन अर्जदारास त्‍या वाहनाचे ट्रायल देऊन ते वाहन त्‍यांचे स्‍वाधीन करावे.
3.                                         गैरअर्जदार क्र.1 यांनी कबूल केल्‍याप्रमाणे रु.19,500/- अर्जदार यांना दयावेत
4.                                         अर्जदारास झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2000/- गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी एकञित व संयूक्‍तीकरित्‍या दयावेत.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                                                                श्री.सतीश सामते     
            अध्‍यक्ष                                                                                                                    सदस्‍य