जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/35. प्रकरण दाखल तारीख - 01/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्रीमती लक्ष्मीबाई आत्माराम देशमूख वय 35 वर्षे, धंदा शेती व घरकाम अर्जदार रा. ढोसणी ता. देगलूर जि. नांदेड विरुध्द. 1. विभागीय प्रमुख, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 2. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा अधिकारी, मूंबई कार्यालय डिव्हीजन नंब.09, कर्मर्शियल युनियन हाऊस, एक्सीलर थिएटरच्या बाजूस, 9वॅलेस स्टिट, फोर्ट, मुंबई 400 001. 3. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय देगलूर ता.देगलूर जि. नांदेड. 4. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, नगिना घाट,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ऐ.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 4 तर्फे वकिल - अड. एम.बी.टेळकीकर गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ही मयत आत्माराम विठठलराव देशमूख यांची पत्नी आहे. मयत आत्माराम हे त्यांची शेत जमिन गट नंबर 25/अ मौजे बळेगांव येथे शेती करीत होते. सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक दि.10.10.2006 रोजी मयत हे विजेचा शॉक लागून मरण पावले. अपघात मृत्यू म्हणून घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन देगलूर ता.देगलूर येथे गून्हा नंबर 45/2006 कलम 174 सीआरपीसी अंतर्गत नोंद केली. अर्जदार हे मयत आत्माराम यांची पत्नी असल्यामूळे ती वारस आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन गैरअर्जदार क्र.1 मार्फत विमा पॉलिसी घेतली. कबाल इन्शुरन्स ही विमा सल्ला देणारी कंपनी आहे व ते शासन व विमा कंपनी यामधील दूवा आहेत. म्हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे प्रपोजल गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे रितसर क्लेम फॉर्मसह पाठविले असता सदरील गैरअर्जदार क्र.1 व 2 यांने गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे लेखी पञ पाठविले ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.3 यांना त्यांनी माहीती दिली की अर्जदाराचा सदरचा क्लेम हा विमा योजनच्या कक्षेत बसत नाही कारण The person deceased have no Name in 7/12 असा अभिप्राय पाठविला आहे. म्हणून त्यांची मागणी आहे की, त्यांना विम्याची रक्कम रु,1,00,000/- व त्यावर 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्कम मानधन म्हणून देखील स्विकारत नाहीत. त्यामूळे त्यांचे विरुध्द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्लेम त्यांचेकडे दि.15.01.2006 रोजी तहसिलदार यांचेकडून आला व तो नॅशनल इन्शूरन्स कंपनी मुंबई यांचेकडे दि.25.6.2007 रोजी सेंटलमेंट साठी पाठविण्यात आला. त्यामूळे त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दचा दावा खारीज करावा. गैरअर्जदार क्र.2 व 4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे एकञितरित्या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी ही अटी व शर्ती वर दिल्या जाते. अर्जदार यांनी ते शेतकरी असल्याबददल व व शेती त्यांचे नांवावर असल्याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही.हे शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्यांनी काढली आहे हे त्यांना मान्य नाही. अर्जदार ही मयत आत्माराम यांची पत्नी असल्याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्यांना अमान्य आहे. मयत आत्माराम दि.10.10.2006 रोजी विजेचा शॉक लागून मरण पावला हे त्यांना मान्य नाही. अर्जदार यांनी पोलिस पेपर व इतर कागदपञ हे सांक्षाकीत दाखल केलेले नाही फक्त झेराक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.अर्जदार यांनी मयताचे नांवाचा 7/12 दाखल केलेला नाही. मयत अर्जदार यांनी पॉलिसीच्या नियम व अटीचे पालन केलेले नाही. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस अर्जदाराच्या नांवाने शेती नव्हती.त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले पण त्यांनी जवाब दाखल केला नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी त्यांचा मयत आत्माराम यांचा दि.10.10.2006 रोजी सुमारे 11.30 वाजता विजेचा शॉक लागून मृत्यू झाला म्हणजे त्यांचा अपघातात मृत्यू झाला असे म्हटले आहे. या बददलचा पूरावा म्हणून दि20.12.2006 रोजीचा घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेसट पंचनामा, पोलिस स्टेशन, देगलूर यांचा एफ.आय.आर., दाखल आहे. यात डॉक्टरच्या मते My opinion cause of death is Cardiorest arrest due to electrical shock असे स्पष्ट दिलेले आहे. त्यामूळे मृत्यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. पोलिस स्टेशन देगलूर येथे गून्हा नोंदविण्यात आलेला आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे.अर्जदार यांचे नांवे जमिन असल्याबददल 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्याबददल त्यांच्या नांवाचा 7/12 व गांव नमूना 8-अ दाखल आहे. याप्रमाणे 1.10 हेक्टर ही जमिन बळेगांव ता.देगलूर येथे आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांनी मयत आत्माराम यांचा विमा प्रस्ताव आला असून त्यासोबत खालील कागदपञ जसे पी.एम. रिपोर्ट, वयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर. , एमएसईबी चा रिपोर्ट, इत्यादी कागदपञ मागितले आहेत. वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहे. मयताचे पत्नी लक्ष्मीबाई अर्जदारा व मयताचा मूलगा गजानन, साविञिबाई मूलगी, व समिञाबाई मूलगी हे वारस आहेत. मयताचे निवडणूक आयोगाचे ओळखपञ दाखल केलेले आहे. मृत्यूनंतर दाव्यासाठी क्लेम फॉर्म पूर्ण भरुन घेऊन तहसीलदार यांना दिल्याची नोंद आहे. नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांनी अर्जदार यांस कागदपञ दयावेत ज्यामूळे क्लेम निकाली काढणे शक्य होईल असे पञ दिलेले आहे. तसेच दि.08.02.2007 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी तहसीलदार देगलूर यांना पञ देऊन मयत आत्माराम यांचा विमा प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कागदपञाची मागणी केली आहे. दि.10.10.2006 रोजीला अपघात झाला. तहसीलदार देगलूर यांना कळविण्यात आले. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्यांना शासनाच्या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्यानंतर ते दूखात असतात. त्यामूळे जबाबदारीने क्लेम दाखल करणे शक्य नसते. म्हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्यास शासनाने परिपञका प्रमाणे क्लेम वेळेत दाखल करणे आवश्यक असले तरी हे बंधनकारक नाही त्यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्पष्ट म्हटले आहे. शेतक-याचा मृत्यू अपघाती झाला हे स्पष्ट आहे त्यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहिजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. विम्याची रक्कम ही मयताच्या पत्नीस मिळाली पाहिजे, त्यामूळे अर्जदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.07.12.2007 पासून 9 टक्के व्याजासह पूर्ण रक्कम वसूल होईलपर्यत व्याजासहीत दयावेत. 3. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- दयावेत. 4. गैरअर्जदार क्र.1 व 3 विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |