Maharashtra

Nanded

CC/08/126

Balaprasad Durgaprasad Agarwal - Complainant(s)

Versus

Baburao Rangrao Kadam - Opp.Party(s)

Pradeep G Barhalikar

19 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/126
1. Balaprasad Durgaprasad Agarwal R/o 3-6-760-C-4, Suvarna Sudha Apartment, Street no 13, Himayatnagar, Hyderabad-29HyderabadAndhra Pradesh ...........Appellant(s)

Versus.
1. Baburao Rangrao Kadam Gajanan Enterprises, Janai, Vasant nagar, NandedNandedMaharastra2. Prof B M GaikawadGajanan Enterprises, R/o Balaji Niwas, Naike nagar, NandedNandedMaharastra3. The Manager, Gajanan EnterprisesR/o Opposite Rajarshi High School, Vasant nagar, NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 19 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.126/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  27/03/2008.
                          प्रकरण निकाल दिनांक 19/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                 मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
                
 
बालाप्रसाद दूर्गाप्रसाद अग्रवाल                                
वय वर्षे 59, व्‍यवसाय धंदा,
रा. घर नंबर 356-760-सी-4,
सूवर्णा सूधा अपार्टमेंट, स्‍टीट नंबर13,
हिमायतनगर, हैद्राबाद-29
जि.हैद्राबाद (आंध्र प्रदेश)                                    अर्जदार
 
विरुध्‍द
 
1.   प्रो.बाबूराव रंगराव कदम
     गजानन इंटरप्रायजेस, जनाई,
     वसंत नगर, नांदेड.
2.   प्रो.बी.एम.गायकवाड
     गजानन इंटरप्रायजेस, बालाजी निवास
     नाईक नगर, नांदेड.                         गैरअर्जदार
3.   व्‍यवस्‍थापक,
     पूडंलीक चंदर पाटील,
     गजानन इंटरप्रायजेस, राजश्री हायस्‍कूल,
     वसंत नगर नांदेड.
अर्जदारा तर्फे.           - अड.पी.जी.बा-हाळीकर
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.डि.एफ.हरदळकर
गैरअर्जदार क्र.3 तर्फे     -   कोणीही हजर नाही.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
               गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली यामूळे अर्जदाराने नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून ही तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, गैरअर्जदार क्र.1 यांनी प्‍लॉट विक्रीची स्‍कीम काढली होती. त्‍यांनी 30 x  50 साईजचे गोपाल गॅरेज नांदेड यांचे पाठीमागे प्‍लॉट विक्री साठी काढले होते. त्‍यांचे फर्मचे नांव गजानन इंटरप्रायजेस होते. अर्जदार यांनी रु.11/- भरुन मेंबर झाले होते. एका प्‍लॉटचे रु.250/- प्रमाणे 30 हप्‍त्‍याचे रु.7500/- गैरअर्जदार क्र.1 कडे भरले होते. ते पैसे गैरअर्जदार क्र.3 हे नेहमी अर्जदारांच्‍या घरी येऊन घेऊन जात होते व त्‍यांना पावती देत होते त्‍या पावत्‍या तक्रारीसोबत दाखल आहेत. अर्जदाराने दि.09.09.1983 पासून ते दि.14.01.1985 पर्यत सतरा पावत्‍या रेग्‍यूलर भरल्‍या व 18,19,20 व 21 चे पैसे एकदम दि.15.05.1985 रोजी रु.1000/- भरले तसेच 22,23,24,व 25 ची रक्‍कम दि.12.09.1986 रोजी रु.1000/- भरले व 26 व 27 चे अनूक्रमे दि.15.10.1986 रोजी व दि.14.11.1986 रोजी भरले व शेवटचे 28,29, व 30 चा हप्‍ता गैरअर्जदार हे दि.27.02.1987 रोजी घेऊन गेले.   सर्व पावत्‍या मंचात तक्रारीसोबत दाखल आहेत. नजरचूकीने अर्जदाराने रु.1,000/- चा चेक गजानन इंटरप्रायजेस ला वैश्‍य बँकेचा दिला तो त्‍यांनी जमा करुन घेतला. एका प्‍लॉटचे सर्व हप्‍ते गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून घेतले. त्‍यानंतर अर्जदारानी प्‍लॉटची मागणी केली असता त्‍यांनी एन. ऐ., लेआऊट राहीले म्‍हणून टाळाटाळ केली.  ठरल्‍याप्रमाणे त्‍यांनी 30 50 प्‍लॉटची गोपाल गॅरेज नांदेड च्‍या पाठीमागील प्‍लॉटची मागणी केली असता त्‍यांनी एन.ऐ लेआऊट व हाऊस लोन रक्‍कम मिळाल्‍यानंतर प्‍लॉट देऊ असे सांगितले. नंतर वर्ष,2006 मध्‍ये अर्जदार हे गैरअर्जदाराकडे गेले व त्‍यांनी प्‍लॉटचे कागदपञ व ताबा मागितला असता त्‍यांना प्‍लॉट देण्‍यास व रक्‍कमही देण्‍यास नकार दिला. अर्जदारानी फसवणूकीचा गून्‍हा पोलिस स्‍टेशन शिवाजी नगर येथे गैरअर्जदारांविरुध्‍द दि.22.07.2006 रोजी दाखल केला. त्‍यानंतर दि.05.09.2006 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारांस वकिलामार्फत नोटीस दिली. नोटीस मिळाल्‍यानंतर त्‍यांचे उत्‍तर गैरअर्जदारांनी वकिलामार्फत दिले व अर्जदाराच्‍या सर्व गोष्‍टी नाकारल्‍या.  त्‍यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदारांनी 30   50 चा प्‍लॉट गोपाल गॅरेज नांदेड च्‍या पाठीमागील अर्जदारांच्‍या नांवे कागदपञासह दयावा अगर रु.3,00,000/- प्‍लॉटची आजची किंमत दयावी. तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी व दाव्‍याच्‍या खर्चापोटी रु.1,00,000/- दयावेत.
              गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने केलेली तक्रार ही खोटी व बनावट आहे. त्‍यांने कोणताही प्‍लॉट देण्‍याचे म्‍हटले नव्‍हते. रु.250/- महिनेवारी भरावयाचे ठरले होते पण ते महिन्‍याचे 10 तारखेच्‍या आधी भरावयाचे ठरले होते एक जर हप्‍ता सोडला तर अर्जदाराने सर्व हप्‍ते 10 तारखेच्‍या नंतर भरलेले आहेत.  नियमानुसार रक्‍कम भरल्‍यास प्‍लॉट देण्‍यात येईल व नियमानुसार रक्‍कम न भरल्‍यास प्‍लॉट देण्‍यात येणार नाही असे ठरले होते. अर्जदाराने दर्शवलेली तारीख व पावती क्रंमाक बरोबर नाहीत. अर्जदाराने फक्‍त रु.6511/- एवढयाच रक्‍कमेचा भरणा केलेला आहे. रक्‍कमेचे 30 हप्‍ते भरलेल्‍या सभासदाना प्‍लॉट देण्‍यात आलेला आहे ज्‍यांनी पूर्ण हप्‍ते भरलेले नाहीत त्‍यांना प्‍लॉट देण्‍यात आलेला नाही. सदरील फर्म दि.10.03.1986 रोजी बंद झालेला आहे त्‍यामूळे अर्जदाराचे सभासदत्‍व रदद झालेले आहे. अर्जदाराने नियमानुसार 30 हप्‍ते भरलेले नाहीत त्‍यामूळे त्‍यांना प्‍लॉट व प्‍लॉटचे कागदपञ देण्‍याचा संबंध येत नाही.    अर्जदार हे गैरअर्जदारास कधीही येऊन भेटलेले नाहीत व प्‍लॉट, पेपरबाबत व ताब्‍या बाबत कधीही चर्चा झालेली नाही. अर्जदाराने पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार केल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी पोलिस स्‍टेशनला सर्व रेकार्ड दिलेले आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांची कोणतीही चूक नसल्‍याचे त्‍यांचे निदर्शनास आले होते त्‍यामूळे पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. अर्जदाराने वकिलामार्फत दिलेल्‍या नोटीसीला गैरअर्जदाराने उत्‍तर दिलेले आहे. स्‍कीम ची रक्‍कम फर्मच्‍या नियमानुसार न भरल्‍यामूळे अर्जदाराचे सभासदत्‍व रदद करण्‍यात आलेले आहे त्‍यामूळे कागदपञ देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. सदर घटनेस अर्जदार स्‍वतः जबाबदार आहे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा यामध्‍ये काहीही दोष नाही. त्‍यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कोणताही ञूटी केलेली नाही. तसेच अर्जदाराने स्‍वतःच फर्मच्‍या नियमाचे पालन केलेले नाही त्‍यामूळे ते स्‍वतः जबाबदार आहे. त्‍यामूळे त्‍यांना प्‍लॉट व त्‍यांचे कागदपञ मागण्‍याचा अधिकार नाही व रु.3,00,000/- मागण्‍याचा व रु.1,00,000/- मागण्‍याचा अधिकार नाही. तसेच सदरील तक्रार ही मंचाच्‍या कालवधीत बसत नाही म्‍हणून तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदाराचे रु.6511/- जमा आहेत व फर्मच्‍या नियमानुसार 50 टक्‍के रक्‍कम रु.3256/- देण्‍याचा आदेश मंचाने केल्‍यास तेवढी रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार तयार आहेत. चूकीची तक्रार दाखल केल्‍यामूळे गैरअर्जदारास झालेल्‍या ञासाबददल अर्जदाराने रु.1,00,000/- व झालेला खर्च रु.20,000/- दयावा व तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र.3 यांना  पेपर जाहीर प्रगटन देण्‍यात आले तरीही गैरअर्जदार क्र.3 हे मंचात हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
                अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच दि.20.11.1987 ची पावती, बाबूराव गायकवाडे यांचे शपथपञ,गजानन इंटरप्रायजेसच्‍या पावत्‍या, सौदा चिठठी, सभासदाची यादी, प्‍लॉटचा नकाशा दवाखान्‍यात शरीक असल्‍याचे डॉक्‍टराचे प्रमाणपञ,इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहेत. तसेच त्‍यांनी रजिस्‍ट्रेशन रदद केलयाचे प्रमाणपञ, बाबूराव गायकवाड यांचे शपथपञ, भागीदारीपञ, पार्टनरच्‍या नांवाने चालन रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या, सभासदांना रक्‍कम परत केल्‍याच्‍या पावत्‍या इत्‍यादी कागदपञ दाखल केली आहेत.
 
              दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?           होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                           होय.
                           
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.     
                   कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे प्‍लॉट स्‍कीम पोटी रक्‍कम भरली आहे आणि सदर रक्‍कम भरल्‍यापोटी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पावती ही दिलेली आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात येते.
 
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार हे गैरअर्जदार गजानन इंटरप्रायजेस या लक्‍की स्‍कीम मध्‍ये भाग घेण्‍यासाठी रक्‍कम रु.11/- भरुन सभासद झालेले आहेत ही बाब दाखल कागदपञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. गैरअर्जदार यांची स्‍कीम ही प्‍लॉट संदर्भात असल्‍याने अर्जदार यांनी वेळोवेळी गैरअर्जदार यांचेकडे रक्‍कम रु.250/- चे हप्‍ते प्रमाणे रक्‍कम भरलेली आहे. त्‍यामध्‍ये अनूक्रमे दि.9.9.1983 रोजी रु.261/-, दि.13.10.1983 रोजी रु.250/-,दि.13.,11,1983 रोजी रु.250/-, दि.14.12.1983 रोजी रु.250/-, दि.12.01.1984 रोजी रु.250/-, दि.15.02.1984 रोजी रु.250/-, दि.13.03.1984 रोजी रु.250/-,दि.15.04.1984 रोजी रु.250/-, दि.17.5.1984 रोजी रु.250/-,दि.15.06.1984 रोजी रु.250/-,दि.20.07.1984 रोजी रु.250/-,दि.15.09.1984 रोजी रु.500/-, दि.15.11.1984 रोजी रु.500/-, दि.15.05.1984 रोजी रु.1000/-, दि.12.09.1986 रोजी रु.1,000/-, दि.27.2.1987 रोजी रु.720/- व दि.12.09.1986 रोजी चेकने रक्‍कम रु.1000/- भरल्‍याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये अर्जदार यांनी प्रत्‍येक हप्‍ता 10 तारखेच्‍या आत भरला नाही असे नमूद केले आहे परंतु गैरअर्जदार यांनी त्‍या बाबत कोणतीही सूचना अर्जदार यांना दिल्‍या बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचात दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी भरलेला प्रत्‍येक हप्‍ता गैरअर्जदार यांनी वेगवेगळया दिनांकाला स्विकारलेला आहे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांचे सभासदत्‍व दि.10.03.1986 रोजीला रदद झाल्‍याचे म्‍हटले आहे परंतु अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पावत्‍यावर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून दि.12.09.1986 रोजी रक्‍कम रु.1,000/- दि.17.09.1987 रोजी रु.720/- व दि.12.09.1986 रोजी रक्‍कम रु.1000/- चेकने जमा करुन घेतलले आहेत. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे सभासदत्‍व दि.10.03.1986 रोजी रदद झालेले आहे या म्‍हणण्‍यास कोणताच अर्थ उरत नाही. अर्जदार यांचे सभासदत्‍व दि.10.03.1986 रोजी रदद झाले असेल तर गैरअर्जदार यांनी त्‍यानंतरही अर्जदार यांचेकडून प्‍लॉटचे स्‍कीमपोटी रक्‍कम जमा करुन घेऊन त्‍यांना पावतीही दिलेली आहे. ही बाब दाखल कागदपञावरुन स्‍पष्‍ट होत आहे.
              अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पावत्‍यावरुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रु.7481/- ही रक्‍कम जमा केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे व सदरची रक्‍कम ही आजअखेर गैरअर्जदार यांचेकडेच दि.27.09.1987 रोजी शेवटचा हप्‍ता भरलेल्‍या तारखेपासून जमा आहे. सदरची रक्‍कम गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना परत केली नाही अगर सदरची रक्‍कम परत घेऊन जाण्‍या बाबत कूठलाही पञव्‍यवहार अर्जदार यांचेकडे केलेला नाही. म्‍हणजेच अर्जदार यांची रक्‍कम आजअखेर गैरअर्जदार यांचेकडे जमा आहे. त्‍यामूळे घटना ही चालू आहे (Cause of action continues) त्‍यामूळे सदर अर्जास मूदतीची बाधा येत नाही.
 
            याकामी AIR 1968 (SC) page no.1413 हे निकालपञ आणि 2002 (II) CPR page no.28 National Commission या वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपञाचा आधार घेता येईल.
 
               गैरअर्जदार यांचेकडे अर्जदार यांनी भरलेल्‍या शेवटच्‍या हप्‍त्‍यापासून आज अखेर रक्‍कम जमा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून स्‍कीमपोटी रक्‍कम जमा करुन घेऊन अर्जदार यांनी प्‍लॉट वाटप केलेले नाही. अगर अर्जदार यांची रक्‍कमही अर्जदार यांनी परत केलेली नाही. यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे.
            अर्जदार यांची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे दि.27.09.1987 पासून नाहक पडून आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना प्‍लॉटही दिला नाही अगर त्‍यांनी प्‍लॉटपोटी जमा केलेली रक्‍कम अर्जदार यांना मागणी करुनही दिलेली नाही. त्‍यामूळे अर्जदार यांना सदरची रक्‍कम मिळण्‍यासाठी या मंचामध्‍ये अर्ज करावा लागला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्‍यामूळे अर्जदार हे मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
              गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये अर्जदार यांनी भरलेल्‍या रक्‍कमेपैकी फर्मच्‍या नियमानुसार 50 टक्‍के रक्‍कम परत देण्‍यास तयार आहेत असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या स्‍कीमच्‍या नियम व अटी मध्‍ये सभासदाने किमान दहा हप्‍ते भरल्‍यास व पुढे भरणे बंद केल्‍यास भरलेल्‍या रक्‍कमेतून 50 टक्‍के रक्‍कम कमी करुन बाकी रक्‍कम योजनेच्‍या शेवटी परत मिळेल परंतु दहा पेक्षा कमी हप्‍ते भरल्‍यास रक्‍कम परत मिळणार नाही परंतु प्रत्‍यक्ष अर्जदार यांनी 10 हप्‍त्‍यापेक्षा जास्‍त हप्‍ते भरल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यामूळे अर्जदार हे त्‍यांनी भरलेली पूर्ण रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
 
                 अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
          वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                            आदेश
 
1.                 अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
          आज पासुन 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.
2.                रक्‍कम रु.7481/- व सदर रक्‍कमेवर दि.27.02.1987 पासुन 9 टक्‍के दराने व्‍याज पूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यत दयावे.
3.                 मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1000/- दयावेत.
4.                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)      (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्‍यक्ष.                               सदस्या                   सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.