Maharashtra

DCF, South Mumbai

147/2007

Mr. Anil Agarwal - Complainant(s)

Versus

B.E.S.T Undertaking - Opp.Party(s)

Geeta Handa Khanuja

16 Oct 2010

ORDER

 
Complaint Case No. 147/2007
 
1. Mr. Anil Agarwal
Jaihind Bldg.,No. 2 B,4th floor, Block No. 5,Bhuleshwar,Mumbai-400002 Mumbai
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. B.E.S.T Undertaking
B.E.S.T Bhavan,B.E.S.T. Marg,Colaba Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. JUSTICE Shri S B Dhumal PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri.S.S.Patil MEMBER
 
PRESENT:
तक्रारदारतर्फे वकील श्रीमती गीता हंडा हजर.
......for the Complainant
 
सामनेवालातर्फे वकील श्री.केतकर हजर.
......for the Opp. Party
ORDER

द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष

1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
    तक्रारदारांचे वडील कापडाचा व्यापार तक्रारअर्जात नमूद केलेल्या गाळा नं.5, भुवलेश्वर, मुंबई-2 येथे करीत होते. तक्रारदारांचे वडिलांनी सामनेवाला यांचेकडून वरील गाळयामध्ये विद्युत पुरवठा घेतला होता व त्याचा मीटर तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर होता. तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्‍यू दि.17/08/2004 रोजी झाला. वडिलांच्या मृत्‍यूनंतर तक्रारदार सदरचा गाळा त्यांच्या व्यावसायासाठी वापरतात.

2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना वरील विद्युत पुरवठा मीटर नं.E-845665चे दिनांक 08/05/01 ते 02/03/07 चे दिलेल्‍या विद्युत बिलांचा तपशिल तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘C’ ला दाखल केला आहे व त्‍यासोबत विद्युत बिलांच्‍या छायांकित प्रती सादर केल्‍या आहेत. सन् 2003 मध्‍ये तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे अर्ज करुन विद्युत भार वाढविण्‍यात यावा अशी विनंती केली. त्‍याप्रमाणे विद्युत भार 0 ते 4.26 kw.ने वाढविण्‍यात आला. तक्रारदारांना वरील गाळयामध्‍ये वातानुकुलीत यंत्रे बसवायची होती म्‍हणून विद्युत भार वाढविण्‍यात आला. विद्युत भार वाढला त्‍यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारांचा मीटर क्रमांक बदलून तो B014589 असा केला. वर नमूद बिले मीटर रिडींग प्रमाणे देण्‍यात आली नव्‍हती. दि.16/04/03 ते 16/06/03 या कालावधीचे दि.21/07/03 रोजी दिलेल्‍या विद्युत बिलामध्‍ये मीटर रिडींग निरंक/कमी वापर अशी नोंद करणेत आली. वरीलप्रमाणे बिल दि.14/08/03 ते 15/10/03 या कालावधीसाठी दिले होते. तक्रारदारांनी वरील बिलांचा तपशिल तक्रारअर्जातील परिच्‍छेद क्र.13 मध्‍ये दिलेला आहे. सामनेवाला यांनी दिलेल्‍या विद्युत बिलांचा भरणा तक्रारदारांनी नियमितपणे केलेला आहे.
 

3) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.10/05/2007 रोजी सामनेवाला यांचे अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांनी अचानकपणे तक्रारदारांच्‍या वरील जागेत धाड टाकली व तक्रारदारांच्‍या वरील मीटरमध्‍ये मुद्दाम बिघाड निर्माण केला असा आरोप करुन रक्‍कम रु.3,23,772/- ची मागणी तक्रारदारांकडून केली व त्‍यासोबत कंम्‍पाऊंडींग चार्जेसपोटी रक्‍कम रु.41,500/- ची मागणी केली. सदर रक्‍कम ताबडतोब भरावी असा तकादा सामनेवाला यांनी लावला. तक्रारदारांना अटक करण्‍याची धमकी देऊन तक्रारदारांच्‍या अनेक को-या कागदावर सहया घेतल्‍या तसेच दि.14/01/2005 चे स्‍टॅम्‍प पेपरवर तक्रारदारांना धमकी देवून त्‍यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे मजकूर लिहिण्‍यास भाग पाडले. तथाकथीत हमी पत्रातील मजकूर तक्रारदारांनी तक्रारअर्जातील पृष्‍ठ क्र.17 मध्‍ये नमूद केला आहे. सदर मजकूरामध्‍ये सामनेवाला यांचे दक्षता पथकाने दि.10/05/07 रोजी अचानकपणे धाड टाकली त्‍यावेळी मीटरमध्‍ये मुद्दामहून बिघाड केल्‍याचे निदर्शनास आले ही बाब तक्रारदारांना बळजबरीने लिहिण्‍यास भाग पाडले तसेच तक्रारदारांकडून दक्षता पथकाने विद्युत बिलापोटी रक्‍कम रु.50,000/- चा धनादेश घेतला व पुढील तारीखचे इतर धनादेश घेतले असे नमूद केले आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांच्‍या दक्षता पथकाने त्‍यांना धमकी देवून रु.50,000/- चा दि.10/05/07 चा धनादेश घेतला असून तथाकथीत हमीपत्रामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे पुढील तारखेचे काही धनादेश घेतले आहेत. वरीलप्रमाणे धनादेश घेवून सुध्‍दा दक्षता पथकाने तक्रारदारांनी विजेची चोरी केली म्‍हणून तक्रारदारांविरुध्‍द इंडियन इलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 चे कलम 135/138 प्रमाणे गुन्‍हा दाखल केला.
 
4) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सदर इमारतीचा वॉचनम श्री.राजेश मिश्रा यांनी तक्रारदारांना सांगितले की, सामनेवाला यांचे अधिकारी सदर इमारीतमध्‍ये धाड टाकण्‍यास आले तेंव्‍हा विद्युत मीटरच्‍या बॉक्‍सची किल्‍ली मागितली. त्‍यापैकी एका अधिका-याने मीटरचे सील तोडले त्‍यावेळी सदर वॉचमनला इतर अधिका-यांनी ताबडतोब जाण्‍यास भाग पाडले. सदर वॉचमनने त्‍यानंतर लेखी तक्रार सोसायटीकडे दाखल केली व त्‍याची एक प्रत सामनेवाला यांचे मुख्‍य अभियंता, दक्षता विभाग, श्री.एस्.जी.घोष यांना पाठविली. सदर तक्रारअर्जाची प्रत तक्रारदारांनी नि.‘G’ला सादर केली आहे.
 
5) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना मुद्दामहून विजेची चोरी केली अशा खोटया केसमध्‍ये अडकवून त्‍यांचेकडून त्‍यांना दम देवून पैसे उकळविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. वास्‍तविक सामनेवाला यांनी बसविलेल्‍या विद्युत मिटरमध्‍ये आपोआप बिघाड झाल्‍यामुळे सामनेवाला यांनी त्‍यांना ब-याच मोठया कालावधीसाठी सरासरी वापराच्‍या आधारावर विजेची बिले दिली होती. दि.11/05/07 रोजी तक्रारदारांच्‍या परवानगीशिवाय नवीन मीटर सामनेवाला यांचे अधिका-यांनी बसविला. सामनेवाला यांनी विद्युत बिलांपोटी केलेली रक्‍कमेची मागणी चुकीची असून ती मुदतीत नसल्‍यामुळे सामनेवाला यांना वरील रक्‍कम वसुल करता येणार नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या दक्षता पथकाने दि.10/05/2007 रोजी रक्‍कम रु.3,65,272/- च्‍या वसुलीसाठी दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे असे जाहीर करावे अशी विनंती या मंचास केली आहे. तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई म्‍हणून व या अर्जाच्‍या खर्चापोटी एकूण रक्‍कम रु.1,00,000/- द्यावेत असा सामनेवाला यांना आदेश द्यावा तसेच, सामनेवाला यांनी या तक्रारअर्जाचा निकाल लागेपर्यंत तक्रारदारांच्‍या विद्युत पुरवठयात अडथळा आणू नये अशी त्‍यांना ताकीद द्यावी अशी मंचास विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाच्‍या पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले असून स्‍थगितीसाठी वेगळा अर्ज दिलेला आहे. तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रांची छायांकित प्रती दाखल केल्‍या आहेत.
 
6) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारअर्जात करण्‍यात आलेले सर्व आरोप चुकीचे व खोटे असून व तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे असे म्‍हटले आहे. सामनेवाला यांचे सेवेत कसलीही कमतरता नाही. तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 प्रमाणे सामनेवाला यांचा ग्राहक आहे असा कोणताही पुरावा तक्रारदारांनी दिलेला नाही. सबब तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचासमोर चालू शकत नाही. ईलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 व त्‍या अंतर्गत नमूद करणेत आलेल्‍या नियमानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना नोटीस दिलेली आहे. सदर नोटीसनुसार सामनेवाला यांचे दक्षता पथकाने तक्रारदारांच्‍या विद्युत मीटरची अचानक पाहणी केली त्‍यावेळी सदर मीटरमध्‍ये तक्रारदारांनी मुद्दामहून बिघाड केल्‍याचे आढळून आले. तक्रारदारांनी विजेची चोरी केल्‍यामुळे सामनेवाला यांचे नुकसान झाले आहे. ईलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट, 2003 चे कलम 154 प्रमाणे मा.उच्‍च न्‍यायालयाने विजेच्‍या चोरी बाबतचे खटले चालविण्‍यासंबंधी विशेष न्‍यायालयाची नेमणूक केलेली असून फक्‍त्‍ा विशेष न्‍यायालयातच अशा प्रकारचे खटले चालविता येतील. ग्राहक मंचास इलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 मधील कलम 105 read with 138, 150 मधील बाबींसंबंधीचे खटले चालविण्‍याचा अधिकार नाही. सबब तक्रारअर्ज खर्चासहित काढून टाकावा असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे.
 
7) सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारअर्जात सामनेवालाविरुध्‍द नमूद केलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे असून तक्रारदारांनी मुद्दामहून सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे, तक्रारअर्जात नमूद केलेले विद्युत कनेक्‍शन हे मयत श्री.रोशनलाल अगरवाल यांचे नांवाने आहे. सदरचे विद्युत कनेक्‍शन श्री.रोशनलाल अगरवाल यांनी व्‍यावसायिक कारणाठी घेतले होते व त्‍याचा मीटर नं.E-845665 असा होता. मूळ ग्राहकाने विद्युत भार वाढविण्‍यासाठी सन् 2003 मध्‍ये अर्ज केला होता व त्‍या अर्जाच्‍या अनुषंगाने विद्युत भार 0 ते 4.26 kw. ने वाढविण्‍यात आला. नवीन विज मीटर क्र.B-014589 बसविण्‍यात आला. सदरचा मीटर विद्युत भाराची नोंद योग्‍य रितीने करीत नव्‍हता म्‍हणून सामनेवाला यांचे अधिका-यांनी काही कालावधीमध्‍ये तक्रारदारांच्‍या मीटरचे निरीक्षण केले. सदर विद्युत मीटरमध्‍ये बिघाड निर्माण केल्‍याचा संशय आल्‍याने सामनेवाला यांचे दक्षता पथकाने दि.10/05/2007 रोजी धाड टाकून सदर मीटरची पाहणी केली त्‍यावेळी सदर मीटरमध्‍ये मुद्दामहून खालील प्रमाणे बिघाड केल्‍याचे त्‍यांना आढळून आले-
1) सदर मीटरचा टर्मिनल ब्‍लॉक सील आढळून आला नाही.
2) मीटर आवरणाच्‍या दोन्‍ही प्‍लॅस्‍टीक सीलमध्‍ये बिघाड केल्‍याचे निदर्शनास आले.
3) मीटर विद्युत वापराची नोंद घेत नव्‍हता.
4) मीटर उघडून पाहणी केली असता डिस्‍क शॉफ्ट हा काऊंटर ऍसेम्‍बलीपासून वेगळा केल्‍याचे निदर्शनास आले.
 
           तक्रारदारांना वरील गोष्‍टी समक्ष दाखविण्‍यात आल्‍या व त्‍याचा खुलासा करण्‍याची तक्रारदारांना संधी दिली. तक्रारदारांनी विज चोरीचा गुन्‍हा मान्‍य केला व त्‍यामुळे सामनेवाला यांचे झालेले नुकसान भरुन देण्‍याचे मान्‍य केले. दक्षता पथकाने ताबडतोब तक्रारदारांना नोटीस बजावून रक्‍कम रु.3,23,772/- ची मागणी केली. सदरची मागणी तसेच कंम्‍पाऊंडींग चार्जेस म्‍हणून रक्‍कम रु.41,500/- ची मागणी केली. सदरची मागणी तसेच कंम्‍पाऊंडींग चार्जेस रक्‍कम रु.41,500/- लागतील असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले. तक्रारदारांनी वरील मागणीपोटी दिलेल्‍या धनादेशातील तपशिल सामनेवाला यांनी कैफीतीमध्‍ये नमूद केला आहे. तक्रारदारांनी कंम्‍पाऊंडींग चार्जेसपोटी रक्‍कम रु.41,500/- देवू केल्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांविरुध्‍द फौजदारी खटला दाखल केला नाही असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. तथापि, तक्रारदारांनी दिलेले 3 धनादेश बँकेने वटविण्‍याचे नाकारले. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी ईलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 चे कलम 135/138 प्रमाणे विजेची चोरी केली असा आरोप तक्रारदारांविरुध्‍द केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी केलेले सर्व आरोप नाकारलेले असून तक्रारदारांनी विज चोरी केलेली असल्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचास चालविणेचा अधिकार नाही, सबब सदरचा तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा असे म्‍हटले आहे.
 
8) तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या स्‍थगिती अर्जावर या मंचाने दि.16/08/2007 रोजी या अर्जाची चौकशी होईपर्यंत वस्‍तुस्थितीत बदल करु नये असा अंतरिम आदेश दिला होता. त्‍यानंतर सामनेवाला यांनी विद्युत पुरवठा खंडित केला असा अर्ज तक्रारदारांनी दि.18/06/2010 रोजी दाखल केला. तथापि, सदर अर्ज चौकशीपूर्वीच सामनेवाला यांनी विद्युत पुरवठा सुरु केल्‍यामुळे तक्रारदारांनी सदरचा अर्ज चालविणेचा नाही असे सांगितले.
 
9) तक्रारदारांतर्फे वकील श्रीमती गीता हंडा खानुजा व सामनेवालातर्फे वकील श्री.ए.बी.केतकर यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी विजेची चोरी केली असल्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज या मंचास चा‍लविता येणार नाही त्‍यामुळे तक्रारअर्ज काढून टाकण्‍यात यावा. उलटपक्षी तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यापमाणे तक्रारदारांनी विजेची चोरी केली नसून सदरचा अर्ज या मंचास चालविणेचा अधिकार आहे तसेच, तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेल्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याचा या मंचास अधिकार आहे असेही प्रतिपादन केले.
 
10) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
 
मुद्दा क्र.1 - सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचास चालविणेचा अधिकार आहेकाय ?
उत्तर      -नाही.
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात नमूद केल्‍याप्रमाणे दाद मागता येईल काय ?
उत्तर     -  नाही.
 
कारणमिमांसा
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्र.1 - तक्रारदारांचे वकील श्रीमती गीता खानुजा यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या गाळयामध्‍ये बसविलेला मीटर क्र.E-845665 योग्‍य त-हेने विज वापराची नोंद करीत नव्‍हता या तथाकथीत कारणावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.16/04/2003 रोजी विजेच्‍या सर्वसाधारण वापरावर (on average basis) आधारीत विद्युत बिले दिली होती ती नियमितपणे तक्रारदार भरीत होते. असे असताना दि.10/05/07 रोजी सामनेवाला यांचे दक्षता पथकाने अचानकपणे तक्रारदारांच्‍या मीटरची तपासणी केली तथापि, तक्रारदारांच्‍या मीटर बॉक्‍स ठिकाणी जावून सामनेवाला यांचे पथकातील काही कर्मचा-यांनी मुद्दामहून मीटरमध्‍ये बिघाड केला. नंतर त्‍या पथकातला अधिकारी व इतर कर्मचा-यांनी तक्रारदारांना अटक करण्‍याची धमकी दिली. तक्रारदारांनी मुद्दामहून मीटरमध्‍ये बिघाड करुन विजेची चोरी केली असा खोटा आरोप केला व तक्रारदारांचेकडून रक्‍कम रु.3,23,772/- ची मागणी केली तसेच, कंम्‍पाऊंडींग चार्जेस रु.41,500/- ची मागणी केली. तक्रारदारांना दमदाटी देवून दि.14/01/05 चे तथाकथीत हमी पत्र लिहून घेतले. त्‍यामध्‍ये लिहिलेला मजमूर खोटा असून तक्रारदारांना धमकी देवून सामनेवाला यांचे अधिका-यांनी तक्रारदारांकडून वरील रकमेचे काही धनादेश घेतले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी विद्युत चोरी केली असा आरोप करुन इडियन इलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 चे कलम 135/138 प्रमाणे गुन्‍हा केल्‍याचा खोटा आरोप केला आहे म्‍हणून तक्रारदारांनी सदर तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांच्‍या दक्षता पथकाला दि.10/05/2007 रोजी दिलेली नोटीस व त्‍यामध्‍ये नमूद केलेली रक्‍कम रु.3,65,272/- ची मागणी चुकीची आहे असे जाहीर करुन ती रद्द करणेत यावी तसेच तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,00,000/- नुकसानभरपाई म्‍हणून सामनेवाला यांचेकडून देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असून ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे या मंचास वरील दाद तक्रारदारांना देता येईल असे तक्रारदारांच्‍या वतीने सांगण्‍यात आले.
 
           सामनेवाला यांचे वकील श्री.केतकर यांनी तक्रारदारांनी विजेची चोरी केलेली असल्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज या मंचास चालविणेचा अधिकार नाही असे सांगितले. या कामी तक्रारदारांचा मीटर विज वापर कमी दाखवित असताना सामनेवाला यांचे अधिकारी वेळोवेळी मीटरचे निरीक्षण करीत होते व मीटरमध्‍ये बिघाड करुन विजेची चोरी केली जात आहे असा संशय निर्माण झाला म्‍हणून सामनेवाला यांचे पथकाने दि.10/05/07 रोजी अचानकपणे धाड घालून तक्रारदारांच्‍या विद्युत मीटरची तक्रारदारांसमक्ष पाहणी केली त्‍यावेळी सदर मीटर संबंधीत खालील गोष्‍टी आढळून आल्‍या -
 
1) सदर मीटरचा टर्मिनल ब्‍लॉक सील आढळून आला नाही.
2) मीटर आवरणाच्‍या दोन्‍ही प्‍लॅस्‍टीक सीलमध्‍ये बिघाड केल्‍याचे निदर्शनासआले.
3) मीटर विद्युत वापराची नोंद घेत नव्‍हता.
4) मीटर उघडून पाहणी केली असता डिस्‍क शॉफ्ट हा काऊंटर ऍसेम्‍बलीपासून वेगळा केल्‍याचे निदर्शनास आले.
 
           तक्रारदारांना वरील गोष्‍टी समक्ष दाखविण्‍यात आल्‍या व त्‍यापोटी खुलासा करण्‍याची तक्रारदारांना संधी दिली. तक्रारदारांनी विज चोरी केली आहे व तसे हमीपत्रामध्‍ये लिहून दिले आहे. तक्रारदारांनी विजेची चोरी केल्‍यामुळे सामनेवाला यांचे नुकसान झाले त्‍यामुळे अंदाजे रक्‍कम रु.3,23,772/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून करणेत आली तसेच कंम्‍पाऊंडींग चार्जेस म्‍हणून रक्‍कम रु.41,500/- ठरविण्‍यात आले. तक्रारदारांनी विजेची चोरी केली हे मान्‍य करुन कंम्‍पाऊंडींग चार्जेस देण्‍याची तयार दाखविली व तसेच रक्‍कम रु.50,000/- चा धनादेश ताबडतोब दिला व उर्वरित रकमेचे पुढील तारखेचे धनादेश दिले. तक्रारदारांनी तक्रारअर्जात सामनेवाला यांनी दिलेली दि.10/05/2007 ची नोटीस रद्द करावी अशी मागणी केली आहे. तक्रारदारांनी विजेची चोरी केली असून सामनेवाला यांचेविरुध्‍द मुद्दाम खोटे आरोप केले आहेत, अशा परिस्थितीत तक्रारदारांनी केलेली मागणी मान्‍य करता येणार नाही. तक्रारदारांनी विजेची चोरी केलेली असल्‍यामुळे या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविण्‍याचा अधिकार नाही असे सांगितले. सामनेवाला यांचे वकील श्री.केतकर यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या दि.28/04/2006 च्‍या Civil Appeal No.2325 of 2006 Haryana State Electricity Board V/s.Mam Chand या निकालाचा आधार घेतला आहे. वरील निकालामध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने सदरचे सिव्‍हील अपिल हे मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोगाला परत पाठवून व ईलेक्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 या कायदयातील तरतूदी विचारात घेवून निकाल द्यावा असा आदेश दिला. वकील श्री.केतकर यांनी ‍मा.राष्‍ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेAccount Officer, Jharkahand State Electricity Board & Asstt. Electrical Engineer, Jharkahnd State Electricity Board V/s. Anwar Ali, Proprietor, M/s.Pinki Plastic Industrial Area AND The Executive Engineer, Gujarat Electricity Board and Deputy Engineer, Gujarat Electricity Board V/s. Madresa Abriyah Talimul Muslin Min, Gujarat.या निकालाचा आधार घेतला. वरील निकालामध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोगाने असे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की,“Consumer Fora have no jurisdiction to interfere with the initiation of criminal proceedings or the final order passed by any Special Court constituted under Section 153 or the civil liability determined under Seciton 154 of the Electricity Act.”
 
          वकील श्री.केतकर यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांचे रिव्‍हीजन पिटीशन नं.51 व 52/2009 मधील दि.13/04/2009 च्‍या आदेशाची छायांकित निदर्शनास आणून मा.राज्‍य आयोगाने वर नमूद केलेल्‍या मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या Account Officer, Jharkahand State Electricity Board.... या निकालाचा आधार घेवून वरील रिव्‍हीजन पिटीशनमध्‍ये आदेश पारित केल्‍याचे निदर्शनास आणले.
 
       तक्रारदारांच्‍या वकीलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी वाढीव दराने केलेली विद्युत बिलांची मागणी चुकीची असून त्‍याबद्दल या मंचासमोर दाद मागितली आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे संबंधीत मीटर तक्रारदारांचे मयत वडिल श्री.रोशनलाल अगरवाल यांच्‍या नांवावर आहे. श्री.रोशनलाल अगरवाल मयत असून तक्रारदार प्रत्‍यक्ष त्‍या मीटरवरुन विजेचा वापर व्‍यावसायीक कारणासाठी करतात. विजेचे मीटर तक्रारदारांच्‍या नांवे नसल्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे म्‍हणता येणार नाही तसेच, सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर प्रलंबित असताना तक्रारदारांनी सदरचा मीटर श्रीमती.अंजना गोयल यांचे नांवे करण्‍यासाठी दि.01/12/09 रोजी अर्ज दिला होता. सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालू असल्‍याचे व त्‍यामधील कोणत्‍याही अंतरिम आदेशाची माहिती सामनेवाला यांचे संबंधीत विभागास न देता सदरचा मीटर श्रीमती.अंजना गोयल यांचे नांवे दि.02/12/09 रोजी वर्ग करुन घेतला. त्‍यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज चालविता येणार नाही. सामनेवाला यांचे वकीलांनी दि.10/05/2007 रोजी दक्षता विभागाने तक्रारदारांना दिलेल्‍या नोटीसीची प्रत निदर्शनास आणली. सदरची नोटीसीची प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.’F’ला जोडली आहे. सदरची नोटीस सामनेवाला यांचे दक्षता पथकाने विजेच्‍या चोरी प्रकरणी तक्रारदारांना दिली आहे. सदर नोटीसीमध्‍ये तक्रारदारांनी विजेची चोरी केली आहे असे स्‍पष्‍टपणे म्‍हटले असून सदर विजेची चोरी इडियन ईले‍क्‍ट्रीसीटी अक्‍ट,2003 चे कलम 135/138 प्रमाणे तो गुन्‍हा आहे असे स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे. वरील नोटीसमध्‍ये सिव्‍हील लायब्‍लीटी म्‍हणून अंदाजित रक्‍कम रु.3,23,772/- ची मागणी तक्रारदारांचेकडून करण्‍यात आली आहे. तक्रारदारांनी वरील नोटीस बेकायदेशीर आहे व ती रद्द करणेत यावी अशी या मंचाकडे विनंती केली आहे. वर नमूद केलेली मा.राष्‍ट्रीय आयोग Account Officer, Jharkahand State Electricity Board.... या निकालानुसार या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नाही असे दिसून येते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी देणेत येते.
 
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्र.2 - या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नसल्‍यामुळे तक्रारदारांनी तक्रारअर्जात मागितलेली दाद या मंचास देता येणार नाही सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नाकारार्थी देणेत येते.
या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नसल्‍यामुळे प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
 
अं ति म आ दे श


 

1.तक्रार क्रमांक 147/2007 खर्चासहित रद्द करणेत येत आहे.
2. सदर आदेशाची प्रमाणित उभय पक्षकारांना देणेत यावी.
 
 
[HON'ABLE MR. JUSTICE Shri S B Dhumal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri.S.S.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.