// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 01/2015
दाखल दिनांक : 03/01/2015
निर्णय दिनांक : 19/05/2015
निलेश राजेंद्रजी राका
वय 40 वर्षे व्यवसाय – व्यापार
रा. 132, शारदा नगर, अमरावती
ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- शाखा व्यवस्थापक
अॅक्सीस बॅंक, शाखा गुलशन टॉवर,
जयस्तंभ चौक, अमरावती
- व्यवस्थापक,
अॅक्सीस बॅंक लिमीटेड, असेटस् सेल सेंटर
एम.जी. हाऊस, तळमजला, बोर्ड ऑफीस जवळ,
रविंद्रनाथ टागोर रोड, सिव्हील लाईन,
- महाव्यवस्थापक,
अॅक्सीस बॅंक लिमीटेड,
- , 3 रा माळा, समर्थेश्वर मंदीराजवळ,
लॉ गार्डन, एलीसबिज,
अहमदाबाद 06 : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. एम.एस. चांडक
विरुध्दपक्ष तर्फे : अॅड. कलोती
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 19/05/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने विरुध्दपक्षाकडून रु. १,१०,००,०००/- चे कर्ज दि. ९.११.२०१२ रोजी घेतले होते, त्याची परतफेड १८० हप्त्या मध्ये करावयाची होती. तक्रारदाराने त्याची मिळकत या कर्जासाठी विरुध्दपक्षाकडे गहाण ठेवली होती. तक्रारदाराने कर्जाची परतफेड ही १८ महिन्यातच केली व मिळकतीचे गहाण त्याला सोडवावयाचे होते (Foreclosed. विरुध्दपक्षाने दि. ८.५.२०१४ रोजी तक्रारदाराला नादेय प्रमाणपत्र दिले.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दि. ५.६.२०१२ रोजी सर्क्युलर काढले ज्यात दि. १७.४.२०१२ नंतर कर्ज घेतले असल्यास 2 टक्के रक्कम ही जर गहाण मिळकतीबाबत घेतलेल्या कर्जाची परतफेड मुदतीपुर्वी केली असेल तर माफ करावी असे होते. तक्रारदाराने दि. ११.४.२०१४ रोजी
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..3..
विरुध्दपक्षाला पत्र देवून गहाण मुदती पुर्वी सोडण्यासाठी जी रक्कम विरुध्दपक्षाने घेतली (Foreclosure) चार्जेस परत मिळण्याची विनंती केली. त्यानंतर विरुध्दपक्षाने दि. २९.४.२०१४ ला तक्रारदार यांना रु. २७,६५१/- चा धनादेश तक्रारदाराकडून घेतलेल्या जास्तीच्या रक्कमे पोटी परतफेडी बाबत दिले. त्यानंतर तक्रारदाराने दि. १४.५.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना पत्र देवून रिझर्व्ह बॅंकेच्या सर्क्युलर प्रमाणे मुदती पुर्वी गहाण सोडविणे संबंधी जे चार्जेस विरुध्दपक्षाने घेतले ते परत करण्याची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने त्यावर योग्य ती कार्यवाही न करता ती रक्कम तक्रारदाराला परत केली नाही त्यामुळे तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 6 मध्ये नमूद केल्या प्रमाणे एकूण रक्कम रु. २,९१,२५७/- त्यावर १८ टक्के व्याजासह विरुध्दपक्षाने परत करावे अशी विनंती या तक्रार अर्जात तक्रारदाराने केली.
4. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 12 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, त्यांनी तक्रारदारास रु. १,१०,००,०००/- चे टर्म लोन मंजूर केले होते, परंतु त्यांच्या कथनाप्रमाणे हे कर्ज व्यावसायीक कारणासाठी देण्यात आलेले असल्याने तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होत नाही. तक्रारदाराने करुन दिलेला करारनामातील अट क्र. 21 नुसार विरुध्दपक्षाने कर्जाची परतफेड मुदतीपुर्वी करण्यात आल्याने ज्यानुसार जे चार्जेस
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..4..
येतात ते घेतलेले आहे, ते तक्रारदार यास परत मिळू शकत नाही. तक्रारदाराचे दि. ११.४.२०१४ चे पत्र मिळाले त्यास लगेच उत्तर देण्यात आले. तक्रारदाराने दि. १५.४.२०१४ रोजी कर्जाची परतफेड मुदतीपुर्वी केल्याने त्याचे खाते दि. १६.४.२०१४ रोजी बंद करण्यात आले व त्यानंतर रु. २७,६५१/- चा धनादेश तक्रारदाराला पाठविल्यावर ते दि. २६.४.२०१४ रोजी अंतीमतः बंद करण्यात आले. तक्रारदाराला दि. ८.५.२०१४ रोजी नादेय प्रमाणपत्र देण्यात आले होते. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या अधिका-याने दिलेल्या पत्राबाबत विरुध्दपक्षाचे कथन असे आहे की, ते पत्र विरुध्दपक्षाच्या लेटरहेडवर नसुन संबंधित अधिकारी याला तसे देण्याचे अधिकार नव्हते.
5. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सर्क्युलरचा तक्रारदाराने आधार घेतला आहे. त्यानुसार विरुध्दपक्षाचे कथन असे आहे की, ते सर्क्युलर हे गृह कर्जाचे आहे, तक्रारदाराने व्यावसायीक कारणासाठी टर्म लोन घेतल्याने ते सर्क्युलर येथे उपयोगाचे नाही. विरुध्दपक्षाने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
6. तक्रारदाराने निशाणी 15 ला प्रतिउत्तर दाखल केले.
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..5..
7. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. चांडक व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. कलोती यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रार अर्ज, लेखी जबाब, प्रतिउत्तर व दाखल दस्तऐवज विचारात घेवून खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक
आहे का ? .... नाही
- तक्रारदार हा भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या
दि. ५.६.२०१२ च्या सर्क्युलर प्रमाणे फायदा
मिळण्यास पात्र आहे का ? .... नाही
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली
आहे का ? नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
8. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. कलोती यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराला जे टर्म लोन विरुध्दपक्षाने मंजूर केले होते ते व्यावसायीक उपयोगासाठी असणा-या मिळकती बाबत होते. त्यामुळे कर्जाचा उपयोग हा व्यावसायीक कारणासाठी घेण्यात आलेला असल्याने तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..6..
नाही. यासाठी (1) Maya Engineering Works //Vs// ICICI Bank Ltd. IV (2014) CPJ 777 (NC) (2) Birla Technologies Ltd. //Vs// Neutral Glass and Allied Industries Ltd. 2010 DGLS (Soft.) 980 (SC) या दोन निकालाचा आधार घेतला.
9. तक्रारदाराने निशाणी 2 सोबत टर्म लोन बाबत विरुध्दपक्षा सोबत जो करार झाला होता त्याची प्रत दाखल केली. त्यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदाराने हे कर्ज व्यावसायीक कामासाठी उपयोगात येणा-या मिळकतीबाबत घेतले होते. विरुध्दपक्षाने निशाणी 13/2 सोबत जे दस्त दाखल केले त्यात कर्ज ज्या कारणासाठी घेतले ते कारण व्यावसायीक मिळकत असे दाखविलेले आहे. यावरुन हे सिध्द होते की, तक्रारदाराने जे कर्ज घेतले ते व्यावसायीक कारणासाठी घेतले होते. अॅड. श्री. कलोती यांनी ज्या निकालाचा आधार घेतला ते विचारात घेता तसेच वरील नमूद बाबी वरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. यावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
10. तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून कर्ज घेतले होते ज्याची परतफेड 180 हप्त्यात करावयाची होती, परंतु तक्रारदाराने 18 हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड मुदतीपुर्वी केली. भारतीय रिझर्व्ह
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..7..
बॅकेच्या दि. ५.६.२०१२ च्या सर्क्युलरचा आधार तक्रारदाराने घेतला आहे. त्याची प्रत निशाणी 2/13 ला दाखल आहे. त्यावरुन असे दिसते की, त्या सर्क्युलरचा फायदा हा गृह कर्ज घेणा-या वैयक्तीक कर्जदारास मिळणार होता. या सर्क्युलर प्रमाणे कर्जाची परतफेड मुदतीपुर्वी केल्यास कोणतीही पेनॉल्टी लावता येणार नव्हती. या सर्क्युलरचा फायदा तक्रारदार याला मिळू शकतो का ते पाहावे लागेल. सदरचे सर्क्युलर हे गृह कर्जाचे आहे. तक्रारदाराने घेतलेले कर्ज हे गृह कर्ज नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या करारनाम्यावरुन हे स्पष्ट होते. त्यामुळे ते वैयक्तीक कर्ज आहे असे स्विकारता येत नाही. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या दि. ७.५.२०१४ च्या सर्क्युलरचा आधार तक्रारदाराने घेतलेला आहे ज्याची प्रत निशाणी 2/14 ला दाखल केली असून त्यात दि. ५.६.२०१२ च्या सर्क्युलरचा उल्लेख आहे त्यात असे नमूद आहे की, वैयक्तीकरित्या टर्म लोन घेणा-या कर्जदारास दि. ५.६.२०१२ चे सर्क्युलर लागु होईल परंतु त्यात असे नमूद नाही की, जर कर्जाची परतफेड दि. ७.५.२०१४ पूर्वी केलेली असेल तर अशा कर्जदारास या सर्क्युलरचा फायदा होईल. दि. ७.५.२०१४ चे सर्क्युलर प्रमाणे वैयक्तीक कर्जदारास फायदा द्यावयाचा होता. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारा सोबत इतर 3 कर्जदार आहेत. त्यामुळे या सर्क्युलरचा फायदा तक्रारदाराला मिळू शकत नाही. दुसरे कारण असे की, तक्रारदाराने दि. ११.४.२०१४
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..8..
रोजी मुदत पुर्वी कर्जाची परतफेड केलेली असल्याने त्याचे कर्ज खाते हे दि. १६.४.२०१४ रोजी बंद करण्यात आले व त्यानंतर जास्तीची रक्कम रु. २७,६५१/- चा धनादेश विरुध्दपक्षाने तक्रारदाराला देवून दि. २६.४२०१४ रोजी अंतीमतः तक्रारदाराचे कर्ज खाते बंद केले. अशा परिस्थितीत दि. ७.५.२०१४ च्या सर्क्युलरचा उपयोग तक्रारदाराला मिळू शकतो ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही.
11. कर्जाबाबत जो करारनामा झाला तो त्यातील अट क्र. 21 नुसार जर कर्जाची परतफेड ही मुदतपुर्वी केली असेल तर मुदतीपूर्वी गहाण सोडविण्यासाठी लागणारे चार्जेस करीता तक्रारदार हा जबाबदार राहील ही बाब तक्रारदाराने विरुध्दपक्षाच्या करारनाम्यात स्विकृत केलेली आहे, ही बाब तक्रारदाराच्या विरुध्द जाणारी आहे.
12. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. चांडक यांनी असा युक्तीवाद जरी केला असेल की, विरुध्दपक्षाने दि. ८.५.२०१४ रोजी नादेय प्रमाणपत्र दिल्याने तक्रारदाराचे कर्ज खाते हे त्या दिवशी बंद होत असल्याने दि. ७.५.२०१४ च्या सर्क्युलरचा फायदा तक्रारदारास मिळू शकतो. परंतु हा युक्तीवाद स्विकारता येत नाही. कारण तक्रारदाराचे कर्ज खाते हे अंतीमतः दि. २६.४.२०१४ रोजी बंद करण्यात आले होते. वर नमूद कारणावरुन विरुध्दपक्षाने सेवेत
ग्राहक तक्रार क्रमांकः 01/2015
..9..
कोणतीही त्रुटी केली नाही. तक्रारदार हा भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या दि. ५.६.२०१२ च्या सर्क्युलरचा फायदा त्याला मिळू शकत नाही असा निष्कर्ष काढण्यात येतो. सबब मुद्दा क्र. 2 व 3 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते. वर नमुद मुद्दाला उत्तरावरुन हा तक्रार अर्ज खालील आदेशा प्रमाणे नामंजूर करण्यात येतेा.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 19/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष