तक्रारदार : वकील श्रीमती. सुषमा देशमुख हजर.
सा.वाले क्र. 1 : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.डी. मडके , अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तकारदार यांचे सारस्वत बँक, शाखा गोरेगाव येथे बचत खाते क्र. 12461 असून ए.टी.एम.ची सुविधा आहे. तक्रारदार यांनी सदर ए.टी.एम. अॅक्सीस बँक गोकुळधाम ए.टी.एम. येथे पैसे काढण्यासाठी वापरले. दिनांक 28.3.2010 रोजी कार्डाचा वापर करुन रु.7,000/- काढण्यासाठी ए.टी.एम.चा वापर केला. त्यावेळी सदर मशिन मध्ये पैसे घ्या असा मेसेज आला पण पैसे बाहेर आले नाहीत.
2. तक्रारदार यांनी म्हटले की, अर्धा तास कार्ड अडकले त्यावेळी वॉचमन हजर होते. त्यावेळी वॉचमन यांनी मेन्टेनन्स टीमकडे फोन केला. त्यावेळी दोन तीन वेळा कॅन्सल प्रेस करा असा निरोप मिळाला. सदर कार्ड पैसे न येता रु. 7,000/- वजा करुन स्लीप बाहेर आली.
3. तक्रारदार यांनी दिनांक 29 मार्च, 2010 रोजी सा.वाले 2 कडे तक्रार दिली. तक्रारदार यांच्या मते अॅक्सीस बँकेने लॉग रिपोर्ट चुकीचा दिला. त्यात वेळ ओव्हरलॅप झाल्याचे दिसून येते. Tramsactoopn क्र. 9740 नंतर 9742 क्रमांक आला म्हणजे 9741 झाल्याचे दिसून येत नाही.
4. तक्रारदार यांनी म्हटले की, त्यांना अॅक्सीस बँकेने दिनांक 30.04.2010 रोजी पत्र पाठवून देखील उत्तर दिले नाही. तक्रारदार यांनी सी.सी.टीव्ही चे त्यावेळचे फुटेज सांगितले असता तोंडीच रु.1500/- द्या म्हणून सांगीतले.
5. तक्रारदार यांनी दिनांक 8.5.2010 रोजी सा.वाले क्र. 2 यांना तक्रार दिली व सा.वाले क्र. 1 च्या मुख्य कार्यालयास पत्र देण्यासाठी गोरेगाव शाखेत दिले. तक्रारदार यांनी दिनांक 11.6.2010 व 21.06.2010 रोजी पोष्टाने पत्र पाठवून सी.सी. टीव्ही फुटेज मिळण्यासाठी अर्ज दिला. तसेच ए.टी.एम. चे प्रमुख यांनी भेट घेतली.
6. तक्रारदार यांनी दिनांक 01.07.2010 रोजी बँकिंग लोकपाल यांचेकडे तक्रार नांदविली. त्यांनी खुलाशासाठी सारस्वत बँकेला पत्र पाठविले. त्यावेळी सारस्वत बँकेने कळविले की, सी.सी.टीव्ही फुटेज उपलब्ध नाही.
7. तक्रारदार यांनी आपल्या अर्जासोबत अॅक्सीस बँकेचा ए.टी.एम. मधील रिपोर्ट, अॅक्सीस बँकेला पाठविलेले पत्र, अॅक्सीस बँकेचे दिनांक 08.12.2010 चे पत्र, ग्राहक पंचायत, मुंबई यांचेकडून बँकेला पाठविलेले पत्र इत्यादी दाखल केले.
8. तक्रार दाखल करुन सा.वाले यांना नोटीस पाठविण्यात आली. सा.वाले क्र. 1 यांनी नोटीस मिळनही कैफियत दाखल न केल्याने मंचाने दिनांक 19.05.2012 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
9. सा.वाले क्र. 2 सारस्वत बँकेने आपले म्हणणे दाखल करुन, मजकूर परिच्छेद निहाय नाकारला. सा.वाला यांनी म्हटले आहे की, ग्राहकांची तक्रार अॅक्सीस बँकेच्या ए.टी.एम. मशीन संबंधी आहे व तक्रारदारांनी दिनांक 30.04.2010 रोजी त्या बॅकेस कळविले आहे. सा.वाले यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार बँकिंग लोकपाल यांनी दिनांक 09.09.2010 रोजी नामंजूर केली.
10. प्रस्तुत प्रकरणी तक्रार अर्ज, सा.वाला क्र. 2 यांनी दाखल केलेली कैफियत, पुरावा शपथपत्र, व उभय पक्षकारांनी दाखल केलेले सर्व पेपर्स यांचे सुक्ष्मपणे अवलोकन केले. तक्रारदार यांचे सा.वाला क्र. 2 या बँकेत बचत खाते असून त्यांना ए.टी.एम. ची सुविधा आहे हे मान्य आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी दिनांक 28.03.2010 रोजी अॅक्सीस बँकेला ए.टी.एम. चा वापर केला व पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार सारस्वत बँकेला मिळाल्याचे कैफियतीमध्ये मान्य आहे.
11. तक्रारदार यांनी पैसे न मिळता, रक्कम रु.7,000/- वजा झाल्याची तक्रार सा.वाला यांना केल्यावर दोन्ही सा.वाले यांनी त्यांच्या तक्रारी संबंधी योग्य ती सेवा देणे आवश्यक असताना सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते.
12. तक्रारदार यांनी दिनांक 28.03.2010 रोजी त्वरीत ए.टी.एम. केअरटेकर यांना रु.7,000/- न मिळाल्याचे व स.टी.एम. कार्ड अर्धातास लॉक झाल्याचे, रक्कम वजा झाल्याचे लेखी निवेदन देऊन त्यावर ए.टी.एम.च्या सुरक्षारक्षकाची सही आहे. तक्रारदार यांनी आपल्या पुरावा शपथपत्रात म्हणटले आहे की, सुरक्षा रक्षकांनी सदर मशीन योग्य नसल्याचे त्यांना सांगितले.
13. अॅक्सीस बँकेचा लॉग रिपोर्ट पाहिला असता दिसून येते की, Transaction क्र. 9740 नंतर Transaction क्र.9742 ची नोंद असून Transaction क्र. 9741 चा उल्लेख नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या कार्डाचा वापर करुन दिनांक 28, मार्च,2010 रोजी रु.7,000/- दुपारी 1.15 वाजता झाल्याचे दिसून येते. Transaction क्र. 9740 प्रमाणे दुपारी 1.13 मिनिटांनी रु.20,000/- काढल्याचे दिसून येते.
14. तक्रारदार यांचे कार्ड अर्धातास लॉग झाल्याचे म्हणणे सत्य असल्याचे स्पष्ट होते. कारण त्या मशिनमध्ये दु.1.15 नंतर 1.43 वाजता Transaction झाल्याचे लॉक रिपोर्टवरुन स्पष्ट होते व सदर Transaction यशस्वी झाले नसल्याचे दिसून येते.
15. तक्रारदार यांची तक्रार मिळाल्यावर अॅक्सीस बँकेने ए.टी.एम. चे सी.सी.टीव्ही फुटेजच्या आधारे तक्रारदार यांना योग्य उत्तर देणे आवश्यक होते. तथापी सदर बँकेने तक्रारदार यांनी पाठपुरावा करुन तसेच सारस्वत बॅंकेने सतत पाठपुरावा करुन देखील ई-मेलव्दारे सदर सी.सी.टीव्ही उपलब्ध नसल्याचे कळविले ही अनुचित व्यापारी प्रथा आहे.
16. तक्रारदार यांनी रक्कम वजा झाल्याबरोबर त्वरीत तक्रार केली व ती तक्रार योग्य असूनही अॅक्सीस बँकेने सी.सी.टीव्ही फुटेजसाठी रु.1500/- मागितल्याचे, अॅक्सीस बँकेने तक्रारदार यांना दिनांक 15.11.2010 रोजी पाठविलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी सदर रक्कम देण्याचे दिनांक 30.11.2010 च्या पत्राने अॅक्सीस बँकेला कळविल्यावर, सदर बँकेने दिनांक 08.12.2010 रोजी उत्तर पाठवून सी.सी.टीव्ही फुटेज तीन महीने असल्याचे सांगून उपलब्ध नसल्याचे सांगितले.
17. प्रस्तुत प्रकरणी दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते की, सा.वाला क्र. 1 यांनी तक्रारदार यांच्या तक्रारी संबंधी योग्य सेवा न देता अनुचित प्रथेचा अवलंब केला. सदर सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सातमोरे जावे लागले. तक्रारदार यांनी सा.वाला यांचेकडून एकूण रक्कम रु.56,000/- ची मागणी केलेली आहे.
18. तक्रारदारांना त्यांचे ए.टी.एम.मध्ये पैसे काढताना ज्या अडचणी आल्या व त्रास झाला व पैसे न मिळाल्याचे जो आर्थिक व प्रचंड मानसिक त्रास झाला व अॅक्सीस बँकेने सेवा देण्या संबंधी जी त्रुटी केली त्या बद्दल सा.वाला क्र. 1 अॅक्सीस बँक तक्रारदारांना एकूण रु.25,000/- देणे न्यायाचे आहे. सदर रक्कम आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्यात द्यावी न थ्दल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज, पूर्ण रक्कम मिळेपर्यत द्यावे.
19. मंच पुढील आदेश परीत करीत आहे.
आदेश
1. RBT तक्रार क्रमांक 142/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदार यांना रु.25,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्यात द्यावी न दिल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल
तारखेपासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज, द्यावे.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 17/11/2017