// कारणमिमांसा //-
4. मुद्दा क्र.1 बाबतः- विरुध्द पक्षांनी हे कबुल केले आहे की, दि.17.06.2013 रोजी तक्रारकर्त्याने त्याचे नावाने घेण्यांत आलेला रु.37,000/- चा धनादेश दि.17.06.2013 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 कडे जमा केला होता. परंतु त्यांचा बचाव असा की, तो धनादेश न वटवता परत आल्याने व तक्रारकर्ता तो घेण्यांस न आल्याने तो कुरियर मार्फत तक्रारकर्त्यास पाठविण्यांत आला होता. परंतु जोराचा पाऊस आल्याने दि.25.06.2013 रोजी तो धनादेश हरवला. धनादेश परत आल्या बाबतच्या मेमोची प्रमाणीत प्रत तक्रारकर्त्यास देण्यांत आली होती. वरील बचाव विचारात घेण्या सोबत हे साबीत करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षांची होती. त्यासाठी त्यांनी प्रोफेश्नल कुरियर, नागपूर यांना दि.04.07.2013 रोजी जे पत्र दिले त्याची प्रत दाखल केली, प्रमाणीत प्रत दिल्याबाबत कोणताही पुरावा विरुध्द पक्षांनी दाखल केलेला नाही. तसेच प्रोफेश्नल कुरियर यांच्या तर्फे शपथपत्र देखिल दाखल केलेले नाही. वास्तविक पाहता धनादेश जरी कुरियर मार्फत पाठविला असला तरी व्यवस्थीतरित्या तक्रारकर्त्यास पाठविण्याची जबाबदारी विरुध्द पक्षा सोबतच कुरियर कंपनीची सुध्दा येते. विरुध्द पक्षातर्फे असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही की, जोराचा पाऊस असल्याने प्रोफेश्नल कुरियरमधील इतर डाक सुध्दा हरवली होती. पाऊस जोराचा असल्याने डाक हरवली ही बाब स्विकरण्या योग्य नाही, कारण पावसात असलेली डाक सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी संबंधीत कंपनीवर येते. विरुध्द पक्षांनी त्या कंपनी विरुध्द काय कार्यवाही केली याचा पुरावा सुध्दा दाखल केलेला नाही. विरुध्द पक्षांची ही कृती सेवेतील त्रुटी ठरते त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन स्विकारावे लागेल. विरुध्द पक्षांच्या या कृतीमुळे तक्रारकर्ता धनादेश देणा-या व्यक्ति विषयी योग्य ती कायदेशिर कारवाई करु शकला नाही, याबाबतचे त्याचे कथन स्विकारावे लागेल.
5. तक्रारकर्त्याने धनादेशाची रक्कम रु.37,000/- 18%व्याजासह विरुध्द पक्षाकडून मागितले असले तरी ती देणे उचित ठरत नाही कारण तो धनादेश अनादरीत झालेला आहे व त्या व्यक्तिच्या खात्यात रु.37,000/- जमा नव्हते. ती रक्कम त्या व्यक्तिच्या खात्यात होती हे तक्रारकर्त्याने साबीत केले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता ही रक्कम विरुध्द पक्षाकडून घेण्यांस पात्र ठरत नाही. असे जरी असले तरी, वर नमुद केल्याप्रमाणे विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली असल्याने तक्रारकर्त्यास मानसिक त्रास सहन करावा लागला यामुळे तो नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र ठरतो व ती भरपाई करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची येते.
6. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 व 2 ला होकारार्थी उत्तर देण्यांत येते. खालिल आदेशाप्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येतो.
-// आ दे श //-
1. तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) त्यावर तक्रार अर्ज दाखल दि.04.06.2014 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत द्यावी.
3. वरील आदेशाचे मुदतीत पालन न केल्यास द.सा.द.शे.12% व्याज देय राहील.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास या तक्रारीचा खर्च रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) द्यावा.
5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.