Maharashtra

Nanded

CC/15/82

Smt. Swati Shailendra Surwe and othe 2 - Complainant(s)

Versus

Axis Bank Ltd. and other 2 - Opp.Party(s)

Adv. U. A. Paul

24 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/82
 
1. Smt. Swati Shailendra Surwe and othe 2
Wadwpuri Tq. Loha
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Axis Bank Ltd. and other 2
Near Bas Stop Kalamandir Nanded
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                          निकालपत्र 

                   ( दिनांक 24-07-2015 )

 

(घोषीत द्वारा- मा. श्री  आर. एच. बिलोलीकर, सदस्‍य  )

 

             अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द सेवेत त्रुटी दिल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.

 

1.          अर्जदार स्‍वाती शैलेंद्र सुर्वे ही वडेपूरी ता. लोहा जि. नांदेड येथील रहिवासी असून मयत शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांची पत्‍नी आहे. अर्जदाराच्‍या पतीने तो हयात असतांना गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍याकडे खाते उघडले. ज्‍याचा खाते क्र. 24037200809 असा आहे. सदर खाते काढतांना अर्जदाराच्‍या पतीस इंटरनॅशनल गोल्‍ड डेबिट कार्ड देण्‍यात आले होते. ज्‍याचा कार्ड नं. 4215 7231 8003 5412 असा आहे. सदर डेबीट कार्डाअंतर्गत कार्डधारकाचा म्‍हणजेच अर्जदाराच्‍या पतीचा रक्‍कम रु. 5,00,000/- चा वैयक्‍तीक अपघात विमा गैरअर्जदार 2 व 3 यांच्‍याकडे उतरविलेला होता.

 

2.          दिनांक 15.3.2012 रोजी शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांचा ट्रक-मोटार सायकल अपघातात मृत्‍यु झाला. त्‍याबद्दल सोनखेड पोलीस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा नोंदविलेला आहे. अर्जदार विमाधारकाच्‍या मृत्‍यु नंतर गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍याकडे आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह क्‍लेम फॉम दाखल केला आणि विमा रक्‍कमेची मागणी केली.  गैरअर्जदार क्र. 1 यांना अनेकवेळा विमा रक्‍कमेची मागणी करुन देखील गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. अर्जदाराने दिनांक 30.1.2015 रोजी वकीलामार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविली व इंटरनॅशनल गोल्‍ड डेबिट कार्ड अंतर्गत वैयक्‍तीक अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम रु. 5,00,000/- दयावे अशी मागणी केली. गैरअर्जदार 1 यांना सदर नोटीस मिळाली तरी पण अर्जदाराचा क्‍लेम देण्‍याचे गैरअर्जदाराने नाकारले. शेवटी दिनांक 14.2.2015 रोजी गैरअर्जदाराकडे जावून विम्‍याच्‍या रक्‍कमेची मागणी केली असता अर्जदाराने क्‍लेम गैरअर्जदाराकडे वेळेत दाखल केला नाही म्‍हणून नाकारला. जे की, अन्‍यायकारक आहे म्‍हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदारास वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम रु. 5,00,000/- त्‍यावर दिनांक 5.3.2011 पासून सदर रकम वसूल होईपर्यंत 12 टक्‍के व्‍याजासह अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्‍कम रु. 10,000/- देण्‍याचा आदेश करावा, अशी मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.

गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदार हे आपल्‍या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे दाखल केले.

गैरअर्जदार 1 चे लेखी म्‍हणणे  थोडक्‍यात  पुढील प्रमाणे आहे.

3.          अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मयत शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांनी दिनांक 20.8.2009 रोजी गैरअर्जदार बँकेमध्‍ये उघडलेल्‍या बचत खात्‍याचा क्र. 24037200809 असा नसून त्‍याचा खाते क्र. 318010100082554 असा आहे. गैरअर्जदार बँकेने संबंधीत खातेदारास रु.5,00,000/- अपघात विम्‍याची सोय असलेल्‍या इंटरनॅशनल गोल्‍ड डेबिट कार्ड नं. 4215 7231 8003 5412 Debit card key to usage booklet सह दिलेले आहे. गैरअर्जदार बँकेने गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनी सोबत विशेष करार करुन बँकेचे डेबिट कार्ड धारकासाठी अपघाती विमा योजनेची सोय केलेली आहे. मयत शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांच्‍या दिनांक 15.3.2012 रोजी झालेल्‍या अपघाती निधनाची माहिती गैरअर्जदार बॅकेस संबंधीतांनी दिनांक 31.1.2015 रोजी अर्जदाराचे वकील यांनी दिनांक 24.1.2015 रोजी पाठवलेली नोटीस मिळाल्‍यानंतर झाली. त्‍यापूर्वी गैरअर्जदार बँकेस खातेदाराच्‍या निधनाची माहिती नव्‍हती. अपघाती निधनाबाबत गुन्‍हयाची संपूर्ण कागदपत्रे दाखल करुन पुरावा देणे आवश्‍यक आहे. अर्जदाराने बँकेकडे कसलाही क्‍लेम दाखल केलेला नसल्‍यामुळे क्‍लेम लवकर मंजूर होईल असे गैरअर्जदार बँकेने कधीही आश्‍वासन दिलेले नाही. सुरक्षीततेच्‍या दृष्‍टीने बँकेने संबंधीत खातेदाराच्‍या व डेबिट कार्ड दिनांक 31.1.2015 रोजी गोठवले. तसेच अर्जदाराने पाठवलेल्‍या दिनांक 24.1.2015 रोजीच्‍या नोटीसचे उत्‍तर गैरअर्जदार बँकेने त्‍यांच्‍या वकिलामार्फत दिनांक 25.2.2015 रोजी अर्जदाराच्‍या वकिलांना पाठवून दिले. मयत खातेदाराने विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केलेले असल्‍यामुळे अर्जदार विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नसल्‍याचे कळविले. खातेदाराच्‍या निधनानंतर देखील अर्जदाराने मयताच्‍या नावाने असलेल्‍या बँक खात्‍याचा व डेबिट कार्डाचा दिनांक 01.01.2015 पर्यंत बेकायदेशीर वापर केला. डेबिट कार्ड विमा योजनेचा लाभ मिळविण्‍यासाठी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे खातेदाराने डेबिट कार्डाचा वापर त्‍याच्‍या अपघाती निधनापूर्वी 90 दिवसांच्‍या आत केलेला पाहिजे व तसेच खातेदाराच्‍या अपघाती निधनानंतर 60 दिवसांच्‍या आत अपघाती निधनासंबंधी कागदपत्रासह क्‍लेम फॉर्म भरुन गैरअर्जदाराकडे सादर करणे आवश्‍यक आहे. अर्जदाराने पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे पालन केलेले नाही त्‍यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज होण्‍याजोगा आहे. गैरअर्जदार बँकेने गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीस मयत शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांच्‍या निधनाबाबत विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र झाल्‍यास ती विम्‍याची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने घेतलेली आहे म्‍हणून गैरअर्जदार बँकेविरुध्‍द अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात यावी.

4.          गैरअर्जदार 2 व 3 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणे.

            अर्जदाराचा अर्ज वस्‍तुस्थितीला सोडून व ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या तरतुदीच्‍या विरुध्‍द व नैसर्गिक न्‍यायाच्‍या विरुध्‍द आहे त्‍यामुळे सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी. गैरअर्जदार विमा कंपनीने मयत शैलेंद्र रामचंद्र सुर्वे यांना कोणती विमा पॉलिसी दिलेली होती त्‍याची प्रत दाखल केलेली नाही अथवा सदर पॉलिसीचा नंबर किंवा काहीतरी माहिती देणे आवश्‍यक होते, जेनेकरुन विमा कंपनीला मयतास विमा पॉलिसी देण्‍यात आली होती किंवा नाही या बाबतची माहिती काढता येईल. परंतू अर्जदाराने तसा कोणताही पुरावा दिलेला नाही त्‍यामुळे गैरअर्जदार यांना कोणतीही संधी दिलेली नसल्‍यामुळे गैरअर्जदाराकडून सेवेत कोणतीही कमतरता होण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. अर्जदाराने विमा कंपनीकडून देण्‍यात आलेल्‍या पॉलिसी बाबत कसलाही कागदोपत्री पुरावा दिलेला नसल्‍यामुळे विनाकारण गैरअर्जदार कंपनीस दाव्‍यात पार्टी केलेले आहे म्‍हणून अर्जदाराविरुध्‍द कॉम्‍पेन्‍सेट्री कॉस्‍ट लावून अर्जदाराचा तक्रार अर्ज गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्‍द खारीज करण्‍यात यावा.

5.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्‍ही बाजुंचा युक्‍तीवाद ऐकला. दोन्‍ही बाजुंनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्‍पष्‍ट होतात.

 

6.          अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या त्‍याच्‍या डेबीट कार्डाच्‍या प्रतीवरुन स्‍पष्‍ट आहे. सदर टेबीट कार्ड हे गोल्‍ड डेबीट कार्ड असून त्‍याचा  नं. 4215 7231 8003 5412 असा आहे. अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, सदर कार्ड धारकासाठी पाच लक्ष रुपयाचा अपघाती विम्‍याचे संरक्षण दिलेले आहे. सदरचे अर्जदाराचे म्‍हणणे हे गैरअर्जदार बँकेस मान्‍य आहे.  गैरअर्जदार क्र. 2 बँकेने मंचासमक्ष दाखल केलेल्‍या Certificate of insurance चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, बँकेने गोल्‍ड डेबीट कार्ड धारकासाठी गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घेतलेली आहे. सदर पॉलिसी ही दिनांक 15.4.2011 ते 14.4.2012 या कालावधीसाठी असून त्‍याचा क्रमांक 11270046111300000001 असा आहे. अर्जदाराच्‍या पतीचा मृत्‍यु हा दिनांक 15.3.2012 रोजी झालेला असल्‍याने अर्जदार ही विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा विमा दावा त्‍यांच्‍याकडे अर्जदाराने दाखल केलेला नाही असे म्‍हटलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात अर्जदाराने मयत शैलेंद्र सुर्वे यांना कोणती विमा पॉलिसी दिली याबद्दल कोणतेही कागदपत्र दाखल केले  नसल्‍यामुळे विमा कंपनीस पुढे काही करता आले नाही, असे कथन केलेले आहे.  

7.          दोन्‍ही बाजुंनी मंचामध्‍ये दाखल झालेल्‍या कागदपत्रांची बारकाईने पाहणी केली असता सर्व कागदपत्र मंचात दाखल झालेली दिसून येतात. परंतू गैरअर्जदार यांना विमा दाव्‍याबद्दल निर्णय घेण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराने संबंधीत विमा कंपनीकडे केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                    दे

1.    अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2.    अर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसांच्‍या आत विमा कंपनीकडे क्‍लेम /विमा दावा दाखल करावा व गैरअर्जदार विमा कंपनीने त्‍यांच्‍याकडे विमा दावा दाखल झाल्‍यापासून 30 दिवसांच्‍या आत गुणवत्‍तेवर निर्णय घ्‍यावा.

 

3.    खर्चाबाबत आदेश नाही.

   

4.    आदेशाची पूर्तता झाल्‍याबद्दलचा अहवाल दोन्‍ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल

      करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्‍हा आदेशाच्‍या पूर्ततेच्‍या अहवालासाठी ठेवले जाईल.

 

5.     निकालाच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारास मोफत देण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.