जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 252/2008. प्रकरण दाखल तारीख - 16/07/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.सतीश सामते, - सदस्य. कैलास सुधाकरराव टाक, वय, 24 वर्षे, धंदा, व्यापार. रा. सराफा नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी,मार्फत व्यवस्थापक, अविवा टावर,सेक्टर रोड, गल्फ कोर्सच्या समोर, डिएलएफ फेस व्ही, सेक्टर 43 गुरगांव 122 002 (हरियाणा) गैरअर्जदार 2. अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी शाखा नांदेड, मार्फत व्यवस्थापक,कोठारी कॉम्पलेक्स, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.सजंयकूमार शर्मा. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी यांनी ञूटीची सेवा दिल्याबददल अर्जदाराने आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून पॉलिसी नंबर एलएफबी 1234159सन 2006 साली घेतली त्याबददल रेग्यूलर प्रिमियम रु.25,000/- व अतिरिक्त प्रिमियम रु.60,000/- भरले. यानंतर मार्च,2007 मध्ये रेग्यूलर प्रिमियम रु.25,000/- व अतिरिक्त प्रिमियम रु.60,000/-परत गैरअर्जदार यांचेकडे दिले, परंतु ही रक्कम अर्जदाराच्या खात्यात दि.28.6.2007 रोजी जमा दाखवलेली आहे. खरे तर ही रक्कम गैरअर्जदार यांनी 30 मार्च,2007 रोजी मिळालेले आहेत. अर्जदाराने अतिरिक्त रक्कम बॅलेन्स फंड व ग्रोथ फंड मध्ये 50-50 टक्के गूंतविण्यास सांगितले होते परंतु गैरअर्जदाराने जाणूनबूजून सस्पेन्स फंड मध्ये ती रक्कम ठेवली. सन 2006-07 मध्ये शेअर्सची मार्केट व्हॅल्यू वाढत होती.अर्जदाराने ती अतिरिक्त रक्कम बॅलेन्स फंड व ग्रोथ फंड मध्ये गूंतवली असती तरी अर्जदाराला रु.1,00,000/- निव्वळ नफा मिळाला असता. गैरअर्जदाराच्या चूकीमूळे अर्जदाराचे रु.1,00,000/- चे नूकसान झालेले आहे. अर्जदाराने दि.21.4.2007 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठवून नूकसान भरपाईची मागणी केली त्यांला उत्तर देताना गैरअर्जदाराने नूकसान भरपाई रु.360/- देण्याचे कबूल केले. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या संपूर्ण सदस्याचे रु.3932/- देण्याचे लेखी दिलेले आहे. अशा प्रकारे गैरअर्जदाराने ग्राहकास फसविले आहे. गैरअर्जदाराने खोटे सांगितले की, त्यांना गूंतवणूकी बददल कोणत्याही प्रकारची सूचना नव्हती. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना नूकसान भरपाई बददल रु.1,00,000/- व्याजासह मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केले आहे. अर्जदार यांचे तक्रार खोटी व कल्पोकल्पीत आहे. गैरअर्जदाराने कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेल्या विमा पॉलिसीमध्ये जे रेग्यूलर प्रिमियम व अतिरिक्त प्रिमियम भरल्याचे मान्य केले आहे. या बाबत बॅलन्स फंड 50 टक्के व ग्रोथ फंड 50 टक्के गूंतवणूक करायचे होते हे तक्रार अर्जात म्हटले आहे परंतु ही बाब खोटी आहे. विमा पॉलिसीत नमूद केलेल्या अटी व तरतूदीच्या कलम 22-1 च्या अनुंषगाने सदरहू विमा हप्त्याची रक्कम गुंतवणूकीसाठी आवश्यक निर्देश देणे असलेले सूचना पञ(इन्डोसमेंट रिक्वेस्ट फॉर्म-इआरएफ) दिलेले नव्हते व गैरअर्जदारातर्फे अर्जदाराकडून दि.27.6.2007 रोजी प्राप्त झालेले सूचनापञ सदरहून अतिरिक्त विमा हप्त्याची रक्कम गूंतवणूक सिक्यूअर फंडामध्ये करण्यात आली.याप्रमाणे वरील निवेदन पूर्णपणे असत्य आहेत असे म्हटले आहे. अर्जदाराचे नूकसान झाले या संदर्भात त्यांची कायदेशीर नोटीसला गैरअर्जदाराने उत्तर दिलेले आहे. अतिरिक्त विमा रक्कमा बाबत इआरएफ अर्जदाराने दिलेले नव्हते तरी सदरहू अतिरिक्त विमा रक्कम हप्त्याचे गूंतवणूकीचे सर्व फायदे दि.28.3.2007 पासून पूर्व लक्षी प्रभावाने देण्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने अतिरिक्त फंड रक्कम विमा हप्त्याची रक्कम उचलण्यासाठी अर्ज केला असताना गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे एन.ए.व्ही. ची रक्कम मान्य करुन रक्कम अर्जदाराना परत केली यावर अर्जदाराने कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही. अर्जदारांना रु.1,00,000/- नफा झाला असता व त्यांचे गैरअर्जदारानी नूकसान केलेले आहे या बाबी कल्पोकल्पीत आहेत. गैरअर्जदाराने आपल्या सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्हणून त्यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून आपली साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली व गैरअर्जदार यांनी सूध्दा पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी झाल्याचे अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी मार्च,2006 मध्ये रेग्यूलर प्रिमियम रु.25,000/- व अतिरिक्त प्रिमियम रु.60,000/- तसेच मार्च,2007 मध्ये परत तितकीच रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा केली हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतु सदरची रक्कम ही दि.28.6.2007 रोजी पर्यत अर्जदार यांचे खात्यात जमा झाली नाही म्हणजे सरळसरळ तीन महिने रक्कम गैरअर्जदार यांनी वापरली व गैरअर्जदार यांना देखील हे नाकबूल नाही परंतु गैरअर्जदार यांचा आक्षेप आहे की, अर्जदार यांनी ही रक्कम कशा प्रकारे गूंतवायची ही सूचना न दिल्यामूळे ही रक्कम त्यांना गूंतवता आली नाही. यात अर्जदार यांनी दि.27.3.2006 रोजीचे प्रपोजल फॉर्म लाईफबॉन्ड 5 दाखल केलेले आहे. यात रेग्यूलर प्रिमियम रु.25,000/- भरलेले आहेत. पॉलिसी नंबर एलएफबी-4589895 याप्रमाणे अर्जदाराने बॅलेन्स फंड मध्ये 50 टक्के व ग्रोथ फंडामध्ये 50 टक्के रक्कम गूंतविण्याची सूचना दिलेली आहे असे प्रपोजल फॉर्मवर स्पष्टपणे दिसून येते असे असताना गैरअर्जदार यांना सूचना दिली नाही म्हणणे योग्य नाही. Addendum for DGH products with Aviva दाखल केलेले आहे व यावर सूचनाचा कॉलम दिसून येत नाही. अर्जदाराने अविवा लाईफ इन्शुरन्स कल पर कंट्रोल दाखल केलेले आहे. यानुसार प्रिमियम अलोकेशन एन.ए.व्ही. व अलाउटेड केलेले यूनिटस यांची संख्या दिलेली आहे. गैरअर्जदाने अर्जदाराची रक्कम कूठे गूंतवायची यांची त्यांना मूभा होती व एखादया चांगल्या योजनेत रक्कम गूंतविल्यानंतर त्यातून होणारा नफा अर्जदार यांना देण्यात येणार होता. इन्डोसमेंन्ट रिक्वेस्ट फॉर्म दाखल केलेला आहे तो दि.1.1.2007 रोजीचा आहे. यावीषयी पॉलिसी नंबर एलएफबी 1234159 यासाठी स्पिच कंन्फॉरमेशन दि.12.1.2007 रोजी दिलेले आहे ते पञही या प्रकरणात दाखल आहे. याप्रमाणे बॅलेन्स फंड- निल, सेक्यूरिटी फंड-निल, ग्रोथ फंड मध्ये गूंतवलेली आहे. दि.27.6.2006 रोजीचे अर्जदारारचे इन्डोसमेंट रिक्वेस्ट फॉर्म वर टॉप ऑफ अमाउन्ट रु.60,000/- ते कशात गूंतवायचे यासाठी सेक्युअर फंडामध्ये 100 टक्के अशी सूचना अर्जदाराने दिलेली आहे.यानंतर अर्जदाराने टॉप ऑफ रक्कम ऐएसपी वापस मागितली होती. ती गैरअर्जदाराने त्यांना दिली आहे. गैरअर्जदारांनी पॉलिसी नंबर एलएफबी 1233901 यासाठी रु.469/-, एलएफबी 1233641 यासाठी रु.2047/-, एलएफबी 1233516 यासाठी रु.360/-, एलएफबी 1234159 यासाठी रु.469/-, एलएफबी 1234196 यासाठी रु.587/- अशी एकूण रु.3932/- अर्जदाराची सूचना नसली तरी पूर्व लक्ष प्रभावाने देण्याचे मान्य केले आहे व अर्जदार यांना ते मान्य नाही. ही रक्कम अर्जदाराने उचलल्याचे गैरअर्जदाराने म्हटले आहे. अर्जदाराने पॉलिसी सोबत रेग्यूलर प्रिमियन बाबतची स्पष्ट सूचना 2006 च्या पॉलिसीमध्ये दिलेली असताना तिन महिने ही रक्कम गैरअर्जदार यांचेकडे पडून होती पर्यायाने अर्जदार यांची रक्कम ही एखादया चांगल्या कंपनीत गूंतविली असती तर त्यांना निश्चितच नफा झाला असता. टॉप ऑफ अतिरिक्त रक्कम बददल अर्जदाराने सूचना दिली नाही हे गैरअर्जदाराचे म्हणणे खरे वाटते. परंतु या रक्कमा गूंतविण्याची सूचना दि.8.1.2007 रोजी दिलेली आहे. रक्कम 30 मार्च रोजी गैरअर्जदारांना मिळाली आहे. अतिरिक्त रक्कम बददल मार्च नंतर गैरअर्जदार यांना कोणतीही सूचना दिली नाही असे गैरअर्जदार यांनी दाखविले नाही किंवा अतिरिक्त प्रपोजल फॉर्म दाखल केला नाही. गैरअर्जदार हे पूर्वलक्ष प्रभावाने रक्कम देण्याची तयारी दर्शवित असलेली रक्कम कमी वाटते. अर्जदाराने रु.1,00,000/- व्याजासह मागितले आहेत परंतु एवढा फायदा कसा होऊ शकतो यांचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नाही. आता गैरअर्जदाराने रक्कम जर गूंतवलेली आहे फक्त तिन महिने ती रक्कम गूंतवली नाही तेवढेच नूकसान अर्जदाराचे होऊ शकते.रेग्यूलर प्रिमियम रक्कम गूंतवणूकी बददल स्पष्ट सूचना आहे. यात गैरअर्जदार यांनी वेगळया सूचनाची गरज का भासली हे कळत नाही. अर्जदार यांचे सूचनेप्रमाणे गैरअर्जदार यांनी रक्कम गूंतवीली नाही व उशिरा जमा केली म्हणजे सेवेत ञूटी केली हे दिसून येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत नूकसान भरपाई म्हणून रु.15,000/- व त्यावर दि.30.7.2007पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 3. मानसीक ञासा बददल रु.1000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |