Maharashtra

Kolhapur

CC/11/432

Jayant Shankar Tendulkar - Complainant(s)

Versus

Aviva Life Insurance Co.India ltd - Opp.Party(s)

S.J.Patkar

08 Feb 2012

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/432
1. Jayant Shankar Tendulkar227,E ward,Tarabai Park,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Aviva Life Insurance Co.India ltdC.E.O.,Regd.Office-2nd Floor,Prakashdip Bldg.7,Tolstoy Marg,New Delhi-110001 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.J.Patkar, Advocate for Complainant
A.L.Patil , Advocate for Opp.Party

Dated : 08 Feb 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.08/02/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला प्रस्‍तुत कामी वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला.
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- सामनेवाला हे कंपनी कायदयाखाली नोंदणीकृत कंपनी असून तिच्‍या कोल्‍हापूर जिल्‍हयात शाखा कार्यरत आहेत. सामनेवाला कंपनी आयुर्विमा बरोबरच विविध योजनाखाली ग्राहकाकडून मुदत बंद पैसे स्विकारणे व ते बँका व विविध कंपन्‍यांचे शेअरमध्‍ये गुंतवून मिळणारा नफा परतावा ग्राहकांना मुदतीनंतर देणे इत्‍यादी कार्य करत आहे. तक्रारदाराचा स्‍वत:चा उदयोग व्‍यवसाय असून ते विमा उदयोग व्‍यवसाय तसेच गुंतवणूक उदयोगाबाबत अज्ञान आहेत. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीच्‍या पेन्‍शन प्‍लस योजनेमध्‍ये दि.06/09/2005 रोजी पासून ते 06/09/2010 पर्यंत 5 वर्षाच्‍या कालावधीकरिता कंपनीच्‍या नियमाप्रमाणे नियमित ठरलेल्‍या मुदतीत ठरलेली रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.रक्‍कम रु.3,000/-चा अर्धवार्षिक हप्‍ता मुदती मध्‍ये धनादेशाव्‍दारे भरलेला आहे.दि.06/09/07 व दि.31/03/09 रोजी अर्धवार्षिक हप्‍ता रु.3,150/- सामनेवालांचे मागणीप्रमाणे चेकव्‍दारे भरणा केली आहे. दि.06/09/08 ते 22/03/10 च्‍या पर्यंत एकूण चार अर्धवार्षिक हप्‍ते कंपनीच्‍या वाढीव मागणीप्रमाणे रु.3,308/- प्रमाणे चेकव्‍दारे भरणा केलेली आहे. सदर पॉलीसीपोटी अर्धवार्षिक हप्‍त्‍याप्रमाणे एकूण रु.31,532/-सामनेवालांकडे जमा केलेले आहेत.सदर पेन्‍शन प्‍लस योजनेची मुदत दि.06/09/10रोजी संपत असता तक्रारदाराने सामनेवालांकडे गुंतवणूक मुदत रक्‍कमेसह झालेल्‍या वाढीव रक्‍मेची मागणी केली असता दि.10/09/10 रोजीचे पेमेंट अडव्‍हाईस पत्र व आरबीएस बँकेवरील रक्‍कम रु.29,964/- चा चेक पाठवून सदर योजनेतील गुंतवणूकीची परतफेड करत असलेचे दि.14/09/10 रोजीचे पत्राने कळवले आहे. वस्‍तुत: तक्रारदाराने रु.31,532/- इतकी रक्‍कम गुंतवूनही त्‍यापोटी रु.29,964/- इतक्‍या रक्‍कमेचा चेक पाठवून तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. सदर योजनेमध्‍ये पैसे गुंतवण्‍यासाठी आर्थिक लाभाचे आमिष दाखवून प्रोत्‍साहीत केले आहे. तसेच छापील पत्रकामध्‍ये गुंतवणुकदाराच्‍या सुरक्षेची व गुंतवणूक वाढीची आश्‍वासने दिली होती. सामनेवाला यांनी तक्रारदाराची रक्‍कम कोणत्‍या वित्‍तीय कंपनीमध्‍ये गुंतवली याची कोणतीही माहिती तक्रारदारास दिलेली नाही. तक्रारदाराने वाढीव रक्‍कमेची वारंवार मागणी करुनही वाढीव रक्‍कम बाजूलाच मात्र मुद्दलातही रक्‍कम कमी देऊन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची फसवणूक केलेने तक्रारदारास प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदारास रु.29,964/- इतकी रक्‍कम गुंतवणूकीची सरेंडर व्‍हॅल्‍यू म्‍हणून पाठवली आहे. तक्रारदाराने गुंतवणूक केलेली फरक रक्‍कम रु.1,568/- तसेच अपेक्षित गुंतवणूक वाढीची रक्‍कम मागणी करुनही त्‍यास दाद न दिलेने दि.06/05/11 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे. सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोचूनही रक्‍कम दिलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला कंपनीकडून मुद्दलातील फरक रक्‍कम रु.1,568/- अपेक्षित गुंतवणूक वाढीची रक्‍कम रु.12,600/-अशा प्रकारे एकूण रु. 14,168/- एवढी रक्‍कम देणेबाबत आदेश व्‍हावा तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च सामनेवालांकडून वसूल होऊन मिळावा तसेच सदर देय रक्‍कमेवर 18 टक्‍के दराने व्‍याज देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवालांचेकडील प्रिमियम रिसीट, रिन्‍यूअल रिमांइन्‍डर, पेन्‍शन प्‍लस पॉलीसीचे स्विकृती पत्र, पॉलीसी अकौन्‍ट स्‍टेटमेंट, अडव्‍हाईस, आरबीएस बँकेचा चेक, सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस व सदर नोटीसीची पोच पावती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेले त्‍यांचे लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये प्राथमिक मुद्दा काढणेबाबत विंनती केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा,1986कलम 26 नुसार फेटाळणेत यावी. प्रस्‍तुतची तक्रार कायदा व वस्‍तुस्थितीच्‍या दृष्‍टीने चालणेस पात्र नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. तसेच प्रस्‍तुत पॉलीसी तक्रारदाराने सरेंडर केलेली आहे व त्‍याप्रमाणे रक्‍कम अदा केली असलेने सामनेवाला सेवात्रुटीसाठी जबाबदार नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने पेन्‍शन प्‍लस प्‍लॅन योजनेअंतर्गत दि.23/08/05 रोजी प्रपोजल फॉर्म नं.पीपी 8163871 भरुन दिलेला होता. यासाठी 5 वर्षाचे कालावधीसाठी रु.3,000/- अर्धवार्षिक हप्‍ते भरणेचे होते. तक्रारदारास पॉलीसी क्र.PPI1187330 दि.06/9/2005 रोजी अदा केलेली आहे. पॉलीसीची कागदपत्रे दि.17/09/2005 रोजी पाठवून दिलेली आहेत. त्‍यासोबत पॉलीसीच्‍या अटी व शर्तीही सोबत दाखल केलेल्‍या आहेत. दि.26/04/2010 तक्रारदाराने सामनेवाला यांना केलेल्‍या ई-मेल नुसार त्‍यांनी गुंतवलेली रक्‍कम फायदयासह मुदतीनंतर परत मागणी केलेली आहे. त्‍यांचे विनंतीनुसार त्‍यास सदर पॉलीसी अंतर्गत पेन्‍शन नको होती. त्‍यास सामनेवाला यांनी ईमेल व्‍दारे उत्‍तर दिलेले असून प्रस्‍तुत पॉलीसीची मुदत दि.06/09/2010 रोजी संपत असलेचे कळवलेले आहे. दि.24/06/2010 रोजी प्रस्‍तुत पॉलीसीची सरेंडर व्‍हॅल्‍यू रु.29,293/- असलेचे कळवलेले आहे. तसेच प्रस्‍तुतची रक्‍कम ही दररोज होणा-या एनएव्‍हीच्‍या बदलावर अवलंबून आहे. दि.27/08/2010 रोजी दि.16/08/2010 चे तक्रारदाराचे पॉलीसी सरेंडर बाबतचे पत्र मिळालेले आहे. दि.08/09/2010 रोजी सामनेवाला यांनी प्रस्‍तुत पॉलीसी सरेंडर करुन घेतलेली आहे व रु.29,964/- इतकी रक्‍कम तक्रारदारास पॉलीसीच्‍या अटी व शर्ती क्र.8 प्रमाणे अदा केलेली आहे. दि.04/04/2011 चा तक्रारदाराने पॉलीसीच्‍या अंतर्गत केलेल्‍या रक्‍कमेबाबतचा ईमेल केलेला आहे.त्‍यास दि.06/04/2011रोजी सामनेवाला यांनी ईमेल व्‍दारे उत्‍तर दिलेले आहे. दि.27/08/2010 रोजी तक्रारदाराची पॉलीसी सरेंडर बाबत विनंती मिळालेने त्‍याप्रमाणे रु.29,964/- यापूर्वीच अदा केलेले आहेत. तक्रारदाराने दि.16/08/2010 रोजी पाठवलेले पत्र सामनेवाला यांना पाठवलेले आहे व त्‍यांने प्रस्‍तुत पॉलीसी सरेंडर केलेची विनंती केलेली आहे. सबब पॉलीसीच्‍या अटी व शर्तीतील आर्टीकल 8 नुसार प्रस्‍तुतची पॉलीसी सरेंडर केलेली आहे. आयआरडीए ने निर्देशित केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वाप्रमाणे प्रस्‍तुत पेन्‍शन प्‍लस प्‍लॅन पॉलीसीच्‍या अटी व शर्ती पाहूनच तक्रारदाराने स्विकारलेला आहे. प्रस्‍तुत पॉलीसीच्‍या अटी व शर्ती त्‍यास मान्‍य नसतील तर त्‍याने सदर पॉलीसी 15 दिवसांचे अवधीत परत करावयास हवी होती. त्‍याने तसे केलेले नाही. याउलट त्‍याने प्रस्‍तुत पॉलीसी सरेंडर केलेली आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास रु.29,964/- नमुद पॉलीसीची सरेंडर व्‍हॅल्‍यू म्‍हणून परत केली आहे. सबब सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदाराचा पेन्‍शन प्‍लसचा प्रपोजल फॉर्म, पॉलीसी शेडयूल, पेन्‍शन प्‍लस स्‍टॅन्‍डर्ड टर्मस अॅन्‍ड कंडिशन्‍स, ईमेल व तक्रारदाराचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा लेखी युक्‍तीवाद तसेच उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ?          --- होय.
2. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                      --- होय.
3. काय आदेश ?                                                               --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी प्राथमिक मुद्दा काढणेबाबत विंनती केलेली आहे. यामध्‍ये ग्राहक संरक्षण कायदा,1986 कलम 26 नुसार फेटाळणेत यावी. प्रस्‍तुतची तक्रार कायदा व वस्‍तुस्थितीच्‍या दृष्‍टीने चालणेस पात्र नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. तसेच प्रस्‍तुत पॉलीसी तक्रारदाराने सरेंडर केलेली आहे व त्‍याप्रमाणे रक्‍कम अदा केली असलेने तक्रारीस कारण घडलेले नाही असे प्रतिपादन केलेले आहे. सदर बाबींचा विचार करता प्रस्‍तुत कायदयाचे कलम 26 हे कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍टबाबत आहे. तक्रारदाराने व्‍देषमुलक व खोटी तक्रार दाखल केली असल्‍यास प्रस्‍तुत कलमानुसार रु.10,000/- इतका दंड तक्रारदारास ठोठवता येतो व सदर रक्‍कम सामनेवाला यांनी कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट म्‍हणून देणेत येते याबाबत आहे. प्रस्‍तुत बाबीबाबत अंतिम चौकशीअंतीच निर्णय करता येत असलेने सदर बाबीचा प्राथमिक मुद्दा काढता येत नाही. सबब सामनेवालांचा हा आक्षेप हे मंच फेटाळत आहे.
 
           सामनेवाला यांनी तक्रारदाराने त्‍यांचे पेन्‍शन प्‍लस पॉलीसी योजनेत रक्‍कम गुंतवलेचे मान्‍य केले आहे. तसेच प्रस्‍तुत गुंतवणीकीची मुदत दि.06/09/2010 रोजी संपत असलेचे मान्‍य केले आहे. तसेच तक्रारदाराने दि.16/08/2010 रोजी पाठविलेल्‍या पत्रानुसार प्रस्‍तुत पॉलीसी तक्रारदाराने सरेंडर केल्‍याने दि.08/09/2010 रोजी सरेंडर व्‍हॅल्‍यू रु.29,964/-तक्रारदारास परत केलेले आहेत. मात्र प्रस्‍तुत परतावा रक्‍कम बेकायदेशीर असलेने तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांचेविरुध्‍द तक्रारीस कारणही घडलेले आहे व प्रस्‍तुत तक्रार ही मुदतीत आहे. सबब प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचासमोर चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 व 3 :- सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेसोबत दाखल केलेले पेन्‍शन प्‍लस प्रपोजल फॉर्मचे अवलोकन केले असता रु.3,000/- अर्धवार्षिक हप्‍ते भरणेचे आहेत. तसेच त्‍याचा कालावधी 5 वर्षाचा आहे. प्रस्‍तुत पेन्‍शन प्‍लस प्‍लॅन वुईथ प्रॉफिटसमोर तक्रारदाराने टीक लावलेली आहे. यावरुन तक्रारदाराने पेन्‍शन प्‍लस वुईथ प्रॉफिट व पेन्‍शन प्‍लस युनिट लिंक्‍ड यापैकी पेन्‍शन प्‍लस वुइथ प्रॉफिट हा पर्याय निवडल्‍याचे दिसून येते. तसेच अर्धवार्षिक हप्‍ते चेकव्‍दारे भरणेचे नमुद केले आहे. बँक डिटेल्‍समध्‍ये तक्रारदाराचे चालू खाते क्र.0187 असून सदर खाते युनायटेड वेस्‍टर्न बँक लि. कोल्‍हापूर शाखा शाहूपुरी येथे असलेचे नमुद केले आहे. त्‍याचप्रमाणे नॉमिनेशन डिटेल्‍स व ऑक्‍यूपेशन डिटेल्‍सची माहिती नमुद केलेली आहे. फॉर्मखाली डिक्‍लरेशन, त्‍याखाली तक्रारदाराची सही व दि.23/06/05 तारीख नमुद आहे. तसेच इल्‍यूस्‍ट्रेशनबाबत दाखवलेचे व माहिती दिले असलेचे टीकमार्क केलेले आहे. दाखल पॉलीसी शेडयूलप्रमाणे रु.3000/- प्रमाणे अर्धवार्षिक हप्‍ते 5 वर्षाचे कालावधीत अदा करणेचे आहे. तसेच पॉलीसीची मुदत दि.06/09/2010 रोजी पूर्ण होत असलेचे नमुद केले आहे. अॅलोकेशन रेट 103 टक्‍के नमुद आहे. दि.16/08/2010 चे तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेल्‍या पत्रानुसार तक्रारदाराने पॉलीसी सरेंडर करणेबाबतची विनंती पत्र दिलेले आहे व यामध्‍ये मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम व अनुषंगीक रक्‍कमेची मागणी केलेली आहे.
 
           प्रस्‍तुत पॉलीसीची मुदत दि.06/09/2010 रोजी संपत आहे व दि.22/04/2010 रोजीचे ईमेलने तक्रारदाराचे पॉलीसी क्र;पीपीआय1187330 च्‍या परतावा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. सदर ईमेलनुसार I have paid all premium amount of above policy. I donot want pension against this policy. I request you to please refund my total amount alongwith benefit and oblige. अशी मागणी केलेली आहे. त्‍यास दि.26/04/2010 चे ईमेल ने सामनेवाला यांनी तक्रारदारास उत्‍तर दिलेले आहे. त्‍यानुसार प्रस्‍तुत पॉलीसीची मुदत दि.06/09/2010रोजी संपत असलेचे कळवलेले आहे.तसेच मॅच्‍यूरिटी बेनेफिटबाबत माहिती दिलेली आहे. तसेच पॉलीसी सरेंडर करणेबाबत सहीसह लेखी सरेंडर रिक्‍वेस्‍ट देणेबाबत कळवलेचे दिसून येते. त्‍यास अनुसरुन तक्रारदाराने दि.16/08/2010 रोजी सरेंडर रिक्‍वेस्‍ट दिलेली आहे. तक्रारदाराने दि.24/06/2010 रोजी सामनेवाला यांना पाठविलेल्‍या ई मेलला सामनेवाला यांनी उत्‍तर देऊन सदर दिवशी प्रस्‍तुत पॉलीसीची सरेंडर व्‍हॅल्‍यू ही रु.29,293/- असून एनएव्‍हीमध्‍ये दैनंदिन होणा-या बदलावर अवलंबून असलेचे नमुद केले आहे व सोबत पॉलीसी स्‍टेटमेंट दिलेबाबत नोंद केलेली आहे.
 
           वस्‍तुत: एनएव्‍ही ही युनिट लिंक्‍ड प्‍लॅनसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. सामनेवाला यांनीच दाखल केलेल्‍या प्रपोजल फॉर्मनुसार तक्रारदाराने पेन्‍शन प्‍लस युनिट लिंक्‍ड प्‍लॅन न निवडता पेन्‍शन प्‍लस वुईथ प्रॉफिट प्‍लॅन निवडलेला असलेचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते. तसेच प्रस्‍तुत पॉलीसीच्‍या Article-8 Full surrender clause मधील 1 ते 4  चे अवलोकन केले असता सदर क्‍लॉज खालीलप्रमाणे-
 
(1) Before the commencement of the third Policy Year the Policyholder shall be entitled to a surrender value calculated by reference to the Selling Price of all Accumulation Units attributable to any Additional Single Premium less and surrender penalty calculated in accordance with the Company’s surrender penalty chart.
 
(2) After the commencement of the third Policy Year and subject to the payment of Regular Premium during the first 2 Policy Years, the Policyholder shall be entitled to a surrender value calculated by reference to the Selling Price of all:
(a) Initial Units, less the Early Redemption Charge
(b) Accumulation Units attributable to Regular Premium.
(c) Accumulation Units attributable to any Additional Single Premium (less a surrender penalty calculated in accordance with the Company’s surrender penalty chart in force time to time if the surrender occurs within 3 years of the date of allocation of attributable Accumulation Units.)
 
(3) The valuation will be carried out as at the date of surrender and the Company shall be entitled to deduct its administrative costs of dealing with the surrender from any payment due.
 
(4) No partial surrender shall be permitted.
 
           प्रस्‍तुत आर्टीकलचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पॉलीसीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. तक्रारदाराने पॉलीसी परताव्‍याची केलेली मागणी ही दि.16/08/2010 रोजी मुदत संपते दि.06/09/2010 म्‍हणजे मुदत संपणेपूर्वी 22 दिवस अगोदर केलेली आहे व सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.10/09/2010 रोजी पेमेंट अडव्‍हाईस व आरबीएस बँकेचा चेक रु.29,964/- चा पाठवून दिलेबाबत दि.14/09/2010 चे पत्राने कळवलेले आहे. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराने दि.24/06/2010 रोजी केलेला ईमेल तसेच दि.16/08/2010ची सरेंडर रिक्‍वेस्‍ट याचा आधार घेऊन रु.29,964/-निश्चित केलेली आहे ती कशी केलेली आहे याचा खुलासा व स्‍पष्‍टीकरण लेखी म्‍हणणेत दिलेले नाही तसेच पॉलीसीच्‍या कोणत्‍या अटी व शर्तीप्रमाणे प्रस्‍तुत रक्‍कम निश्चित केलेली आहे हे दाखवून दिलेले नाही. प्रस्‍तुत आर्टीकल-8 चे अवलोकन केले असता तक्रारदाराने प्रस्‍तुत पॉलीसी मध्‍येच म्‍हणजे कालावधीपूर्व हप्‍ते न भरता सरेंडर केलेले नाही तर पॉलीसीचे संपूर्ण अर्धवार्षिक हप्‍ते सामनेवालांचे सुचनेप्रमाणे वेळोवेळी भरलेले आहेत हे दाखल पावत्‍यांवरुन निदर्शनास येते. तसेच प्रस्‍तुत पॉलीसीप्रमाणे प्रतिअर्धवार्षिक रु.3,000/-प्रमाणे ठरलेले असतानाही सामनेवालांचे सुचनेप्रमाणे रु.3,000/- पेक्षा जादा रक्‍कमा अदा केलेल्‍या आहेत. प्रस्‍तुत शेवटचा अर्धवार्षिक हप्‍ता दि.06/03/2010 रोजी देणेचा होता. त्‍याप्रमाणे संपूर्ण हप्‍ते तक्रारदाराने वेळोवेळी अदा केलेले आहेत. दाखल खातेउता-यावरुन रु.321,532/- सामनेवाला यांना मिळालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे -
 
Details of premium received since 6 September, 2005
 
            Date                                        Transaction Type                             Premium Received (Rs.)
 
06-SEPTEMBER-2005                      FIRST PREMIUM                                         3,000/-
17-FEBRUARY-2006                        REGULAR PREMIUM                                 3,000/-
09-OCTOBER-2006                           REGULAR PREMIUM                                 3,000/-
06-MARCH-2007                               REGULAR PREMIUM                                 3,000/-
06-SEPTEMBER-2007                      REGULAR PREMIUM                                 3,150/-
31-MARCH-2008                               REGULAR PREMIUM                                 3,150/-
06-SEPTEMBER-2008                      REGULAR PREMIUM                                 3,308/-
06-MARCH-2009                               REGULAR PREMIUM                                 3,308/-
18-SEPTEMBER-2009                      REGULAR PREMIUM                                 3,308/-
22-MARCH-2010                               REGULAR PREMIUM                                 3,308/-
                                                                                                       Total Rs.       31,532/-  
          
           वरीलप्रमाणे रक्‍कमा मिळूनही सामेनवाला यांनी वर विवेचन केलेप्रमाणे तक्रारदारास रु.29,964/- इतकी रक्‍कम आरबीएस बँकेचा चेक क्र.051910 अन्‍वये तक्रारदारास अदा केलेले आहेत. सदर रक्‍कम तक्रारदाराने स्विकारुन सामनेवालांकडे कमी परताव्‍याबाबत तक्रार नोंदवलेली आहे. तसेच दि.06/05/11 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविलेली आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये झालेल्‍या ईमेल संभाषणाचे अवलोकन सदर मंचाने केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराने गुंतवलेली मूळ मुद्दल रक्‍कमसुध्‍दा परत केलेली नाही. प्रस्‍तुत प्‍लॅन हा तक्रारदाराने पेन्‍शन प्‍लस प्रॉ‍फिट पर्याय निवडला असलेने सामनेवाला नफयासह मुळ मुद्दल देणेस बांधील आहे. तसेच तक्रारदाराने सदर पर्याय निवडला असलेने व सदर पॉलीसी अंतर्गत संपूर्ण अर्धवार्षिक हप्‍ते सामनेवालांचे सुचनेप्रमाणे अदा केलेले असतानाही सदर मुळ मुद्दल नफ्यासह देणेस बांधील असतानाही त्‍यापेक्षा कमी रक्‍कम अदा करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच नमुद पेन्‍शन प्‍लस प्रपोजल फॉर्मचे बारकाईने अवलोकन केले असता सदर फॉर्मखाली डिक्‍लरेशन घेऊन तक्रारदाराची सही घेतलेली आहे. यामध्‍ये कुठेही तक्रारदारास नमुद योजनेच्‍या अटी व शर्ती दिलेचे तसेच त्‍या तक्रारदारास समजावून सांगितलेबाबत कुठेही नमुद केलेले नाही. केवळ पॉलीसीच्‍या अटी व शर्ती दाखल केल्‍या म्‍हणजे त्‍या गुंतवणूकदाराला माहिती असेलच असे नाही. तसेच प्रस्‍तुतच्‍या अटी व शर्ती या सामनेवाला यांना लाभदायक अशा स्‍वरुपाच्‍या प्रिंटेड केलेल्‍या असतात. सदर अटी व शर्ती तक्रारदारास माहित असलेबाबतची वस्‍तुस्थिती सामनेवाला यांनी मंचाचे निदर्शनास आणून दिलेली नाही. तसेच परतावा केलेली रक्‍कम सामनेवाला यांनी कोणत्‍या अटी व शर्तीस अनुसरुन व काय पध्‍दतीने आकारणी केली हे तक्रारदाराने मागणी करुनही त्‍यास त्‍याची माहिती दिलेली नाही. तसेच मे. मंचासमोरही त्‍याचा स्‍पष्‍ट खुलासा सामनेवाला यांनी केलेला नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
           तक्रारदाराने भरलेली मूळ मुद्दल रक्‍कम रु.31,532/- पैकी वर नमुद चेक व्‍इदारे तक्रारदारास मिळालेली रक्‍कम रु.29,964/- वजा जाता उर्वरित रक्‍कम रु.1,568/-मिळणेस तक्रारदार पात्र आहे.तसेच तक्रारदाराने अर्धवार्षिक हप्‍त्‍याप्रमाणे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे रक्‍कमा भरलेल्‍या असलेने सदर रक्‍कमा वेळोवेळी भरले तारखेपासून ते दि.10/09/2010 पर्यंतचे कालावधीसाठी सदर रक्‍कमांवर द.सा.द.शे. 10 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहे. सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटीमुळे तक्रारदार झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                                              आदेश
 
 
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
 
2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास उर्वरित मुद्दल रक्‍कम रु.1,568/-(रु.एक हजार पाचशे अडूसष्‍ट फक्‍त) अदा करावेत.
 
3. सामनेवाला यांनी तक्रारदारास स्‍टेटमेंटप्रमाणे सदर अर्धवार्षिक हप्‍ता रक्‍कमा वेळोवेळी भरले तारखेपासून ते दि.10/09/2010 पर्यंतचे कालावधीसाठी सदर रक्‍कमांवर द.सा.द.शे. 10 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे. 

4. सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT