Maharashtra

Thane

CC/1008/2015

Mr Tarun Ravindra Saxena - Complainant(s)

Versus

Aviva life Insurance co Ltd Through Managing Director - Opp.Party(s)

Adv Poonam Makhijani

10 Feb 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/1008/2015
 
1. Mr Tarun Ravindra Saxena
At 401, Pratap Tower, Kolbad Road, Khopat, Thane west 400601
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Aviva life Insurance co Ltd Through Managing Director
At Sun Magnetica,1st floor,Near LIC,Louise Louise wadi Thane west 400601
Thane
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 10 Feb 2017
Final Order / Judgement

             (द्वारा मा. सदस्‍या – श्रीमती. माधुरी एस. विश्‍वरुपे)

1.          तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन रक्कम रु. 12,50,000/- एवढया किमतीची पॉलीसी घेतली.  पॉलीसीमधील अटी व शर्तीनुसार तीन वर्षाची एकत्रितपणे प्रिमियमची रक्‍कम रु. 7,50,000/- सामनेवाले यांचेकडे भरेणा केली.

 

2.          तक्रारदार यांनी विमा पॉलीसीचा 4 वर्षाचा कालावधी संपुष्‍टात आल्‍यानंतर पॉलीसी सरेंडर करण्‍याचे निश्चित केले.  तक्रारदार यांच्या वडीलांना विमा पॉलीसीची सरेंडरची व्हॅल्‍यु रक्‍कम रु. 8,43,831/- असल्‍याचे सामनेवाले यांचे कार्यालयातील कर्मचारी किर्ती यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी पॉलीसी सरेंडरची कार्यवाही पुर्ण केली.  तथापी सामनेवाले यांनी कोणतीही पुर्वसुचना न देता सरेंडर व्‍हल्यु चार्जेस पोटी 25% रक्‍कम व सर्विस चार्जेसची रक्‍कम मिळुन एकुण रक्‍कम रु. 2.4 लाख कपात केली.  तक्रारदार यांनी रक्कम रु. 7,50,000/- प्रिमियमचा भरणा करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सरेंडर व्‍हल्‍यु रु. 6,06,792/- एवढी रक्‍कम फक्‍त अदा केली.

 

3.          तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांची पॉलीसी सरेंडर करतांना सरेंडर चार्जेस व सर्विस चार्जेसच्‍या कपाती संदर्भात लेखी स्‍टेटमेंट दिले नाही.  तसेच सदर रक्‍कम रु. 2.4 लाख कपाती संदर्भातील कोणतीही माहीती पॉलीसी सरेंडर करण्‍यापुर्वी तक्रारदार यांना दिली नाही.  सामनेवाले यांची सदरची कृती व्‍यापारातील अनुचित पध्‍दती असल्‍याचे कारणास्‍तव तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

 

4.          सामनेवाले यांना मंचाची नोटिस प्राप्‍त होवुनही गैरहजर असल्‍यामुळे ता. 05/10/2016 रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याबाबतचे आदेश पारित करण्‍यात आले. 

 

5.          तक्रारदार यांची तक्रार दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे वाचन केले. तक्रारदार यांनी तक्रारीमध्‍ये नमुद केलेला मजकुर पुरावा शपथपत्र हाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस दिली. तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकला यावरुन मंच खालील निष्‍कर्ष काढत आहे. 

 

6.                             कारणमिमांसा

अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन 20 वर्षाच्या कालावधीकरीता (22/04/2010 ते 22/04/2030) तिन वर्षे वार्षिक प्रिमियम प्रत्‍येकी रु. 2,50,000/- प्रमाणे एकुण रक्‍कम रु.7,50,000/- प्रिमियम भरणा करुन रक्‍कम रु. 12,50,000/- एवढया किमतीची “Unit – Linked line Insurance Policy” ता. 22/04/2010 रोजी घेतली.  तक्रारदार यांनी विमा पॉलीसीची प्रत विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीसह मंचात दाखल केली आहे.

ब) तक्रारदार यांनी विमा पॉलीसीतील अटी व शर्ती नुसार सामनेवाले यांचेकडे विमा पॉलीसीच्‍या प्रिमियमची रक्कम रु. 7,50,000/- ए‍कत्रितपणे भरणा केली.

क) तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांनी विमा पॉलीसीच्या 4 वर्षाच्‍या कालावधीनंतर म्‍हणजेच जानेवारी 14 मध्‍ये सरेंडर करण्‍याचे निश्चित केले.  तक्रारदार यांचे वडील तक्रारदारांच्‍या सदर विमा पॉलीसीची सरेंडर व्‍ह्ल्‍युच्या रकमेसंदर्भात चौकशी करण्‍यासाठी सामनेवाले यांच्‍या कार्यालयात गेले होते.  सामनेवाले यांच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदार यांच्‍या विमा पॉलीसीची सरेंडर व्‍हल्‍यु रक्‍कम रु. 8,43,821/- असल्‍याचे सांगितले.  तथापी सरेंडर चार्जेसपोटी 25% रक्कमेच्‍या कपाती संदर्भात व सर्विस टॅक्‍स कपाती संदर्भातील माहीती दि‍ली नाही.  तथापी तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या विमा पॉलीसीमध्‍ये तसेच अटी व शर्तीमध्‍ये सरेंडर चार्जेस व सर्विस चार्जेस बाबतची माहीती दिल्‍याचे दिसुन येते.  त्‍यामुळे सामनेवाले यांनी या संदर्भात माहीती दिली नाही हे तक्रारदारांचे म्‍हणणे ग्राह्य धरणे उचित होणार नाही.  तक्रारदार यांना विमा पॉलीसीतील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे.

ड) तक्रारदार यांनी ता. 09/02/2015 रोजीच्‍या ई-मेलद्वारे सामनेवाले यांना तक्रारदार यांच्‍या सरेंडर व्‍हल्‍यु मधील रक्कम रु. 2.4 लाख रकमेची कपात पुर्वसुचना न देता सामनेवाले यांनी केल्‍याबाबत तक्रार केल्‍याचे दिसुन येते.  सामनेवाले यांनी ई-मेल द्वारे तक्रारदार यांना सरेंडर चार्जेस कपाती बाबतचा तपशील पाठवला असुन विमा पॉलीसीतील पान नं. 6 मधील अटी व शर्तीनुसार कपात केली असुन “There will be no surrender charges after completion of 5 Policy terms”  असे कळवले आहे.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेसमवेत पत्र व्‍यवहार झाल्‍याबाबतच्‍या ई-मेलच्‍या प्रती मंचात दाखल केल्‍या आहेत.

ई) तक्रारदार यांनी विमा पॉलीसी सोबत “Standard terms and condition” ची प्रत मंचात दाखल केली आहे या मधील कलम 5 खालील प्रमाणे आहे. 

5 – Surrender Value and Auto Foreclosure

a -  After completion of first three (3) policy years, this policy may be surrendered by the policyholder and a Surrender value shall be payable provided the Regular Premium due for at least one (1) Policy Year has been received by Us. The Surrender value will be equal to the Fund Value, as on the date of surrender, after deduction of Surrender Charges specified in the Schedule.

b) If the Regular Premium payment is discontinued after the Policyholder has paid Regular Premium for at least three (3) policy Years and if at anytime during the Policy Term the Surrender Value o Units pertaining to Regular Premium becomes equivalent to the Annualised Regular premium for the first Policy Year, then the policy shall automatically terminate and we shall send the Policyholder a notice of termination and pay the Surrender Value, if any, (as on the date of termination) calculated in accordance with the Article 5)a). 

तक्रारदार यांच्‍या विमा पॉलीसीमध्‍ये “Table of Charges” नमुद केले आहेत. या मधील कलम 9 खालील प्रमाणे आहे.

9 – service charges on units pertaining to Regular premium levied at the time of surrender of policy

वर नमुद केलेल्‍या विमा पॉलीसीतील कलम 9 व पॉलीसीच्‍या अटी व शर्ती मधील कलम 5 – a प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या सरेंडर व्‍हल्‍यु मध्‍ये 25% सरेंडर चार्जेसची कपात केल्‍याचे दिसुन येते. सबब सामनेवाले यांनी पॉलीसीच्‍या अटी व शर्ती नुसार सरेंडर चार्जेसची व सर्विस चार्जेसची कपात केल्‍याचे दिसुन येते. तसेच विमा पॉलीसीमधील “Table of Charges” मध्‍ये नमुद केलेल्‍या कलम 9 प्रमाणे “सर्विस चार्जेस” ची कपात केली आहे.

उ) तक्रारदारांची विमा पॉलीसी ही “Unit linked” पॉलीसी असुन सामनेवाले यांनी विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्ती प्रमाणे सरेंडर चार्जेस व सर्विस चार्जेसची कपात केली आहे.  तक्रारदार यांचेवर विमा पॉलीसीतील अटी व शर्ती बंधनकारक आहेत.  अशा परिस्थितीत सामनेवाले यांची सेवेतील त्रृटी दिसुन येत नाही असे मंचाचे मत आहे.

 

7.          सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे. या मंचातील कार्यभार पाहता इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .     

 

                                    आदेश

1) तक्रारदारांची तक्रार क्र. 1008/2015 नामंजुर करण्‍यात येते.   

2) खर्चाबाबत आदेश नाही.

3) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल विनाविलंब पाठविण्यात याव्यात.

4) संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.