Maharashtra

Nagpur

CC/174/2017

Shri Rajesh Shankarrao Dagde - Complainant(s)

Versus

Authorized Person, Paragon Traders, Royal Enfield, A Unit of Eicher Motors Ltd. - Opp.Party(s)

Adv. Dinesh Purohit

21 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/174/2017
( Date of Filing : 29 Mar 2017 )
 
1. Shri Rajesh Shankarrao Dagde
R/o. House No. 8C/25, T.V.Tower, Manavata Nagar, Seminary Hills, Nagpur 440006
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Authorized Person, Paragon Traders, Royal Enfield, A Unit of Eicher Motors Ltd.
Thiruvattiyur high road, Thiruvattiyur, Chennai-600019
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. Dinesh Purohit, Advocate for the Complainant 1
 ADV. PARAG D. ATHAWALE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 21 Mar 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍यश्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत केलेली बुलेट इलेक्ट्रा ब्लॅक क्रं. MH-31,EV-2151, इन्व्हॉइस क्रं. 22162 दिनांक 30.3.2015 अन्वये वि.प.क्रं. 1 यांचेकडुन रुपये 1,36,794/- एवढया किंमतीत टाटा फायनान्शीयल सव्हीसेस यांचेकडुन कर्ज काढुन  विकत घेतली.
  2. तक्रारदाराने विकत घेतलेले वाहन सुरुवातीपासून त्रास देत होते. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 30.3.2016 ला त्यांचे वकीलामार्फत नोटीस पाठविली व त्याव्दारे वाहनातील दोषाबाबत कळविले. परंतु वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 5.8.2016 ला ई-मेल पाठविला. त्यांस  वि.प.ने दिनांक 6.8.2016 रोजी उत्तर पाठविले. तकारदाराचे वाहनात पहिल्या दिवसापासून दोष होता व अनेकवेळा वाहनाची सर्व्हिसिंग करुनही वाहन व्यवस्थीत काम करीत नव्हते. तक्रारदाराने दिनांक 17.8.2016 ला वाहन त्रास देत असल्याबाबत वि.प.ला परत ई-मेल व्दारे तक्रार केली असता वाहनाची बॅटरी 4 वेळा बदलविण्‍यात आली. तसेच सायलेन्सर व शॉकअप सुध्‍दा बदलविण्‍यात आले. तसेच इंजिनमधील ऑइल गळत होते, सायलेन्सर जळुन काळे झाले होते. गाडीचा सेल्फ काम करीत नव्हता. परंतु वि.प.ने दरवेळी तक्रारदाराचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 7.9.2016 रोजी वि.प.ला नोटीस पाठविली. परंतु नोटीस प्राप्त होऊनही वि.प.ने तक्रारीची दखल घेतली नाही. परंतु दुरध्‍वनीवरुन वाहन बदलवून देण्‍याचे आश्‍वासित केले पण वाहन बदलवून दिले नाही. तक्रारदाराने दिनांक 1.3.2017 ला वि.प.ला परत नोटीस पाठविली परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही. तक्रारदाराचे वाहन रस्त्यावर चालविण्‍याइतके सुरक्षीत नव्हते. सदर वाहन वि.प.चे ताब्यात दिनांक 25.7.2016 पासुन आहे म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन  वि.प.ने तक्रारदाराने परिच्‍छेद क्रं.11 मध्‍ये नमुद केल्याप्रमाणे रुपये 1,88,764/- मिळावे. तसेच वाहन बदलवून द्यावे व  नुकसान ंभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प.क्रं. 1 व 2 यांना नोटीस काढण्‍यात आली असता नोटीस प्राप्त होऊन वि.प.क्रं. 1 व 2 तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर सादर केले.
  4. वि.प.क्रं.1 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारदाराने त्यांचे वाहनात निर्मीती देाष असल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे वाहनाचे निर्मात्याला प्रतीवादी करणे आवश्‍यक होते परंतु निर्मात्याला प्रतीवादी न केल्याचे कारणास्तव तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच तक्रारदाराने सदर वाहन टाटा फायनान्शीयल सव्हीसेस प्रा.ली. यांचे कडुन वाहन कर्ज काढुन विकत घेतले आहे व  सदर वाहन टाटा फायनान्शीयल सव्र्हीसेस प्रा.लि. यांचे कडे गहाणपत्र करण्‍यात आले आहे. त्यामूळे तक्रारदाराने कर्ज पूरवठा करणा-याला प्रतीवादी करणे आवश्‍यक होते त्यामूळे टाटा फायनान्शीयल सव्हीसेस प्रा.लि. यांना प्रतीवादी न केल्याचे कारणास्तव तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  5. तकारदाराने वि.प.यांचे कडुन रॉयल बुलेट इलेक्ट्रा ब्लॅक क्रं. MH-31,EV-2151, इन्व्हाइस क्रं. 22162 दिनांक 30.3.2015 अन्वये वि.प.क्रं. 1 यांचेकडुन रुपये 1,36,794/- एवढया किंमतीत विकत घेतली याबाबत वाद नाही. तक्रारदाराचे पूर्ण समाधान झाल्यावर सदर वाहन तक्रारदाराने दिनांक 7.4.2016 ला स्व‍िकारले. तक्रारदाराचे वाहनाला सुरुवातीला काही दोष असल्याचे .व दिनांक 30.3.2016 ला नोटीस पाठविल्याचे नाकारण्‍यात येत आहे. तक्रारदाराने दिनांक 5.8.2016 ला पाठविलेला ई-मेल वि.प.क्रं.1 ला मिळाल्याचे नाकारले आहे.
  6. सदर ई-मेल 
  7. तकारदाराचे वाहनातील बॅटरी बदलविल्यानंतर व वाहन व्यवस्थीत असल्याची खात्री केल्यानंतर वि.प.ने तक्रारदाराला त्याचदिवशी 18.50 मिनीटांनी ई-मेल व्दारे वाहन घेऊन जाण्‍याबाबत कळविले व त्याची प्रत निर्मात्याला पाठविली. तक्रारदाराने वाहनाची उचल न करता उत्तर पाठविले की, तो वाहनाची उचल करणार नाही त्याऐवजी त्यानी नवीन मोटारसायकल किंवा संपूर्ण वाहनाची किंमत परत मिळण्‍याची मागणी केली. तक्रारदाराने त्यांचे वाहन बेकायदेशीररित्या वि.प.चे दालनात ठेवले आहे. तक्रारदार वि.प.ला दिनांक 17.8.2016 पासुन वाहनाची उचल न करण्‍याचे तारखेपासून रुपये 300/- प्रती दिवस देणे लागतात.
  8. वाहनाची बॅटरी काम करीत नसल्या व्यतिरिक्त, बॅटरी चारवेळा बदलविण्‍यात आली, सायलेन्सर बदलविले, शॉकप व इंजिन ऑईल व वाहनाचे सेल्फ स्टार्ट बाबत लावलेले आरोप नाकारण्‍यात येत आहे.  तक्रारदाराने वि.प.निर्मात्यांने पूरविलेली चा मोफत्‍ सेवा दिनांक 21.5.2015, 28.7.2015, 28.10.2015, 1.12.2015 ची सेवा उपभोगली आहे. निर्मात्याने पूरविलेलया वॉरन्टी नुसार त्यांतील शर्ती व अटी नुसार वाहन विक्रीपासून (एक वर्ष किंवा 10,000 कि.मी या पेक्षा कमी) तकारदाराचे वाहनाची वॉरन्टी दिनांक 30.3.2016 ला संपली आहे. वॉरन्टी कालावधी संपल्यानंतर तक्रारदाराने दिनांक 23.4.2016, 26.7.2016 व दिनांक 16/18.8.2016 ला पेड सर्व्हिस उपभोगली आहे. तक्रारदाराने वाहन दिनांक 16.8.2016 पर्यत 10770 किं. मी पेक्षा जास्त चालविले आहे. वि.प. व तक्रारकर्ता यांचेमध्‍ये वाहन बदलवुन देण्‍याबाबत कधीही तोंडी आश्‍वासन दिले नाही. जर वि.प.यांनी निर्मीत केलेल्या वाहनात दोष असेल तर तक्रारदाराने सदर वाहनामध्‍ये दोष असल्याचा पूरावा सादर करावा जो सादर करण्‍यात तक्रारकर्ता अपयशी ठरला त्याकरिता तक्रारदाराने निर्मात्यांना आवश्‍यक पक्षकार करण्‍यास पाहिजे होते जे त्यांनी न केल्याने सदर प्रकरण खर्चासह खारीज करण्‍यात यावे.
  9. वि.प.क्रं.2 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की,  तक्रारदाराने वि.प.क्रं.1 अधिकृत विक्रेता यांचे कडुन दिनांक 2.4.2015 ला एक रॉयल इनफील्ड  बुलेट इलेक्ट्रा ब्लॅक रुपये 1,23,283.12 एवढया किंमतीत विकत घेतली. सदर वाहनाची आवश्‍यक फ्री-डीलेव्हीरी तपासणी केल्यानंतर तक्रारदाराला हस्तांतरीत करण्‍यात आले व त्यानंतर तक्रारदाराला वॉरन्टी बुकलेट पूरविण्‍यात आले. त्यातील काही वॉरन्टी गाईडलाईन खालीलप्रमाणे आहे. 

 

RE will replace or repair defective part(s) at their dealerships and authorised service centre, free of charge within a period of 24 months or 10,000/-kms from the date of sale, whichever earlier.

During the warranty period, RE’s obligations shall be limited to repairing/replacing part (s) of the vehicle for free, only if the part(s), on examination is deemed to have a manufacturing defect. Defective part(s) which have been replaced will become the sole property of RE.

The warranty shall be applicable only if all the 4 free services and periodic maintenance services are availed in the respective period/Kilometre ranges as per the schedule in the owner’s manual from RE dealers/authorised service centre.

(Warranty shall not apply to damages due to non-genuine parts, lack of proper maintenance, incorrect riding habits.

RE reserves the right of finally decide on all warranty claims.)

  1. तक्रारदाराने त्याचे वाहन पहिल्या फ्री सर्व्हिसिंगकरिता दिनांक 21.5.2015 ला वि.प.क्रं. 1 यांचेकडे आणले त्यावेळी त्यांचे ओडोमिटर रिडींग हे 440 कि.मी होते त्यावेळी तक्रारदाराचे वाहनाची तपासणी करण्‍यात आली व वाहनात कोणताही दोष नसल्याकारणास्तव वाहन सव्र्हीसिंग नंतर तक्रारदाराला हस्तांतरीत करण्‍यात आले. त्यानंतर तक्रारदाराने दुस-या फ्री सर्व्हिसिंगकरिता वि.प. यांचे कडे दिनांक 28.7.2015 ला आणले त्यावेळी वाहनाचे ओडोमिटर रिडींग हे 1403 असे होते. त्यावेळी तक्रारदाराचे वाहनामधे गेअर शिफ्टींग बाबत तक्रार होती व त्यांचे निराकरण करण्‍यात आले व वाहन तक्रारदाराचे समाधान झाल्यावर त्यांना हस्तातरीत करण्‍यात आले. दिनांक 12.10.2015 व 1.12.2015 ला तक्रारदाराचे वाहनाची तिसरी व चौथी फ्री सर्व्हिसिंग करण्यात आली त्यावेळी तक्रारदाराचे वाहनाबाबत कोणतीही तक्रार नव्हती.
  2. तक्रारदाराने त्यांचे वाहनाची तक्रार दिनांक 23.4.2016 ला केली त्यावेळी तक्रारदाराचे वाहनाचे ओडोमिटर प्रमाणे 8354 किं.मी.एवढे वाहन चालले होते. तक्रारदाराला पूरविण्‍यात आलेल्या ओनर मॅनुअल प्रमाणे तक्रारदाराने त्यांचे वाहनाची तपासणी रेग्युलर कालावधी मध्‍ये करावयाची होती. वॉरन्टी मॅन्युअल मध्‍ये दिलेल्या शेडयुलचे पालन केले नाही तर वॉरन्टी रद्द होऊ शकते. तक्रारदाराने त्यांचे वाहन 6500 चालविल्यानंतर सर्व्हिसिंग आणले व तक्रारकर्ता त्याचं वाहनाचे देखभाल करण्‍याचे दृष्‍टीने निष्‍काळजीपणा असल्याचे निर्देशनास येते. तक्रारदाराचे निष्‍काळजीपणामूळे तक्रारदाराचे वाहनाला क्षती होऊ शकते ही बाब तक्रारदाराचे निर्देशनास आणून देण्‍यात आली होती. परंतु वि.प.क्रं.1 यांनी तक्रारदाराचे वाहन वॉरन्टी कालावधीत असल्याने सर्व्हिसिंग करुन दिली. त्यानंतर तक्रारदाराने वाहन दिनांक 26.7.2016 ला सर्व्हिसिंग करिता आणले त्यावेळी त्यांचे वाहन ओडोमिटर नुसार 10,630 कि.मी. एवढे चालले होते. त्यावेळी तक्रारदाराचे वाहनाचे बॅटरी बाबत व सेल्फ स्टार्ट बाबत तक्रार होती. वि.प.क्रं.2 चे टेक्नीशीयनने वाहनाची तपासणी केली व तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण केले. त्यावेळी तक्रारदाराला वाहन ताब्यात घेण्‍याबाबत सांगीतले तेव्हा तक्रारदाराने वाहनाचा ताबा घेण्‍याचे नाकारले व त्यावेळी तक्रारदाराने नवीन वाहन देण्‍याची मागणी केली. तक्रारदाराची मागणी बेकायदेशीर व आकलनापलीकडील होती कारण तक्रारदाराने वाहन एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता व 10603 की.मी.चालविले होते. त्यानंतर दिनांक 5.8.2016 ला तक्रारदाराने वि.प.क्रं.2 चे सपोर्ट टीमला ई-मेल पाठविला व त्यात सदर वाहनात दोष असल्याचे कळविले व ते त्यांनी वि.प.क्रं.1 ला बदलवून देण्‍याकरिता परत केल्याचे कळविले. वि.प.क्रं.2 च्या सपोर्ट टीमने तक्रारदाला त्या अनुषंगाने 24 तासाचे आत इ-मेल पाठविला व त्या अन्वये वि.प.ने वाहनातील बॅटरीचा दोष दुरुस्त केला व बॅंटरी वॉरन्टीमधे कव्हर होत नाही. वॉरन्टीच्या मार्गदर्शक तत्वानुसार बॅटरी टायर टयुब वॉरन्टीमध्‍ये येते नाही व त्याबाबत संबंधीत निर्मात्याकडे तक्रार करावी लागते असे सूचविले. त्याकरिता वि.प.क्रं.2 जबाबदार नाही. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर दिनांक 16.8.2016 ला ई-मेल व्दारे वाहन घेऊन जाण्‍याबाबत सुचित केले असता . तक्रारदाराने दिनाक 17.8.2017 ला इ-मेल व्दारे वाहनाची उचल न केल्रयाचे कळविले. तक्रारदाराने त्यांचे ई-मेल व्दारे बॅटरी चार वेळा बदलविल्याचे व सायलेन्सर जळाल्याचे व शॉकअप बदलविल्याचे, इंजिन ऑइल गळती व सेल्फ स्टार्ट बंद असल्याचे कळविले व त्यात नमुद केले की वि.प.वाहन जरी दुरुस्त करेल तरी पण तो वाहनाची उचल करणार नाही. तो फक्रत नवीन बाईकची किंमत पर‍तीचा स्व‍िकार करेल. वि.प.कं.2 ने त्यांचे दिनांक 29.8.2016 चे ईमेल व्दारे तक्रारदाराला येऊन वाहनाची उचल करण्‍याबाबत विनंती केली कारण वाहन रोडवर चालविण्‍याचे स्थीतीत आहे परंतु तक्रारदाराने वाहनाची उचल करण्‍याचे नाकारले. त्यानंतर पुन्हा दिनांक 3.9.2016 ला ईमेल पाठविण्‍यात आला तक्रारदाराचेयांचे वाहन वि.प.चे परिसरात दिनांक 17.8.2016 पासुन बेकायदेशीपणे ठेवण्‍यात आले आहे.
  3. तक्रारदाराने दिनांक 30.3.2016 ला कायदेशीर नोटीस पाठविल्याचे व सदर नोटीस प्राप्त झाल्याचे नाकारण्‍यात येत आहे. वि.प.ने तक्रारदाराला वाहन बदलवुन देण्‍याचे कधीही आश्‍वासीत केले नाही. वि.प.ने तक्रारदाराचे वाहनाची तपासणी करुन तक्रारीचे निराकरण केले आहे व वाहन रोडवर चालविण्‍या योग्य आहे. वि.प.ने तक्रारदाराला नेहमी चांगली सेवा दिली आहे. तक्रारदाराचे वाहनात कोणताही दोष नाही त्यामूळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  4. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                             उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                       होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?       नाही
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

अवलंब केला आहे काय ?                                          नाही

  1. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प.क्रं.1 कडुन इनव्हॉइस क्रं.११२६२ दिनांक 30.5.2015 अन्वये वि.प.क्रं.2 यांनी निर्मीत इलेक्ट्रॉ बुलेट विकत घेतली याबाबत उभयपक्षात वाद नाही. त्यामूळे तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे. वि.प.क्रं.1 यांनी नि.क्रं.8 वर दाखल वॉरन्टी मॅन्युअल अंतर्गत खालील प्रमाणे नमुद आहे. तक्रारदाराने त्यांचे वाहनाची फ्री सर्व्हिसिंग दिनांक 21.5.2015, 28.7.2015,  1.12.2015 दिनांक 23.4.2016 ला केल्याचे दाखल नि.क्रं.9 वर  दाखल  दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते.
    1. RE will replace or repair defective part(s) at their dealerships and authorised service centre, free of charge within a period of 24 months or 10,000/-kms from the date of sale, whichever earlier.
    2. During the warranty period, RE’s obligations shall be limited to repairing/replacing part (s) of the vehicle for free, only if the part(s), on examination is deemed to have a manufacturing defect. Defective part(s) which have been replaced will become the sold property of RE.
    3. The warranty shall be applicable only if all the 4 free services and periodic maintenance services are availed in the respective period/Kilometre ranges as per the schedule in the owner’s manual from RE dealers/authorised service centre.
    4. Warranty shall not apply to damages due to non-genuine parts, lack of proper maintenance, incorrect riding habits.
    5. RE reserves the right of finally decide on all warranty claims.

15.   वि.प.ने तक्रारदाराचे वाहनातील दोषाचे वाहनाचे प्रत्येक फ्री सर्व्हिसिंगमध्‍ये निराकरण केल्याचे दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते व तो प्रत्येकी वेळी वेगवेगळा असल्याचे दिसुन येते. तक्रारदाराने दिनांक 26.7.2016 , 18.8.2016 ला पेड सर्व्हिसिंग उपभोगल्याचे नि.कं.9 वर दाखल दस्तऐवज क्रं.6,7, वरुन स्पष्‍ट होते. तक्रारदाराचे वाहनाची वॉरन्टी एक वर्षाची होती. वॉरन्टी कालावधीनंतर तक्रारदाराने त्यांचे वाहन दिनांक २६.७.२०१६ रोजी वि.प.चे वर्कशॉप मध्‍ये आणले त्यावेळी त्याचे वाहन 10630 कि.मी. चालले होते. तक्रारदाराने त्यांचे वाहनात दोष असल्या कारणास्तव वाहन वि.प.चे वर्कशॉपमध्‍ये ठेवले परंतु तक्रारदाराने त्यांचे वाहनात दोष असल्याबाबतचा तज्ञ अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही किंवा ते सिध्‍द करण्‍यात तक्रारकर्ता अपयशी  ठरला आहे.

16.   वि.प.ने तक्रारदाराचे वाहनाला वॉरन्टी कालावधीमध्‍ये वेळोवेळी सेवा देऊन वाहनातील दोषाचे निराकरण केले आहे व तो प्रत्येक वेळी वेगवेगळा होता व नियमित नव्हता त्यामूळे वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिली नाही असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.