Maharashtra

Nagpur

CC/521/2019

SAYYAD YUSUF SAYYAD BISMILLA - Complainant(s)

Versus

AUTHORITY OF CENTRAL BANK OF INDIA - Opp.Party(s)

SELF

05 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/521/2019
( Date of Filing : 19 Sep 2019 )
 
1. SAYYAD YUSUF SAYYAD BISMILLA
INDIAN AN INHABITANT, RESIDING AT HOUSE NO. 300, GITTIKHADAN, I.B.M. ROAD, NEAR BADI MASJID, BISWAR NAGAR, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. AUTHORITY OF CENTRAL BANK OF INDIA
AT CENTRAL BANK OF INDIAN BRANCH, 1ST FLOOR, VIJAY KAMAL APARTMENT, KATOL ROAD, UTKARSH NAGAR, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 05 Jul 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य,  श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून अॅटो हया वाहनाकरिता रुपये 1,19,000/- चे कर्ज दि. 25.08.2014 ला घेतले होते व सदरच्‍या कर्जाची परतफेड रुपये 2,039/- प्रतिमाह या ई.एम.आय. प्रमाणे  7 वर्षात करावयाची होती.  तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या बॅंकेत बचत खाते होते व त्‍यात तो दर महिन्‍याला अॅटो कर्ज परतफेडीचा मासिक हप्‍त्‍याकरिता रुपये 2,039/- नियमितपणे जमा करीत होता, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतेही कोणतेही कायदेशीर पत्र न देता त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रुपये 2,500/- त्‍याच्‍या कर्ज खात्‍यात वळते केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे बचत खाते हे एन.पी.ए.झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने इतर कुणास दिलेला दि. 26.11.2018 चा धनादेश हा रक्‍कमे अभावी वटविल्‍या गेला नाही व सदरची बाब ही कर्ज करारा विरुध्‍द आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या बचत खात्‍यात दि. 20.10.2018 ला रुपये 2,000/- जमा केले, परंतु  दि. 20.10.2018 ला रुपये 16,500/- जमा केलेले नाही आणि दि. 21.10.2018 ला ही रुपये 2,500/- खात्‍यात जमा केले नाही. ( बॅंक अधिका-यांनी त्‍यांचे पत्र क्रं.  Ro/opr legal /2018-2019/15 dated 04.03.2019 अन्‍वये दिलेले उत्‍तर )  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या बचत खात्‍यातून दि. 20.12.2018 ला 2  ई.एम.आय. रुपये 2,500/- वळती केले. परंतु कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रुपये 2,039/- एवढीच रक्‍कम वळती करणे आवश्‍यक होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून कर्ज करारनाम्‍याप्रमाणे रुपये 2,039/- ई.एम.आय.वसूल करावयाच्‍या एैवजी विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला कोणतेही पत्र न देता त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रुपये 2,500/- वळती केलेले आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे बचत खाते एन.पी.ए.झाले व त्‍याच्‍या विरुध्‍द वि.प.ने पीनल चार्जेस लावले व बॅंक लोक अदालत मध्‍ये तक्रार ही नोंदविली. विरुध्‍द पक्षाने कर्ज कराराचे उल्‍लंघन केलेले असून करारातील शर्तीचे पालन केलेले नाही. तसेच विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. सदरची नोटीस दि. 11.10.2019 ला प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 30.12.2019 ला पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

         अ.क्रं.       मुद्दे                                                        उत्‍तर

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक ठरतो काय?      होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

    अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ?        होय

3. काय आदेश ?                                          अंतिम आदेशानुसार

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून अॅटो हया वाहनाकरिता रुपये 1,19,000/- चे कर्ज दि. 25.08.2014 ला घेतले होते व सदरच्‍या कर्जाची परतफेड रुपये 2,039/- प्रतिमाह या ई.एम.आय. प्रमाणे  7 वर्षात करावयाची होती हे नि.क्रं.2(3) वरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या सदरच्‍या कर्ज करारनाम्‍यातील   परिच्‍छेद क्रं. 13 मध्‍ये नमूद आहे की, The said loan of Rs. 1,19,000/- shall be repayable by the Borrower/s by yearly/half/yearly/quarterly/monthly instalments each of Rs.2039/- the first of which shall be paid on the Sept 2014 day of and the second instalment on the Oct 2014 day of and so on till the entire amount of the said loan of Rs,1,19,000/-  is repaid in full with all interests costs,  charges, expanses.etc. whatsoever and the Borrower/s shall in the meantime in addition to the said instalments pay interest at the rate of 10.75 % per annum or at such other rate or rates as may at any time and from time to time be notified by the Bank to the Borrower/s with quarterly rests as on 31st March, 30th June, 30th September and 31st December.    
  2.      विरुध्‍द पक्ष बॅंकेच्‍या कर्ज करारनाम्‍यात व्‍याज दरात झालेल्‍या बदलाबाबत नमूद आहे. त्‍याचप्रमाणे नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत पुरविलेल्‍या माहितीनुसार अ.क्रं. 3 चे प्रश्‍नाच्‍या उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने  दि. 20.10.2018 ला रुपये 16,500/- आणि दि. 21.10.2018 ला रुपये 2,500/- खात्‍यात जमा केल्‍याचे नमूद केले आहे आणि खाते नियमित केल्‍याचे नमूद केले आहे. परंतु नि.क्रं. 2(5) वर दाखल मुळ बचत खाता क्रं. 3354280562 या पुस्तिेकेचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात दि. 20.10.2018 ला रुपये 20,000/- जमा करण्‍यात आले व त्‍यानंतर दि. 20.10.2018 ला अ.क्रं. 2,500/- व रुपये 16,500/- एवढी रक्‍कम वळती करण्‍यात आली व ही बाब विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत दिलेल्‍या माहितीशी विसंगत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  

 

  1.      तसेच विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून दि. 20.12.2018 ला अॅटो वाहन कर्जाचे 2  हप्‍ते रुपये 2,500/- प्रमाणे रक्‍कम वळती केलेली होती व  सदरच्‍या रक्‍कमे पैकी एक हप्‍ता रुपये 2,500/- तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यात दि. 21.12.2018 ला पूर्ववत जमा केलेली असल्‍याचे दिसून येते.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2(6) वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने  दि. 20.10.2018 ला त्‍याच्‍या बचत खात्‍यात रुपये 20,000/- जमा केले होते. विरुध्‍द पक्षाने दि. 20.10.2018 ला अ.क्रं. 2,500/- व रुपये 16,500/- वळती करुन ही तक्रारकर्त्‍याला माहिती अधिकार अंतर्गत चुकिची माहिती दिली ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेकरिता रुपये 5,000/- व शारीरिक, मानसिक त्रासाकरिता तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 3,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.