Maharashtra

Akola

CC/15/316

Krushna Pundlik Sontakke - Complainant(s)

Versus

Authorised Officer,I C I C I Lombard General Insurance - Opp.Party(s)

J T Ladhdha

03 Feb 2017

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/316
 
1. Krushna Pundlik Sontakke
R/o.Tapdiya Nagar,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Authorised Officer,I C I C I Lombard General Insurance
Deepak Chowk, Station Rd.Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Feb 2017
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 03.02.2017 )

आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार

1.         सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.

    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडून त्‍याच्‍या मालकीच्‍या हिरो होन्‍डा  एम.एच. 30/ए.एच.3019 चा विमा, पॉलिसी क्र. 3005/22697320/  10872/000, नुसार, दि. 22/4/2014 ते 21/4/2015 या कालावधी व रु. 38,080/- करिता, प्रिमियम रु. 1095/- भरुन काढला होता.  सदर वाहन दि. 8/5/2014 रोजी अकोला येथील सर्कीट हाऊस मधुन चोरीला गेले.  या बाबतची तक्रार पोलिस स्‍टेशन, सिव्‍हील लाईन अकोला येथे त्‍याच दिवशी  नोंदविण्‍याकरिता पुरुषोत्‍तम पुंडलीक सोनटक्‍के गेले असता,         15-20 दिवस चौकशी करण्‍यास सांगितले, सदर वाहन न सापडल्‍याने दि. 22/5/2014 रोजी एफ.आय.आर.क्र.171/2014 नुसार अज्ञात व्‍यक्‍ती  विरुध्‍द गुन्‍हा नोंदविण्‍यात आला.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने संपुर्ण मुळ कागदपत्रांसह विरुध्‍दपक्षाकडे गाडी चोरी गेल्‍या बाबतची सुचना दिली. तक्रारकर्ता हा गरीब कुटूंबातील असल्‍यामुळे व त्याला कायद्याचे पुरेसे ज्ञान नसल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्दक्षाकडे ताबडतोब सुचना देऊ शकला नाही.  तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक कागदपत्रे  विरुध्‍दपक्षाकडे जमा केल्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने दि. 23/3/2015 रोजीचे दावा फेटाळल्‍याबाबतचे पत्र तक्रारकर्त्‍याला पाठविले.  त्‍यामध्‍ये, वाहन हे दि. 8 मे 2014 रोजी चोरीला गेले व एफ.आय.आर. हा 22/5/2014 ला लिहल्‍या गेला, तसेच विमा कंपनीला वाहन चोरीला गेल्‍यापासून 33 दिवसानंतर सुचना देण्‍यात आली, अशी कारणे दिली. वास्‍तविक पाहता, तक्रारकर्त्‍याने चोरी बाबतची सुचना पोलीस स्‍टेशनला त्‍याच दिवशी दिली होती, परंतु पोलिस स्‍टेशनने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या तोंडी निर्देशानुसार वाहन शोधण्‍याचा सल्‍ला दिला होता, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने आपल्‍या वाहनाची सखोल इतरत्र चौकशी करुन त्‍या नंतर पोलीस स्‍टेशन मध्‍ये तक्रार नोंदविली.  अशा प्रकारे विरुध्‍दपक्षाने सेवा देण्‍यास न्‍युनता दर्शविली, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजुर करण्‍यात यावी.  तक्रारकर्त्‍याचा मोटार दावा क्र. MOT03856807 हा पुर्णतः मंजुर करुन तक्रारकर्त्‍याला पॉलिसीनुसार विमाकृत रक्‍कम रु. 38,080/- व्‍याजासह  देण्‍याचा आदेश व्‍हावा.  विमा दावा 3 महिन्‍याचे आत न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला रु. 200/- प्रति दिवसाप्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 10,000/- व खर्चापोटी रु. 5000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.

विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब :-

2.       विरुध्दपक्षाने सदर प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप अमान्य केले व असे नमुद केले की,चोरी गेलेल्‍या  वाहनाबाबत नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता विरुध्‍दपक्षाच्‍या कोणत्‍याही शाखा कार्यालयात जाण्‍याची आवश्‍यकता नाही.  ग्राहक सेवा केंद्रावर दुरध्‍वनीद्वारे विचारणा केली असता, आवश्‍यक असलेली कागदपत्रे पोस्‍टाने विरुध्‍दपक्षाच्‍या पत्‍त्‍यावर पाठविण्‍यास दावा योग्‍यतेनुसार मंजुर केला जातो. तक्रारकर्त्‍याने गाडी चोरीला गेल्‍यावर लगेच पोलिसांकडे तक्रार करावयाची होती, मात्र तक्रारकर्त्‍याने उशीरा एफआयआर केल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले.  निदान त्‍यानंतर तरी लगेच विमा कंपनीस अवगत करणे अपेक्षीत होते, मात्र एफआयआर दिल्‍यानंतर तिन महिन्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीकडे दावा अर्ज सादर केला.  या विलंबाकरिता त्‍याच्‍याकडे कोणतेही स्‍पष्‍टीकरण नाही. तक्रारकर्त्‍याचे वाहन दि. 8/5/2014 रोजी चोरीला गेले, तक्रारकर्त्‍याने तथाकथीत घटनेचा रिपोर्ट सिव्‍हील लाईन्‍स पोलिस स्टेशन मध्‍ये दि. 22/5/2014 रोजी दिला, तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास दि. 10/7/2014 रोजी वाहन चोरी गेल्‍याबाबत कळविले.  त्‍यानंतर दि. 21/8/2014 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडे वाहन चोरी बाबत दावा अर्ज पाठविला.  तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशन मध्‍ये रिपोर्ट दिल्‍यानंतर तब्‍बल तिन महिने अधिक कालावधीनंतर विरुध्‍दपक्षाकडे क्‍लेम फॉर्म दाखल केला आहे, त्‍यामुळे विहीत प्रक्रियेनुसार विरुध्‍दपक्षाला घटनेबाबत चौकशी करण्‍याकरीता चौकशी अधिकारी नेमणे शक्‍य झाले नाही.  तक्रारकर्त्‍याने  केलेले आरोप अनाठायी असून खोटे व बिनबुडाचे आहेत व म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.   

3.   त्यानंतर  उभय पक्षाने तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4          तक्रारकर्ते यांची तक्रार, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले सर्व दस्‍तएवेज, विरुध्‍दपक्ष यांचा लेखी जबाब व उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद  यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देऊन पारीत केला.  

      उभय पक्षात वाद नसलेल्‍या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांचे मालकीचे वाहन हिरोहोंडा स्‍प्‍लेंडर क्र. एम.एच 30 एएच 3019 चा विमा विरुध्‍दपक्षाकडे काढलेला होता. विमा कालावधी बद्दल वाद नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्ते विरुध्‍दपक्षाचे ग्राहक आहे, या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे.

      उभय पक्षाला हे मान्‍य आहे की, तक्रारकर्ते यांचे वरील वाहन दि. 8/5/2014 रोजी चोरीला गेले व त्‍याबद्दलचा पोलिस रिपोर्ट तक्रारकर्त्‍याने दि. 22/5/2014 रोजी दिला. तसेच चोरी गेलेल्‍या सदर वाहनाबाबत विरुध्‍दपक्षाकडून नुकसान भरपाई मिळणेबाबतचा विमा दावा अर्ज दि. 21/8/2014 रोजी पाठविला. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचा सदर विमा दावा अर्ज दि. 23/3/2015 रोजीच्‍या पत्राअन्‍वये NO Claim करुन कारणासहीत नाकारला तो खालील प्रमाणे,

Reference Claim No MOT03856807 against Two Wheeler Package Policy No 3005/90162772/00/B00 against bearing vehicle registration number MH-30-AH-3019

We wish to inform you that we have received the documents submitted by you for processing of your claim.  On the basis of scrutinizing the documents and further surveying the fact of the claim, we regret out inability to honor the claim for further process due to the below mentioned reasons:

Your above mentioned vehicle was stolen on 08th May 14 and FIR for the same has been lodged on 22nd May 14.  The FIR for the stolen vehicle is lodged after 14 days of the theft of the vehicle.  This is violation of terms & conditions of insurance Policy.  The FIR should have been immediately lodged after the theft.  The Motor insurance Policy issued to you states-in case of theft or criminal act which may be the subject of claim under the policy the insured shall give immediate notice to the Police and cooperate with the company in securing the conviction of the offender.

We have to further draw your attention that you have intimated claim to insurer after 33 days of date of loss.  This is violation of policy condition.  After the incidence took place, the claim should have been immediately lodged with the insurer.  As per policy conditions-Notice shall be given in writing to the Company immediately upon the occurrence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the Company shall require.

In the circumstance, you are therefore informed that the above captioned claim as made by you hereby stands as ‘No Claim’

    तक्रारकर्त्‍याच्‍या मते विरुध्‍दपक्षाने त्‍यांचा विमा दावा चुकीचे कारण दाखवून नाकारला व नियमानुसार 3 महिन्‍याचे आंत निकाली काढला नाही.  त्‍यामुळे ही सेवा न्‍युनता आहे.  तसेच तक्रारकर्त्‍याला पोलिस कैफियत देण्‍यास व विरुध्‍दपक्षाकडे विमा दावा अर्ज दाखल करण्‍यास कोणत्‍या कारणामुळे उशिर झाला ते तक्रारीत नमुद केले आहे व हे कारण सबळ आहे.  त्‍यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजुर करावी

          विरुध्‍दपक्षाचा युक्‍तीवाद, त्‍यांच्‍या विमा दावा नाकारणारे दि. 23/3/2015 च्‍या पत्रानुसार आहे.  अशा परिस्थितीत मंचाचे मत असे आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या चोरी गेलेल्‍या वाहनाबाबत पोलिस कैफियत व विरुध्‍दपक्षाकडे नुकसान भरपाई मिळणेबाबत विमा दावा अर्ज करण्‍यास विलंब केला आहे. परंतु विरुध्‍दपक्षाने किंवा तक्रारकर्त्‍याने रेकॉर्डवर सदर पॉलिसीची पुर्ण प्रत दाखल केलेली नाही.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने सदर पॉलिसीच्‍या कोणत्‍या नियमानुसार हा दावा फेटाळला व तक्रारकर्त्‍याने पॉलिसीच्‍या कोणत्‍या अटी शर्तींचा भंग केलेला आहे,  हे विरुध्‍दपक्षाने पॉलिसी प्रत रेकॉर्डवर दाखल करुन सिध्‍द केले नाही.  परंतु तक्रारकर्ता अशा परिस्थीतीत विरुध्‍दपक्षाकडून फक्‍त वाहनाची IDV रक्‍कम रु. 38,080/- मिळण्‍यास पात्र आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या इतर मागण्‍या  फेटाळण्‍यात येतात.

    सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत केला.

                                ::: अं ति म  आ दे श  :::

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास, तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत चोरी गेलेल्‍या वाहनाची विमा रक्‍कम रु. 38,080/- ( रुपये अडतिस हजार अंशी फक्‍त ) अदा करावी.
  3. सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांच्‍या आंत करावी.
  4. तक्रारकर्त्‍याच्‍या इतर मागण्‍या फेटाळण्‍यात येत आहेत.
  5. न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.  

सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.